Category

Show more

बालगुन्हेगारीची विषयी सविस्तर माहीती (Meaning of Juvenile Delinquency)

बालगुन्हेगारीचा अर्थ सांगुन त्याचे स्वरूप स्पष्ट करा. (Meaning of Juvenile Delinquency)

समकालीन भारतातील सामाजिक समस्या

प्रश्न १ :-  बालगुन्हेगारीची संकल्पना स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तावना :- बालगुन्हेगारी हे आजारी समाजाचे लक्षण आहे. शहरातील वाढती गर्दी, बकालवस्त्या, जुगार तस्करी मद्यपानाने बाल गुन्हेगारी वाढत आहे. औद्योगिकरण, नागरीकरणाने बालगुन्हेगारी वाढत आहे. भारतात सुद्धा पाश्चात्य देशाप्रमाणे बालगुन्हेगारी गंभीर स्वरूप धारण करीत आहे. गुन्हे आणि बालगुन्हेगारी ह्या प्राचीन समस्या आहेत. विशेषता गुन्हेगारीत वालगुन्हेगारीची भर पडत आहे. बालगुन्हेगारी ही सार्वत्रिक समस्या आहे.

बालगुन्हा ही संज्ञा :-

 बालगुन्हेगारी ही संज्ञा सैल अर्थाने वापरली जाते. त्या संदर्भात डॉ. सुशीलचंद्र म्हणतात. बालगुन्हेगार कोणाला म्हणावे याची एकस्कंध व्याख्या नाही त्या संबंधीचे दृष्टीकोन, उपाय योजना गोंधळात टाकणाऱ्या आहेत. विधिज्ञ, समाजशास्त्रज्ञ वैद्यक, पालक, अध्यापक, समाजशास्त्रज्ञ न्यायाधिश, विधिज्ञांनी विविध दृष्टीकोनातून विश्लेषण केले. बालगुन्हेगारीची व्याख्या देशातील कायदे, सामाजिक परिस्थिती समाजशास्त्रीय आणि वैधानिक दृष्टीकोनामुळे व्याख्येत मित्रता, विविधता दिसून येते. मूल्ये. नियमाचे उल्लंघन म्हणजे बालगुन्हेगारी परंतु मूल्ये नियमने शहर, राज्यात विभिन्न असतात. तसेच न्यायालय, पुलीस आणि समुदायाच्या अनिवृत्तीवर अवलंबून असतात. रुथ कवन म्हणतात. कायद्याचे उल्लंघन करणारे बालगुन्हेगार नाहीत त्यांना पोलिसाने पकडणे आवश्यक आहे. तत्वतःच आरोपी करून गुन्हा सिद्ध करणे आवश्यक आहे. समाजशास्त्रीय दृष्टीकोनातून प्रस्थापित रुढी, रीतीरिवाज, लोकाचारा विरुद्ध वर्तन करणारा बालगुन्हेगार आहे. 

ज्याचे वर्तन इतरास हानिकारक, बाधक ठरते कछवाह म्हणतात. तो निरुद्देश भटकतो सामाजिक दृष्ट्या उन्मार्गी वर्तन करतो, कायद्याचे उल्लंघन करतो. डॉ. सुशीलचंद्र म्हणतात जेव्हा बालकाचा खोडकरपणा नियमने उल्लंघनाच्या सवयीत रुपांतरीत होतो असे वर्तन बालगुन्हेगारीचे आहे. मँगोल्डने वैधानिक दृष्ट्या गैरवर्तनास बालगुन्हेगारी संबोधले आहे. वयात न आलेल्या मुलाने अथवा मुलीने प्रचलित कायद्याविरोधी केलेले वर्तन किंवा सामाजिक नियंत्रणाचे केलेले उल्लंघन म्हणजे बालगुन्हेगारी. बालगुन्हेगार म्हणजे विशिष्ट वयोमर्यादेतील मुलाने / मुलीने केलेले दृष्कृत्य होय. 

व्याख्या :

  1.  डॉ. सुधा काळदाते :-  बालगुन्हेगारी असे वर्तन आहे जे सामाजिक दृष्ट्या अपेक्षीत नसते. 
  2. डॉ. सी. बी. मेमोरिया :- बालगुन्हेगारी विशिष्ट वर्तन प्रकार आहे तो सार्वजनिक नीतीविरुद्ध असतो. बालकाचे पौगंडाचे समाज अमान्य वर्तन आहे. बालकाकडून केली जाणारी समाजविरोधी कृत्य बालगुन्हेगारी आहे. 
  3. विल्यम शेल्डन:- योग्य अपेक्षांचा भंग करणारे वर्तन म्हणजे बालगुन्हेगारी होय.
  4.  मार्शल क्लिनार्ड : विशिष्ट वयोगटातील व्यक्तीने केलेले समाज विघातक कृत्य. 
  5.  इलिनॉस कायदा :- जो निरुद्देश मटकतो. आळसात वेळ घालवितो. रस्त्यावर भटकतो. गैरकायदेशीर व्यवहार, व्यवसाय करतो.
  6. न्यु मेस्किो :- जो पालकाच्या आज्ञेचे उल्लंघन करतो किंवा कायदेशीर अधिकाराचे उल्लंघन करतो जी मुले अनियंत्रित असतात ज्यामुळे स्वतःच्यात इतरांच्या नीती आरोग्यास हानी पोहचते.
  7.  डॉ. शेठना :- वैधानिक व्याख्या एखाद्या देशातील कायद्याने नमूद केलेल्या विशिष्ट वयोमर्यादेतील मुलाने / मुलीने प्रचलित कायद्याच्या विरोधात केलेले वर्तन
  8. फ्रिडलँडर :- कायद्याच्या आधारे कारवाई करण्यास पात्र असे दुर्वतन करणारे बालअपराधी होत. 
  9.  सिरील वर्ट :- जेव्हा बालकाची समाजविरोधी प्रवृत्ती इतकी गंभीर  स्वरूप धारण करते की ज्यामुळे बालक कायदेशीर कारवाईचे लक्ष ठरते.
  10. १९६० चा बालकायदा :- (Childern Act १९६० ) १६ ते १८ वयोगटातील मुलाने / मुलीने केलेला गुन्हा म्हणजे बालअपराध .

व्याख्याचे विश्लेषण :

बालगुन्हेगारीच्या वैधानिक व्याख्येत १६ ते १८ वयोगटातील मुले / मुली जी जाणीवपूर्वक कायद्याचे उल्लंघन करतात अनैतिक व्यवसाय करतात. डॉ. सेठना वर्ट चिल्ड्रेन अॅक्ट फ्रिडलँडर न्युमेअरने वैधानिक व्याख्या केल्या. शेल्डन, मार्शन क्लिनाईट ओहिओ कोड च्या व्याख्या सामाजिक स्वरुपाच्या व्याख्या आहेत. ज्यात समाजाचे मूल्ये, संकेताचा भंग करणारे वर्तन उनाडपणा भटकेपणा, अनैतिक वर्तनाचा समावेश होतो. बालगुन्हेगार भाता पित्याच्या आई चे उल्लंघन करतात. शाळेतून पळून जातात इतरांच्या नैतिकतेस इजा देतात. बालगुन्हेगारीची लक्षणे आणि स्वरुप :

  1.  बालगुन्हेगार वयाने आणि बुद्धीने परीपक्व नसतात.
  2. वालगुन्हेगारी सार्वत्रिक आहे. प्रत्येक संस्कृतिक अस्तित्वात आहे.
  3. बालगुन्हेगारी ही नागरी समस्या आहे. 
  4.  समीश्र वस्ती, अधिक लोकसंख्येची घनता असेल तेथे बालगुन्हेगारीचे प्रमाण अधिक असते.
  5.  बाल गुन्हेगाराची वयोमर्यादा कायद्याने निर्धारीत केली जाते.
  6.  मुलीच्या तुलनेत मुलाचे बालगुन्हेगारीचे प्रमाण अधिक असते कारण मुलीवर अधिक नियंत्रण असते. 
  7.  मुले चोरी करतात जुगार खेळतात वेश्या गमन करतात. बदमाश गुंडाची सोबत करतात शिवराळ भाषा वापरतात तर मुली लैगिक गुन्हे करतात.
  8.  गुन्हेगार व बालगुन्हेगार वेगळा समजून बालगुन्हेगारावर उपचार केले जातात. रिमांड मध्ये पाठवितात वालन्यायालयात त्याचे खटले चालतात. ९) बालगुन्हेगार अजाणतेपणे गुन्हा करतो. त्यास त्याच्या कृत्याची योग्य, अयोग्य जाणीव नसते. अशा प्रकारे बालगुन्हेगारीची संकल्पना स्पष्ट करता येते. 

