सामाजिक व्यक्तीमत्व - Personality
व्यक्तीमत्व (Personality) प्रश्न १ :- सामाजिक व्यक्तीमत्व म्हणजे काय? उत्तर : प्रस्तावना :- व्यक्तीचे अंतरंग हा सामाजिक मानसशास्त्राचा महत्वाचा अभ्यासविषय आहे. व्यक्तीमत्वाच्या अभ्यासाशिवाय हा शास्त्र पूर्ण होत नाही. दैनंदिन व्यवहारात व्यक्तीमत्व हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो. उदा:- एखाद्या माणसाचे व्यक्तीमत्व किती आकर्षक आहे. किंवा त्याला काहीच आकर्षक व्यक्तीमत्व नाही. व्यवहारिक भाषेत एखाद्या सुंदर किंवा देखण्या व्यक्तीला आकर्षक व्यक्तीमत्व आहे असे म्हटले जाते. पण ते शास्त्रीयदृष्ट्या चूकिचे आहे. म्हणजेच या ठिकाणी व्यक्तीमत्वाचा अर्थ मर्यादित व चुकिच्या अर्थाने घेतला जातो. केवळ व्यक्तीचे बाह्य सौंदर्य म्हणजे व्यक्तीमत्व नाही तर त्या व्यक्तीच्या वर्तनामागील व्यक्तीमत्वाची रुपरेषा म्हणजे सामाजिक व्यक्तीमत्व होय. व्यक्तीमत्वाचा अर्थ : "व्यक्तीमत्व या शब्दास इंग्रजीमध्ये Personality असे म्हणतात. Personality हा इंग्रजी शब्द Persona या लॅटीन शब्दापासुन बनलेला आहे. Persona या शब्दाचा अर्थ अस्पष्ट, असंदिग्ध आहे. Persona या शब्दाचा अर्थ मुखवटा असा आहे. व्यक्तीमत्व म्...