ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे, परिणाम व उपाय
ध्वनी प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे, परिणाम व उपाय सांगा. प्रस्तावना :- हवा, पाणी, मृदा प्रदूषणाइतकीच ध्वनी प्रदूषण ही एक महत्त्वाची समस्या आहे. ध्वनी यंत्रातून निघणारे ध्वनी तरंग वातावरणात ध्वनी प्रदूषणाचे कारण बनतात, असे ध्वनीयुक्त वातावरण आरोग्यास हानीकारक असते ध्वनी प्रदूषण म्हणजे नको असलेला आवाज, मूल्यहीन अर्थ हीन ध्वनी नादमाधुर्याचा गुण नसलेला, कर्ण कर्कश, विसंवादी आवाज, निद्रानाशक, भीतीदायक संतापजनक, दुःखदायक, त्रासदायक, चित्तविचलीत करणारा," कामात अथडळा निर्माण करणारा उंच आवाज होय. व्याख्या :- डॉ. रॉयबी :- "अईच्छापूर्ण ध्वनी जो मानवी सुविधा स्वास्थ व गतीशीलतेत हस्तक्षेप करतो त्यास ध्वनी प्रदूषण म्हणतात." सायमन्स आय.जी . :- "मूल्यहीन अथवा अनुपयोगी ध्वनी म्हणणे ध्वनी प्रदूषण होय "ध्वनी प्रदूषण म्हणजे अनावश्यक असुविधाजनक व निरर्थक आवाज होय. ध्वनी प्रदूषणाची कारणे :- १) वाहतूक साधने :- दोन चाकी, तीनचाकी, चार चाकी वाहनामुळे मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण होते. या वाहतूक साधनाबरोबर विमाने व क्षेपणास्त्रे यांच्यामुळेही ध्वनीप्रदूषणा होते. २) रात्रदिव...