प्रश्न २ :- बालगुन्हेगारीची कारणे सांगा.

(Causes of Juvenile Delinquency)

किंवा

बालगुन्हेगारी निर्माण होण्यापाठीमागील कारणांचा आढावा घ्या.

उत्तर :

प्रस्तावना :- बालगुन्हेगारीची कारण मिमांसा करताना न्युमेअर म्हणतात. बालगुन्हेगारीचे कोणतेही एक कारण देणे असमाधानकारक आहे. आर. एल. सिंह म्हणतात बालगुन्हेगारी कोणत्याही एका कारणाने स्पष्ट होत नाही. लोम्बासी, गोअरिंग, गोडार्ड, क्रेशमरने अनुवंशीक कारणे सांगितली आहेत. गिलिन व गिलिनने बालगुन्हेगारीचे भौगोलिक, मानसिक, आर्थिक घटक सांगितले. न्युमेअर व चार्लस बडने सामाजिक परिस्थितीस प्राधान्य दिले. शेल्डन आणि ग्लूएकने बालगुन्हेगारीचा बहुविध कारक सिद्धांन्त मांडला. अब्राहमने कौटुंबिक तणाव कारण सांगितले. रेकलेसने सामाजिक मानसिक कारणे सांगितली. थॅशरने टोळी सिद्धांत (गँग) कोहेनने उपसंस्कृतीचा सिद्धांत, शॉ मॅकीने परिस्थिती सिद्धांत (Ecology) मर्टनने प्रमाणक शून्यता कारणे दिली. अशा प्रकारे मॅकीने थॅशर, शॉ, मीड, कोहेन, ओहलीन, मेटस् यांनी विविध कारणे सांगितली. बालगुन्हेगारीच्या कारणाची मिमांसा व्यक्तीगत कारणे आणि सामाजिक, अनुवंशिक मानसिक, कारणे अशी केली जाते. परिस्थिती जन्य कारणात कुटुंब मित्र, शाळा शेजार, चित्रपटाच्या समावेश होतो. 

१) शारिरीक कारणे (वैयक्तिक ) :

शारिरीक किंवा जैविक घटकात काही शारिरीक वैशिष्टांचा समावेश होतो. त्यात अनुवंश, अंतस्त्राव ग्रंथी, शारिरीक दुर्बलता, शारिरीक असामान्यता. शारिरीक विकृतीचा समावेश होतो. माता-पित्याकडून मुलात अनुवंशिक गुणधर्म संक्रमीत होतात. लोम्ब्रोसो म्हणतो बालगुन्हेगारी व अनुवंशाचा संबंध आहे. शरीर रचना आणि गुन्हेगारीचा हुटनने संबंध सांगितला आहे. लोम्ब्रोसो म्हणतो गुन्हेगान जन्मजात असतात. गोअरिंग, हुटन क्रेशमरने शारिरीक रचना आणि बालगुन्हेगारीचे समर्थन केले. शेल्डनने बालगुन्हेगारी आणि शरीररचनेचा संबंध विषद केला. जैविक किंवा शारिट्रीक घंटक खालीलप्रमाणे आहेत. 

  1.  अनुवंश 
  2.  अंतस्त्राव ग्रंथी 
  3. शारिरीक दुर्बलता
  4. शारिरीक विकृती 
  5. शारिरीक असामान्यता 
  6.  सातत्याचे आजार.

i) अनुवंश :- डगडेल, इस्टबुक आणि गोअरिंग च्या मताप्रमाणे मुलात मातापित्याकडून अनुवंशिक गुणधर्म संक्रमीत होतात. सिरील बर्टच्या मताप्रमाणे ७० टक्के बालगुन्हेगार शारिरीक दोषग्रस्त असतात. गोअरिंगच्या मताप्रमाणे बौद्धिक दुर्बलता बालगुन्हेगारीचे कारण आहे. १३ टक्के वालगुन्हेगार निर्बुद्ध असतात. अनुवंशकतेचा बालकाच्या स्वास्थावर परिणाम होतो. शारिरीक दुर्बलतने बालकास हिनतेची भावना निर्माण होते. जन्मजात विकृती, कुरूपतने बालकावर तणाव येतो. परंतु शास्त्रीय आधारावर उपरोध निष्कर्ष चूक वाटतात. गुन्हेगाराची मुले गुन्हेगार असतात हा समज चुकीचा आहे.

ii) अंतस्त्राव ग्रंथी :- शरीरात अंतस्त्राय ग्रंथीचे प्रभावी, महत्वपूर्ण कार्य आहे. ग्रंथाच्या स्त्रवन्यामुळे काही बालकाची अनैसर्गिक शारिरीक वाढ होते त्यामुळे त्याला न शोभणारे वर्तन करतो. काही मुलांना बालवयात मेंदूचे विकार होतात ती मुले अतिशय मंद बुद्धीची किंवा चालाख होतात. अंतस्त्राव ग्रंथी वाल गुन्हेगारीचे कारण आहे. परंतु दुर्बलता शोधण्याच्या शास्त्रीय पद्धती नसल्याने निष्कर्ष पूर्ण मान्य करता येत नाहीत.

iii) शारिरीक दुर्बलता :- लोब्रोसो आणि हॉस्किनच्या मताप्रमाणे शारिरीक दुर्बलतेने लैगिक गुन्हे वाढतात. थर्स्टन, हूटन, हिले, ब्रोन्नर यांनी शारिरीक गुणधर्माचा मुलावर प्रभाव सांगितली आहे. ७० टक्के बालगुन्हे शारिरीक दुवळेपणाने होतात. विशेषता लैगिक गुन्हे वाढतात.

iv) शारिरीक विकृती :- शारिरीक विकृतीमुळे मुलांची दयनीय अवस्था होते अशी बालके अपसमायोजन करतात त्यांच्यामध्ये द्वेषमूलक प्रवृत्ती निर्माण होतात. मुलीमध्ये शारिरीक विकृती असल्यास इतरास लैगिक गुन्ह्यास प्रेरित करतात. शारिरीक विकृतीने त्रासलेली मुले चिडखोर, प्रतिक्रियावादी असतात त्यांच्यात तिव्र भावनात्मक संघर्ष असतो.

v) शारिरीक असामान्यता :- शरीरांचा पूर्ण विकास न झाल्यास शारिरीक विकासाअभावी न्यूनगंड, मनौदीवर्त्य निर्माण होते. अधिक प्रमाणात शारिरीक विकास झाल्यास लैगिक गुन्हे होतात.

vi) सातत्याचे आजार :- रोगामुळे बालके शारिरीक, मानसिक दृष्ट्या व्याधीगस्त होतात. त्यामुळे आत्यांतिक आत्मकेंद्री बनतात. २) मानसिक कारणे, किंवा मानसिक घटक :

बालगुन्हेगार मानसिक रोगाने पिडीत असतात असे अनेक मानसशास्त्रज्ञ गांना वाटते. त्यांच्यावर कोण प्रेम करत नाही. त्यामुळे त्यांचे व्यक्तीमत्व सायकोपॅथीक बनते. ( Deliquents are mentally diseased) आईसलरने वालगुन्हेगारीचा मानसिक सिद्धांत विसीत केला. जेफरीने वालगुन्हेगारीचे मानसिक कारण सांगितले. फ्राईइने बालगुन्हेगारीचे मनोविकलन वादाच्या आधारावर समर्थन केले. अलेक्झांडर, अॅडलरने न्यूनगंड, निराशा आणि संघर्षाचा बालगुन्हेगारीशी संबंध सांगितला. हिलेच्या मताप्रमाणे आंतरिक बाह्यदडपण बालगुन्हेगारीचे कारण आहे. पॉप टॅपान च्या मताप्रमाणे सायकोपॅथीक मुले शंकाखोर, आत्मकेंद्री, असामाजिक क्रूर, निदर्यी असतात. ती बदला घेणारी लैगिंक प्रवृत्तीची असतात. मानसिक घटकाचे खालील उपप्रकारात विश्लेषण करता येते.

  1.  मानसिक दुर्बलता 
  2. मानसिक रोग/मनोविकृती
  3. व्यक्तीमत्वाची लक्षणे 
  4.  भावनात्मक अस्थिरता.

अ) मानसिक दुर्बलता :- 

डॉ. गोअरिंगच्या मताप्रमाणे मानसिक दुर्बलता गुन्ह्याचे कारण आहे. हिले आणि ब्रोन्नरल चार हजार मुलांच्या बौद्धीक चाचणीत १३ टक्के मुलांचा बुध्यांक ७० टक्के हून कमी आढळला. गिलीन आणि गिलिन ने मानसिक दुर्बलता बालगुन्हेगारीचे प्रमुख कारण सांगितले आहे. मंदबुद्धीची मुले भावनेच्या आहारी जातात घरातून पळून जातात ९० टक्के मंद बुद्धीची मुले पकडली जातात. उलटपक्षी १० टक्के तल्लखबुद्धीची मुले पकडली जातात. परंतु मेरील म्हणतात बुद्धीचा व बालगुन्हेगारीचा संबंध नाही मात्र गोडार्ड बालगुन्हेगारीचे कारण मानसिक दुर्बलता समजते.

