समकालीन भारतातील सामाजिक समस्या (Social problems in Contemporary India) - परिचय (Introduction)
समकालीन भारतातील सामाजिक समस्या परिचय (Introduction) प्रश्न १ :- सामाजिक समस्येची संकल्पना स्पष्ट करून सामाजिक समस्येचे स्वरूप सांगा. किंवा सामाजिक समस्येचा अर्थ सांगुन त्याचे स्वरूप विषद करा. (Meaning & Nature of Social Problems) सामाजिक समस्येच्या व्याख्या सांगुन सामाजिक समस्येच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा. उत्तर : प्रस्तावना :- सामाजिक समस्या सार्वत्रिक आहेत. अर्थात सामाजिक समस्याच्या स्वरूपात कालमानानुसार अंतर दिसून येते. कांही दशकापूर्वी समस्या नसलेला प्रश्न सामाजिक समस्या होतो. उदा. भारतात १९५० पूर्वी वाढती लोकसंख्या ही समस्या नव्हती. १९५० नंतर दोन तीन दशकात लोकसंख्या वाढ ही समस्या बनली. तसेच सामाजिक परिवर्तनाने नव्या समस्या निर्माण होतात. उदा. मद्यपान, अंमली पदार्थाचे सेवन, गुन्हेगारी, बेकारी, दारिद्र्य, दहशतवाद, भ्रष्टाचार पूर्वी गर्भपात गुन्हा समजला जात असे. आज गर्भपातास कायदेशीर मान्यता असल्याने गर्भपात ही समस्या होणार नाही. सामाजिक समस्या मानव समाजाशी संबंधीत असतात. सामाजिक समस्या समाजातील स्थिती आहेत. ज्याचे निर्मुलनाकरीता सामूहिक कृती आवश्यक आहेत. ज्यावर सामूहिक उपाययो...