The nature, structure, meaning, and interpretation of history / इतिहासाचे स्वरूप , संरचना, अर्थ, व व्याख्या आणि संपूर्ण माहिती
घटक १ : इतिहासाचे स्वरूप व संरचना
ह्या घटकांच्या अभ्यासानंतर आपल्याला इतिहासाचा अर्थ, स्वरूप व व्याख्या कळेल.
- इतिहासाचे स्रोत कळतील.
- इतिहासाचे महत्त्व व गरज समजेल.
- इतिहासातील तत्वे: अहिंसा, समता, बंधुता, स्वातंत्र्य यांचे महत्त्व व स्वरूप कळेल. इतिहासातील संरचनांचा अर्थ, उपयोग व अध्यापनातील वापर स्पष्ट होईल.
प्रास्ताविक
विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा अर्थ स्पष्ट करताना कोणत्याही दोन माणसांचे एकमत होत नाही. १९व्या शतकापूर्वीच्या इतिहासाचे स्वरूप जर आपण पाहिले ना, तर आपल्याला इतिहास साहित्याचाच एक भाग वाटतो.
शास्त्रीय दृष्टी, सत्य त्यात आढळत नाही. १९व्या शतकापासून मात्रे हा दृष्टिकोन बदलला बरं का! इतिहासाचा शास्त्रोक्त दृष्टीने विचार व्हायला लागला आणि चिकित्सक दृष्टीही निर्माण झाली.
इतिहासाचा समावेश सामाजिक शास्त्रांत होतो आणि सामाजिक शास्त्रे ही मानवी जीवनातून उदयाला आली आहेत. पण मानवी जीवनाशी थेट आणि घनिष्ट संबंध असलेला विषय जर कोणता असेल ना, तर तो इतिहासच होय. कारण इतिहास मानवी जीवनप्रवाहाचे यथार्थ दर्शन घडवितो. इतिहास हा एखाद्या विषयाचा भूतकाळातून आलेला अखंड ओघ असतो.
विषय- विवेचन
इतिहास : अर्थ, स्वरूप व व्याख्या
- अर्थ
विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाबद्दल भिन्न कल्पना अस्तित्वात असलेल्या आढळतात. कोणी इतिहासाला "राष्ट्राची अनुभूती' म्हणतात, कोणी 'मानवाने जीवनविषयक प्रश्न सोडविण्याच्या दिशेने केलेल्या प्रयत्नांचा वृत्तांत' म्हणतात, तर कोणी राजकारणावर भर देतात. अशी विविध मते इतिहासाचा अर्थ लावताना लोक व्यक्त करतात. प्रत्येक मतात काही ना काही तथ्य मात्र आढळतंच है! कारण प्रत्येकाने आपल्या अनुभवानुसार लावलेला अर्थ आहे तो! प्रत्येकाचे दृष्टिकोन वेगळे, म्हणून प्रत्येकाने व्यक्त केलेले अर्थही वेगळे! ही वेगवेगळी मतं लोक का व्यक्त करत असतील ? हा प्रश्न माझ्याप्रमाणेच तुम्हांलाही पडला असणार, हो ना ? मित्रांनो, इतिहास हे काही भौतिक शास्त्रासारखे शास्त्र नाही. हे आहे सामाजिक शास्त्र ! आणि सामाजिक शास्त्रातला आशय हा मनुष्याच्या आंतरिक मनोव्यापार आणि मनुष्य आणि समाजाच्या क्रिया-प्रतिक्रियांवर आधारलेला असतो. माणसाचे मन कसे आहे माहीत आहे का तुम्हांला ? प्रत्येकाला मन आहे. पण ते कसे आहे ? नाही ना सांगू शकत आपण ? कारण मानवी मन ही एक अतर्क्य घटना आहे. त्यासंबंधी आपण कोणतेही निश्चित भाकीत करू शकत नाही. माणसाच्या मनात काय आहे ते सगळ्यांना कळतं ते त्याच्या क्रिया आणि कृर्तीवरून! आणि इतिहास हा जिवंत माणसांचा आहे. त्यांनी ज्या कृती केल्या आहेत, त्या कृतींचाच अर्थ इतिहासात इतिहासकारांनी लावलेला आहे. इतिहास लिहिणारे इतिहासकार हीदेखील जिवंत माणसेच ! म्हणूनच इतिहासाबद्दल आपल्याला मतभिन्नता दिसते. तसेच घटना एकच पण लिहिणारे दोघं असले की त्या घटनेविषयीचा लिहिणाऱ्याचा दृष्टिकोन लिहिण्यात व्यक्त होतो. उदाहरण या का आपण ? १८५७ साली भारतात एक मोठी घटना घडली. तिला वेगवेगळी नावे देण्यात आली. कोणी 'शिपायांचे बंड' म्हटले, कोणी 'स्वातंत्र्याचा उठाव' म्हटले, तर कोणी 'स्वातंत्र्यसमर'! आणि इंग्रजांनी याच घटनेला 'राजद्रोह' म्हटले. प्रत्येकजण आपल्या सोयीप्रमाणे अर्थ लावतो, हे आता आपल्या लक्षात आले. दुसरे म्हणजे ऐतिहासिक सत्य चिरंतन स्वरूपाचे असत नाही. उत्खनन आणि संशोधन यांनी इतिहास वारंवार बदलत असतो. पूर्णत्वाने इतिहासात निःपक्षपातीपणाही येऊ शकत नाही. कारण इतिहासकाराला स्वतःचा दृष्टिकोन असतोच! इतिहास ही घटनांची केवळ जंत्री नसून तो जिवंत माणसांचा इतिहास आहे, हे लक्षात ठेवूनच आपण इतिहासाचा विचार करायला हवा. त्यासाठी पुढील प्रश्नाचे उत्तर प्रथम लिहून पाहा.
इतिहास म्हणजे राजकीय घटनांचा व घडामोडींचा संगतवार वृत्तांत किंवा वर्णन असे पूर्वी समजत असत. पण या परंपरागत कल्पनेला कार्ल मार्क्स याने धक्का दिला. इतिहासाला त्याने आर्थिक दृष्टिकोन प्राप्त करून दिला. यामुळे इतिहासाच्या रचनेत सामाजिक, आर्थिक आणि सांस्कृतिक अंगांनीही अधिक प्राधान्य मिळायला सुरुवात झाली. तसेही आपण पाहिले तर आपल्याला दिसते की, मानवी जीवनात अर्थ, उद्योग, विज्ञान, कला धर्म, संस्कृती या क्षेत्रांमध्येसुद्धा मानवाने भरीव कामगिरी केली आहे. जसे, छापखान्याचा शोध. यामुळे ज्ञान सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचले. दुसरे उदाहरण म्हणजे युरोपातील औद्योगिक क्रांती. यामुळे परंपरागत व्यावसायिक संस्था नष्ट झाल्या भांडवलशाहीचा उदय झाला. त्याचा परिणाम काय बरं झाला असेल ? समाजाचे दोन वर्ग पहले, ते म्हणजे भांडवलदार आणि मजूर. मग त्यातून वर्गसंघर्षाची बीजे पेरली गेली आणि साम्यवादाचीही. अशा बदलांची नोंदही इतिहास घेतो.