ब) मानसिक आजार किंवा मनोविकृती :- 

बालगुन्हेगार मनोरुग्ण असतात. त्यांना उपचार आवश्यक आहेत. अशी मुले लैर्गिक दृष्ट्या अनियंत्रित असतात. अपराध शास्त्रज्ञाच्या अध्ययनात बालगुन्हेगार मनोरुग्ण आढळून आले. त्यांच्यात आत्मनियंत्रण, प्रेमाचा अभाव दिसून आला. अशी मुले अतिलैगिंक वर्तन करणारी बदला घेणारी, शंकाखोर, आढळून आली. डनहॅम व इस्ट म्हणतात मनोरुग्ण बालके अल्प प्रमाणात बालगुन्हेगार असतात.

क) व्यक्तिमत्वाची लक्षणे, किंवा गुणधर्म :- 

व्यक्तिमत्वाची लक्षणे आणि बालगुन्हेगारीचा संबंध आहे. बालगुन्हेगार अवैधानिक रित्या परिस्थितीशी समायोजन करतात. ग्ल्युएकच्या मताप्रमाणे सामान्य बालकाच्या तुलनेत बालगुन्हेगार अधिक स्वैराचारी, बेजबाबदार, बंडखोरवृत्तीचे असतात. ते सामान्य मुलापेक्षा आठपट भावनात्मक अपरिपक्व असतात. बालगुन्हेगार साहसी प्रवृत्तीचे विनाटिकेट प्रवास करणारे धोकादायक घटनात रस घेणारे असतात. त्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास न झाल्याने त्यांच्याकडून अनेक गुन्हे होतात. ती घराबाहेर भटकतात जुगार, खेळतात मद्यपान करतात.

ड) भावनात्मक, संवेगात्मक अस्थिरता :

 हिले आणि ब्रोन्नर म्हणतात ९३ टक्के बालगुन्हेगार भावनात्मक असंतुलित असतात. संवेगात्मक अस्थिरता मानसिक कारणातील प्रमुख कारण आहे ज्यात प्रेम आणि सहानुभूतीचा अभाव, हिनतेची, अतृप्ततेची भावना यामुळे मुलाचे असंतुलित व्यक्तिमत्व बनते. बालगुन्हेगार मुलीत अधिक प्रमाणात भावनात्मक अस्थिरता आढळून येते. हिले व ब्रोन्न म्हण २३ टक्के बालगुन्हेगारात भावनात्मक अस्थिरता, ४६ टक्के असुरक्षितता २८ टक्के स्नेहाचा अभाव ५४ टक्के बालगुन्हेगारास अपर्याप्तता, ३४ टक्के बालगुन्हेगारात घृणेची भावना १७ टक्के बालगुन्हेगार दुःखी होते. मॅकडुगलच्या शब्दात दमीत इच्छा वालगुन्हेगारीचे प्रमुख कारण आहे.

 ३) परिस्थितीजन्य घटक किंवा सामाजिक कारणे :

समाज रचनेत होणारे बदल सांस्कृतिक संघर्ष, बदलत्या समाजरचनेत • गुन्हेगारीचे प्रमाण अधिक असते. शहरात दाट वस्तीच्या ठिकाणी, राजकीय सीमारेषा क्षेत्रात प्रमाण अधिक असते. सुदरलँडच्या मताप्रमाणे शहराच्या घनदाट वस्तीपासून दूरजावे तेवढ्या प्रमाणात बालगुन्हेगारी प्रमाण कमी होते. विभागीय रचनाबरोबर वर्ग, वय, लिंग, निवासस्थान, मनोरंजन, आर्थिक स्थिती चित्रपट, साहित्य, वृत्तपत्रे समीश्र संस्कृतीचा बालगुन्हेगारीशी संबंध आहे. भेद आक्रमकता निर्माण होते. मॉलरच्या अध्ययनात न्यूयॉर्क जेथे राहणीमानाचा निम्नस्तर आहे. औद्योगिक केंद्र आहेत. निवास अस्थिर आहे. तेथे स्थानक धर्मशाळा, हॉटेलात लोकसंख्या अस्थिर आहे. तेथे जुगार, उचलेगिरी चालते, क्लिफर्ड, शॉभेकीच्या शिकॅगो शहराच्या अध्ययनात केंद्रीय भागात बालगुन्हेगारीचे प्रमाण अधिक दिसून आले. जेथे शाळेतून मुले पळून जातात. तसेच कारखाने क्षेत्राच्या परिसरात बालगुन्हेगारीचे प्रमाण आढळून आले. जेथे व्याभिचार, जुगार चालतो. मद्यपान चालते. असे अपराधी क्षेत्र होय.

भारतात स्वातंत्र्योत्तर नागरीकरणात वेग आला शहराची लोकसंख्येची घनता वाढली त्यामुळे दारिद्य, बेकारी, लोकसंख्येची विजायता वाढली. गलिच्छ वस्त्या वाढल्या. म्युमेअर म्हणतो नागरीकरण सर्व समुहात प्रभावित करते. बालकास विघटीत करते. वाढती लोकसंख्या आणि बालगुन्हेगारीचा संबंध सुदरलँड, शॉ, मॅकीने सांगितला. भौतिकवादी दृष्टीकोन, युद्ध बालगुन्हेगारीचे कारण आहे. अशा प्रकारे समाज रचनेत होणारे परिवर्तन प्रमाणक शून्यता संदर्भ समुह सामाजिक विघटन, अनुकरण स्थलांतरण झोपडपट्टया, बालगुन्हेगारीस सहाय्यभूत ठरते. विलगता प्रमाणक शून्यता अवैयक्तिक इ.. 

४) कुटुंब :

रॉबर्ट बीरस्टीडच्या मताप्रमाणे मानवी जीवनावर कुटुंबाइतका कशाचाही प्रभाव नाही. एलिएटक्मेरिलच्या मताप्रमाणे कौटुंबिक घटकाचा बालगुन्हेगारीवर अधिक प्रभाव पडतो. त्यांच्या मताप्रमाणे चांगल्या कुटुंबात जन्म घेणे हा सर्वात्कृष्ट, पुरस्कार आहे. हिले आणि ब्रोन्नरला ५० टकके बालगुन्हेगार विघटीत कुटुंबातील आढळले. कुटुंबास मानवी जीवनाची प्राथमिक पाठशाळा समजतात. कुटुंबात विचार, आदर्श संस्कार केले जातात. कुटुंब दर्जा देणारे, सामाजिकरणाचे माध्यम आहे. कुटुंबाचे विघटन समाज विरोधी मूल्याचे संवर्धन करते. बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढविते. कुटुंब ह्या घटकाचे अनेक प्रकारात विश्लेषण करता येते. 

  1. कुटुंबाचा आकार,
  2. भग्न कुटुंब, 
  3. अनैतिक कुटुंब, 
  4. तिरस्कृत बालकं,
  5. बहीण भाऊ संबंध 
  6. कुटुंबातील व्यसनाधिनता,
  7. अतिशिस्त व शिस्तीचा अभाव, 
  8. कुटुंबाची आर्थिक स्थिती

i) कुटुंबाचा आकार :- 

कुटुंबाचा आकार मोठा असेल तर मुलांची हेळसांड होईल त्यांचे निट संगोपन होणार नाही. मुलांच्या गरजा पूर्ण न झाल्यास गरजा पूर्ततेसाठी गुन्हा करेल.

ii) विघटीत किंवा भंग्न कुटुंब :- 

आई-वडीलांचा मृत्यू, घटस्फोट, परित्याग, अनैतिक संबंधाने कुटुंब विघटीज होते. अशा कुटुंबातील बालकांना प्रेम, स्नेह मिळत नाही. अशी मुले अधिक वेळ घराबारे राहतात. भग्न कुटुंबाने मुलापेक्षा मुलीत अधिक गुन्हेगार प्रवृत्ती निर्माण होते. विक्सच्या मताप्रमाणे ६८ टक्के मुली ३९ टक्के मुले, विघटीत कुटुंबातील असतात. हंसा सेठसा ४८ टक्के बालगुन्हेगार विघटीत कुटुंबातील आढळले. चंद्रप्रकाश गोएलला बहुतांशी बालगुन्हेगार विघटीत कुटुंबातील दिसून आले. मेरिलच्या मते ५० टक्के बालगुन्हेगार विघटीत कुटुंबातील असतात. सुंदरलॅन्ड ला ३० ते ६० टक्के बालगुन्हेगार विघटीत कुटुंबातील होते. अब्राहम म्हणतो, कौटुंबिक तणाव, द्वेष, शत्रुत्व निर्माण करते आणि ताणव, शत्रूत्व बालगुन्हेगारीस संवर्धन करते. ग्ल्युएक म्हणतो तणावामुळे भांडणे होतात. एबाल्ट बेकनोजला ३८ टक्के भग्न कुटुंबातील आढळून आले हिले व ब्रोन्नरला शिकॅगो व बोस्टन शहरातील चार हजार बालगुन्हेगारांपैकी दोन हजार विघटीत कुटुंबातील होते. कुटुंबाच्या विघटनाने मुले असमायोजन करतात. असुरक्षित होतात.

