The nature, structure, meaning, and interpretation of history / इतिहासाचे स्वरूप , संरचना, अर्थ, व व्याख्या आणि संपूर्ण माहिती
घटक १ : इतिहासाचे स्वरूप व संरचना ह्या घटकांच्या अभ्यासानंतर आपल्याला इतिहासाचा अर्थ, स्वरूप व व्याख्या कळेल. इतिहासाचे स्रोत कळतील. इतिहासाचे महत्त्व व गरज समजेल. इतिहासातील तत्वे: अहिंसा, समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचे महत्त्व व स्वरूप कळेल. इतिहासातील संरचनांचा अर्थ, उपयोग व अध्यापनातील वापर स्पष्ट होईल. प्रास्ताविक विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा अर्थ स्पष्ट करताना कोणत्याही दोन माणसांचे एकमत होत नाही. १९व्या शतकापूर्वीच्या इतिहासाचे स्वरूप जर आपण पाहिले ना, तर आपल्याला इतिहास साहित्याचाच एक भाग वाटतो. शास्त्रीय दृष्टी, सत्य त्यात आढळत नाही. १९व्या शतकापासून मात्रे हा दृष्टिकोन बदलला बरं का! इतिहासाचा शास्त्रोक्त दृष्टीने विचार व्हायला लागला आणि चिकित्सक दृष्टीही निर्माण झाली. इतिहासाचा समावेश सामाजिक शास्त्रांत होतो आणि सामाजिक शास्त्रे ही मानवी जीवनातून उदयाला आली आहेत. पण मानवी जीवनाशी थेट आणि घनिष्ट संबंध असलेला विषय जर कोणता असेल ना, तर तो इतिहासच होय. कारण इतिहास मानवी जीवनप्रवाहाचे यथार्थ दर्शन घडवितो. इतिहास हा एखाद्या विषयाचा भूतकाळातून आलेला अखं...