व्युत्पत्तीच्या दृष्टीने इतिहासाचा अर्थ पाहता संस्कृत व्युत्पत्तीनुसार इतिह+ आस 'हे असे खरोखर पडले' असा होतो. इतिहासाची संकल्पना ही मूळची ग्रीक लोकांची लॅटिनमध्ये इतिहासाला 'हिस्टोरिया' म्हणतात, तर फ्रेंच भाषेत त्याला 'हिस्टोरी' तर इंग्रजीत 'हिस्ट्री' (History) असे म्हणतात. वरील सर्व शब्दांचा खरा अर्थ चौकशी करणे असा होत नाही, पण भूतकाळात पडून गेलेल्या गोष्टींचा विचार करणे म्हणजे इतिहास किंवा भूतकाळातील यथार्थता (Actuality) म्हणजे इतिहास होय. 'हिस्ट्री' या शब्दाचा अर्थ माहिती किंवा सत्यन्वेषण असा आहे. म्हणजे इतिहासात भूतकाळातल्या घटनांचा अभ्यास करताना सत्याचा शोधही अपेक्षित आहे. इतिहास हे ज्ञान मिळविण्याचे साधन आहे. यादृष्टीने पाहिल्यास भूतकाळात ज्या उल्लेखनीय घटना पडल्या, संस्मरणीय घटना व घडामोडी झाल्या. त्यांचा सविस्तर वृत्तांत म्हणजे इतिहास होय. इतिहासातील सर्वच घटना आणि पडामोडी जशाच्या तशा माहीत होणे अशक्य असते. काही वेळा महत्त्वाचे कागदपत्रे सापडत नाहीत तेव्हा इतिहासकाराला साधनरूप पुराव्यांवर अवलंबून राहावे लागते.
तसे म्हटले तर प्रत्येक होऊन गेलेली घटना ऐतिहासिक म्हणावी लागेल, पण अनेक घटकांचे महत्त्व तात्पुरतेच असते. म्हणून लोकजीवनावर खोलवर परिणाम करणाऱ्या घटना, मूल्ये, आदर्श हेतू, प्रवृत्ती, अभिवृत्ती यांचे प्रतिबिंध पडलेल्या घटना यांचा चिकित्सक, तर्कशुद्ध व सखोल विचार करून सहृदयपणे पण वस्तुनिष्ठपणे स्पष्टीकरण करणे म्हणजे इतिहास होय.
इतिहासाचे स्वरूप बघताना आपल्या लक्षात येते की, इतिहासाला कालक्रम असतो. इतिहास लिहिताना पटना आणि पटकांची सुसंगती लावून जसे पडले तसे इतिहासकार सांगत असतो. कालक्रमाचे महत्त्व मानवी डोळ्याप्रमाणे आहे. आपल्याला डोळे नसले तर आपण काहीच पाहू शकणार नाही. म्हणजेच डोळ्यांचा संबंध बघण्याशी आहे. बघण्यासाठी डोळ्यांचे महत्त्व आहे. तसाच संबंध कालक्रम आणि इतिहास यांचा आहे. कालक्रम हे एक शास्त्र असून निसर्गाच्या चक्रावर ते आधारले आहे.
पूर्वी शेती, व्यापारविषयक कामे सुरू करण्याबद्दल चांगला दिवस पाहून कामाला सुरुवात केली जात असे. त्यानंतर त्या पद्धतीने घटना पडत असत. उदाहरणार्थ, शेतीमध्ये नांगरणे, पेरणी, दाणा भरणी व कापणी या गोष्टी निसर्गनियमाप्रमाणे घडत नांगरणीच्या वेळीच नांगरणी झाली पाहिजे. अन्य काळात नांगरणी केल्यास त्याला अर्थ राहणार नाही. तसे इतिहासात आहे. घटना ह्या कालक्रमाने घडतात. त्यांच्यात सुसंगती लावून त्या घटना सांगणे महत्वाचे ठरते. निरनिराळ्या काळात ज्या उल्लेखनीय पटना घडल्या व पडामोडी झाल्या त्या का घडल्या, त्यांचे परिणाम काय झाले, यांबद्दल इतिहासात चर्चा असते. ज्या काळात इतिहासकार इतिहासाची रचना करतो, त्या काळातील प्रचलित परिस्थिती, मूल्ये, आदर्श आणि हेतू यांचा त्याच्या इतिहासलेखनावर परिणाम दिसतो.
'इतिहास' या संकल्पनेत अनेक छटा आहेत, हे उपरोक्त विवेचनातून आपल्या लक्षात आले असेलच. आपण इतिहासाचे समग्र स्वरूप समजून घेण्यासाठी इतिहासाचे स्वरूप वधू या.
इतिहासाचे स्वरूप
इतिहासाचा संबंध मानवाशी असतो. प्रत्येक मानवावर इतिहासाचा कळत नकळत परिणाम झालेला असता, तसेच इतिहासाचा संबंध भूतकाळाशी म्हणजे घडून गेलेल्या बाबींशी असतो. इतिहास स्थलसापेक्ष आणि कालसापेक्ष असतो. इतिहासातील घटना विशिष्ट स्थळी आणि विशिष्ट काळी पडलेल्या असतात. इतिहासात मानवी जीवनाच्या सर्वच अंगांचा समावेश होतो. उदाहरणार्थ, राजकारण, शिक्षण, संस्कृतीची विविध अंगे, धर्म, अर्थ, सामाजिक संस्था, इत्यादी इतिहास सर्व प्रकारच्या मानवांशी = श्रीमंत तसेच गरीब, राजा तसेच रक संबंधित असतो. इतिहासात पर्यावरणाशी मानवाने केलेल्या संघर्षांचे चित्रण असते. मानवाच्या गत जीवनाचे सत्यावर आधारित वस्तुनिष्ठ चित्रण म्हणजे इतिहास होय. मानवी जीवनातील विविध घटनांमागील कार्यकारणभाव शोधण्याचा प्रयत्न इतिहासात असतो. गत जीवनाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न इतिहासात असतो. प्रचलित सामाजिक समस्यांचे मूळ इतिहासात शोधले जाते. सत्याचा शोध घेण्याचा योग्य पुराव्याचा आधार घेऊन प्रयत्न करणे यादृष्टीने इतिहास हे शास्त्र आहे, परंतु प्राप्त माहिती आकर्षकरितीने मांडल्यामुळे इतिहासात कलेचाही अंश असतो. इतिहासात मानवाचे यश व अपयशाचा शोध घेतला जातो.
प्रत्येक इतिहासकार हा उपलब्ध साधने, पुरावे यांच्या साहाय्याने इतिहास लिहिण्याचा प्रयत्न करतो. नवीन कल्पना उदयाला आल्या की इतिहासकाराला इतिहासाचे पुनर्लेखन करण्यासाठी प्रेरणा मिळते. काळाच्या ओघात नवीन आधार, नवीन पुरावे, तत्थ्ये, माहिती उपलब्ध होते. इतिहास लिहिण्यासाठी नवीन तंत्राचा अवलंब करण्यात येतो. यामुळेही इतिहासाचा होणे आवश्यक वाटू लागते. प्रचलित वैचारिक संघर्षाचे पडसादही इतिहासरचनेत उमरतात.
इतिहासरचनेच्या सोयीकरता काळाची काही विशिष्ट कालखंडात विभागणी करण्यात येते. प्रागैतिहासिक काळ ऐतिहासिक काळ, मध्ययुग आणि आधुनिक युग हे प्रमुख कालखंड मानले जातात. यातील एक काळ संपून दुसरा केव्हा सुरू झाला हे कुणीही ठामपणे सांगू शकत नाही. मानवाने अतिप्राचीन काळापासून सभोवतालच्या परिस्थितीशी लढा दिलेला आहे. काही प्रसंगी त्याने निसर्गापुढे नमते घेतले. काही ठिकाणी निसर्गाशी जुळवून घेतले, तर काही ठिकाणी निसर्गावर मात केली आहे. हजारो वर्षे खडतर तपश्चर्या केल्यानंतर माणूस आजच्या प्रगत अवस्थेपर्यंत पोहोचला आहे.
