Producer's Behaviour - उत्पादकाची वर्तणूक Full text
उत्पादकाची वर्तणूक Producer's Behavio पॉल सॅम्यूल्सन व्याख्या - "बाजारात अस्तित्वात असलेल्या किंमती, विक्रेता व विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय." पॉल सॅम्यूल्सन प्रस्तावना बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणे हे उत्पादकाचे मूलभूत कार्य आहे. बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या साहाय्याने वस्तू व सेवांच्या किंमती ठरतात, म्हणून मागणीप्रमाणे पुरवठ्याचा अभ्यास करणेही आवश्यक आहे. पुरवठ्याद्वारे किंमत आणि नगसंख्यांचा पुरवठा यातील संबंध स्पष्ट होतो. त्यामुळे पुरवठा व पुरवठ्याशी संबंधित संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे. संकल्पना एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा एकूण उत्पादनः उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. म्हणून विशिष्ट कालावधीत उत्पादन कार्यासाठी वापरलेल्या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलेल्या एकूण नगसंख्या म्हणजे एकूण उत्पादन होय. साठा आणि पुरवठा साठा व पुरवठा ह्या दोन्ही परस्पर...