वाङ्मयीन इतिहास माहिती
वाङ्मयीन इतिहास बाड्मयाचा इतिहास म्हणजे सामाजिक इतिहास किंवा ऐतिहासिक राज्यव्यवस्थेचा इतिहास नव्हे. वाङ्मय हे मानवी संस्कृतीचे एक अंग असते. वाड्मयाचा इतिहास बाड्मयसंस्कृतीचे वृत्तकथन करते. म्हणजे इथे आपल्याला दोन गोष्टी स्पष्ट होतात. त्या म्हणजे वाड्मयाचा इतिहास म्हणजे बाड्मयाची समीक्षा नव्हे आणि बाड्मयाचा इतिहास म्हणजेही वाड्मयाचे संशोधन नव्हे, पण बाड्मयाचा इतिहास वाड्मयाच्या समीक्षेला आणि वाङ्मयाच्या संशोधनाला सहाय्यभूत असते. ते कसे ते पाहू. वाड्मयाचा इतिहास समीक्षेच्या निकषांवर होत नसतो. नवनिर्माणक्षमता, सृजनात्मकता, आस्वादात्मकता, मूल्यनिर्णय आणि सौंदर्यस्थळांचे विश्लेषण वाड्मयाच्या इतिहासाला अमान्य असते. वाड्मयेतिहासाचेही कार्य सामाजिक वा राजकीय इतिहासासारखेच असते. समीक्षा वाड्मयाच्या अंतरंगात डोकावते तर वाड्मयाचा इतिहास बाड्मयाच्या बहिरंगावर बेतलेला असतो. समीक्षकापेक्षा कमालीचा तटस्थपणा वाड्मयेतिहासकाराला साधावा लागतो. एवढेच नव्हे तर त्याच्या व्यक्तिगत अभिरुचीला म्हणजे आवडी निवडीला वाव नसतो. विशिष्ट काळात घडलेल्या बाड्मयाचे प्रारूपच त्याला रेखाटायचे असते. वाड्मयेतिहासात व...