थोर ग्रीक इतिहासकार हिरॉडॉट्स हा इतिहास लेखनशास्त्राचा जनक मानला जातो. कारण त्याने शास्त्रशुद्ध, काटेकोर आणि काळजीपूर्वक इतिहास लेखन करण्याची पद्धती व परंपरा त्या काळी निर्माण केली. ब्युसिडीडीज याचा असा आग्रह होता की, इतिहासात सत्याचे दर्शन व्हावे आणि मनुष्याला त्यापासून धडे मिळावेत. इतिहासकाराने भूतकालीन घटनांचे विवेचन करण्याऐवजी वर्तमानकालीन घटनांची नोंद घेऊन त्यांचा चिकित्सक परामर्श घ्यावा, असे त्याचे मत होते. हिरॉडॉट्स आणि च्युसिडीडीज यांच्या मतात भेद असला तरी दोघांनीही सत्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला आहे. त्या काळी इतिहास हे साहित्याचेच एक अंग होते. शास्त्राचे स्थान त्याला प्राप्त झाले नव्हते.
मध्ययुगात युरोपमध्ये धर्माला महत्त्व होते. इतिहासही धार्मिक दृष्टीने लिहिला जाई. सतराव्या शतकात शिलालेख, नाणी, इत्यादी साधनांचा इतिहासाच्या दृष्टिकोनातून पद्धतीवर अभ्यास होण्यास सुरुवात झाली. अठराव्या शतकात वॉल्टेअर या बुद्धिवादी विचारवंताने सांस्कृतिक इतिहास लिहायला सुरुवात केली. या प्रकारच्या इतिहासात व्यक्तीऐवजी ऐतिहासिक घटनांना व घडामोडींना प्राधान्य देण्यात येते. कारण त्या घटनांमुळेच व्यक्तींना प्राधान्य मिळालेले असते.
लिओपोल्ड हॉन रैक वाला इतिहासाचे साहित्यिक स्वरूप अमान्य होते. त्याच्या मते, इतिहासकाराने ऐतिहासिक घटना व तथ्ये याबाबत स्वत: कोणताही निर्णय घेता कामा नये. प्रत्यक्ष घडले त्याचा वृत्तांत देणे त्याचे कर्तव्य होय. यामुळे भूतकालीन घटना, घडामोडी व तत्संबंधीची तथ्ये यांची यथार्थ स्वरूपात मांडणी करणे म्हणजे इतिहास होय, ही वास्तववादी कल्पना उदयास आली. इतिहासाला शास्त्रीय स्वरूप प्राप्त होण्याचा हा प्रारंभ होता. पुढे भौतिक शास्त्राच्या क्षेत्रात संशोधनाला सुरुवात झाली व त्याचा परिणाम इतिहासाच्या संशोधनपद्धतीवरही झाला. इतिहासाच्या संशोधनात निश्चितता यायला सुरुवात झाली. इतिहासात चिकित्सा, निष्ठता, वस्तुनिष्ठता व शिस्तबद्धवा या गोष्टींना प्राधान्य प्राप्त झाले.
इतिहास संशोधनात परिवर्तन पडून आल्यामुळे इतिहासकालीन पटना, घडामोडी, संघर्ष, आंदोलने, समस्या वगैरसंबंधी विश्लेषण, चिकित्सा व तर्कनिष्ठ तात्विक चर्चा होण्यास सुरुवात झाली. सामान्यत: इतिहास म्हणजे राजकीय पटनांचा व पदामोडींचा संगतवार वृत्तांत वा वर्णन समजले जाते. या परंपरागत कल्पनेला कार्ल मानि पक्का दिला. त्याने इतिहासाला आर्थिक दृष्टिकोन प्राप्त करून दिला. त्यामुळे इतिहासाच्या रचनेत सामाजिक, आर्थिक व सांस्कृतिक अंगांना अधिक प्राधान्य मिळण्यास सुरुवात झाली.
थोडक्यात, इतिहासाचे स्वरूप बघताना आपल्याला असे निश्चितच म्हणता येईल की, इतिहासाची व्याप्ती खूप मोठी आहे. त्यात विविधता आहे. है इतिहासाचे स्वरूप इतिहासाच्या व्याख्येतही आपल्याला अधिक स्पष्ट होईल. इतिहाभूतकाळ व वर्तमानकाळ यांच्यातील न संपणारा संवाद असतो, हे मात्र निश्चित.
- इतिहास लेखनशास्त्राचा बनक हा ग्रीक इतिहासकार आहे.
- सांस्कृतिक इतिहास लिहायला याने सुरुवात केली.
- लिओपोल्ड डॉन बैंक याला इतिहासाचे स्वरूप अमान्य होते.
- कार्ल मार्क्सने इतिहासाला" दृष्टिकोन प्राप्त करून दिला.
- या प्रश्नांची उत्तरे देत असतील तर पुढील भागाकडे जाऊ,अन्धा पुन्हा एकदा पूर्वीचा भाग वाचा.
जीवनपद्धतीत प्रयत्नपूर्वक व जाणीवपूर्वक होत जाणारी स्थित्यंतरे ही फक्त मानवाच्या बाबतीतच शक्य आहेत. अधिकाधिक समृद्धीसाठी मानव धडपडत असतो. या प्रयत्नात जय असतात, पराजयही असतात. या सर्व यशापयशांची कथा व चिकित्सा म्हणजे इतिहास इतिहासाच्या संदर्भात निर्विवाद असलेली गोष्ट एकच. ती म्हणजे एकामागून एक होणारी स्थित्यंतरे इतिहास म्हणजे बदल, इतिहास म्हणजे स्थित्यंतर
इतिहास शब्दाच्या व्युत्पत्तिसिद्ध अर्थाप्रमाणे इतिहासामध्ये घडलेल्या सर्व गोष्टी आणि जशा पडल्या तशाच सांगणे अभिप्रेत आहे. परंतु असे न पडल्याने आणि जे घडले तसेच इतिहासाच्या कक्षेत न घेतल्यामुळे इतिहासाच्या अनेक व्याख्या बहु अपूर्ण अर्धयत्य निर्माण झाल्या आहेत. यापैकी काहींचा परामर्श घेऊन इतिहास म्हणजे काय हे निश्चित केले पाहिजे.
- व्याख्या
विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाचा स्पष्ट अर्थ आणि स्वरूप आपल्याला कळण्यासाठी आपण ह्या व्याख्या बघणार आहोत, पण इतिहासाची सर्वमान्य अशी व्याख्या नाही. इतिहासाच्या अभ्यासकांनी, इतिहासकारांनी आपापल्या दृष्टिकोनातून इतिहासाचे स्वरूप स्पष्ट करण्याचा व अर्थ स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. बघू या इतिहासाच्या काही व्याख्या
- कार्लाईल 'भूतकालीन थोर व्यक्तींची चरित्रे म्हणजे इतिहास होय.
• प्रतिकूल परिस्थितीत कर्तृत्व गाजवल्यामुळे काही थोर व्यक्तींच्या व्यक्तिमत्त्वाचे ठसे त्या कालखंडावर उमटलेले असतात. त्यांनी कोणते कार्य केले, ते त्यांच्या चरित्रातून समजू शकते. उदाहरणार्थ, अलेक्झांडर, नेपोलियन, शंकराचार्य, ज्ञानेश्वर, टिळक, गांधी, इत्यादी, पण इतिहासात व्यक्तीच्या व्यक्तिगत लहान मोठ्या कृत्यांना स्थान नसते. चरित्रांना महत्त्व दिल्याने तत्कालीन सामाजिक, आर्थिक, राजकीय अंगांना गौण स्थान मिळते. चरित्रे ही उद्बोधक असली तरी इतिहासाचे स्थान ती घेऊ शकत नाहीत. इतिहास है शास्त्र आहे. इतिहासात चरित्रेच घातली ना, तर विभूती पूजनाची प्रवृत्ती बळावण्याचा धोका निर्माण होतो.
- हिरॉडॉटस् "भूतकालीन मनोरंजक व संस्मरणीय घटनांचा शोध म्हणजे इतिहास होय.मनोरंजक घटना संस्मरणीय असतातच असे नाही.व संस्मरणीय घटना रंजक असतीलच असेही नाही.
- थ्यूसीडीडीज् अनुभवांच्या साहाय्याने तत्त्वज्ञानाचे अध्यापन करणे म्हणजे इतिहास होय.
