सायबर गुन्हेगारीचे स्वरूप सांगून त्याचे परिणाम (Cybercrime- Nature & Effects.)
सायबर गुन्हेगारीचे स्वरूप सांगून त्याचे परिणाम सांगा. (Cybercrime- Nature & Effects.) किंवा सायबर गुन्हेगारीवर निबंध लिहा. उत्तर : प्रस्तावना : - आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात घडुन आला आहे. संगणक, इंटरनेट, सोशल मिडीया, आदी साधनाद्वारे माहितीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात होत आहे. जग जवळ आले आहे नव्हे तर जग खेडे बनले आहे. मानवी जिवनाच्या विकासासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वरदान ठरला आहे. परंतू या माहितीच्या देवाण घेवाणीमध्ये जसा विकास घडतो तसाच या माहितीचा चुकिचा वापर केल्या मुळे सायबर गुन्हेही घडतात. आज सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे. १) सायबर गुन्हेगारीचा अर्थ : संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानाचा वापर गैरप्रकारांसाठी आणि गुन्हेगारीसाठी केला जातो त्यावेळी सायबर गुन्हा घडतो. आणि सातत्याने अशा पद्धतीचे गैर प्रकार केल्यानंतर सायबर गुन्हेगारी निर्माण होते. पांढरपेशी गुन्ह्यामधील गुन्हेगारीचा हा नविन प्रकार आहे. २) सायबर गुन्हेगारीचे स्वरूप : अ) सायबर गुन्हेगारीत दुसऱ्याच्या फाईल्स, प्राग्राम, माहिती चोर...