Category

Show more

समकालीन भारतातील सामाजिक समस्या (Social problems in Contemporary India) - परिचय (Introduction)

समकालीन भारतातील सामाजिक समस्या

परिचय (Introduction)

प्रश्न १ :- सामाजिक समस्येची संकल्पना स्पष्ट करून सामाजिक समस्येचे स्वरूप सांगा.

किंवा

सामाजिक समस्येचा अर्थ सांगुन त्याचे स्वरूप विषद करा. (Meaning & Nature of Social Problems) सामाजिक समस्येच्या व्याख्या सांगुन सामाजिक समस्येच्या वैशिष्ट्यांची चर्चा करा.

उत्तर : प्रस्तावना :- सामाजिक समस्या सार्वत्रिक आहेत. अर्थात सामाजिक समस्याच्या स्वरूपात कालमानानुसार अंतर दिसून येते. कांही दशकापूर्वी समस्या नसलेला प्रश्न सामाजिक समस्या होतो. उदा. भारतात १९५० पूर्वी वाढती लोकसंख्या ही समस्या नव्हती. १९५० नंतर दोन तीन दशकात लोकसंख्या वाढ ही समस्या बनली. तसेच सामाजिक परिवर्तनाने नव्या समस्या निर्माण होतात. उदा. मद्यपान, अंमली पदार्थाचे सेवन, गुन्हेगारी, बेकारी, दारिद्र्य, दहशतवाद, भ्रष्टाचार पूर्वी गर्भपात गुन्हा समजला जात असे. आज गर्भपातास कायदेशीर मान्यता असल्याने गर्भपात ही समस्या होणार नाही. सामाजिक समस्या मानव समाजाशी संबंधीत असतात. सामाजिक समस्या समाजातील स्थिती आहेत. ज्याचे निर्मुलनाकरीता सामूहिक कृती आवश्यक आहेत. ज्यावर सामूहिक उपाययोजना केली जाते. समस्या ह्या कुकार्यात्मक क्रिया आहेत. ज्याचा समाजावर परिणाम होतो.

सामाजिक समस्याचा अर्थ :

 उत्पत्ती शास्त्राच्या मताप्रमाणे समस्या म्हणजे कोणतीही गोष्ट समोर फेकणे, एखादा प्रश्न सोडविण्याकरीता तयार करणे किंवा प्रश्न आव्हान म्हणून उमा असणे.

समस्या म्हणजे अशी स्थिती ज्याचा समाजावर दुःखद परिणाम होतो. जे वर्तन, स्विती आक्षेपार्ह असते तेव्हा त्यास समस्या म्हणतात. ब्ल्युमर यांनी आक्षेपार्ह स्थिती, वर्तनास सामाजिक समस्या संबोधले आहे. बेकर यांच्या शब्दात समस्या बाबत जागीव असणे महत्त्वपूर्ण आहे. 

सामाजिक स्थिती आणि समस्या परस्परपूरक आहेत. समस्या विरोधामासातून निर्माण होतात. काही देका समस्या जाणीवपूर्वक निर्माण केल्या जातात. उदा. हिटलरने ज्यु च्या केलेल्या हत्या. सामाजिक समस्याचा अर्थ स्पष्ट करताना स्पेक्टर आणि किस्तुरे म्हणतात, जेव्हा समस्या म्हणून समस्यास मान्यता मिळते तेव्हाच सामाजिक समस्या अस्तित्त्वात येतात. समस्या विषयक जाणीव निर्माण झाल्याने समस्याचे. अस्तित्व जाणवते. त्याबाबत भाष्य लिखाण, चर्चा करतात. त्या का निर्माण झाल्या त्याची कारणे आणि उपाययोजना शोधतात. समस्या विषयक जाणीव नव्हे तर उपाययोजना महत्त्वाची आहे. उदा. दुष्काळ ही नैसर्गिक आपत्ती वाटत  असेल तर सामाजिक समस्या भासणार नाही. आज दुष्काळ सामाजिक समस्या संबोधून त्यावर उपाय केले जातात. पूर्वी मानसिक आजार ही समस्या न समजता उपचार केले जात नव्हते. आज समस्या संबोधून उपचार केले जातात.

समस्या हा शब्द सामाजिक आणि समस्या या दोन शब्दांनी निर्माण झाला आहे. सामाजिक म्हणजे समाजातील संबंध, सामाजिक संघटन, सामाजिक संरचना तर समस्या सामाजिक स्वरूपाची असते. ज्यात अनअपेक्षित, अयोग्य, अडचणीची, संघर्षात्मक स्थिती किंवा वर्तन. सामाजिक समस्या ह्या समाजातील अवांछनीय क्लेशकारक वर्तन आहे. त्यावर उपाययोजना करावी लागते. 

व्याख्या :

  1. रॉबर्ट ली :- सामाजिक समस्या म्हणजे समाजात निर्माण झालेली अशी स्थिती की, जी समाजातील बहुसंख्य लोकावर परिणाम करते आणि तिच्या निर्मुलनाकरीता सामुहिक प्रयत्नाची आवश्यकता भासते. २) रिनहार्ट :- अशी स्थिती की जी समूह समाज विरोधी असते. ज्याचे दूरगामी परिणाम होतात. ती सामूहिकरित्या हाताळावी लागते.
  2. रॉबर्ट मर्टन आणि रॉबर्ट निस्बेट :- सामाजिक समस्या म्हणजे प्रमाणकांचे उल्लंघन, सामाजिक समस्या समाजातील वर्तणुकीतील बिघाड़ जो बऱ्याचशा लोकांना घेरतो. सामाजिक समस्याचे स्वरूप किंवा वैशिष्ट्ये :


