आंतर्विद्याशाखीय अभ्यास अन्य अभ्यास शाखा संपूर्ण माहिती
आंतर्विद्याशाखीय अभ्यास अन्य अभ्यास शाखा मानवाच्या जाणीवकक्षा सतत विस्तारत, बाढत आहेत. या साऱ्यांचा साहित्यवर परिणाम होणे अपरिहार्य आहे, कारण मानवी मन अनेक गोष्टींतून शक्यता अजमावत असते. साहित्यावर आणि संशोधनावर विस्तारलेल्या ज्ञानशाखांचा प्रभाव होणे साहजिकच आहे. विशेषतः संशोधनात साहित्येत ज्ञानशाखांचा आधार घेणे आज आवश्यक झाले आहे. इतर ज्ञानशाखेची तुलना करून प्रभावक्षेत्र दाखविले जाते. साहित्याचे मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, सामाजिक शाख, लोकसाहित्य इत्यादी मानव्यविद्या शाखांशी संबंध असतो. हे संबंध कशाप्रकारचे आहेत, त्यांचा शोध आंतरविद्याशाखीय अभ्यासातून घेतला जातो. त्यामुळे आंतरविद्याशाखांत समन्वय असणे महत्त्वाचे ठरले आहे. साहित्याचा इतर शास्त्रांशी परस्पर संबंध कसा आहे, ते पाहू साहित्य आणि इतिहास साहित्य आणि इतिहास यांचा दोन प्रकारचा अनुबंध असतो. एक म्हणजे साहित्याचा इतिहासाशी संबंध ऐतिहासिक, पौराणिक कथावस्तूशी असतो, ऐतिहासिक, पौराणिक अशा घटना, प्रसंगांच्या अनुषंगाने कलाकृती निर्माण केली जाते. म्हणून इतिहासाचा विविध संदर्भात अभ्यास केला जातो. भूतकाळातील अभ...