आर्थिक वृद्धी चे निर्देशक घटक वैशिष्ट्ये Indicators of economic growth in Marathi
Indicators of economic growth आर्थिक वृद्धी चे वैशिष्ट्य किंवा निर्देशक प्रा. कुझनेट्स यांनी आपल्या ग्रोथ ऑफ इकॉनोमी या ग्रंथात आर्थिक वृद्धीचा सखोल अभ्यास करून आर्थिक वृद्धी ठरणारे काही घटक सांगितले आहेत. या घटकाला आर्थिक वृद्धी चे निर्देशक घटक असे म्हणतात. त्यावरून आरती कुर्ती झाली किंवा नाही हे समजते. ते घटक पुढीलप्रमाणे आहेत. 1) स्थूल देशांतर्गत उत्पादनातील वाढ - एखाद्या देशात दीर्घकाळपर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनात सतत वाढ होत असली तर त्याला आर्थिक वृद्धी म्हणावे. म्हणजेच स्थूल देशांतर्गत उत्पादनातील दीर्घकालीन वाढ ही वृध्दी चे लक्षण समजले जाते. 2) वाढते दरडोई उत्पन्न - दीर्घकाळात अर्थव्यवस्थेत दरडोई उत्पन्नात सतत वाढ होणे हे आर्थिक वृद्धी चे निर्देशक मानले जाते. कारण लोकसंख्या ही सतत वाढते त्या प्रमाणात संसाधनाचा पर्याप्त वापर करून एकूण व दरडोई उत्पन्नात वाढ घडवून आणणे आवश्यक असते. 3) वाढते दर डोई उपभोग - प्रत्येक व्यक्तीच्या उपभोग हा त्याच्या उत्पन्नावर आधारित असतो. उत्पन्न जास्त असेल तर उपभोग खर्च अधिक होतो. आणि जगावर त्याचे जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे अर्थव्यवस...