अकराव्या व्या शतकामधील प्रबोधन आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक विषयी माहिती
अकराव्या व्या शतकामधील प्रबोधन पार्श्वभूमी महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासात १९ वे शतक हे महत्त्वाचे मानले जाते. या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतात इंग्रजी राजवट स्थिर झाली. महाराष्ट्रात सुरू झालेल्या इंग्रजी राजवटीमुळे नव्या युगाचा प्रारंभ झाला. राजकीय क्षेत्रात पडून आलेल्या या बदलाचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला. इंग्रजांच्या शिस्तबद्ध नियोजित व कार्यक्षम शासन पद्धतीस सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिश पूर्व काळातील महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील अराजकता, अशांतता, बेशिस्तपणा व अनास्था याला पायबंद बसला. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात हळूहळू परिवर्तन घडून येण्याची प्रक्रिया सुरू झाली. इंग्रजी राजवटीत महाराष्ट्रात नव्या विचारांचे वारे वाहू लागले. त्यामुळे येथील समाजातील जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा व जातिव्यवस्था यातील दोष निदर्शनास येऊ लागले. समाजजीवनामध्ये सुरू झालेल्या या परिवर्तनामुळे येथील आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन ढवळून निघाले. ग्रंथप्रामाण्य रूदीप्रियता, धार्मिक प्रभाव, कर्मकांड व परंपरावाद यांचा प्रभ...