ii) अनैतिक कुटुंब :-

 ज्या कुटुंबात वेश्याचारी, मद्यपान, जुगार चालतो त्या कुटुंबातील वातावरण बालगुन्हेगारीस चुंबकाप्रमाणे आकृष्ट करते. माता पिता, अनैतिक वर्तन करीत असल्यास त्याच्या मुलाच्या मनावर विपरीत परिणाम होतो. वडीलांच्या चारित्र्य हिततेचा परिणाम होतो. मीस एलिएटच्या मताप्रमाणे माता वेश्या असेल तर मुलीस वेश्या होण्यास हरकत होणार नाही. वेश्याच्या वस्तीत राहणाऱ्या मुली वेश्या व्यवसाय स्वीकारतात. विघटीत कुटुंबात ६७ टक्के अनैतिक व्यवहार चालतात. आई-वडीलांच्या चारित्र्यहिनतेने मुले चांगल्या गुणाऐवजी वाईट गुणाकडे वळतात.

iv) तिरस्कृत, उपेक्षित बालक :-

 कुटुंबात मुलाच्या उपेक्षेची अनेक कारणे आहेत. अनावश्यक अवैधमुल व कुटुंबातील माता-पिता तणाव, सावत्र आई-वडील त्यामुळे मुलास प्रेम-समाधान, सुरक्षा प्राप्त होत नाही. अनैतिक मुलाकडे त्याचे कुटुंब, आणि समाजसुध्दा घृणास्पद दृष्टीने पाहतो. अपराधतज्ञ म्हणतात तिरस्कृत बालकात गुन्हा प्रवृत्ती अधिक असते. अनैतिक संबंधातून जन्मलेली मुले त्यागली जातात. परिणाम गुन्हेगार होतात. सावत्रपणा, मातापित्याची मारहाण, कुरवर्तनाने मुले घरातून पळून जातात, मुली वेश्या होतात. लंडन येथील अध्ययनात माता-पिता संबंधातून मुलींनी वेश्या व्यवसाय पत्करला. टॅफ्टच्या मताप्रमाणे अनावश्यक मुले बालगुन्हेगार होतात. त्यांच्या आवश्यक, गरजा, सुरक्षितता, मानसिक गरजा पूर्तते अभावी बालगुन्हेगार बनतात.

v) बहीण भाऊ संबंध :-

 बालकाच्या व्यक्तिमत्वावर आई-वडील नव्हे तर भाऊ-बहीणीचा परिणाम होतो. कुटुंब एकात्म, सुसंघटीत असेल तर व्यक्तिमध्ये एकात्मता, सहानुभूती असणार नाही. आणि बालकाचे व्यक्तिमत्व विघटीत होईल मोठी बहिण अनैतिक वर्तन करीत असेल तर धाकटी बहीण अनैतिक वर्तन करेल थोरली बहिण आदर्श असेल तर घाकटी भावड़े आदर्श बनतील. कुटुंबात अधिक मुले असतील तर मो दुर्लक्षीत जातील. ग्ल्यूएकच्या मताप्रमाणे ८० टक्के गुन्हेगारांना कोणते ना कोणते व्यसन असते. 

vi) कुटुंबातील व्यसनाधिनता :- 

कुटुंबात मादक पदार्थाचे सेवनाची सवय असेल तर बालगुन्हेगारीस सहाय्यभूत घटक ठरेल मुलेही मद्यपान, धुम्रपान करतील. व्यसनी पती पत्नी मुलासोबत निष्ठुर वागेल. पित्याच्या व्यसनाने • कुटुंबाची आर्थिक स्थिती खालावेल. ८० टक्के गुन्हेगारांना कोणते ना कोणते व्यसन असते.


(vii) अतिशिस्त व शिस्तीचा अभाव :-

 पालकाचे गंचया पाल्यावर नियंत्रण असणे, अत्यावश्यक आहे. अनेक पालकांना पाल्य त्यांच्या जरवेत, आइ त असावे वाटते. अती शिस्तिीमुळे मुले चूक, कबूल करण्याचे, खरे बोलण्याचे धाडस करत नाहीत. गुन्हे लपवून ठेवतात. काही पालकांचे त्यांच्या मुलावर नियंत्रण नसते किंवा मुलाकडे दुर्लक्ष करतात. बर्टन शिस्तीचा अभाव बालगुन्हेगारीचे कारण सांगितले आहे.


viii) कुटुंबाची आर्थिक स्थिती :- 

कुटुंबाच्या बिकट आर्थिक स्थितीमुळे मुलांचे निट संगोपन होत नाही. ८० टक्के बालगुन्हेगार अल्पउत्पन्न गटातील असतात, ७५ टक्के बालगुन्हेगार बकाल वस्तीत असतात. दारिद्यामुळे मुलांच्या मुलभूत गरजांची पूर्तता होत नाही. त्यामुळे गुन्हेगारीकडे वळतात. परंतु सधन उच्च वर्गीय कुटुंबातील मुलेसुद्धा बालगुन्हेगार असतात. ग्ल्यूएकच्या ५८० बालकांच्या अध्ययनात २०० मुलींचे माता पिता दैनंदिन गरजा पूर्ण करू शकत नव्हते. ६५ मुलांचे माता पिता दैनंदिन गरजा पूर्ण करण्यास असमर्थ होते. अशा प्रकारे कुटुंबाची आर्थिक स्थिती वालगुन्हेगाराच्या वृद्धीस सहाय्यक ठरते. 

५) आर्थिक कारणे व आर्थिक स्थिती :

आर्थिक परिस्थितीतून बालके बालगुन्हेगार बनतात. बालगुन्हेगारी आणि आर्थिक कारणे परस्पर पूरक घनिष्ट संबंधीत आहेत. आर्थिक स्थितीने बालकात उदासीनता, निराशा, हिनता निर्माण होते. आर. एल. सिहंने आर्थिक दुरावस्था आणि बालगुन्हेगारीचा निकट संबंध दाखविला आहे. बोंजर म्हणतो आर्थिक मागास वर्गातन गुन्हेगार निर्माण होतात. वर्टल १९ टक्के बालगुन्हेगार अल्पउत्पन्न गटातील असतात. मॉचरर म्हणतो, आर्थिक स्थितीं बालगुन्हेगारांची आणि देणगी सुपीक भूमी आहे.

१९५४ मध्ये लखनौ येथील कारागृहातील बालगुन्हेगारांच्या अध्ययनात ७२ टक्के बालगुन्हेगारीचे आर्थिक कारण होते. हिलेच्या अध्ययनात ६३ टक्के बालगुन्हेगार कनिष्ठ आर्थिक स्तरावरील हाते. अकुशल श्रमीकांची मुले अधिक प्रमाणात बाल अपराधी होतात.

आर्थिक घटकात :

१) दारिद्र्य :- 

बोंजर म्हणतो दारिद्य बालगुन्हेगारीस प्रेरणा देतो. कानपूर येथील अध्ययनात दारिद्यामुळे मुलींनी वेश्या व्यवसाय पत्करला असे आढळून आले. आर.एल. सिंह च्या शब्दात दारिद्याता बालगुन्हेगारीचे संवर्धन करणारी भूमी आहे. बरेली, लखनौ तसेच अहमदबाद येथील अध्ययनात दारिद्यात बालगुन्हेगारीचे प्रमुख कारणे आढळून आले. तसेच समृद्धातही वालगुन्हेगारीचे कारण आहे. तप्पन म्हणजे दारिद्यात वबेकारी विचलित वर्तनास प्रेरणा देते समृद्ध देशातही वालगुन्हेगारी आहे.

