बालगुन्हेगारीची विषयी सविस्तर माहीती (Meaning of Juvenile Delinquency)
बालगुन्हेगारीचा अर्थ सांगुन त्याचे स्वरूप स्पष्ट करा. (Meaning of Juvenile Delinquency) समकालीन भारतातील सामाजिक समस्या प्रश्न १ :- बालगुन्हेगारीची संकल्पना स्पष्ट करा. उत्तर : प्रस्तावना : - बालगुन्हेगारी हे आजारी समाजाचे लक्षण आहे. शहरातील वाढती गर्दी, बकालवस्त्या, जुगार तस्करी मद्यपानाने बाल गुन्हेगारी वाढत आहे. औद्योगिकरण, नागरीकरणाने बालगुन्हेगारी वाढत आहे. भारतात सुद्धा पाश्चात्य देशाप्रमाणे बालगुन्हेगारी गंभीर स्वरूप धारण करीत आहे. गुन्हे आणि बालगुन्हेगारी ह्या प्राचीन समस्या आहेत. विशेषता गुन्हेगारीत वालगुन्हेगारीची भर पडत आहे. बालगुन्हेगारी ही सार्वत्रिक समस्या आहे. बालगुन्हा ही संज्ञा :- बालगुन्हेगारी ही संज्ञा सैल अर्थाने वापरली जाते. त्या संदर्भात डॉ. सुशीलचंद्र म्हणतात. बालगुन्हेगार कोणाला म्हणावे याची एकस्कंध व्याख्या नाही त्या संबंधीचे दृष्टीकोन, उपाय योजना गोंधळात टाकणाऱ्या आहेत. विधिज्ञ, समाजशास्त्रज्ञ वैद्यक, पालक, अध्यापक, समाजशास्त्रज्ञ न्यायाधिश, विधिज्ञांनी विविध दृष्टीकोनातून विश्लेषण केले. बालगुन्हेगारीची व्याख्या देशातील कायदे, सामाजिक परिस्थिती समाज...