मद्यपानाच्या समस्येचे स्वरूप (Problems of Alcoholism - Causes & Measures)
मद्यपानाच्या समस्येचे स्वरूप सांगा. (Problems of Alcoholism - Causes & Measures) किंवा मद्यपानाची संकल्पना सांगुन मद्यपानाचा इतिहास, प्रकार व वैशिष्ट्यांची चर्चा करा. उत्तर : प्रस्तावना :- मद्यपान केवळ व्यक्तिच्या जीवनाशी निगडीत समस्या नाही तर त्याचा संबंध व्यक्ती, कुटुंब व समाजाशी येतो. मद्यपानाचा आरोग्य, शरीरावर अपाय होतो. कौटुंबिक संघर्ष होतात. अपघाताचे प्रमाण वाढते. कामावरील गैरहजेरी वाढते. कुटुंबाचे विघटन होते. श्रमिक, गरीव वर्गातील मद्यपान आज जागतिक समस्या बनली आहे. त्यामुळे सामाजिक, नैतिक, आर्थिक अध:पतन होत आहे. मद्यपानाने दारिद्र्यात वाढ होते. मद्यपी योग्य-अयोग्य, बरे-वाईट ठरऊ शकत नाही. मद्यपानाने दारिद्र्य वाढते, मोठ्या प्रमाणात राष्ट्रीय संपत्तीची हानी होते. मद्यपानाची मुले आणि स्त्रियांचा विपरीत परिणाम होतो. मद्यपान विपथगामी वर्तन, सामाजिक व्याघी आहे. गरीब दुःख विसरण्यासाठी मद्यपान करतात. त्यामुळे ते उच्छंदी, चंचल, दिवाळखोर बनतात. मद्यपानाने गरीब गरीबच राहतो. मद्यपान युरोप, आफ्रिकन, अमेरिका, आशियायी देशाची समस्या आहे. मद्यपानाचा इतिहास : चीन, हिन्दू, ग्रीक, अॅसीरीयनांना...