सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues) - (Social problems in Contemporary India)
समकालीन भारतातील सामाजिक समस्या सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues) प्रश्न १ :- धार्मिक अल्पसंख्याकाची संकल्पना सांगून अल्पसंख्यांकांची वैशिष्ट्ये व उदिष्ट्ये स्पष्ट करा. (Causes & Problems of Religious Minorities ) धार्मिक अल्पसंख्यांक यावर निबंध लिहा. उत्तर : प्रस्तावना :- प्रत्येक समाजात त्या समाजातील विविध समूहात, घटकात धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक घटकाधारावर ऐक्य आवश्यक आहे. समाज विघटित होऊ नये म्हणून लोकाचे सहअस्तिवाचे, सहमतीचे शांततेचे संबंध अपरिहार्य आहेत. परंतु सामाजिक भेद, सांस्कृतिक विविधता, राजकीय विरोध, आर्थिक विसंवाद आणि एैतिहासिक शत्रुत्व असेल तर ऐक्य असत नाही. भारतात मुस्लिम, दलित, आदिवासी यांचे धार्मिक, सांस्कृतिक भाषिक, प्रादेशिक विविधतेने त्यांचे ऐक्य आणि एकात्मतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतीय समाज जाती, धर्म जमात, प्रदेश, भाषा, संस्कृती वर्गात विभागला आहे. अल्प संख्याकाच्या समस्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेताना आर्यानी विषम श्रेणीरचना, जाती निर्माण केल्या. विवाह निषेध, अन्ननिषेध, व्यवसायावर निर्बंध घातले. तसेच भारतात मुस्लिम ख्रिश्चन आ...