जलप्रदुषण अर्थ , परिणाम व उपाय याची सविस्तर माहिती
Water Pollution Meaning, Effects and Remedies and Causes जलप्रदुषण प्रस्तावना :- पाण्याला सजीवाच्या जीवनात अत्यंत महत्व आहे. परिस्थितीकीच्या निर्मितीत पाणी हा एक महत्वाचा घटक आहे. मानवाच्या क्रीयाशी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या संबंध असतो म्हणून प्राचीन मानवी संस्कृतीचा विकास नद्यांच्या खोऱ्यात झाल्याचे दिसते. पृथ्वीवर पाण्याचे वितरण विषम आहे. पृथ्वीचा सुमारे ७१ टक्के भाग पाण्याने व्यापलेला आहे एकूण पाण्यापैकी ९२.२ टक्के पाणी महासागरात असून खारट आहे उर्वरीत २.८ टक्के पाणी गोड व पिण्यायोग्य आहे या गोडया पाण्यापैकी ०.९ टक्के पाणी नद्या सरोवर विहिरी तळी इत्यादीच्या स्वरुपात आहे यावरुन लक्षात येते की शुद्ध व गोडपाणी किती दुर्मीळ व अमूल्य आहे त्यामुळे पाण्याची गुणवत्ता टिकवून ठेवणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उपलब्ध आलेल्या शुद्ध पाण्यात सध्या मोठ्या प्रमाणात प्रदूषकांचा प्रादुर्भाव दिसतो सध्या जलप्रदूषणाची तीव्रता जास्त वाढली आहे औद्योगिक क्रांतीनंतर पाण्याची गुणवत्ता कमी होत आहे जलप्रदूषण ही एक जागतीक समस्या बनली आहे. व्याख्या :- १) सी. एस. साऊथविक :- "मानवी क्रियाद्वारे किंव...