  1. सार्वत्रिकता :- सामाजिक समस्या मानव समाजाच्या प्रत्येक कालखंडात प्रत्ययास येतात. गतीशील समाजात समस्याची तीव्रता अधिक आढळून येते.
  2. स्थिती सापेक्षता आणि समाज सापेक्षता :- सामाजिक समस्या स्थिती सापेक्ष असतात. जेव्हा बहुसंख्य लोकांना एखादे वर्तन नैतिकदृष्टया त्याज्य, घृणास्पद वाटते. नियमनाविरोधी वाटते तेव्हा त्याला सामाजिक समस्या म्हणतात. उदा. पाश्चात्यात आणि आदिवासीमध्ये मद्यपान समाज मान्य आहे. म्हणून सामाजिक समस्या होणार नाही. प्राचीन काळात सती जाणे, नरबळी समस्या नव्हती, आज ती समस्या आहे. प्राचीन काळात गर्भपात हा गुन्हा नव्हता. आज गर्भपातास मान्यता आहे. डॉ. सम्नर म्हणतात मूल्ये, नियमने आणि सामाजिक समस्याचा घनिष्ठ संबंध आहे. जेव्हा मुले ईश्वराची देणगी समजत तेव्हा लोकसंख्या ही समस्या नव्हती. स्थिती सापेक्षता, विशिष्ट कालखंड आणि समस्या निगडीत आहेत. उदा. स्वातंत्र्यापुर्वी भारतात दहशतवाद, शरणार्थीची समस्या नव्हती. विशिष्ट स्थिती आणि समस्याचा संबंध आहे. उदा. अमेरिकेत वंशवाद, कुमारी माता, वृद्धांचा प्रश्न, घटस्फोट या समस्या आहेत तर भारतात जातीवाद, अस्पृश्यता, प्रदेशवाद, भाषावाद ह्या समस्या आहेत..
  3. व्यक्तीगत आणि सामाजिक स्वरूप :- वैयक्तिक समस्या व्यक्तीहिताशी संबंधित असतात. उदा. भ्रष्टाचार, पक्षपात व्यसनाधिनता, वैयक्तिक समस्या निराकरणाकरिता वैयक्तिक प्रयत्न करावे लागतात. उलटपक्षी सामाजिक समस्या समाजहिताच्या विरूद्ध असतात. त्याच्या निराकरणाकरिता सामूहिक प्रयत्न करावे लागतात. परंतु वैयक्तिक आणि सामाजिक समस्या संबंधित आहेत. उदा. बेकारी, अपराध मनोविकृती ह्या वैयक्तिक समस्या जेव्हा बहुसंख्य व्यक्तींच्या बनतात तेव्हा त्यास सामाजिक समस्या म्हणतात.
  4. मूल्याधिष्ठितता :- जेव्हा घटना दैवाने घडतात असे लोकांना वाटते तेव्हा त्या घटना समस्या असुन सुद्धा सुद्धा समस्या वाटत नाहीत. दैवामुळे समस्यावर उपाययोजना केली जात नाही. उदा. दारिद्र्य, मृत्यु, वाढती लोकसंख्या देवामुळे स्विकारली जाते. समाज परंपरावादी, अज्ञानी असेल तर विशिष्ट मूल्याने समस्याची तिव्रता भासणार नाही. समस्या मूल्य अभिवृत्तीवर विसंबून असतात. उदा. अस्पृश्याला अस्पृश्यता जायक वाटेल तेव्हाच समस्या बनेल अशा प्रकारे समस्या आणि मूल्यावस्थेचा संबंध आहे.
  5. समस्याची तिव्रता :- समाजाने स्विकारलेले आदर्श नियमनाविरुद्ध प्रत्यक्ष वर्तन असते तेव्हाच सामाजिक समस्या उद्भवतात. समस्याची तिव्रता मित्र असल्याने कालखंडानुसार समस्या मित्र असतात. आधुनिक काळात समस्याच्या अस्तित्वाची जाणिय बहुसंख्य लोकांना झाली. प्राचीन काळात कर्म, धर्म, भूतदयावाद, कर्मकांडामुळे प्रश्न नशीवावर भरोसा उऊन स्विकारले जात. प्रबोधन, मानवतावाद, बुद्धिनिष्ठ दृष्टिकोणामुळे समस्याची तिव्रता वाढून समस्या सोडविण्याचा प्रयत्नः केले जातात.
  6. जागृतता :- सामाजिक समस्या विषयक व्यक्तींना सारखी जाणीव असत नाही. त्या बाबत प्रतिक्रिया समान नसतात. म्हणून लोकांच्या मनात समस्या किती जागृत आहेत त्यावर समस्याचे स्वरूप विसंबून असते. समस्याच्या प्रकटना विषयी जाणीव नसेल तर त्या निवारण्या बाबत प्रतिक्रिया केल्या जाणार नाहीत. उदा. अपधात बलात्कार, संप. मोर्चाच्या सनसनाटी बातमीने समस्या गंभीर वाटतील. उलटपक्षी लोकसंख्येची वाढ, जातीवाद, अस्पृश्यता या समस्या बाबत जागृतता वाटणार नाही..
  7. अवांछनीयता, अपसामाजिकता :- सामाजिक समस्या, अवांछनीय, वाईटअपसामाजिक असतात. मर्टन आणि निस्वेटने सामाजिक समस्यांना अपसामाजिक अवांछनीय समजले आहे. समाज जो पर्यंत वर्तनाला अवांछनीय समजत नाही तो पर्यंत ती समस्या होत नाही. सामाजिक समस्या मानवी दुव्र्यवहारातून दुष्ट प्रवृत्तीच्या लोकामुळे निर्माण होतात. काही वेळा विपरीत परिस्थितीला सहाय्य केल्याने समस्या निर्माण होतात..
  8. समस्या सोडवाव्या लागतात:- सामाजिक समस्या सोडविल्या नाहीत तर काळाच्या ओघात आपोआप सुटतील हा भ्रम आहे. त्या सोडविण्याकरीता सामूहिक कृती जाणिवपूर्वक प्रयत्न करावे लागतात. कारण हितसंबंधीयांना समस्या सुटू नये असे वाटते. उदा. जमीनदारांना जमीनदारी नष्ट होऊ नये असे वाटते देश्या व्यवसायात गुंतलेल्यांना वेश्यावर निर्बंध नको वाटतात. समस्या संबोधली की त्यावर उपाय आवश्यक आहेत. त्यावेळी समाजाची वैचारिक पातळी बदलावी लागते.
  9.  प्रकटता आणि अप्रकटता (अंतर्मुखता व बहिर्मुखता) :- अंतर्मुख आणि बहिर्मुख असे सामाजिक समस्याचे स्वरूप आहे. ज्या समस्याचे अवलोकन करता येते. सांख्यिकी माहिती देता येते त्याला बहिर्मुख समस्या म्हणतात. उदा. गुन्हे, घटस्फोट, आत्महत्या, बेकारी, बालगुन्हेगारी, उलटपक्षी ज्या समस्याचे अवलोकन करता येत नाही त्या अंतर्मुख, अप्रकट समस्या आहेत. उदा. वंशवाद, पुर्वग्रह, जातीवाद.
  10.  सामाजिक, वैयक्तिक, नैसर्गिक समस्या :- वैयक्तिक समस्या व्यक्तीशी संबंधित असतात. जेव्हा त्या बहुसंख्य व्यक्तीशी संबंधित असतात. समाजहिता विरूद्ध असतात. उदा. पक्षपात, भ्रष्टाचार, वैयक्तिक तर बेकारी सामाजिक समस्या आहे. लेस्ली व हॅरी जॉन्सनने सामाजिक आणि नैसर्गिक समस्यात भेद केला आहे. भूकंप, अवर्षन, वादळ, महापूर यातून सामाजिक समस्या निर्माण होतात. सामाजिक समस्या सामाजिक परिवर्तन संस्थात्मक परिवर्तनातून निर्माण होतात. त्या मानव निर्मित आहे. 

