Category

Show more

Full Text about डेव्हिड रिकार्डो ( David Recardo ) in Marathi

डेव्हिड रिकार्डो ( David Recardo ) : - 

डेव्हिड रिकार्डो यांनी १८१७ मध्ये " The Principles of political Economy and Taxa tion " यांनी ग्रंथामध्ये आर्थिक विकास विषयक विचार मांडले . तसे पाहिलो असता रिकार्डोने देखील आर्थिक विकासाचा वेगळा सिद्धांत मांडला नाही . सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अॅडमस्मिथ यांनी आर्थिक विकासाच्या दृष्टिने जे विचार मांडले त्याचीच पुन्हा विस्ताराने मांडणी करण्याचे कार्य रिकार्डोनी केले . त्यांनी फक्त वितरणविषयक व मूल्यविष्यक सिद्धांताची मांडणी अधिक प्रभावीपणे केली आहे.

अॅडमस्मिथ यांनी मांडलेली जी ग्रहिते आहेत . त्याचाच गृहिते आधार डेव्हिड रिकार्डो यांनी आपल्या सिद्धांतात घेतला आहे . 

  1.  पूर्ण स्पर्धा 
  2.  अन्हासी उत्पतीची अपरिहार्यता 
  3.  नैसर्गिक वेतन दर , 
  4.  नफा व भांडवल संचय यातील संबंध ,
  5.   जमिनीचा पुरवठा स्थिर आहे . 
  6. मजुराची मागणी भांडवल संचयावर अवलंबून असते .
  7.  अन्नधान्यासाठी सर्व जमिन वापली जाते .
  8.  श्रम व भांडवल हि बदलती उत्पादके आहेत . इत्यादी .

 आर्थिक रचनेतील प्रमुख गट : रिकाडचे आर्थिक विकासाचे प्रारूप तीन गटावर आधारित आहे . या तीन गटांनी भूमिका महत्वाची आहे असे रिकार्डोने मानले आहे . हे गट म्हणजे जमीनदार , भांडवलदार व श्रमिक वर्ग आणि या घटकातच राष्ट्रीय उत्पन्नाचे वितरण होते असे देखिल मानले आहे . या घटकांना अनुक्रमे खंड नफा व मजुरी या स्वरूपामध्ये मोबदला मिळतो . व्याजाचा समावेश नफ्यामध्ये होतो असे रिकार्डीने मांडले आहे . भांडवलदार , जमिनदार व श्रमिक या तीन वर्गामध्ये समाजाची विभागणी करून आर्थिक विकासामध्ये या घटकाचे स्थान काय आहे .. याचे स्पष्टीकरण निकार्डोनी पुढील प्रमाणे केले आहे .. 

  •  भांडवलदार : 

भांडवलदार हा विकासाच्या प्रक्रियेमध्ये दुहेरी स्वरूपाची भूमिका पार पाडीत असतो . एक म्हणजे उत्पादनाच्या साधनाचे वाटप देशामध्ये योग्य रितीने करणे . कोणत्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक केली असता अधिक फायदा होईल याचा शोध घेणे आणि त्या क्षेत्रामध्ये गुंतवणूक करणे . यामुळे विविध क्षेत्रामध्ये मिळणारा जो नफा मिळतो . त्यात समानता निर्माण होते . सर्व क्षेत्राचा संतुलित विकास होण्यास मदत होते . दुसरे महत्त्वाचे कार्य म्हणजे आर्थिक विकासाच्या प्रक्रियेस गती देणे. भांडवलदारला जो नफा मिळतो त्या नफ्याचा वापर गुंतवणूक करण्यासाठी भांडवलदार करित असतात. त्यामधून उत्पादन वाढीस चालना मिळून आर्थिक विकासाचा वेग वाढण्यास मदत होते असे डेव्हिड रिकार्डोंचे मत आहे .

  •  जमिनदार : 

भांडवलदाराबरोबर जमिनदार देखील आर्थिक विकासामध्ये महत्वाची / भूमिका बजावीत असतो असे रिकार्डोंचे मत आहे . जमिनदाराचा मोबदला खंड असतो . भूमि या घटकाचा पुरवठा मर्यादित असतो . सुरुवातीला एकुण जमिनीपैकी कांही सुपीक जमीन लागवडीखाली आणली जाते . उत्पादन काढले जाते . परंतु जसजशी लोकसंख्या वाढत जाते तसतसी अन्नधान्याची गरज देखील वाढते . ही वाढती गरज पूर्ण करण्यासाठी अधिक अन्नधान्याचे उत्पादन करावे लागते . हे करण्यासाठी दुय्यम दर्जाच्या जमिनीचा वापर करणे भाग पडते . परंतु अशा जमिनीची सुपिकता कमी असते . त्यामुळे उत्पादन घटत्या प्रमाणात मिळते . खर्च वाढतो , अन्नधान्याच्या किंमती वाढतात . श्रेष्ठ दर्जाची जमिन मिळावी म्हणून भांडवलदारामध्ये स्पर्धा लागते . त्यामुळे जमिनदाराला खंडाच्या रूपाने मिळणारा मोबदला वाढतो व अन्नधान्याच्या किंमती देखील वाढतात असे रिकार्डोचे मत आहे . 

  • श्रमिक :

 श्रम हा सुद्धा एक आर्थिक विकासाचा महत्त्वपूर्ण घटक आहे . मजुरीच्या स्वरूपामध्ये श्रमिकाला मोबला मिळतो . समाजातील तीन वर्गापैकी संख्येने मोठा असणारा हा वर्ग आहे . श्रमिक वर्गाकडे उत्पादनाची साधने नसतात . श्रमिकाला जे वेतन मिळते ते वेतननिधी आणि श्रमसंख्या यावर आधारित असते . वेतनदराचे दोन प्रकार असतात असे रिकार्डोने सांगितले आहे . ते म्हणजे ' बाजारातील वेतन दर ( MWR ) आणि दुसरा ' नैसर्गिक वेतनदर ' ( NWR ) . तसेच वेतनदर हा त्यात्या काळातील रूढी परंपरेनुसार ठरतो व तो सर्वसाधारणपणे ' नैसर्गिक वेतनदरा ' इतका असतो . जेंव्हा बाजारातील वेतनदर नैसर्गिक वेतन दरापेक्षा अधिक असतो . तेंव्हा देशातील लोकांचे उत्पन्न वाढते . खर्च करण्याची क्षमता देखील वाढते , अधिक लोकांचे विवाह होतात , लोकसंख्य वाढते , शेवटी श्रमपुरवठा वाढतो . आणि उलट जेव्हा बाजारातील वेतनदर ' ( MWR ) नैसर्गिक वेतनदरापेक्षा ' ( NWR ) कमी होतो . तेव्हा लोकसंख्या कमी होते व श्रमपुरवठा देखील कमी होतो आणि वेतनदराची पातळी वास्तविक वेतन दराच्या पातळीला राहील.


भांडवलदार जमिनदार श्रमिक



Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English