भारतीय मध्यवर्ती बँकेची (RBI) रचना RBI चे आर्थिक वर्ष आणि व्यवस्थापन - Formation of Central Bank of India (RBI) Financial year and management of RBI
भारतीय मध्यवर्ती बँकेची (RBI) रचना आणि व्यवस्थापन थोडक्यात सांगा ? Formation of Central Bank of India (RBI) Financial year and management of RBI उत्तर : मध्यवर्ती बँकेची रचना आणि व्यवस्थापन (Structure of Management of Central Bank) रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९३४ नुसार १ एप्रिल १९३५ रोजी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची मध्यवर्ती बँक म्हणून स्थापन झाली. रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अॅक्ट १९४८ नुसार १ जानेवारी १९४९ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. स्वातंत्र्यानंतर आर्थिक, सामाजिके, राष्ट्रीय हित लक्षात घेवून भारतीय रुपयाचे अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय मुल्य स्थिर ठेवणे, पतविषयक योग्य धोरण निश्चित करणे, बँकाचे रचनात्मक संघटन करून त्यांच्यातील अस्थिरता दूर करणे, संकटकाळात बँक व्यवसायाचे संरक्षण करणे, आर्थिक व्यवहारातील विविध प्रकारच्या समस्यांच्या निराकरणासाठी समस्या निरसन केंद्र स्थापन करणे, देशातील महत्त्वपूर्ण बाबीसंबंधी आकडेवारी गोळा करणे, पत नियंत्रण करणे, इत्यादी कारणासाठी भारतीय मध्यवर्ती बँकेची स्थापना करण्यात आली. वरील सर्व जबाबदारी पार पाडण्यासाठी व तिच्या कार्य...