या व्याख्येप्रमाणे मागील पिढ्यांतील घटना व घडामोडी यांपासून प्राप्त होणाऱ्या अनुभवातून भावी पिढी शहाणी व सूज्ञ बनते. परंतु असे झालेले आपल्याला आढळत नाही. कारण स्थलकालानुसार संदर्भ बदलतात आणि यामुळे गतकालीन अनुभव पुढील काळात घडे देण्यास असमर्थ ठरतात.
- हॅप्पोल्ड
इतिहास हा अनुभवांचा नंदादीप आहे." पूर्वकालीन अनुभवांच्या प्रकाशात मानव समाजाने पुढील मार्ग आक्रमावा, असे येथे अपेक्षित आहे. इतरांचे अनुभव माणसाला मौल्यवान वाटतात, पण त्यातून मानव शहाणा होतोच असे मात्र सांगता येत नाही,
- वर्कहाभूतकालीन घटना तद्नंतरच्या अनेक युगात नोंद घेण्याच्या लायक असतात. त्यांचा वृत म्हणजे इतिहास होग
- मानवी जीवनातील अनेक पटना व पडामोडी] काळाच्या उदरात गडप होतात. काही महत्वपूर्ण व संस्मरणीय पटना चिरंजीव होतात, त्या पटना येथे अपेक्षित आहेत.
- वि. द. पाटे मानवी प्राण्याच्या पृथ्वीतलावरीलउत्क्रांतीचा शास्त्रशुद्ध अभ्यास म्हणजे इतिहास होय. या व्याख्येत श्री. पाटे पुढे म्हणतात, 'इतिहास म्हणजे पृथ्वीवरील मानवी समाजातील घडामोडींचे संगतवार व कालक्रमानुसार केलेले सत्यकथन होय.' येथे त्यांनी सत्यकथनावर भर दिला आहे.
- श्री. मा. ठिगळे व्यक्ती व समाज एकमेकांवर आपात व प्रत्यापात प्रत्यही चालू असतात. या आघातांची व प्रत्याघातांची कार्यकारणभावाने केलेली नोंद म्हणजे इतिहास म्हणावयास हरकत नाही. ते पुढे असेही म्हणतात की, समाजाच्या सांस्कृतिक वातावरणात जीवन जगत असताना थोर व्यक्तींनी समाजाच्या सर्वांगीण क्षेत्रात केलेल्या कामगिरीची नोंद म्हणजे इतिहास होय. त्यांच्या विचारांवर कालाईतच्या चरित्रावर भर देण्याची छाप दिसते.
- इ. एच. कार इतिहासकार व त्याची तथ्ये यांच्या दरम्यान चालू असणारी प्रक्रिया म्हणजे इतिहास होय आणि हा संवाद वर्तमान व भूतकाळ यांच्या दरम्यान अखंड चालू असतो.'
- येथे इतिहासकार वर्तमानकाळाचा प्रतिनिधी असतो, तर तथ्ये भूतकाळाचे प्रतिनिधित्व करतात.
- जॉनसन - विस्तृत अर्थाने आतापावेतो जे सर्व काही चढले ते म्हणजे इतिहास होय.' यात व्युत्पत्तिसिद्ध अर्थाची छाप आहे.
- पं. जवाहरलाल नेहरू निसर्ग व त्याचे घटक, श्वापदे व जंगल आणि याहीपेक्षा सर्वांत कठीण म्हणजे मानवाला नमविण्याचा व स्वतःच्या लाभासाठी अयोग्य फायदा घेण्याचा प्रयत्न करणारे स्वकीय यांच्याशी मानवाने केलेल्या संघर्षाची कथा म्हणजे इतिहास होय.पंडित नेहरूंच्या व्याख्येत वर्गकलहाचा अंश दिसतो.
- वजेश्वरी आर. इतिहास म्हणजे भूतकालातील घटनांची अर्थपूर्ण नोंद होय. काय पडले व ते का घडले, हे वर्णन करणारी ती मानवाची अर्थपूर्ण कथा होय.'
- मैकनिकॉल 'भूतकालीन संस्कृतीची ही बौद्धिक स्वरूपात सादर करणे म्हणजे इतिहास होय.
- किंटिंग इतिहास ही मानवी कृतीची नोंद होय.'
- ब्लॉच इतिहास म्हणजे विशिष्ट काळातील मानवाचे शास्त्र
- रॉबर्ट डॅनिएल 'मानवसमूहाच्या अनुभवांची स्मृती म्हणजे इतिहास होय.' कितीही व्याख्या आपण पाहिल्या तरी त्यात भिन्नता ही आढळतेच, हो ना!
मित्रांनो, माणूस हा मन असलेला, गतिमान उपक्रमशील प्राणी आहे. त्याच्या जीवनात विशिष्ट ध्येय, मूल्य, आदर्श आहेत. व्यक्ती व्यक्ती, व्यक्ती व गट, गट व गट यांच्या महत्त्वाकांक्षांमुळे अनेकदा तणाव वाढतो, समस्या निर्माण होतात. संघर्ष होतो. परिणामत: अनेक महत्त्वपूर्ण घटना व पडामोडी पडतात. त्या प्रसंगांची पडामोडींची व त्यांच्याशी संबंधित व्यक्तींच्या कृती यांचा तत्कालीन सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीचा संदर्भात उपलब्ध असलेली साधने, तथ्ये व पुरावे यांच्या साहाय्याने त्या घटना व घडामोडी यांचे निरपेक्ष, निःपक्षपातीपणे व बुद्धियुक्तपणे सत्यान्वेषण करणे, त्यांचे सहानुभूतिपूर्वक, तर्कसंगत अन्वयीकरण आणि सत्यकथन म्हणजे इतिहास होय.
कोणत्याही ऐतिहासिक घटनासंबंध ज्ञात घडामोडी व ज्ञात कारणे यांच्या साहाय्याने लिहिण्यात आलेले तर्कसंगत व सुसंगत विवरण म्हणजे इतिहास होय.
जुने इतिहास राजे राण्या, सरदार, जमीनदार यांसारख्या मातब्बर लोकांचे होते. सामान्य व्यक्तींना तेथे काही स्थान नव्हते. लष्करी व राजकीय उलाढालींचा त्यात विचार होता. जुनी विचारसरणी भावडी व अंधश्रद्धेला पूरक होती. आज दृष्टी बदललेली आहे. डोळसपणा व विवेक आज आवश्यक आहे. इतिहासात पृथ्वीवरील मानवी समाजातील घडामोडींचे सुसंगत व कालक्रमानुसार सत्यकथन यायला पाहिजे, हे आपल्याला आता जाणवते.
केवळ राजकारणालाच इतिहासात महत्त्व देणे योग्य ठरणार नाही. आपण बघितले तर इतिहास हा सर्वग्राहक, सर्वव्यापी विषय आहे. राजकीय, आर्थिक, कायदेशीर, सांस्कृतिक, इत्यादी जीवनाची अंगे भूतकाळातील तसेच वैज्ञानिक विकास, वाङ्मय, कला यांना जोडली जातात. गतकाळाविषयी माणसाला उत्सुकता वाटते. ही उत्सुकता पूर्ण करण्याचे काम इतिहासच करू शकतो. आपल्या पायाशी गतकाळाच्या हजारो स्मृती लोळण घेत आहेत, गतकाळातील व्यक्तींचा सुखद सहवास आपल्याला मिळत आहे. सर्व जगातील विचारप्रवाह आपल्यापर्यंत येऊन पोहोचत आहे. हे सर्व इतिहासामुळे घडत आहे.