समारोप :

समस्या ही संकल्पना समाजातील आदर्श, मूल्ये, प्रमाणके ह्या मानदंडा आधारावर मांडली जाते. जोपर्यंत एखादी स्थिती समाज अवांछनिय समजत नाही तोपर्यंत सामाजिक समस्या होणार नाही. उदा. समाजात मद्यपान, जुगार मान्य असेल तर ती त्या समाजाची समस्या होणार नाही. जेव्हा ड्रग्ज घातक समजले, त्यावर कायद्याने बंदी आणली तेव्हाच ड्रग्ज समस्या संबोधली. कारण ड्रग्ज आरोग्यास अपायकारक वाटले. समस्या आणि मूल्यधिष्ठीततेचा संबंध आहे. भारतात पत्नीस मारहाण, स्त्रीया सहन करतात. पाश्चात्य जगतात स्त्रीयाना पतीची मारहाण मूल्य विरोधी वाटते. म्हणून भारतात समस्या नाही पाश्चात्य देशात समस्या आहे.

प्रश्न २ :- सामाजिक समस्यांची कारणे स्पष्ट करा. (Causes of Social Problems)

किंवा

 सामाजिक समस्या निर्माण होणाऱ्या कारणांची चर्चा करा.

उत्तर :

प्रस्तावना :- प्रत्येक देशात कोणत्या ना कोणत्या स्वरूपात सामाजिक समस्या असतात. या देशातील विशिष्ट सामाजिक परिस्थितीने निर्माण होतात. तसेव औद्योगिकरण, नागरीकरण, तांत्रिक प्रगतीमुळे अनेक समस्या निर्माण इ आल्या आहेत. काही समस्या व्यक्ती निर्माण करतात तर काही समूह समस्या • निर्माण करतात. त्यामुळे सामाजिक समस्यांची विभीन्न कारणे सांगता येतात.

