मृदाप्रदूषणाची कारणे, परिणाम व उपाय
मृदाप्रदूषणाची कारणे, परिणाम व उपाय सांगा. प्रस्तावना :- मृदेची निर्मिती खडकाच्या झीजेतून होते मृदेत विविध प्रकारची खनिजे, क्षार, कार्बनीक पदार्थ, हवा व पाणी इत्यादीचे एक निश्चित प्रमाण असते. कांही कारणामुळे त्या प्रमाणात बदल होतो त्यास मृदाप्रदूषण असे म्हणतात. मृदा प्रदूषण जमीनीच्या अयोग्य नियोजनाचा परिणाम आहे. मृदा प्रदूषणाची कारणे :- १) क्षरण क्रिया बाह्य शक्तीच्या करकांपासून क्षरण क्रिया होत असते. क्षरणास मातीचा शत्रू म्हणतात. मातीचा वरचा थर खनिजे व कार्बनिक पदार्थापासून बनलेला असतो याच थरात सूक्ष्म जीवजंतूचा विकास होतो बया थरातच मातीची उत्पादन क्षमता असते क्षरणामुळे ही माती वाहून जाते त्यामुळे नायट्रोजन फॉस्फरस, पोटॅशियमसारखी पोषकतत्वे वाहून नेली जातात. २) वृक्षतोड :- निसर्गातील प्रत्येक घटक एकमेकाशी संबंधीत असतो. निसर्गातील एखादा घटक कमी झालातर त्याचा अप्रत्यक्ष परिणाम इतर घटकावर होतो मातीचा सतत वापर केल्याने त्यातील जैविक सत्य कमी होतात. मातीत जैविक अजैविक घटकातील संतुलन बिघडते वनस्पती या त्यांच्या सडलेल्या पालापाचोल्याच्या साह्याने मातीला जैविक पुरवठा करतात व...