- इतिहासाचे स्रोत
विद्यार्थी मित्रांनो, इतिहासाची निर्मिती ही स्रोतांच्या साहाय्याने होत असते. इतिहासात भूतकालीन व्यक्ती, घटना, घडामोडी व आंदोलने यांचे वर्णन असते आणि इतिहासाची रचना ही प्रत्यक्ष घटना घडल्यानंतर व बराच काळ लोटल्यानंतर करण्यात आलेली असते. इतिहासकार निरनिराळ्या साहित्यसामग्रीच्या साहाय्याने इतिहासाची रचना करतो. ती त्याच्या इतिहासरचनेची साधने असतात; स्रोत असतात. या स्रोतांमध्ये विविध साधनांचा समावेश होतो. बघू नंतर कोणत्या विविध स्रोतांच्या साहाय्याने इतिहास निर्मिती होते.
पूर्वीची आज्ञापत्रे, संदेश, हुकूमनामे, राजपत्रे, ताम्रपट, संविधान, सनदा, न्यायालयीन निर्णय, तह, सूचना, दैनंदिनी, पत्रे, ताडपत्रे, हिशेबाची कागदपत्रे, इत्यादी अधिकृत कागदपत्रे, तत्कालीन प्रवासवर्णने, आत्मवृत्ते, बखरी, चरित्रे, काव्य, कथा, दंतकथा, इत्यादी वाङ्मय, पूर्वीची भांडी, दागिने, खेळणी, अवजारे, हत्यारे, मूर्ती, नाणी, पोषाख, इत्यादी मूर्त वस्तू, जुन्या इमारती, किल्ले, राजवाडे, गठ्या, मंदिरे, घाट, कालवे, पूल, रस्ते, इत्यादी इतिहासकालीन ठिकाणे आणि सामाजिक आचार, चालीरीती, रूढी, परंपरा, इत्यादी गोष्टींचा इतिहासाचे स्रोत म्हणून उपयोग होतो. अचव! किती स्रोत कळले आपल्याला ? याच विविध स्रोतांच्या रूपाने इतिहास मूर्त रूप धारण करतो. या सोतांमुळेच इतिहासाची सत्यता पटते. स्रोताचे तीन प्रकार असल्याचे आढळते. ते म्हणजे
- इमारती, रस्ते, कालवे, पूल, नाणी, भांडी, अलंकार, अवजारे, हत्यारे, पोषाख, स्मारके, मोदी, ताम्रपर, संविधान वह सूचना इत्यादी वस्तू एखाद्या समाजाचे विशिष्ट काळाती वस्तुरूप अवशेष होते. त्यावरून तत्कालीन परिस्थितीबद्दल सर्वसाधारण पण स्पष्ट कल्पना येण्यास मदत होते. हे अवशेष मूर्त स्वरूपात असतात. त्यामुळे त्यांच्या हत्येबद्दल कोणत्याही प्रकारचा संदेह नसतो. असेहडप्पा संस्कृतीच्या उत्खननात सापडलेल्या वस्तू म्हणून हे मूळ किंवा मूलभूत स्रोत मानले जातात. इतिहासकार प्राथमिक स्रोत म्हणून त्यांचा उपयोग करतात.
- काही साधने दुसन्या अस्सल साधनांवर आधारलेली असतात. उदहरणार्थ, मूळ साधनांचे चित्र वा इतरांनी केलेले वर्णन वा उल्लेख एखाद्या व्यक्तीने विशिष्ट घटनेचा वृत्तांत प्रत्यक्ष निरीक्षणाच्या आधारावर तयार केला तर त्यातील बरीच माहिती इतर आधारांवर आधारलेली असते. त्या व्यक्तीच्या निरीक्षणाच्या मर्यादेपर्यंत तो आधार अस्सल असतो; तर उर्वरित गोष्टींच्या बाबतीत त्यांची गणना दुय्यम प्रतीच्या स्रोतात होते.
- काही आधार दुय्यम प्रतीच्या आधारावरून तयार केलेले असतात. या आधारांकडे साशंकतेने पाहिले जाते. ते तृतीय प्रतीचे स्रोत असतात.
- जवळच्या भूतकाळातील अवशेष चांगल्या स्थितीत असतात. पण जसजसा काळ लोटत जातो ना, तसतसे त्याचे स्वरूप अस्पष्ट होत जाते. ते संदिग्ध बनतात. उत्खननातून उपलब्ध होणाऱ्या वस्तूपासून काही अंदाज बांधता येतात.
उपलब्ध स्रोतांचे सूक्ष्म निरीक्षण, छाननी, चिकित्सा, विश्लेषण, सखोल अभ्यास, निष्कर्षप्राप्ती, इत्यादीनंतरच ते ग्राह्य मानण्यात येतात. पुन्हा आपल्यासाठी काही प्रश्न.
(अ) पुढील वाक्ये चूक की बरोबर ते सांगून कंसात
(X) किंवा (८) अशी खूण करा.
- सामूहिक आचार, परंपरा, चालीरीती, रूढ़ी यांचा ऐतिहासिक स्रोत म्हणून उपयोग होतो. ( )
- प्राचीन काळातील अवजारे, हत्यारे यांना ऐतिहासिक दृष्टीने अजिबात महत्त्व नसते. ( )
- मूर्त अवशेषल से सत्य की असत्य असा संदेहच असतो. ( )
- काळ लोटतो तसतसे खोतांचे स्वरूपं अधिक स्पष्ट होत जाते.
- इतिहासाचे महत्त्व व गरज
इतिहासाचे मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कोमेनिअसच्या मते, इतिहासाशी परिचय हा मानवाच्या शिक्षणातील महत्वाचा घटक आहे. ती जणू काही त्याच्या संपूर्ण जीवनाची दृष्टीच असते. इतिहासामुळे कालप्रवाह अखंड आहे आणि जीवन सातत्याने पुढे जात आहे, हे मुलांना कळते.
- इतिहासाने भावी नागरिकांत देशप्रेमाची व देशभक्तीची भावना निर्माण होते. देशाची संस्कृती, पराक्रमी घोर पुरुष, सामाजिक आर्थिक पडामोडी, सांस्कृतिक वैभव, इत्यादींची ओळख इतिहासामुळे होते. आपल्याला उपलब्ध असलेल्या वारशाची जाणीव होते. या वारशाची जपणूक आपल्याला करायची आहे, हे मुलांना कळते.
- विद्यार्थ्यांमध्ये मर्मदृष्टी व सामंजस्य निर्माण होते. व्यक्ती व समाज यांचे प्राचीन काळातील संबंध मुलांच्या लक्षात आले तर त्यांना त्या काळातील समाजाची परिस्थिती समाजातील समस्या, त्यावर तत्कालीन लोकांनी केलेले उपाय कळतील व आजच्या काळाशी जेव्हा ते तुलना करतील तेव्हा विद्यार्थ्यात मदृष्टी व सामंजस्य निर्माण होईल. इतिहासामुळे समग्र मानवजातीच्या एकात्मतेची जाणीव होते. 'आंतरराष्ट्रीय सामंजस्य निर्माण करण्याचा 'युनेस्को' प्रयत्न करत आहे. त्याला पोषकच इतिहासाची भूमिका आहे. स्वदेशप्रेम आणि आंतरराष्ट्रीय सामंजस्य परस्परपूरक व तारक आहेत. आपण विश्वाचे नागरिक आहोत, सर्वांची सुखदुःखे सारखीच आहेत, ही जाणीव मुलांमध्ये इतिहासाच्या अध्ययनाने निर्माण होऊ शकते.
- मुलांना देशाच्या इतिहासाचा वारसा प्राप्त करून देणे हेही इतिहासाचे महत्त्वाचे कार्य आहे. अनेक श्रद्धा, चालीरीती, परंपरा, रूढी, आचार माणसाला वारसारूपाने प्राप्त झालेल्या असतात. कर्तबगार, चिकित्सक, सामंजस्यपूर्ण भावी पिढी निर्माण होण्यासाठी सध्याच्या विद्यार्थ्यांना इतिहासाचे ज्ञान होणे आवश्यक आहे. या मते, 'इतिहास म्हणजे जीवनविषयक अनुभवांची परोपकारी खाणच होय. आजकालचे तरुण इतिहासाच्या अभ्यासाने मानवजातीच्या म अनुभवांचा फायदा घेऊ शकतात.
