आर्थिक विकासाचे निर्देशक घटक सांगा ( Indicators of Economic Development )
आर्थिक विकासाचे निर्देशक उत्तर : एखाद्या देशाचा आर्थिक विकास होतो किंवा लक्षात नाही येण्याकरीता विकासाचे काही निर्देशक पटक सांगण्यात येतात . या घटकाच्या साह्याने आर्थिक विकासाचे मोजमाप करता येते . ते निर्देशक घटक पुढील प्रमाणे सांगता येतात . १ ) राष्ट्रीय व दरडोई उत्पन्नात वाढ : एखाद्या राष्ट्राच्या राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होत असेल तर आर्थिक विकास होतो असे समजले जाते . कारण एकुण राष्ट्रीय उत्पन्नातील वाढीमुळे तेथील लोकांच्या क्रयशक्तीत वाढ होवून लोकांच्या गरजा पूर्ण होतात . तरी पण लोकसंख्येतील वाढीचा प्रभाव कळण्याकरिता ' दरडोई उत्पन्न ' हा अधिक चांगला निर्देशक आहे . दरडोई उत्पन्नात होणारी वाढ हे आर्थिक प्रगती मापणाचे उचित माप आहे . दरडोई उत्पन्नात जेवढी वाढ जास्त तेवढा आर्थिक विकास जास्त समजला जातो . २ ) भांडवल निर्मितीचा दर : आर्थिक विकासाच्या प्रक्रियेत भांडवल निर्मिती चालकाचे कार्य करते . म्हणून राष्ट्रीय उत्पन्नातून किती बचत होवू शकते व त्यातून किती गुंतवणूक होवू शकते यावर आर्थिक विकासाची संभाव्यता अवलंबून अस...