२) बेकारी :- 

बेकारीमुळे कुटुंबाच्या मूलभूत गरजांची पूर्तता होत नाही. मुलांच्या गरजा पुरविणे अशक्य होते. अपूया वेतनामुळे मुली लैगिक दूर्व्यवहार करतात. अनैतिक मार्गाने पैसा मिळवितात. बेकारीमुळे कोणतेही गैर व्यवहार पत्करतात. अपराध तज्ञ बेकारीचा गुन्हेगाराशी संबंध सांगतात व्यापारचक्रे, उपात्तमार, तेजीमंदी, हंगामी बेकारी आर्थिक असंतोष इत्यादी कारणे जबाबदार आहेत.

(3) शालेय वातावरण

कुटुंबानंतर बालगुन्हेगारीवर प्रभाव टाकणारा शाळा हा प्रमुख घटक आहे. विलियम्सने शाळेतून पळून जाणे. वाईट संगत शिक्षकाकडून कठोर शिक्षा, विषयाची आवड नसणे, न पेलणारा अभ्यासक्रम गुन्हेगाराच्या जाळ्यात अडकणे इत्यादी शालेय वातावरण अनुषंघाने मिमांसा केले कुसंगतीने बालके चोरी, लैगिक गुन्हे करतात.

राजनाथ खन्नायांनी याची लखनौ येथील बालगुन्हेगारांच्या अध्ययनात शाळेतून पळून जाणे ही बालगुन्हेगारी पहिली पायरी समजली पळून जाण्यास शिक्षण प्रणालीतील दोष, निकृष्ट शैक्षणिक दर्जा, शाळेतील निराशाजनक वातावरण, मुलाच्या वयातील अंतर शिक्षक विद्यार्थ्यातील संबंधाचा अभाव, शाळेची रचना, मुलाच्या बुद्धांकात फरक शिक्षण संस्था मुलाच्या अपेक्षा पूर्ण करू शकत नाहीत. शिक्षण स्पर्धेत टिकू न शकणारी मुले वालगुन्हेगार होतात. 

4) कुसंगती, वाईट संगत :

बालकावर सवंगड्याचा प्रभाव असतो. सोबती चारित्र्यहिन होत असतील तर वाईट संगतीने मद्यपान करतो. जुगार खेळतो, घुम्रपान करतो, चोरी वेश्यागमन करतो. शाळेतून पळून जातो घराबाहेर राहतो. बालगुन्हेगारी कुसंगतीचा परिणाम आहे. शाळेतील कुसंगत शेजारी आणि कुटुंबातील कुसंगतीने मुले बालगुन्हेगार होतात. सुदरलॅन्ड च्या मताप्रमाणे गुन्हेगारी वर्तन इतरांच्या आंतरक्रियेतून शिकले जाते. बालकाच्या मनावर त्याचा खोलवर ठसा उमटतो टॅफ्टच्या मनाप्रमाणे वाईट संगत बालगुन्हेगारीचे प्रमुख कारण आहे. हिले आणि बान्नरच्या मनाप्रमाणे ३४ टक्के बालगुन्हेगारीचे कारण वाईट संगत आहे. आर.एल. सिंह म्हणतात वाईट संगतीतून खिसे कापणे, चोरी, उनाडकी इत्यादी गुन्हे केले जातात. समवयस्क भटकी उनाड, कुमार्गी असतील तर संगतीने अनैतिक वर्तन केले जाते. चित्रपट पाहणे, हॉटेलात जाणे, धुम्रपान, मद्यपान, ह्या गरजा पूर्ततेसाठीचोरी करतात. 

5) शेजारी :

कुटुंबानंतर बालक शेजाऱ्यांच्या संपर्कात येतो. शेजारी अनैतिक भांडखोर, क्रूर असल्यास बालकात असामाजिक वर्तन विकसीत होईल काल्डवेलच्या मताप्रमाणे शेजारातून बालगुन्हेगारीस चालना मिळते. 

6) पौगंडावस्थेतील भावनोत्कटता :

मुले आणि मुली वयात येणाचा बारा ते अठरा वयोगटाचा कालावधी आहे. त्या कालावधीत झपाट्याने शारिरीक, मानसिक, बदल होतात. तेव्हा योग्य मार्गदर्शन, संगत, मिळाली नाहीतर मुले वाईट गोष्टीकडे वळतात कारण वयात नाविण्याची ओढ असते. मुले मुली एकमेकांकडे आकर्षित होतात. त्यांना नको त्या अनुभवाची ओढ, इच्छा असते यास ड्युरीया असमने संवेगात्मता अपरिपक्वता संबोधले आहे. मानसशास्त्रज्ञ संवेगात्मक अस्थिरता बालगुन्हेगारीचे प्रमुख कारण सांगतात. उदयशंकराने पौंगडावस्था आणि बालगुन्हेगारीचा निकटचा संबंध दाखविला आहे. हिले व ब्रोन्नरने ९३ टक्के बालगुन्हेगार भावनात्मक असंतुलीत असतात असे नमूद केले त्यात हिनता तिरस्कार प्रेमाचा अभाव, माता पित्याचा, बालकाप्रती दुर्व्यवहाराचा समावेश होतो.

7) सामुदायिक आणि सांस्कृतिक कारणे किंवा गुन्ह्यास करणारे घटक :

 सामुदायिक व सांस्कृतिक प्रभावात अनुक्रमे 

१) मनोरंजन साहित्य, वृत्तपत्राचा समावेश होतो.

i) मनोरजंन :- मुलांच्या विकासात मनोरंजन महत्वाचे आहे. अपुरे मनोरंजनाची साधने बालगुन्हेगारीचे कारणे आहेत. म्हणून वाचनालये, छंद, मंडळे, सहल, बालनाट्य, चित्रकला, शिल्पकला, सुविधा पुरविण्यात याव्यात त्यामुळे बातके दुष्कृत्याकडे वळणार नाहीत कुमार्गाला लागणार नाहीत. 

अ) दोषयुक्त मनोरंजन :

शहरात निर्भेळ मनोरंजनाचा अभाव असतो. शहरातील अपूर्ण मनोरंजनाची. साधने, बालगुन्हेगारीचे कारण आहेत. चित्रपट समानाविरोधी प्रवृत्ती निर्माण करतात. चित्रपटातील अश्लील दृश्ये, श्रृंगार, उत्ताण दृश्ये, संवाद, बेडरूम प्रसंग, साहसी, सनसनाटी दृश्ये, चुंबन, अर्धनग्न पोझेस, चालकांच्या मनावर विपरीत परिणाम करतात. सिरील बर्टच्या मताप्रमाणे चित्रपटाने खिसे कापणे, चोरी करणे, व्यसनाधिनता, लैगिक गुन्हे घडतात. ब्ल्युमर आणि हाऊसरला चित्रपट व वालगुन्हेगारीचा जवळचा संबंध आढळून आला. भारतातील चित्रपट गुन्हेयास पोषक आहेत. चित्रपटाच्या व्यापारी कारणाने समान विघातक प्रवृत्ती वाढली आहे.

ब) अश्लिल साहित्य :

चांगले साहित्य सृजन शक्तीचा विकास करते. मुलांना चांगले वाईट ठरविण्याची जाण येण्यापूर्वीच मूले कामूक, रहस्यकथा, अश्लिल विनोद, रहस्यमय कथा जिवळया वेष्टनातील साहित्याने मुले मुली मानसिक दृष्ट्या भ्रष्ट होतात. अश्लिल साहित्यातील व्याभिचारी त्याला करता, मद्यपान, मुलाच्या अजाण मनावर विपरीत परिणाम करते. अश्लिलातील बाजार उत्ताण अनैतिक संबंधाचे मुले अनुकरण करतात. आणि गुन्ह्यास बळी पडतात. तसेच नृत्य, घर, कॅबरे, मुनराडान्स योनविषयक भष्टाचार निर्माण करतात त्यामुळे मुले विघडतात. ९२ टक्के बालगुन्हेगारांना चित्रपटाचे वेड असते.

क) दूरदर्शन, आकाशवाणी :

आधुनिक काळात मनोरंजनाचे साधन म्हणून टी.व्ही आकाशवाणी, चा प्रसार झाला. टी. व्ही आकाशवाणीवरील कामोत्तोनक संगीत, सनसनाटी बातम्या नाही. राती त्यामुळे समान विघातक प्रवृत्ती वाढतात असे पोपार्ड यांचे मत आहे. पॉल तात्पनच्या मताप्रमाणे टी.व्ही. समाजविरोधी प्रवृत्ती निर्माण करते.

ड) वृत्तपत्रे - 

वृत्तपत्रे रोचक पद्धतीने गुन्ह्याचे वर्णन करतात. अपराधी सिद्ध करण्याचा वृत्तपत्रे प्रचार करतात. वृत्तपत्रातील वर्णनाने मुलास गुन्ह्याची प्रेरणा मिळते. निरपराधी बालक अपराधी होतो. अशा प्रकारे बालगुन्हेगारीची कारणे सांगता येतात .