  1. सांस्कृतिक पाश्चायन:- कोणत्याही समाजात, संस्कृतीत परिवर्तन होताना संस्कृतीचे सर्व भाग समान गतीने बदलत नाही. संस्कृती जीवन व्यापी असून जीवनातील सर्व भागामध्ये होणारे परिवर्तन समान गतीने न झाल्यास काही भाग पुढे जातात किंवा काही भाग तसेच म्हणजे मागे राहतात. यालाच सांस्कृतिक पाश्चायन म्हटले जाते. भारतीय समाजात तर सांस्कृतिक पाश्चायनाने अनेक सामाजिक समस्या निर्माण झाल्याचे आढळते. ब्रिटीश राज्य सत्तेत भौतिक संस्कृतीत झपाट्याने बदल झाला. आगगाडी, बस याने वाहतूक सुरू झाली पण त्यासाठी लागणारी शिस्त, नियमपालक, सामाजिकता लोकांनी स्विकारली नाही. औद्योगिकरणाने सर्व तऱ्हेच्या लोकांना काम मिळाले. त्याचबरोबर रिकाम्या येळेचा उपयोग करण्याची साधने उपलब्ध झाली नाहीत. स्त्रियांना शिकवून नोकरी करण्याच्या बाबतीत समाज बदलला पण अन्य बाबतीत स्त्रीपुरूषांसाठी जुनीच मापे राहिली
  2. तांत्रिक प्रगती :- तांत्रिक प्रगतीनेही समाजात फार मोठ्या प्रमाणात सामाजिक प्रगती केली जाते व त्यातून सामाजिक समस्या निर्माण होतात. आज औद्योगिकरण, नागरिकरण, बेकारी, गलिच्छ वस्ती, रस्त्यांचा प्रश्न किंवा व्यापारी मनोरंजनाची साधने या सर्व गोष्टी नव नवीन सामाजिक समस्यांना जन्म देताना आढळता
  3. आर्थिक संस्था :- भारतातील जातीपद्धती श्रम विभाजनाचे कार्य करीत होती. जाती पद्धतीत बदल होताच परंपरागत व्यवसाय नष्ट झाले. मुक्त स्पर्धेने बेकारी वाढू लागली. मोठ्या प्रमाणावरील आर्थिक उत्पादनामुळे संपत्ती आणि सत्ता केंद्रित झाल्या. समाजात आर्थिक परिवर्तन होताना त्यातून आर्थिक आणि सामाजिक विषमता निर्माण झाली. भारतीय अर्थसंस्थेतील बदल संयुक्त कुटुंबास मारक ठरला हे आपण पाहतो
  4. सामाजिक संस्था : आज समाजात धंदे शिक्षण आणि शिक्षण, • मनोरंजन, प्रसुती आणि रुग्णसेवा अशा तऱ्हेची अनेक कार्ये बाहेरच्या संस्था करताना आढळतात. व्यक्तीच्या जीवनातील कुटूंब आणि धर्म या संस्थेचे महत्त्वच कमी होत असून या दोन्हीचेही तिच्यावरील नियंत्रण हळूहळू कमी होत आहे. परिणामतः सामाजिक संबंधात दुरावा निर्माण होऊन विघटनाला पोषक असे वातावरण तयार होत आहे.
  5. सामाजिक कायदे आणि बंधने:- सध्याचे राज्य स्वतःला कल्याणकारी राज्य म्हणवून घेते. सामाजिक सुधारणा, पुर्नरचना, विकास करण्याची जबाबदारी आज राज्यावर आहे. समाजहित डोळ्यासमोर ठेवून राज्य अनेक कायदे करते पण तो कायदा होताच त्यातून नवीन समस्या जन्माला येतात. उदा. मद्यपान बंदी केल्याने दारू पिणाऱ्यांची. दारू गाळणाऱ्यांची विकणाऱ्यांची संख्या वाढून गुन्हेगारीचे प्रमाण वाढले. सुवर्ण नियंत्रणाच्या कायद्याने सोनारांना बेकार केले व सोन्याचा चोरटा व्यापार सुरू झाला. बेकारी भत्ता दिल्याने लोकांची ऐतखाऊ वृत्ती वाढीस लागेल असेही लोक म्हणू लागले. थोडक्यात जसजसे कायदे करीत जावेत वा बंधने घालीत जावी तसतशा सामाजिक समस्या निर्माण होताना आढळतात.
  6. स्वार्थीवृत्ती :- सामाजिक स्वास्थ्य टिकविण्यात किंवा वाढविण्यात काही लोकांची स्वाथीवृत्ती असते. उदा. घडघाकट लोकात व्यंग करून भिकाऱ्याच्या संघटना भिक्षावृत्ती टिकवितात. आयते खाण्यासाठी त्रियांना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडले जाते.
  7.  पुराणमतवाद: समाजात परंपरेवर आधारीत वर्तन करण्याची वृत्ती जास्त आढळते. अर्थात भारतात लोकांमध्ये जुन्या रूढी आणि परंपरांना चिकटून बसण्याची वृत्ती आढळते. म्हणूनच भारतात अजूनही जाती, अस्पृश्यता, स्त्री पुरूष असमानता, धर्मांधता या समस्या जीवंत आहेत. येथील लोकांना नवीन पद्धती अजूनही स्विकाराव्याशा वाटत नाहीत. तसे करताना जुन्याचा अभिमान, सवय, स्वार्थी वृत्ती अशा अनेक गोष्टी आड येतात.
  8. विषमव्यवस्था :- कोणत्याही समाज रचनेत सामाजिक, आर्थिक, राजकीय: अशा कोणत्याही क्षेत्रात आत्यंतिक विषम स्तर निर्माण होणे म्हणजेच सामाजिक संघर्षाला जन्म देणेच होय. कोणताही समाज सर्व सभासदांमध्ये सर्व बाबतीत समानता आणू शकणार नाही हे मान्य करूनही समाजात आत्यंतिक विषम स्तर निर्माण होतात. उदा. भांडवलदार आणि मजूर व त्यातून विघटन होते असे दिसून येते. अशा प्रकारे सामाजिक समस्यांची कारणे स्पष्ट करता येतात.

प्रश्न ३:- सामाजिक समस्येच्या प्रमाणकशून्यतेचा सिद्धांत स्पष्ट करा. 

किंवा

सामाजिक समस्येचा प्रमाणकशून्यता (Anomie) दृष्टीकोण विषद करा.

उत्तर :

प्रस्तावना :- व्यक्ती समाजाची मूल्ये नियमने शिकताना विपथगामी होतो. विचलनाचा विकास व्यक्तिमत्त्वाचा विकास होताना होतो. काही व्यक्तीचे योग्य सामाजिक ऋण झालेले नसते. समाजशास्रज्ञानी अनुक्रमे नामनिर्देश सिद्धांत प्रमाण शून्यतेचा सिद्धांत आणि सांस्कृतिक समर्थन सिद्धांत विकसीत केले आहेत.

