आशययुक्त अध्यापन पद्धतीची कार्यपद्धती संकल्पना व स्वरूप Full Chapter
घटक १ : आशययुक्त अध्यापन पद्धती : संकल्पना व स्वरूप * आशययुक्त अध्यापन पद्धतीची कार्यपद्धती स्पष्ट करता येईल. १.१ प्रास्ताविक तुम्ही तुमच्या शाळेत रोजच अध्यापन करत असतात. तुमचे सहकारीही त्यांच्या पद्धतीने अध्यापन करतात. त्यासंदर्भात तुमच्यात कधीकधी चर्चाही होत असेल आणि त्यातून तुमच्या लक्षात आले असेल की , प्रत्येकाचे अध्यापन वेगवेगळ्या प्रकारचे असते. त्यांपैकी काहाँचे अध्यापन परिणामकारक असते तर काहींचे परिणामकारक असतेच असे नाही. विशेषत: नवीन शिक्षकांना अध्यापन सुधारण्यास खूप वाव असतो. कारण त्यांना अध्यापनापूर्वी नेमका कशाकशाचा विचार करावा हे ज्ञात नसते. अनुभवी शिक्षकांच्या तुलनेत त्यांच्या विचारप्रक्रिया , अभ्यासपद्धती , पूर्वतयारी , इत्यादींबाबत खूपच कमतरता जाणवते. तज्ज्ञ / अनुभवी शिक्षकांच्या अध्यापनापूर्वीच्या विचारांमध्ये कळत नकळत काही पायच्या दिसून येतात. त्यांचा विचार नवीन शिक्षकांनी केल्यास त्यांच्या अध्यापनातही निश्चितच फरक जाणवतो. जो विषय आपण शिकवतो त्यावर प्रभुत्व असेल तरच ते अध्यापन अधिक परिणामकारक होते , हा समज मात्र चुकीचा आहे. कारण विद्यार्थी म्हणून ज्ञानग्रहण करताना आ...