- स्मरणशक्ती व कल्पनाशक्तीचा विकास इतिहासातून होतो कल्पनाशक्तीला इतिहासात बराच याव आहे. गळची चित्रे, स्मृतिचित्रे मुले डळापुढे आणतात. प्रसंगांचे नाट्यीकरण करतात, त्यामुळे कल्पनाशक्ती विकसित होते. स्मरणशक्ती इतर विषयांतून जशी विकसित होते ना तशीच इतिहासातूनही होते. इतिहासामुळे मानवाचा दृष्टिकोन विशाल होण्यास मदत होते
- स्वदेशाचा अभिमान माणसाला असावा; पण इतर देशांना हीन लेखन आपले श्रेष्ठ सिद्ध करणे अयोग्य आहे, हे मुलांना कळले पाहिजे. अयोग्य प्रवृमुळे मानवजात दोन वेळेस दोन महायुद्धात पोळली आहे. याची जाणीव विद्यार्थ्यांना इतिहासामुळे होते. त्या युद्धांचे परिणाम समजतात. असे युद्ध पुन्हा होऊ नये, असे त्यांना वाटते.
- इतिहासाच्या मदतीने मानवता, लोकशाही, बंधुत्व, सहनशीलता, न्याय, सहानुभूती, उदात्तता या मूल्यांचा विकास करता येतो -
- इतिहासात निरनिराळ्या काळात व निरनिराळ्या प्रदेशात जन्माला आलेल्या वर्धमान महावीर, भगवान गौतमबुद्ध सॉक्रेटिस, येशू ख्रिस्त, महंमद पैगंबर, गुरुनानक यांनी उच्च कोटीचा संदेश दिला. मानवता, बंधुता, सहनशीलता, उदात्तता, सहानुभूती या मूल्यांचा •विकास करणाराचा तो संदेश होता. आधुनिक युगात लोकशाहीचे महत्त्व मुलांना इतिहासातून कळते. मानवाच्या व देशाच्या विकासाची वाटचाल इतिहासामुळे कळते
- इतिहासात कसे श्रेष्ठ पुरुष होऊन गेलेत, त्यांनी आपल्या जीवनात महत्त्वपूर्ण कार्य करून सर्वसामान्य लोकांना कसा मार्ग दाखवला, परिस्थितीवर कशी मात केली, त्यांच्या कार्यामुळे मानवी जीवनात कसे परिवर्तन घडून आले हे इतिहासामुळे कळते.
उदाहरणार्थ, गांधी, फुले, राष्ट्राची संस्कृती प्रगती यांचा बोध इतिहासातून होतो. देश परस्परावलंबी जाण निर्माण होते
इतिहास पार्श्वभूमीवर समजून घ्यावा लागतो. जग वैज्ञानिक प्रगतीमुळे संकुचित आहे. विश्वनागरिकत्वाच्या भावनेला फार महत्त्व जगातील सर्व देशाचे कोणत्या ना कोणत्या बाबतीत घ्यावे लागते. त्यामुळे सहजीवन आवश्यक आहे, आवश्यक तर्कशुद्ध विवेचक अभ्यासाने निःपक्षपातीपणा, तर्कशुद्धता आणि बौद्धिक प्रामाणिकपणा निर्माण अशी अपेक्षा इतिहासाच्या अभ्यासाने माणूस डोळस अधिक बनतो आणि कोणत्याही अतिरेकी नाही.
- ऐतिहासिक स्थळे, यांचे निरीक्षण करतात. तसेच ऐतिहासिक घटनांवर आधारित नाटके, कथा, कादंबऱ्या, इत्यादींचे पोवाडे, गीते श्रवण करणे, ऐतिहासिक भेटी देणे, इत्यादींमुळे आपल्याला आनंद होतो. विद्यार्थी निराळ्या भावविश्वात रममाण होतात आनंद तसेच इतिहासामुळे आकलनशक्ती अभिव्यक्ती कौशल्यही विकसित होते. आणि आणखी महत्त्वाचे म्हणजे इतिहासामुळे सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, पार्श्वभूमी कळण्यास मदत होते.
- वर्गामध्ये जेव्हा इतिहास या विषयाचे अध्यापन होते तेव्हा त्यातून काही उद्दिष्टे त्यातून पूर्ण व्हावीत, अशी असते. उद्दिष्टे पुढीलप्रमाणे
- आकलन तथ्ये, कल्पना, संकल्पना, प्रतीके, सामान्यीकरण, पद्धती व यांबद्दल माहिती ज्ञानसंपादन करणे.
- सर्वच शिक्षण प्राप्त व्हावे म्हणून जाते. क्रमिक पुस्तकात आशय असतो. पाठ नव्हे. आशयातील ऐतिहासिक व्यक्तीच्या कृती स्थळ काळ आणि तत्कालीन एकंदर परिस्थिती कळल्याशिवाय आकलन होत नाही. विद्यार्थ्याचे वय, अनुभव, अभिरुची, कुवत लक्षात घेऊन आशय आत्मसात करण्यास मुलांना प्रवृत्त करावे लागते. प्रत्येक घटना वेगवेगळी, एकेकटी घडत नाही. घटनांची मालिका असते. पटना पडण्यास कारणे असतात, त्या घटनेचे काही परिणाम असतात. त्या घटनेचा कार्यकारण भाव समजला पाहिजे. त्या घटनेत ज्या व्यक्तींची भूमिका आहे. त्या व्यक्ती कोणत्या हेतूने प्रेरित झाल्या होत्या, हे समजल्यास घटना आणखी स्पष्टपणे लक्षात येते.
- शिक्षकाला निरनिराळ्या शैक्षणिक साधनांचा उपयोग करून ऐतिहासिक घटना व प्रसंग यांतील साम्य व विरोध मुलांसमोर स्पष्ट करावा लागतो. मग विद्यार्थ्यांना तो आशय योग्य प्रकारे समजतो. इतिहासाच्या अभ्यासात ज्ञानाला पायाभूत स्थान आहे. म्हणून ज्ञान देण्याचा दृष्टिकोन सतत डोळ्यासमोर ठेवणे आवश्यक असते.
- सामंजस्य व मर्मदृष्टी घटनासंबद्ध, तथ्ये, कल्पना, संकल्पना, संज्ञा वगैरेंबद्दल सामंजस्य मर्मदृष्टी प्राप्त होणे."
- इतिहासातील घटना, घडामोडी, प्रसंग, व्यक्तींनी केलेल्या कृती यासंबंधीचा कार्यकारणभाव व आधार यांच्या साहाय्याने चिकित्सक व सांगोपांग विचार केला तरच त्या घटना अर्थपूर्ण बनतात. उदाहरणार्थ, फ्रेंच राज्यक्रांती. त्या वेळची आर्थिक, सामाजिक, राजकीय परिस्थिती, फ्रेंच सम्राटांचे बेमुर्वत घोरण, विचारवंतांचे विचार, प्रत्यक्ष क्रांती, त्या क्रांतीतून उदयाला आलेली तत्त्वे या सर्व गोष्टींचा सर्वकष विचार केला म्हणजे त्या घटनेचे आकलन होते.
- अमेरिकन राज्यक्रांती, फ्रेंच राज्यक्रांती, रशियन राज्यक्रांती ह्या राज्यक्रांत्याच होत्या. पण त्यापैकी प्रत्येकाची कारणे व परिणाम वेगळे होते, हे त्यानंतरच्या घडामोडींवरून स्पष्ट होते. केवळ आशयाचे पाठांतर केल्याने कोणत्याही घटनेची वैशिष्ट्ये लक्षात येत नाहीत. तेव्हा घटनेची चिकित्सक चर्चा केली म्हणजे विद्याथ्यांना अपेक्षित आकलन होऊ शकते.
