Consumer's Behaviour - उपभोक्त्याचे वर्तन
Consumer's Behaviour Economics - प्रा. स्टॅन्ली जेव्हॉन्स प्रा. स्टॅन्ली जेव्हॉन्स यांच्या मते, वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय. प्रस्तावना सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तणुकीशी संबंधित असते. व्यावहारिक दृष्टीने प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन-सामग्रीच्या सहाम्याने आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असते. सारे तर, मनुष्याच्या गरजा अमर्यादित आहेत. त्यामुळे सर्व मानवी गरजा एकाचवेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. परंतु विशिष्ट गरज एखादया निश्चित वेळी पूर्णपणे भागविता येते. उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास म्हणजेच उपयोगिता विश्लेषण हे आपल्याला महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी उपभोक्त्याकडून गरजा भागवण्याचे कसे प्रयत्न केले जातात त्याचे स्पष्टीकरण देते. साधारणपणे, उपयोगिता म्हणजे वस्तूची उपयुक्तता होय. परंतु अर्थशास्त्रानुसार उपयोगिता म्हणजे वस्तूमधील गरज पूर्ण करण्याची शक्ती होय. प्रा. स्टॅन्ली जेव्हॉन्स यांच्या मते, "वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय." प्रा. स्टॅन्ली जेव्हॉन्स उप...