प्रश्न ३:- बालगुन्हेगारीच्या समस्येला रोखण्यासाठीची उपाययोजना सांगा 

बालगुन्हेगारी प्रतिबंधासाठी उपाय स्पष्ट करा.

उत्तर : प्रस्तावना :- मानवाच्या प्रगती बरोबर बालगुन्हेगारी वाढत आहे. बालगुन्हेगारी यांत्रिक युगाचे अपत्य आहे. सामाजिक परिवर्तनाने सामाजिक, आर्थिक, संरचनेतील परिवर्तन होत असल्याने, पारंपारिक निमंत्रणाची साधने दुर्बल होत आहे. कुटुंबाचा प्रभाव कमकुवत होत आहेत. अवैयक्तिक संबंधाने बालगुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे समाज सुधारक, राजनीतीज्ञ शासन आणि समाजशास्त्रज्ञांचा चिंतनीय विषय बनला आहे. बाल गुन्हेगारीवरील उपाय योजना :

१) कायदेशीर तरतुदी :

प्रत्येक राष्ट्रात बाल अपराध वाढत आहेत. त्याचा समाजावर होणारा परिणाम लक्षात घेता त्यास प्रतिबंध करणे आवश्यक आहे. त्या दृष्टिकोणातून बाल अपराध प्रतिबंधक निरनिराळे कायदे केले आहेत..

अ) उमेदवारी किंवा शिक्षार्थी कायदा, १८५० या कायद्यानुसार प्रशिक्षण दिले जाते. शिक्षण देण्याचा उद्देश मुलाने स्वावलंबी व्हावे, प्रशिक्षणाचा कालावधी सात वर्षे असतो. मुलीचा विवाह होईपर्यंत प्रशिक्षण दिले जाते. मात्र २१ वर्षानंतर कोणत्याही स्थितीत प्रशिक्षणार्थी म्हणून ठेवले जात नाही.

ब) १८८४ चा बाल गुन्हेगारी कायदा :- गुन्हेगार आणि बालगुन्हेगार यांच्यात भेद करणे आवश्यक ठरते. बाल गुन्हेगारास शिक्षा न देता सुधारणा घडवून आणणे आवश्यक आहे. त्या दृष्टिने १८८४ मध्ये वालगुन्हेगारी कायदा करण्यात आला. सर्व घटक राज्यासाठी समाज अधिनियम लावण्यात आला.

क) १८९७ चा सुधारगृह कायदा १९९७ मध्ये बालअपराध कायद्यात महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला. बालगुन्हेगारांना जन्मठेप देतो, करागृहात न ठेवता सुधारगृहात पाठविण्याची तरतूद केली. ज्याचे वय १५ वर्षाआतील आहे अशा वालगुन्हेगारास प्रौढ गुन्हेगारापेक्षा निराळ्या तऱ्हेने हाताळले जाते. १८ वर्षानंतर सुधारगृहात ठेवले जात नाही. सुधारगृहात मुलांच्या राहण्याची, जेवण्याची गोफत व्यवस्था केली जाते.

ड) १८२० चा बाल धुम्रपान बंदी कायदा - या कायद्यानुसार बालकांस धुम्रपानास मनाई आहे.

) १९३३ चा बालरोजगार कायदा :- या कायद्यानुसार वयात न आलेल्या • मुलास कामावर घेण्यास मनाई आहे.

 उ) १९३८ चा बालरोजगार कायदा :- कायद्यानुसार 14 वर्षाआतील बालकास कामावर ठेवण्याची मनाई आहे.

ऊ) मुंबईचा बाल कायदा, १९४८ :- या कायद्याप्रमाणे मुलास जन्मठेप, मृत्यूची शिक्षा देता येत नाही. मुलास कैद करता येत नाही. मुलांना प्रमाणीत शाळेत ठेवण्याची तरतूद करण्यात आली आहे.

ए) १९६० चा केंद्रीय कायदा :- संसदेने १९६० मध्ये लहान मुलाचा केंद्रीय कायदा मंजूर केला. त्यात बालन्यायालये बालण कल्याण मंडळाच्या स्थापनेची तरतूद करण्यात आली. १९८६ मध्ये बाल न्यायालये कायदा पारित करण्यात आला. तसेच अनैतिक व्यापार बंदी कायदा, परिवीक्षा अधिकारी कायदा, बोटल स्कूल अॅक्ट पारित केले. राज्याने अनैतिक व्यापार बंदी कायदे पास केले. त्यानुसार सार्वजनिक ठिकाणी वेश्या व्यवसायास प्रतिबंध केला. हा कायदा तरूण तरूणीच्या संरक्षणासाठी केला आहे. बेकायदा वेश्या व्यवसाय करणे, त्यास प्रवृत्त करणे, वेश्यांच्या उत्पन्नावर निर्वाह करणे, वेश्याचे अड्डे चालविणे, वेश्यांची खरेदी करणे, विक्री करणे त्यास प्रतिबंध केला आहे.

ऐ) बोर्स्टल स्कूल अॅक्ट :- ज्या राज्याने चिल्ड्रेन अॅक्ट लागू केले तेथे १५ ते २१ वयोगटातील मुलांची रवानगी वोर्स्टल स्कूल मध्ये केली जाते. १९२६ मध्ये सर्व प्रथम बोर्स्टल स्कूल अॅक्ट मद्रास प्रान्तात लागू केला. १९२९ मध्ये मुंबई राज्यात, त्यानंतर आंध्र, उत्तरप्रदेश, केरळ, तामिळनाडू, पंजाब, विहार, मध्यप्रांतात कायदा लागू झाला. ज्या बालकांना तीन वर्षापेक्षा अधिक कारावास झाला अशांना बोर्स्टल स्कूल मध्ये ठेवले जाते आणि औद्योगिक प्रशिक्षण दिले जाते.

ओ) परीविक्षा कायदा :- बालअधिनियम केल्यानंतर काही राज्यांनी बाल अपराध्यावर लक्ष ठेवण्यासाठी परीविक्षा अधिका-यांची नियुक्ती केली. १९३५ मध्येसर्व मद्रास राज्याने परीविक्षा कायदा केल्यानंतर मुंबई, उत्तर प्रदेशने कायदा केला.

संघात्मक उपाय : संस्थात्मक उपायात बालन्यायालय सुधारगृह, बोटलसंस्था प्रमाणित, शाळा, सहाय्य कारागृहे, पालनगृहे, परीविक्षागृहे, पात्रव्यक्ती संस्था वालप्रतिष्ठानाचा समावेश होतो. तसेच विविध थेरपीचा अवलंब केला जातो. बाल न्यायालये :

१९२० नंतर बाल अपराधाच्या संदर्भात कायदे केले. १९२२ मध्ये प्रथम बाल न्यायालयाची स्थापना करण्यात आली. १९२७ मध्ये मुंबई १९३० ला मद्रास येथे स्थापन झाले. ज्या राज्यांनी बाल कायदे लागू केले त्या राज्यात वालन्यायालयाची / तरतूद आहे. ज्या बालकाचे वय सोळा वर्षाच्या आत आहे त्या बालकास बाल न्यायालयापुढे उभे केले जाते. बाल न्यायालयाची वैशिष्ट्ये व रचना विशेष स्वरूपाची आहे. बालन्यायालयाचा उद्देश शिक्षा न देता सुधारणा घडवून आणणे आहे.

१) बाल न्यायालयाची रचना :- बालन्यायालयाचे वातावरण न्यायालयाहून वेगळे असते. ही न्यायालये साध्या इमारतीत भरविली जातात किंवा रिमांड होम मधील खोलीत न्यायालयाचे काम चालते. या न्यायालयात एक प्रमुख न्यायाधीश, दोन ऑनररी मॅजीस्ट्रेट त्यापैकी एक महिला एक समाजशास्त्रज्ञ, एक मानसशास्त्रज्ञ ा असतो. लेडी न्यायाधीश असते. पोलिस प्रॉसिक्यूटर गुन्हेगारीविरुद्ध केस मांडतो. परीविक्षा अधिकारी संशोधन करतो. या न्यायालयात पोलिस अपराध्यास वेड्या घालत नाहीत, आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात नाही. पोलिस गणवेषात येत नाहीत. वकीला मार्फत उलट तपासणी केली जात नाही. बाल न्यायालयाने दिलेल्या निकाला विरुद्ध कोणत्याही न्यायालयात अपील करता येत नाही. मात्र बाल अपराध्याची सत्य स्थिती कथन करण्यासाठी काही अटीवर वकिलांना परवानगी दिली जाते. 

बाल न्यायालयाची लक्षणे :

बाल न्यायालये बाल अपराध्यासाठीच असतात. शिक्षा देणे, जन्मठेप, मृत्यूदंड देणे बालन्यायालयाचा उद्देश नसतो.

