आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्यातील फरक स्पष्ट करा
आर्थिक वृद्धी आणि आर्थिक विकास ह्यातील फरक स्पष्ट करा. आर्थिक वृद्धी ( Economic Growth ) १ ) आर्थिक वृद्धी ही विक अर्थ व्यवस्थेशी संबंधित संकल्पना आहे . २ ) अर्थव्यवस्थेतील संसाधनाचे कार्यक्षमपणे पुनर्वितरण करणे आर्थिकवृद्धीशी संबंधीत आहे. ३ ) आर्थिक वृद्धीची प्रक्रिया ही संथपणे व दिर्घकालीन स्वरूपाची असते. ४ ) आर्थिक वृद्धीसाठी सरकारी मार्गदर्शनाची व मदतीची फारशी आवश्यकता नसते. ५ ) प्रगतीची एक किमान पातळी गृहीत धरुनच वृद्धीचे प्रारूपे मांडली जातात. ६ ) ह्यात नवनिर्मितीची शक्यता नसते. ७ ) आर्थिक वृद्धी ही स्थैतिक संतुलनाची एक अवस्था आहे. आर्थिक विकास ( Economic Development ) १ ) आर्थिक विकास ही विकसनशील अर्थव्यवस्थेशी संबधीत संकल्पना आहे. २ ) अर्थव्यवस्थेत बेकार पडून असलेल्या संसाधनाचा उपयोग करणे आर्थिक विकासाशी संबधीत आहे. ३) आर्थिक विकासाची प्रक्रिया ही तुटक व खंडीत स्वरूपाची असते. 4 ) आर्थिक विकासासाठी सरकारी मदतीची व मार्गदर्शनाची अत्यंत आवश्यकता असते. 5 ) प्रगतीच्या विशिष्ठ पातळीच्या अभावी गुणात्मक परिवर्तनाची आधी गरज असते....