प्रमाणक शून्यतेचा अर्थ प्रमाणक शून्यता ही संकल्पना फ्रेंच समाजशास्रज्ञ इमाईल दर्खाइमने मांडली आहे. त्याने श्रमविभाजन आणि आत्महत्या सिद्धांतात प्रमाणकशून्य श्रमविभाजन आणि प्रमाणकशून्य आत्महत्या असे प्रकार पाडले आहेत. रॉबर्ट के मर्टनने प्रमाणकशुन्यता ही संकल्पना सामाजिक, सांस्कृतिक संरचनाच्या कार्यासंदर्भात वापरली. प्रमाणकशून्यतेत सांस्क. तिक संरचना विकलांग झालेली असते. सांस्कृतिक नियमने आणि ध्येयात विघटन झालेले असते.

प्रमाणक शून्यता अशी स्थिती आहे ज्यात नियमनाचा प्रभाव कमकूवत, दुर्बल झालेला असतो. नियमनाबाबत संदिग्धता असते. प्रमाणक शून्यतेत असुरक्षितता, गोधळाची स्थिती प्रमाणकविहिनता असते. रॉबर्ट के मर्टन प्रमाणकशून्यते विषयी म्हणतात. साध्य आणि साधनातील तफावतीमुळे व्यक्तीची संस्थात्मक साधनाशी बांधिलकी नष्ट होते. त्यामुळे मटन असेही म्हणतात की, जेव्हा व्यक्ती सांस्कृतिक ध्येय व संस्थातक साधने नाकारतो आणि समायोजन करतो.

  1. विश्लेषण :- मर्टनच्या शब्दात तणावाचा उगमस्रोत व्यक्ती, संस्कृती, सामाजिक संरचना आहे. प्रमाणकशून्यता अशी स्थिती आहे ज्यात नियमनाचे मोठ्या प्रमाणात उल्लंघन केले जाते. ही संकल्पना सामाजिक, सांस्कृतिक संरचनेच्या कार्यपद्धतीतून निर्माण होणारे विचलन समजावून घेण्यासाठी उपयोगी आहे. प्रत्येक समाजात सांस्कृतिक उद्दिष्ट्ये आणि संस्थात्मक साधने निश्चित असतात. परंतु व्यक्ती सांस्कृतिक साध्याच्या पूर्ततेसाठी अपर्याप्त संस्थात्मक साधनाचा अवलंब करतात. उदा. कपट, भ्रष्टाचार, फसवणूक इत्यादी मार्गोचा अवलंब करतात. अशा प्रकारे संस्कृतीने निर्धारीत केलेली साध्ये आणि त्याच्या पूर्ततेकरीता समाजमान्य अशा प्रकारे संस्कृतीने निर्धारीत केलेली साध्ये आणि त्याच्या पूर्ततेकरीता समाजमान्य साधने वापरली जात नाहीत ही विसंगती प्रमाणक शून्यतेची स्थिती आहे. अशा परिस्थितीत विपथगमनाने सामाजिक समस्या वाढतात. कनिष्ठ वर्गातील लोक दैनंदिन जीवनातील वैफल्य, नैराश्य घालविण्याकरीता अमली पदार्थ घेतात. बकाल वस्तीतील निवास, भग्न कुटुंबातील व्यक्ती ड्रग्ज घेतात. शहरातील विघटनात्मक स्थिती, मानसिक आजार आणि प्रमाणक शून्यतेचा संबंध आहे.
  2.  सांस्कृतिक समर्थन :- हा सिद्धांत उपसंस्कृती आणि प्रतिसंस्कृतीस उद्देशून वापरला जातो. उपसंस्कृती ही संस्कृती मधीलच संस्कृती आहे. तर प्रतिसंस्कृती ही विशेष प्रकारची उपसंस्कृती आहे. ज्यात उपसंस्कृतीच्या प्रमाणकाचा समाजातील नियमनाशी संघर्ष असतो. गुन्हेगारी वर्तनाचे विश्लेषण करताना सांस्कृतिक समर्थन सिद्धांत उपयुक्त आहे. उदा. बकाल वस्त्यातील तरुण गुन्हेगारी वर्तन जीवनाचा स्वीकृत प्रकार म्हणून शिकतात. उदा. मुलांच्या टोळ्या. जे व्यक्ती प्रतिसंस्कृतीचे सदस्य आहेत. त्यांचे अपसमायोजन झालेले असते. परंतु विपगामी समूहाशी चांगले समायोजन होते असे व्यक्ती द्वेषी, विकृत असतात. सतत संघर्षशील असतात. जटिल समाजात उपसंस्कृती प्रघात दिसून येतात.
  3. नामनिर्देश (Labeling) :- काही समाजशास्त्रज्ञ प्राथमिक आणि दुय्यम विचलनात सूक्ष्मभेद करतात. दुय्यम विचलनात नामनिर्देश ही मध्यवर्ती संकल्पना आहे. ह्या सिद्धांताप्रमाणे प्राथमिक विचलन हे प्रासंगिक विचलन आहे. उदा. आयकराच्या नियमाचे उल्लंघन, मद्य विकत घेणे. प्राथमिक विचलन हे सामाजिक समस्याचे महत्त्वाचे कारण नाही. परंतु त्या मधुन दुय्यम विचलन विकसीत होते. दुय्यम विचलन जेव्हा इतरास विचलन वाटते तेव्हा व्यक्ती विपथगामी समजला जातो. त्याचा विपथगामी म्हणून नामनिर्देश केला जातो. त्यास दरोडेखोर, मद्यपी समलिंगी (होमो) असे लोक वेश्या, दरोडेखोर, चलत्कारी म्हणून लोकांच्या दृष्टिपथात येतात. त्यांना कलंक लागतो. तेव्हा त्यांना लोकांकडून वेगळी वागणूक मिळते. म्हणून विपथगामी टोळ्यात भरती होतात. जीवनाचा सरघोपट, अरूंद मार्ग पत्करतात. अशा टोळ्यात त्यांचे संपूर्ण जीवन गुन्हेगारी युक्त असते. समाजशास्त्रज्ञांच्या मताप्रमाणे संघटित विपथगामी टोळ्याची निर्मिती सामाजिक समस्या निर्मितीतील प्रमुख घटक आहे.


