स्त्रियांच्या समस्या (Problems of Women) - Social problems in Contemporary India
स्त्रियांच्या समस्या (Problems of Women) प्रश्न १ :- लिंग भेदभावाची कारणे व स्वरूप स्पष्ट करा. लिंग भेदभाव करण्याची कारणे व स्वरूप विषद करा. (Causes of Gender Discrimination) लिंग भेदभाव करण्यामागील कारणे व स्वरूप सांगा. उत्तर : प्रस्तावना :- भेदभावाचे अनेक प्रकार देशपरत्वे वेगवेगळे पाहावयास मिळतात. आर्थिक भेदभावामुळे सामाजिक भेदभाव निर्माण होते. तसेच वर्ग, दर्जा व सत्ता या आधारावर फेदभाव आढळते. यापैकी दर्जाची भेदभाव ही लिंग भेदभावशी संबंधित आढळते. सामाजिक गुणविशेषतील फरक आणि जीवनपद्धतीमुळे श्रेष्ठ-कनिष्ठता प्राप्त होते. तेव्हा दर्जाची भेदभाव आहे असे म्हटले जाते यात सामाजिक दर्जा अपेक्षित आहे. भारतात लिंगाच्या आधारावर स्त्री-पुरुष भेदभाव पाहावयास मिळते. पुरूष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ, तर स्त्रिया कनिष्ठ दर्जाच्या हे परंपरागत रीतीने मान्य झालेले आढळते. स्त्री-पुरुषांतील भेदभाव म्हणजे लिंग भेदभाव समजली जाते. समाजातील दर्जा हा लिंगानुसार निश्चित होतो. समाजिक भूमिकादेखील त्यानुसार ठरविल्या जातात. भारतात पितृसत्ताक पद्धती असल्याने कुटुंबात पुरुषांचा अधिकार असतो. वंश पित्याच...