वायू प्रदूषण, जलप्रदूषण, माती प्रदूषण याबाबत सविस्तर माहिती- (Pollution)
Detailed information on air pollution, water pollution, and soil pollution प्रदूषण पर्यावरणातील विविध समस्या पर्यावरणातील या समस्या का निर्माण झाल्या असाव्यात ? या समस्यांवर मात करण्यासाठी काय करावे लागेल ? माणसाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे पृथ्वीवर अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. औदयोगिकीकरण, बारी लोकसंख्या, खाणकाम, वाहतूक, कीटकनाशकांचा आणि खतांचा वाढता वापर यांमुळे पृथ्वीवर प्रदूषण वाढलेय. प्रदूषणाचे परिणाम माणसावर सुद्धा होऊ लागलेत. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होय. प्रदूषण (Pollution): तुमच्या सभोवताली कोठे कोठे प्रदूषण आढळते ? प्रदूषण कशामुळे होते ? प्रदूषके (Pollutants) परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणान्या, अजैविक व जैविक घटकांवर (वनस्पती, प्राणी आणि मानवावर) घातक परिणाम घडवणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. प्रदूषके पर्यावरणात जास्त प्रमाणात सोडली गेल्यास पर्यावरण विषारी व अनारोग्यकारक होते.. प्रदूषके नैसर्गिक तसेच मानवनिर्मित असतात. नैसर्गिक प्रदूषके निसर्गनियमानुसार कालांतराने नष्ट होतात, याउलट मानवनिर्...