या सिद्धांतात व्यक्ती ज्या प्रक्रियामुळे विपथगामी बनतो त्यावर लक्ष केंद्रीत केले जाते. होवार्ड बेकरने आऊट सायडर या ग्रंथात नामनिर्देश (लेबलिंग) सिद्धांत मांडला. बेकरच्या मताप्रमाणे विचलन विशिष्ट वर्तनाच्या सामाजिक व्यवस्थेचा विपथगामी परिणाम आहे. म्हणून विपथगामी हा बाह्य (outsider) म्हणून त्याचा नामनिर्देश केला जातो. देकर म्हणतात प्रत्येकजन नियमनाचे उल्लंघन करतो. 

परंतु सर्वाचा विपथगामी म्हणून नामनिर्देश केला जात नाही. एखादा त्यास शिक्का बसला की तो कायम राहतो आणि त्यानुसार व्यक्ती त्याशी प्रतिक्रिया करतात, बेकर म्हणतो उन्मागी वर्तन महत्त्वाचे नाही तर त्या बाबत प्रतिक्रिया महत्त्वाच्या आहेत. त्याने पुढे कोणत्याही नियमनाचा भंग न करता त्याचा नामनिर्देश केला जातो. गृहित: विल्यम फिलस्टेंडने गृहिते मांडताना

  1. दुसऱ्याच्या प्रतिक्रिया की व्यक्तीचे वर्तन विपथगामी आहे. 
  2. व्यक्तीचे मुळचे वर्तन उन्मार्गी नाही.
  3.  उन्मार्गी वर्तन आणि रूढवर्तन दिशाहिन आहे.
  4. विचलन आणि सहभागी होणाऱ्याच्या सामाजिक आंतरक्रिया आणि

आंतरक्रियाचा अर्थ या संदर्भात नामनिर्देश समजावे.

सिद्धांताचा वापर :

हा दृष्टिकोण व्यक्ती अंमलीपदार्थ का घेतात. तसेच मद्यपान, समलिंगी संबंध इत्यादी समस्या समजावून घेण्यासाठी हा दृष्टिकोण उपयुक्त आहे. विपथगामी वर्तन करणाऱ्याचा नामनिर्देश कसा केला जातो. याचे विचलन इतरास कसे त्रासदायक आहे. स्थितीशी सुसंवाद साधण्याकरीता कोणते पर्याय आहेत. कोणती प्रतिसंस्कृतीची नियमने आहेत. हा दृष्टिकोण उपयुक्त असला तरी सुद्धा निश्चितपणे वापरता येत नाही. या सिद्धांताद्वारे समस्या सोडविता येत नाहीत. ज्यांना निर्देश अमान्य आहे त्यांना हा सिद्धांत लागू होत नाही. अशा प्रकारे प्रमाणकशून्यतेचा सिद्धांत स्पष्ट करता येतो.

प्रश्न ४:- सामाजिक समस्यांसंबंधीचा सामाजिक विकृतिशास्त्रीय (Social Pathology) दृष्टिकोण स्पष्ट करा. 

किंवा

सामाजिक विकृतिशास्त्र दृष्टिकोणावर निबंध लिहा.

उत्तर : मॉरीस गिन्सबर्ग या समाजशास्त्रज्ञाने समाजाशास्त्राच्या व्याप्तीमध्ये सामाजिक विकृतीशास्त्राचा उल्लेख केला आहे. सामाजिक विषमायोजन आणि सामाजिक क्षोभ यांचा अभ्यास होतो. तसेच यामध्ये विविध सामाजिक समस्या उदा. दारिद्र्य, भिक्षावृत्ती, बेकारी, अतिरिक्त लोकसंख्या, वेश्याव्यवसाय, गुन्हेगारी इत्यादींचा अभ्याससुद्धा समाविष्ट केला जातो.

विकृतीयुक्त व्यक्तीत्त्वाचा उल्लेख करताना मॉवरर या विचारवंताने शारिरीक दुर्बलता, मानसिक कमतरता व अवयवांचे विकार असणाऱ्या लोकांचा यात समावेश केला आहे. व्यक्तीच्या शारीरिक किंवा मानसिक रोगामुळे किंवा विकृतीमुळे सामाजिक समस्यांचा जन्म होत असतो. अपंगत्व, अंधत्व, बहीरेपणा, मानसिक गतीविहीनता या कारणांमुळे काही लोकांना प्रेम आणि स्नेह मिळत नाही त्यामुळे ते मानसिकदृष्ट्या स्वतःला असुरक्षित मानतात आणि प्रसंगी हिन मावनेने ग्रासून जातात. यातूनच समाज विरोधी कार्य करण्यात ते आग्रही व्हायला लागतात.

मानसिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या किंवा अवयवांच्या दोषांनी युक्त असलेल्या व्यक्ती मानसिक अस्थिर होतात आणि त्यातून त्यांच्यात प्रेम आणि घृणा यांच्या तीव्र भावना निर्माण होतात. तसेच यांच्यात कामोत्तेजन मोठ्या प्रमाणात असते. याशिवाय तणाव व संघर्षाची स्थिती त्यांच्या व्यक्तिमत्त्वात निर्माण होते. रागीट, बेजबाबदार, इर्शाळू आणि ददला घेण्याची वृत्ती विकृतीयुक्त व्यक्तीत मोठ्या प्रमाणात आढळून येते. विकृत व्यक्तिमत्त्वाच्या शारीरिक व मानसिक दोषांच्या मुळे ते समाजाशी जुळवून घेऊ शकत नाहीत आणि यातूनच मद्यपान, लैंगिक अत्याचार, वेश्यावृत्ती, गुन्हेगारी या सामाजिक समस्यांचा जन्म होतो. 