- तर्कशक्ती, चिकित्सक वृत्ती व विचारशक्तींचा विकास करणे, चिकित्सक दृष्टिकोन प्राप्त करणे, विधायक विचारशक्ती विकसित करणे.
- मनुष्याला मन व बुद्धीचे वरदान लाभलेले असल्याने तर्क करणे, चिकित्सकपणे शोध घेणे व व्यापक विचार करणे या बौद्धिक क्रिया तो करू शकतो. ऐतिहासिक व्यक्तीसुद्धा आपल्यासारखी माणसेच होती. त्यांनाही भाव भावना, इच्छा व आकांक्षा होत्या, विशिष्ट उदिष्टे, मूल्ये डोळ्यासमोर ठेवून त्यांनी विशिष्ट कृती केल्या. त्या कृतीमागील प्रवृत्ती व अभिवृत्तीचा शोध घेणे आणि त्या व्यक्तींना तसे करणे का भाग पढले, हे समजून घेणे जरुरीचे असते. सर्व तथ्ये, अधिकृत सामग्री आवश्यक साधने उपलब्ध असल्याशिवाय विद्यार्थी तर्क व चिकित्सा करू शकत नाहीत. मुलांना विविध साहित्याचा वापर अध्यापनात करून विचार करण्यास प्रवृत्त केले पाहिजे. उदाहरणार्थ, मोहम्मद तुघलकाने दिल्ली येथील राजधानी देवगिरीला का हलविली ? याचा विचार केल्यास दिल्लीला राहून दक्षिणेकडील बडाचा मोड करणे कठीण जात असे. म्हणून राजधानी हलवली म्हणजे राजधानी बदलण्यात चूक नव्हती, असे दिसते. मंग त्याची चूक कोठे झाली ? हे शोधण्यास विद्यार्थ्यांना प्रवृत्त करणे आवश्यक आहे. त्या घटनेची कारणे, परिणाम यांचा सर्वांगाने विचार होणे आवश्यक असते. ऐतिहासिक ज्ञान प्राप्त होत असतानाच विद्यार्थ्यांची तर्कशक्ती, चिकित्सक वृत्ती व विचारशक्ती या अंगांचाही विकास होणे अगत्याचे असते.
- अभिरुची व अभिवृत्ती विद्यार्थ्यात योग्य व अनुकूल अभिरुची व अभिवृत्तींची वाढ व विकास करणे इतिहास विषयाचा उद्देश ज्ञान प्राप्त करीत असतानाच व्यक्तीच्या भावभावनांचा विकास करणे व तिला उच्च दर्जाच्या अभिरुची व अभिवृत्ती प्राप्त करून देणे हा असतो. व्यक्तीच्या भावभावना, ध्येय्ये, मूल्ये, आदर्श, इत्यादींचा थेट संबंध इतिहासाशी असतो. ह्या पटना मानसिक प्रक्रियेचा एक भाग आहे. घटनांची व कारणांची परंपरा, परिणाम, घटनेतील व्यक्ती, त्यांच्या कृती, त्यांच्या महत्त्वाकांक्षा यांचा त्या काळातील पार्श्वभूमीवर चिकित्सक विचार केला की, विद्यार्थ्याला त्या व्यक्तींच्या उद्देशाची कल्पना येते. ते उद्देश योग्य की अयोग्य हे विद्यार्थ्यांच्या लक्षात आणून दिले की, विद्यार्थ्याच्या अभिवृत्तीचा विकास होण्यास मदत होते.
- भारतीय संस्कृती प्राचीन आणि समृद्ध आहे. भारतात अनेक धोर, प्रतिभासंपन्न व्यक्ती होऊन गेल्या. त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवल्याने विद्यार्थ्यांना इतिहासाची गोडी लागते. उच्च ध्येय्ये आणि मूल्ये यांनी ते आकर्षित होतात आणि त्यांना योग्य अभिवृत्ती प्राप्त होतात. आपण अखिल मानवजातीचे अविभाज्य घटक आहोत, ही जाणीव महत्त्वाची आहे. जात, धर्म, वंश, पंथ, पक्ष वगैरे माणसांमध्ये भेद निर्माण करतात. परंतु मानवी ऐक्याची भावना असली तर ह्या कृत्रिम गोष्टी उरतच नाहीत आणि उच्च अभिरुची, अभिवृत्ती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होतात.
- उपयोजन नवीन अपरिचित परिस्थितीत पूर्वी संपादन केलेल्या ज्ञानाचा उपयोग करणे. इतिहासाच्या अभ्यासात वस्तू व वास्तूरूप अवशेष, चित्रे, प्रतिकृती, नकाशे व आलेख यांचा सतत उपयोग करावा लागतो. त्यामुळे वास्तूंच्या साहाय्याने इतिहासाचा अभ्यास कसा करावा हे समजते. जगात नेहमीच लहान-मोठ्या घटना पडतात आणि त्यासंबंधीचे नकाशे, बातम्या वृत्तपत्रात प्रसिद्ध होतात. व्यक्ती त्यांचे डोळसपणे वाचन करू शकते. आधुनिक जीवन जास्त गुंतागुंतीचे झाले आहे. इतिहासाच्या अभ्यासामुळे उद्दिष्टानुसार घटनांचा अर्थ लावता येतो. इतिहासाच्या अभ्यासाने ही उपयोजनक्षमता येते. इतिहासाच्या अभ्यासाने आलेल्या योग्यता व्यक्ती समर्थपणे उपयोगात आणू शकते आणि हे या विषयातील उपयोजन होय.
- कौशल्य इतिहास विषयाशी संबंधित काही कौशल्ये प्राप्त करण्यास उद्युक्त करणे. विशिष्ट हेतू समोर ठेवून सक्यीनुसार जाणीवपूर्वक, बिनचूकपणे व वेगाने एखादी कृती करणे म्हणजे कौशल्य होय. मुले कृति प्रिय असतात. इतिहासात नकाशे, आकृती, चित्रे वगैरेंचे वाचन व रेखाटन करता येणे आवश्यक असते. पहिले त्यांना अवलोकन करू द्यावे. वाचन करू द्यावे. त्यानंतर त्या वस्तू प्रत्यक्ष तयार करण्यास प्रवृत्त करण्यात येते.
- नकाशा, आलेख यांच्या रेखाटनाप्रमाणेच अनुक्रमणिका, सूची यांचा लाभ घेणे, संदर्भग्रंथांचा उपयोग करणे, स्वयं अभ्यास करणे हीदेखील कौशल्ये विद्यार्थ्यांना प्राप्त होणे जरुरीचे आहे.
या प्रकारे इतिहासाचे अध्यापन करताना विविध हेतू डोळ्यासमोर ठेवले जातात व ते इतिहास अध्यापनातून पूर्ण व्हावेत, अशी अपेक्षा केली जाते.
आता पुढील प्रश्नांच्या आधारे आपण आपली माहिती पडताळून पाहा -
पुढील घटक विकसित करण्यासाठी कोणते अनुभव विद्यार्थ्यांना देता येतील ?
जसे देशप्रेम, देशभक्ती संस्कृती र पुरुषांचा परिचय, आता सांगापू अनुभव
- स्मरणशक्ती व कल्पनाशक्ती
- विशाल दृष्टिकोन
- मानवता व बंधुता यांचा विकास
- आनंदप्राप्ती
- अभिर अभिवृी विकास -
- कोशल्यविकास
इतिहासातील तत्त्वे : अहिंसा, समता, बंधुता, स्वातंत्र्य
विद्यार्थी मित्रांनो, इतिहासात आपण डोकावलो ना तर विविध तत्वे यायला मिळतात. येथे आपल्या मर्यादामुळे आपण सर्वच तत्त्वांचा विचार करू शकणार नाही. म्हणून अहिंसा, समता, बंधुता, स्वातंत्र्य झा इतिहासातील महत्त्वाच्या तत्त्वांचाच आपण येथे विचार करू या. भारतीय संस्कृतीला भव्य व विशाल भूतकाळ आहे. अनेक संस्कृतीचे प्रवाह व उपप्रवाहांनी भारतीय संस्कृती अधिकच समुद्र झाली आहे. निरनिराळ्या कल्पना, विचारप्रणाली आणि निरनिराळे तत्त्वज्ञान यांनी भारतीय संस्कृती वृद्धिंगत केली आहे. या संस्कृतीतही वर उल्लेखिलेली तत्वे रुजलेली दिसतात. आपण विचार करू या. एका-एका तत्त्वाचा !
