पर्यावरणावर होणारे विकासाचे परिणाम (Development Effects on Environments)
पर्यावरणावर होणारे विकासाचे परिणाम (Development Effects on Environments) पर्यावरण अर्थशास्त्राचा परिचय सांगुन भुमी धूप आणि प्रदुषन यावद्दल थोडक्यात माहीती सांगा. किंवा जमिनीची दुर्दशा होण्यामागची कारणे काणती.. भूमी प्रदूषण म्हणजे काय ते सांगुण भूमी प्रदुषणाची कारणे सांगा ? उत्तर : पर्यावरण अर्थशास्त्र (Introduction of the Environmental Economics) : आज जगातील प्रत्येक व्यक्तीला आपला आर्थिक विकास झाला पाहिजे व आधुनिक तंत्रज्ञानाची फळे आपणास चाखावयास मिळाली पाहिजेत असे वाटत आहे. परंतु आर्थिक विकास आणि आधुनिक तंत्रज्ञान याचा पर्यावरणावर फार मोठा परिणाम होतो. म्हणून आर्थिक विकासासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करीत असताना त्याचा पर्यावरणावर विपरीत परिणाम होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. मानवाच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यावरणाचा समतोल राखणे फान महत्त्वाचे आहे. मानव आणि पर्यावरण यातील संबंध फार पुरातन स्वरूपाचे आहेत. मानवाला निसर्गता बुध्दीमत्ता, कल्पनाशक्ती, स्मरणशक्ती सारखे गुण प्राप्त झाल्यामुळे इतर सजीवांच्या तुलनेत मानवाचे पर्यावरणातील स्थान महत्त्वाचे आहे. मानवाने आपले जीव...