  1. अनौपचारिक सुनावणी :- बालन्यायालयाचा उद्देश बाल अपराधासंबंधी सत्य परिस्थिती समजाऊन घेणे असतो. त्यामुळे मुलाला विश्वासात घेऊन माहिती काढली जाते. त्यामुळे अनौपचारिक सुनावणी असते त्यात उलट तपासणी, साक्षी, पुरावे नसतात. तर परीविक्षा अधिकारी, अपराधी, आणि पालकांचा संवाद असतो. मुलाने अपराध केला सिद्ध करण्याऐवजी सामाजिक स्थितीचा: पुरावा लक्षात घेतला जातो.
  2. खाजगी सुनावणी :- या न्यायालयात न्यायालयाप्रमाणे सुनावणीस मुक्त प्रवेश नसतो. केवळ परीविक्षा अधिकारी, पालक, पोलिस अधिकारी यांना | प्रवेश असतो. बाल न्यायालयाच्या परवानगीशिवाय वृत्तपत्राना मुद्रण करता येत नाही. 
  3.  वकीलास प्रतिबंध :- बाल न्यायालयाची प्रक्रिया अनौपचारिक असते. न्यायालयाच्या पुर्व परवानगी विना वकील बालन्यायालयात बाजू मांडू शकत नाहीत.
  4. वैधानिक संरक्षण :- बाल अपराध्यास बेड्या घातल्या जात नाहीत. • आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले जात नाही. जामीन, अटक, शिक्षा शब्द वापरले जात नाहीत.
  5.  बाल न्यायालयात अपील करता येत नाही :- किंवा जामीनावर सोडता येत नाही. मात्र बोर्डाचे उल्लंघन न केल्यास १९६० च्या चिल्ड्रन अॅक्टप्रमाणे अपील करता येते. ७) ऊपचार :- बाल अपराध्यास दंड न देता सुधारणा घडऊन आणणे हा उद्देश असतो. भविष्य काळात चांगले वर्तन करावे म्हणून पालकास सूचना दिल्या जातात.
  6.  घटनात्मकै तरतूद :- अंटके नंतर मुलास चोवीस तासाच्या आत पोलीस अधिकाऱ्याने वेल्फेअर बोर्डाकडे सूर्पूद करावे.
  7. निर्णय :- मुलै चिल्ड्रेन बोर्ड अपेक्षित मूल प्रमाणित शाळेत पाठविण्याचा किंवा पालकाच्या स्वाधीन करण्याचा स्थिती सापेक्ष आदेश देईल. परीविक्षा • अधिकाऱ्याच्या अहवालानुसार मुलास चांगल्या वर्तनाच्या हमीवर सोडले जाईल किंवा मुलास सूचना देऊन पालकाच्या स्वाधीन केले जाईल. 
  8.  न्यायाधिशाची नेमणूक :- न्यायाधिशांची नेमणूक राष्ट्रपती, राज्यपाल करतो. काही ठिकाणी ते निर्वाचित असतात. न्यायाधिश बालमानसशास्त्रज्ञ असावा. अधिकार न हाताळता समाजशास्रज्ञ म्हणून भूमिका करावी अशा प्रकारे बालन्यायालये सुधारात्मक, उपचारात्मक असतात. बाल अपराध्यांचे पुनर्वसन करणे हा त्यांचा उद्देश असतो. मुलांचे कल्याण हाच उद्देश असतो.. 

(२) बाल सुधार संस्था :

१)- रिमांड होम (बाल रक्षा गृह, वाल निरीक्षण गृह) प्रशिक्षण कायद्यानुसार अपराध्यांस पकडल्यानंतर चोवीस तासाच्या आत मॅजीस्ट्रेट पुढे उभे केले पाहिजे आणि केसचा निकाल लागेपर्यंत त्याला बॉलसुधार गृहात ठेवतात. रिमांडमध्ये    ठेवण्याचा उद्देश परीविक्षा अधिकारी त्याच्या वर्तनाचे, व्यक्तिमत्त्वाचे गुणधर्म तपासतात.

सुधारगृहात बालगुन्हेगारांना शिक्षण, प्रशिक्षण दिले जाते. आरोग्य, मनोरंजक व जीवनावश्यक सुविधा दिल्या जातात. किरकोळ गुन्हा असेल तर पालकांच्या स्वाधीन केले जाते. भारतात ११ राज्यात १३९ सुधारगृह आहेत. महाराष्ट्रात ३० सुधारगृहे आहेत. ती शासकीय, खाजगी कल्याणकारी यंत्रणे मार्फत चालविली जातात. मुला मुलींची वेगळी सुधारगृहे आहेत. १५ ते २० टक्के बाल अपराधी सुधारगृहात राहतात. २/३ मुले ७ ते १४ वयोगटातील ५० टक्के मुलांना सहा आठवडे पेक्षा कमी काळ सुधारगृहात ठेवतात. ५० टक्के मुलास सहा आठवडे ते सहा महिणें सुधारगृहात ठेवतात.

१९७५ च्या सुधारीत बाल गुन्हे नियमानुसार बालरक्षा गृहास बाल निरीक्षण गृह म्हणतात. येथे बाल अपराध्यांचा वृत्ताभ्यास केला जातो. प्राथमिक चौकशी केली जाते. परिविक्षा अधिकारी मुलांच्या वर्तनाचा, त्याचा परिसर आणि परिस्थितीचा अभ्यास करतात. सुधारगृहात ऊपेक्षित, उद्दाम, एकाकी, शारिरीक, मानसिक व्याधिग्रस्त बालके ठेवतात. वाल कल्याण अधिकारी, सामाजिक कार्यकर्ते मुलांच्या वर्तनाचा अहवाल तयार करून त्याच्या पुढील व्यवसायाची, शिक्षणाची तरतूद करतात. २) प्रमाणित शाळा :

छोटे अपराध करणाऱ्या बालकास प्रमाणित शाळेत ठेवले जाते. ज्या राज्यात बाल अधिनियम पारित केले आहेत त्या राज्यात प्रमाणित शाळा सुरू केल्या आहेत. बालन्यायालय बालकांना पालकाच्या लेखी हमीवर पालकांच्या स्वाधीन करते किंवा प्रमाणित शाळांमध्ये पाठविण्याचा निर्णय घेते तेव्हा त्याची रिमांड मधून शाळेत रवानगी होते.

  1.  उद्देश :- प्रमाणित शाळेचा उद्देश प्रशिक्षण देऊन स्वतःचा चरितार्थ चालवावा, स्वाभिमानाने जगावे, वेश्यागारी, भिक्षागारी निर्माण होणार नाही हा उद्देश असतो.
  2.  प्रकार :- प्रमाणित शाळेचे वरिष्ठ व कनिष्ठ प्रमाणीत शाळा असे दोन प्रकार आहेत. १४ वयोगटातील कनिष्ठ, १४ ते १६ वयोगटातील वरिष्ठ प्रमाणात शाळेत असतात.
  3. प्रशिक्षण कालावधी :- या शाळेत ३ वर्षे प्रशिक्षण, ५ वी ते ८ वी पर्यंत शिक्षण दिले जाते. 
  4.  व्यवस्था :- प्रमाणित शाळामध्ये बालकाचे निवास, भोजन, वस्राची व्यवस्था केली जाते. मुलांची चार ते पाच डॉर्मीटरीमध्ये विभागणी केली जाते. प्रत्येक शाळेवर अधिक्षक, उपअधिक्षक असतो. दोन तीन शिक्षक, काही इन्स्ट्रक्टर असतात. तसेच डॉक्टर, कारागृह अधिकारी, उपहारगृह अधिकारीही असतात. मुलांना दोन वर्षाचे कृषिवस्तू, चामड्याच्या वस्तू बनविण्याचे प्रशिक्षण दिले जाते.
  5. संचलन :- प्रमाणित शाळा खाजगी संस्था आणि शासनामार्फत चालविल्या जातात. महाराष्ट्रात २४ प्रमाणित शाळा पैकी १४ शासकिय आहेत. मुलांना कार्यस्थ करणे हा त्यांचा उद्देश असतो.
  6. बोर्स्टल स्कूल (किशोर सुधारालय) :- बोटल स्कूल म्हणजे नैतिक, मानसिक, शारिरीक, व्यावसायिक क्षमतेचा विकास करणे. १९०२ मध्ये मॅन्चेस्टर जवळ वोर्स्टल येथे प्रशिक्षण संस्था स्थापन झाली. त्याचे नाव बोर्स्टल स्कूल असे पडले. १९२६ मध्ये सर्वप्रथम मद्रास राज्यात स्थापन झाली. मुंबई राज्याने १९२९ मध्ये बोटल स्कूल कायदा केला. उत्तरप्रदेश, आंध्र, बंगाल, तामीळनाडू, केरळ, बिहार पंजाब राज्याने कायदा केला. बोर्स्टल स्कूलमध्ये १६ ते २१ वयोगटातील अपराधी ठेवले जातात. जी मुले प्रमाणित शाळेत जाऊ शकत नाही त्यांचा समावेश बोर्स्टल स्कूलमध्ये केला जातो.