सामाजिक विकृतीशास्त्र दृष्टीकोनानुसार समाजातील विकृतीयुक्त व्यक्तिमत्त्वाचा सामाजिक समस्यांच्या निर्मितीत बराच मोठा वाटा असतो. बऱ्याच वेळा विकृतीयुक्त व्यक्तिमत्त्वाची व्यक्ती आत्महत्यासारखा मार्गही चोखाळताना दिसते. सामाजिक समस्यांच्या निर्मितीला व त्याच्या व्यापकतेला व्यक्तीतील विकृतीचा मोठा हातभार लागतो. सामाजिक विकृतीशास्त्र दृष्टीकोन असे मानते की, प्रत्येक सामाजिक समस्येच्या पाठीमागे समाजातील व्यक्तीची विकृती हीच कारणीभूत असते. अशाप्रकारे सामाजिक समस्येचा सामाजिक विकृतीशास्त्रीय दृष्टीकोन स्पष्ट करता येतो.

प्रश्न ५:- सामाजिक समस्यांचा मूल्य संघर्षाचा दृष्टिकोण सांगा.

किंवा

मूल्य संघर्ष (Valuc conflict) दृष्टिकोणावर निबंध लिहा.

उत्तर : प्रस्तावना : समाजात जी मूल्ये प्रचलित असतात ती समाजाचे सर्व समासद एक मुखाने मान्य करतात असे नाही. त्यामुळे समाजातील काही लोक ते मूल्य झुगारून दुसरेच मूल्य स्वीकारतात व अशा तऱ्हेने मूल्य संघर्ष निर्माण होऊन समस्या निर्माण होतात. मूल्य संघर्ष दृष्टिकोण:

१) मूल्याचा अर्थ :- मूल्ये वर्तनाचे अमूर्त नियम आहेत. मूल्यामागे भावना असतात. ती कृतीशी संबंधित असतात. मूल्ये सांस्कृतिक धारणा आहेत. त्याद्वारे मानवी संबंधाचे अध्ययन केले जाते. त्यामागे नैतिकतेची भावना असते. मूल्ये योग्य, अयोग्य वर्तनाशी संबंधित असतात. मूल्याचा आधार सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. त्यामध्ये समूहबंधाची भावना असते. त्यामुळे व्यक्ती समूहात समूह मान्य मूल्याने वर्तन करतात. त्यामुळे कृती, ध्येयाचा निर्णय घेता येतो. थिओडोर म्हणतात मूल्ये निरपेक्ष असतात.

मूल्ये समुहपरत्वे विभिन्न स्वरूपाची असतात. त्यातून मूल्ये संघर्ष होतो. उदा. पुरोगामी आणि सनातन्याच्या विचारात मूल्ये संघर्ष होतो किंवा कामगार मालक, कुळ-जमीनदार यातील मूल्ये संघर्षाने अशांतता निर्माण होते.


२) मूल्ये संघर्ष सिद्धांताचे प्रवर्तक :- बॉलर, फुल्लर, क्युवर यांनी हा दृष्टिकोण मांडला. तसेव १९ व्या शतकाच्या प्रारंभी कार्ल मार्क्स, रँझनफर, गम्लाईट्स, जॉर्ज सिमेल, ऍझनफरने विचार मांडले. अमेरिकेत स्मॉल, फ्रेंक, पार्क, रिचर्डने त्याचा विकास केला. कार्ल मार्क्सने वर्ग संघर्ष सिद्धान्ताद्वारे मूल्ये संघर्षाची संकल्पना विकसीत केली. मार्क्स म्हणतो मानव समाजाचा इतिहास वर्ग संघर्षाचा आहे. कामगार-मालक या वर्गाची मूल्ये परस्पर विरोधी असतात.

त्यामुळे संघर्ष होतो. मार्क्सने मूल्य संघर्ष विचार मांडला. फ्रेंक, फुल्लर, मार्क्सने मूल्य संघर्ष दृष्टिकोण विकसित केला.

३) मूल्ये संघर्ष का होतो :- मूल्ये संघर्ष सिद्धानाप्रमाणे समाजात मूल्याचे जतन करण्याकरीता व्यक्तीचा कलह सुरू असतो. व्यक्ती हितसंबंधाचे रक्षण करताना व्यक्ती, समूह आणि नियमाना विरोधी जातात. समुहाची वेगवेगळी मूल्ये आणि मूल्ये विसंगतीने मूल्ये संघर्ष होतो. सामाजिक परिवर्तन होताना जुन्या मुल्याची जागा नवी मूल्ये घेऊ शकत नाहीत. नवी मूल्ये स्वीकारताना वेळ लागतो. तेव्हा मूल्याच्या संघर्षातून अनेक समस्या निर्माण होतात.

(४) मूल्ये संघर्ष दृष्टिकोण विश्लेषण : वॉलर, क्युबर, हार्पर यांच्या मताप्रमाणे सामाजिक समस्याची उत्पत्ती, विकास, मूल्ये व्यवस्थेतील संघर्षाने होतो. वॉलरच्या शब्दात संघटनात्मक आणि मानवतावादी मूल्यात संघर्ष तर संघटनावादी व्यक्तीवादाचे समर्थन करतात. तर मानवतावादी त्या विरुद्ध भूमिका घेतात.

