आर्थिक विकासाचे सिध्दांत १ ( Theories of Economic Development )
आर्थिक विकासाचे सिध्दांत १( Theories of Economic Development - अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा. प्रास्ताविक : - दुसऱ्या महायुध्दामुळे अनेक राष्ट्रांतील पायाभूत सुविधा उध्वस्त होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . यातून अर्थव्यवस्थेला सावरून विकासाचा वेग वाढविणे आवश्यक होते . त्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाचे सिध्दांत मांडले . आर्थिक विकास म्हणजे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे होय . म्हणजे देशातील नैसर्गीक साधन सामग्री , भांडवल व मानवी साधने यांच्या साह्याने अर्थव्यवस्थेत संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणणे होय . हे बदल कशा पध्दतीने होते . लोकांच्या राहणीमानात कशी वाढ होते , अर्थव्यवस्था विकासाकडे कशी वाटचाल करते याविषयी अनेक अर्थतज्ञांनी आर्थिक विकासाच्या सिध्दांताची मांडणी केली आहे . अभिमतपंतीयाचा विकासाचा सिध्दांत ( Classical Theories of Development ) अॅडम स्मिथ यांना अभिमत पंतांचे ( सनातनवादी ) संस्थापक मानले जाते . त्यांनी आपले आर्थिक विचार ' आशावाद ' , ' निसर्गवाद ' व ' आदर्श हात ' य...