महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी - प्रार्थना समाज , आर्य समाज आणि सत्यशोधक समाज
महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा चळवळी प्रार्थना समाज , आर्य समाज आणि सत्यशोधक समाज याच्या विषयी माहिती व्यापाराच्या निमित्ताने आलेल्या इंग्रजांनी या देशात आपली सत्ता प्रस्थापित केली. पुढे ते राज्यकर्ते बनले. त्यांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात नव्या युगास प्रारंभ झाला. इंग्रजांबरोबर ख्रिश्चन मिशनरीही महाराष्ट्रात दाखल झाले. ख्रिश्चन मिशनरी म्हणजे ख्रिश्चन धर्माच्या प्रसाराचे कार्य करणारे लोक. ख्रिश्चन धर्मप्रसार करणाऱ्या संस्थांना 'मिशन' आणि धर्मप्रसाराचे कार्य करणाऱ्या व्यक्तींना 'मिशनरी' म्हटले जाते. या मिशनऱ्यांनी देशभर सेवाभावी मार्गाचा अवलंब करून मोठ्या चिकाटीने ख्रिश्चन धर्माचा प्रचार व प्रसार केला. याचबरोबर त्यांनी सामाजिक सुधारणा करण्याचाही प्रयत्न केला. जातिनिर्मूलन, शिक्षण, स्त्रियांचे वेगवेगळे प्रश्न, आरोग्यविषयक जागृती, आदिवासी व गरीब लोकांच्यासाठी केलेले कार्य अत्यंत मौलिक स्वरूपाचे आहे. थोडक्यात, मिशनऱ्यांनी गरिबांच्या मुलांच्यासाठी शाळा सुरू केल्या. दीनदुबळ्यांसाठी आरोग्यसेवा पुरवल्या, मोफत औषधोपचार केले, रोगपीडितांची सेवा केली. दुष्काळ, महापूर, सा...