Computer and Marathi language - संगणक आणि मराठी भाषा
संगणक आणि मराठी भाषा निबंध प्र. १. :- संगणक म्हणजे काय ? संगणकाची वैशिष्ट्ये सांगा? उत्तरे : संगणकाला इंग्रजीत Computer असे म्हणतात. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. त्याचबरोबर संगणक हे मानवाला बौद्धिक प्रक्रियेत मदत करतो. मानवाची बुद्धिमत्ता संगणकाच्या बुद्धिपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण संगणक या बुद्धिमान यंत्राची रचना मुळातच मानवाने केली आहे. आजच्या युगामध्ये संगणाकामुळे जग फारच जवळ येत चालेल आहे. यासाठी संगणक म्हणजे काय हे पाहणे गरजचे आहे. व्याख्या: - १. संगणक म्हणजे स्मृतिकेत साठविलेल्या माहितीचे दिलेल्या आज्ञावलीनुसार गणितातील कृती आणि तार्किक संकल्पना वापरुन संस्करण करण्याची क्षमता असलेले इलेक्ट्रॉक उपकरण होय." 2. संगणक हे त्याला मिळालेल्या सुचनेप्रमाणे दिलेल्या संख्यांची आकडेमोड अथवा माहितीचे पृथ्यकरण अचूकपणे पण थोड्या वेळेत करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे." ३. संगणक हे बहुउद्देशीय माहिती संस्करणाचे चिन्हांतरण यंत्र होय. ४. संगणक म्हणजे ज्यामध्ये स्मृतिका साठविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती साठवून ठेवली जाते.. संगणकाची वैशिष्ट्ये : १) वेग : संगणकाचे सगळ्यात मह...