Economic Development Measurements / Problems ( आर्थिक विकासाच्या मापनातील अडचणी / समस्या )
आर्थिक विकासाच्या मापनातील अडचणी समस्या Economic Development Measurements / Problems आर्थिक विकासाच्या संकल्पनेनुसार एखादे राष्ट्र विकसीत , विकसनशील किंवा अविकसीत आहे . हे ठरविता येते . त्यासाठी आर्थिक विकासाचे अचुक व काटेकोरपणे मापन करणे आवश्यक असते . परंतु खरोखरच आर्थिक विकासाचे काटेकोरपणे मापन करता येते का ? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल . कारण आर्थिक विकासाचे मोजमाप करण्यात अनेक अडचणी आहेत . त्यापैकी प्रमुख अडचणी पुढीलप्रमाणे आहेत . १ ) राष्ट्रीय उत्पन्नाचे चुकीचे मापन : राष्ट्रीय उत्पन्नाचे वरुन दोन राष्ट्राची तुलना करुन विकासासंबधीचे निष्कर्ष काढले जातात . राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली तर देशातील लोकांना वस्तु व सेवा मुबलक प्रमाणात मिळूण त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडून येते . परंतु वाढत्या उत्पन्नाबरोबर लोकसंख्याही वाढली असेल तर लोकांचे जीवनमान उंचवणार नाही . म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अधिक म्हणून विकास अधिक अशा प्रकारचे वरील विधान चुक ठरते . म्हणून आर्थिक विकासाचे मोजमाप अचूक करता येत नाही . २ ) दरडोई उत्पन्न : दरडोई उत्पन्नाचा वापर क...