ज्यास तीन वर्षापेक्षा अधिक शिक्षा झाली त्यास बोर्स्टल स्कूलमध्ये प्रवेश मिळतो. बोटल स्कूल मध्ये २ ते ५ वर्षे पर्यंत ठेवले जाते. मुला मुलींसाठी ५ स्वतंत्र व्यवस्था केली जाते. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर जामीनावर, अपीलावर सोडले जाते. बोर्स्टल स्कूल मधून बाहेर पडल्यानंतर पुनर्वसनासाठी मदत दिली जाते. ह्या संस्थेत प्रशिक्षणावरोवर मेहनतीचे कामही करून घेतले जाते. ह्या संस्था मुक्त आणि बंदिस्त स्वरूपाच्या आहेत. वोर्स्टल स्कूलमध्ये १०० ते ३५० बाल गुन्हेगार मुले ठेवतात. त्यात ६ ते १८ वयोगटातील ६० टक्के, १८ ते २१ वयोगटातील ५ टक्के, १५ ते १६ वयोगटातील असतात. त्यांच्यावर इन्स्पेक्टर जनरलचे नियंत्रण असते. भारतात नऊ राज्यात प्रमाणित शाळा आहेत.

  1. सहाय्यकारी गृहे :- ही प्रमाणीत शाळेशी संबंधित आहेत. बालअपराध्यास प्रथम येथे प्रवेश दिला जातो. सामाजिक कार्यकर्त्याद्वारे मुलाच्या मनोव्यापाराचा, मुलाचा स्वभाव, आवडी निवडी, गुन्हयाच्या पार्श्वभमीचा अभ्यास करून मुलास प्रमाणित शाळेत प्रवेश दिला जातो. सहाय्यकारी गृहे दुर्लक्षिलेल्या मुलांची संस्था आहे.
  2.  पालनगृहे :- दहा वर्षाआतील बाल गुन्हेगारांना प्रमाणित शाळेत न पाठविता अशा कुटूंबात पाठविले जाते. तेथे मुलावर संस्कार होतील. प्रेम वात्सल्य, सहानुभूतीस मुकलेल्या मुलास प्रेम मिळेल. त्यामुळे त्याच्या वर्तनात बदल होईल. अशा मुलांचा खर्च शासन त्या कुटुंबास देते. पालन गृहाची कामे बालसुधार गृहाप्रमाणे आहेत. पालनगृहे संस्कारक्षम कुटुंब आहे. या कुटुंबातमुल सद्वर्तनी बनविले जाते.
  3. परीविक्षा गृह :- परिविक्षा अधिकारी कायद्यान्वये परीविक्षा गृहे स्थापन झाली. ज्या बालगुन्हेगारांना बालन्यायालयाने परीविक्षेवर सोडले अशा बालकावर परीविक्षा वस्तीगृहात ठेवले जाते. ज्या बालकास, आई, वडील, कुटूंबाचा आधार नाही त्याला परीक्षिागृह वस्तीगृहात ठेवले जाते. उद्देश मुलाच्या वर्तनात सुधारणा व्हावी, संस्थेतून बाहेर पडलेल्यास परीविक्षा अधिकारी व्यवसाय, नोकरी शोधण्यासाठी मदत करतात.


३) सूचना किंवा इतर उपाय :


  1. मानसोपचार (मनोरूग्ण) :- आईवडील, सामान्य व्यक्ती मुलाच्या भावना समजू शकत नाहीत. मुलाच्या दुखावलेल्या भावनामुळे विरोध, द्वेष, संघर्ष निर्माण होतो. त्यामुळे अपसामाजिक वर्तन करतो. मानोसोपचार तज्ञ मुलाच्या • मनातील आक्रोश समजू शकतात. त्यामुळे विघटनात्मक वर्तनाचे अध्ययन करता येते. वर्तनाचे संशोधन उपचार करता येतात. बर्ट म्हणतो बालगुन्हेगारी थांबविण्याकरीता मानसिक दवाखाने उघडले पाहिजेत.
  2. मनोरंजन :- मनोरंजनाची साधने व्यक्तिमत्व विकसित करतात आणि बाल अपराध्यास प्रतिबंध करतात त्यासाठी बालसंस्कार केंद्रे, क्रिडांगणे, बगीचे, वाचनालये आवश्यक आहेत.
  3.  शिक्षण :- शिक्षण मूल्ये निर्मिती करते. शिक्षणामुळे व्यवसाय कौशल्य निर्माण होते. ह्युम म्हणतो एक शाळा उघडली की एक जेल बंद करावे लागेल. शिक्षणामुळे समतोल व्यक्तिमत्व निर्माण होते. शाळेतील वातावरण उत्साहवर्धक असावे, अभ्यासक्रम अभिरूची वाढविणारा असावा. अध्यापक मानसशास्त्रज्ञ असावा.
  4. कुटूंबाची भूमिका :- कुटुंबात मद्यपान, जुगार, अनैतिक कार्य असू नयेत. कुरूप, शारिरीक, मानसिक दुर्बल मुलांची ऊपेक्षा करू नये. मुलांच्या चिकित्सा लक्षात घेऊन त्याच्या गरजा, पुर्तता करावी. मुलाला कुटुंब कारागृह वाटेल इतके ताठर नियंत्रण असू नये.
  5. आर्थिक सोई:- प्रामुख्याने बाल गुन्हेगार निर्धन, दरिद्री कुटुंबातील असतात. तेव्हा दारिद्र्य, गरीवी विरुद्ध युद्ध पातळीवर झुंज द्यावी. सर्वांना मोफत शिक्षण मिळावे. अपंग, अनाथ, निराश्रीतांना जीवन, सुरक्षिततेची व्यवस्था करावी. शिकतांना स्वावलंबन, अर्थार्जनाची तरतूद करावी.
  6.  बालकल्याण : सामाजिक संस्थांनी बालकल्याणास प्राधान्य द्यावे. त्या संस्थांनी आपल्या क्षेत्रातील बालकांचे अध्ययण करावे. बालक मार्गदर्शन केंद्रे सुरू करावीत. युवक संघटना, महिला संघटना व शिक्षण संस्थांनी बाल कल्याणास प्राधान्य द्यावे.
  7. झोपडपट्टी निवारण निर्मूलन:- शहरात वाढणाऱ्या झोपडपट्ट्यावर प्रतिबंध घालावा, झोपडपट्टीत सुधारणा कराव्या, अश्लील साहित्य चित्रपटावर बंदी घालावी, बाल अपराध विरोधी प्रचार करावा. 
  8. संयुक्त परिषद :- संयुक्त परिषदेत पोलिस, पालक, बाल न्यायालय व परिविक्षा अधिकारी असावे.
  9. सामुदायिक कार्यक्रम :- रचनात्मक कार्यक्रम, शेजाऱ्याशी संबंध समूह व समुदायाचा सहभाग इत्यादी.. 
  10. बाल अपराध उपचार पद्धतीत सायकोथेरपी, वर्तन थेरपी, वास्तव थेरपी, मायलू (मिलू) अॅक्टिव्हिटी थेरपीचा वापर केला जातो.
  11. i) सायको थेरपीन मानसशास्त्रीय साधनाआधारे व्यक्तिमत्वाच्या समस्या लक्षात घेऊन वर्तनात समायोजन घडवून आणले जाते. ii) वास्तव थेरपीत लोकाच्या दृष्टिकोणाच्या आधारावर समाजविरोधी वर्तनावर प्रतिबंध घातला जातो. iii) वर्तन थेरपीत शिकण्याची प्रक्रिया निर्माण केली जाते. शिक्षा, पुरस्काराद्वारे वर्तनात बदल घडऊन आणला जातो. 
  12.  अक्टिव्हिटी थेरपीत : ८ ते १० मुले एकत्र आणून आशादायी वातावरण निर्माण केले जाते. 

समारोप :- 

बालअपराध निर्मुलनासाठी प्रतिबंधात्मक पुनर्वसनात्मक उपाय आवश्यक आहेत. समायोजन, मनोरंजन, दारिद्र्य, बेकारी निवारण, सल्ला मंडळे, शारिरीक, मानसिक विकास, मानसोपचार, कुटुंबाची भुमिका महत्त्वाची आहे.


(Meaning of Juvenile Delinquency)





Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English