मूल्ये वर्तनाच्या योग्य, अयोग्यतेच्या संदर्भात निर्माण होतात. आधुनिक समाजात अनेक मूल्ये संच असतात. त्यामुळे मूल्याबाबत असहमती असते. परिणाम नैतिक गोंधळातून समस्या निर्माण होतात. संघर्षातक स्थितीने समस्या निर्माण होतात आणि मूल्यातील विभिन्नतेने सामाजिक स्थितीची संघर्षात्मक व्याख्या केली जाते. उदा. वेश्यावृत्तीमुळे कुटूंबाच्या अस्तित्त्वास धोका निर्माण होतो. तर त्या विरोधी विचार, लैंगिक नैराश्यावर वेश्यागमन उपाय आहे, त्या मनोरंजन करतात.

मूल्ये संघर्ष दृष्टिकोणातून समाजाची मुल्ये, प्रमाणके (in consistant) मूल्यामध्ये तणाव, संघर्ष असतो. मूल्याचा परिणाम सामाजिक समस्याचे कारण आहे. उदा. प्रेम प्रणयाधारित विवाह ही मूल्ये विवाहाच्या पावित्र्या विरोधी ठरतात. प्रणय प्रमाणातील आकर्षण ओसले की घटस्फोट होतो. विवाहवाहा संबंध निर्माण होतात किंवा व्यक्तिवाद आणि समाजहित ही मूल्ये परस्पर विरोधी असल्याने मूल्ये संघर्ष होतो. उदा. कुटुंब नियोजन विषयक हिंदु आणि इस्लामचा मूल्ये संघर्ष वर्ग संघर्ष दृष्टिकोणात सामाजिक समस्या कशा निर्माण होतात आणि त्यावर उपाय योजना सुचविली जाते.

५) मूल्ये संघर्षाने वैयक्तिक विचलन होते :- समाजात सामाजिक स्थितीने मूल्ये संघर्ष होत नाही तर व्यक्तीचा विकास होत असताना संघर्षात्मक मूल्ये आत्मसात केली जातात. व्यक्तीने प्रामाणिक असावे असे शिकविले जाते. परंतु यश आणि प्रामाणिकता ह्या बाबी एक नाहीत. समाजातील नैतिक गोंधळाने : वैयक्तिक विचलन होते. मूल्य निर्धारणाबाबत संघर्षात्मक मूल्ये व्यक्तीची असमर्थता निर्माण करतात. अशा गोंधळाने वैयक्तिक वेजबाबदारपणा निर्माण होतो आणि सामाजिक समस्या निर्माण होतात. उदा. तरुणांना फॅशन करावी वाटते परंतु ह्या अतृप्त बेकायदेशीर मार्गाने पूर्ण करतात. त्यामुळे तरुणाकडून गुन्हे घडतात.

अशा प्रकारे मूल्ये योग्य, अयोग्य वर्तनाचे मानदंड आहेत. रणांगणात सैन्याने शत्रुला मारणे योग्य परंतु प्रत्येक समाजाची मूल्याव्यवस्था वेगळी असते. उदा. एक विवाह, राष्ट्रनिष्ठा, बहुविवाह, चंगळवाद, त्यामुळे मूल्याबाबत मतैक्य नसते. मूल्याच्या विसंगतीने मूल्ये संघर्ष होतो. त्यामुळे विचलन होते. उदा. आंतरजाती विवाह आणि जाती अंतर्गत विवाह ह्या मिन्न मूल्याने संघर्ष होतो. समूहाची विविध संघर्षात्मक मूल्ये सामाजिक समस्याचे फलित आहे.

६) मूल्ये संघर्ष दृष्टीकोणातील दोष : 

  1. मूल्यसंघर्ष दृष्टिकोणात विरोधी गट संपूर्णपणे एकमेका विरोधी असतो का याची चर्चा करीत नाही.
  2. सामाजिक समस्या मूल्ये संघर्षाचा परिणाम असेल तर समस्या कशा प्रकारे सोडवाव्या त्याचे उत्तर देत नाहीत. सत्ता संघर्षात एखादा गट यशस्वी झाला तर त्याची मूल्ये लादतो का? किंवा संघर्ष संपुष्टात आला तेव्हा कोणती मूल्ये प्रभावी ठरतील उत्तर अनुत्तरीत आहे. त्याचे 
  3. समस्या सुटण्यासारखी नसेल तर मूल्ये बदलतील का? किंवा त्याच्यावर परिस्थितीचा काय परिणाम होईल. त्याचे स्पष्टीकरण हा दृष्टिकोण करीत नाही. समस्या काही वेळा संघर्षात्मक मूल्याऐवजी सहभागी मूल्याने निर्माणहोतात.
  4. सत्ता संघर्षात विभिन्न समुहाची समान मूल्ये असतात. ज्याशी संघर्ष केला जातो. त्यांची भिन्न मूल्ये असतात. उदा. युद्ध राष्ट्राच्या हिताचे असते. त्याने आर्थिक लाभ प्रादेशिक नियंत्रण, राजकीय नेतृत्त्वाचे सहभागी मूल्ये इत्यादी युद्धाचे दृष्टिकोण असतात किंवा वांशिक संघर्षाची मुळे सत्ता, अधिकार, दर्जा, एकात्मा, विलगता आहेत. परंतु सहभागी मूल्ये आणि संघर्षात्मक मूल्ये यात कोणती मूल्ये संघर्षात प्रभावी ठरतात हे ठरविणे कठीण आहे.

अशा प्रकारे सामाजिक समस्यांचा मूल्य संघर्ष दृष्टिकोण स्पष्ट करता येतो.



  • समाजशास्त्र

  • CBCS

  • (Choice Based Credit System)

  • बी.ए. द्वितीय 

  • वर्ष समकालीन भारतातील सामाजिक समस्या

  • Social problems in Contemporary India


परिचय  (Introduction)




Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English