अहिंसा
अहिंसा हे तत्त्व जैन धर्मातून भगवान महावीरांनी पुरस्कारले आहे. महावीरांच्या मते, माणसाला सांसारिक बंधनातून मुक्त झाल्यास मोक्षप्राप्ती होते व संसारातील बंधनातून मुक्तता मिळण्याकरता मानवाला पुढील पाच तत्त्वांचा अंगीकार करणे आवश्यक आहे. (१) सत्य. (२) अहिंसा, (३) अस्तेय, (४) अपरिग्रह (५) सत्चारित्र्य या पान तत्त्वांच्या आचरणानेच माणसाला मोक्षप्राप्ती होऊ शकेल, असा महावीराने उपदेश केला. जैन धर्मात पुनर्जन्म व कर्म यांच्यावर विश्वास ठेवला जातो. सामान्य माणसाला जैन धर्मातील अहिंसा झेपण्यासारखी नव्हती.
गौतम बुद्धांनीही बौद्ध धर्मातून अहिंसा या तत्त्वाचा पुरस्कार केला. संसारातील दुःखे पाहून गोठमाने संसारत्याग केला. १२ वर्षे तपश्चर्या केल्यानंतर त्यांना 'ज्ञान' प्राप्त झाले, पुढे ते बुद्ध (ज्ञानी) या नावाने प्रसिद्ध झाले. त्यानंतर लोकांना आपल्या ज्ञानाचा फायदा व्हावा म्हणून त्यांनी भ्रमंती सुरू केली, त्यांचे पहिले भाषण सारनाथ येथे झाले. तेथे त्यांना पाच शिष्ण मिळाले. त्यांना 'पंचवर्गीय' म्हणतात. या घटनेला 'धम्मचक्र प्रवर्तने' असे नाव आहे. दिवसेंदिवस बुद्धाचे अनुयायी बाढ़ लागले. बुद्ध म्हणतात, 'इंद्रियावर विजय मिळविल्यास माणूस सुखी होतो म्हणून मानवाने अशा गोष्टींचे पालन करावे. त्या अशा (१) सुयोग्य विचार, (२) सुयोग्य ध्येय (३) योग्य भाषण, (४) योग्य वागणूक, (५) योग्य मार्गान उपजीविका करणे, (६) योग्य प्रयत्न योग्य चिंतन, (८) योग्य मनोनिग्रह
सम्राट अशोकानेही अहिंसा तत्वाचा पुरस्कार केला. सम्राट अशोकाने राज्यावर येताच काश्मीर व कलिंग या देशांवर स्वाऱ्या केल्या. या दोन्ही स्वायत त्याला विजय मिळाले. पण कलिंगच्या स्वारीत अपार मनुष्यहानी झाली. या युद्धात एक लक्ष माणसे ठार झाली, तीन लक्षावर कैद करण्यात आली व अनेक राजे अशोकाला शरण आले. अशोकाला अत्यंत चाईट वाटले. त्यानंतर त्याने पुन्हा युद्ध न करण्याची प्रतिज्ञा घेतली, पाटलीपुत्राला परत आल्यानंतर अशोकाने बौद्ध धर्माचा स्वीकार केला व त्यातील अहिंसेचे पालन करण्याचे ठरविले. त्याने बौद्ध धर्माचा प्रसार करण्याकरिता बरेच परिश्रम घेतले. स्वतःच्या राज्यात व राजवाड्यात होणारी हिंसा बंद केली.
सम्राट कनिष्क यानेही बौद्ध धर्माचा प्रसार केला. अहिंसा तत्त्वावर त्यांची श्रद्धा होती.
सम्राट हर्षवर्धनानेही आपल्या कारकिर्दीच्या उत्तरार्धति बौद्ध धर्माचा स्वीकार केला. पशुहत्या बंद केली व पशुहत्या करणाऱ्यांना कडक शिक्षा दिल्या.
भारतातील संत ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास, गुरुनानक, कबीर, तुलसीदास, गाडगेबाबा, इत्यादी संतांनीही आपापल्या पद्धतीने अहिंसेच महत्त्व लोकांना सांगितले व पशुहत्येला विरोध दर्शवला. त्यानंतर भारतातील प्रबोधन काळात प्रबोधनकारांनीही लोकांमध्ये जागृती घडवून आणण्यासाठी कार्य केले. राजा राममोहन रॉय, महात्मा जोतीराव फुले, नारायण गुरु सर सध्यद अहमद खान, न्या. रानडे, स्वामी विवेकानंद यांनीही लोकांना पशुहत्येसारख्या हिंसेपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला.
स्वातंत्र्य
स्वातंत्र्य मिळविण्याच्या प्रयत्नात जे कार्यकर्ते होते. यांच्यात मतभेद होऊन जहाल व मवाळ हे दोन गट तयार झाले. अर्ज व विनंत्यांचा सरकारवर काही परिणाम होणार नाही, राष्ट्रीय चळवळ तीव्र करावी, ती सामान्य जनतेपर्यंत न्यामध्ये राजकीय जागृती घडवून आणावी. त्यांना राष्ट्रीय चळवळीत सामील करून घ्यावे, लोकमताच्या दडपणाखाली नमण्यास सरकारला भाग पाडावे, असे म्हणणारा एक गट होता, तर दुसरा गट स्वातंत्र्यासाठी सनदशील मागनिच कार्य करावे, अशा मताचा होता. ह्याला 'मवाळ गट म्हणतात राष्ट्रीय चळवळीची सूत्रे १९२० पासून महात्मा गांधींच्या हाती आली. गांधीजीनी अहिंसेच्या मार्गाने प्रतिकार करण्याचे ठरविले. 'जुलूम व अन्याय यांचा अहिंसक मार्गाने केलेला प्रतिकार म्हणजे सत्याग्रह होय असे सत्याग्रह गांधीजींनी वारंवार केले. त्याग्रहातून तेथील लोकांना शेतसारा इंग्रजांकडून माफ करण्यास भाग पाडले. अहमदाबादच्या सत्याग्रहातून कामगारांचा पगार वाढवला. रौलट कायद्यालाही सत्याग्रहाच्या मार्गाने गांधीजींनी विरोध केला, असहकार आंदोलन गांधीजींनी इंग्रजाविरुद्ध उभे केले. दांडी येथे मिठाचा सत्याग्रह करून मिठाचा फायदा मोडला. 'छोडो भारत' है आंदोलन त्यांनी राबवले. गांधीजींच्या चळवळीचाच परिणाम म्हणून इंग्रजांना हा देश सोडावा लागला. असे अहिंसेचे तत्व हे पूर्वीपासून अर्वाचीन काळापर्यंत चालत आलेले दिसते,
समता
'समता' हे तत्त्वही महत्त्वाचे आहे. समानता म्हणजे दर्जा च संधी यांबाबत समानता. सर्व मानव मूलतः नैसर्गिकदृष्ट्या समान आहेत. त्यामुळे त्यांच्यात कोणत्याही तऱ्हेचा भेदभाव न करता त्या सर्वांना विकासाची समान संधी उपलब्ध झाली पाहिजे. प्राचीन काळी ग्रीक नगरराज्यात प्लेटो या विचारवंताने कुटुंब व संपत्ती संबंधीचा समाजवाद सांगितला होता. स रसुद्धा इ.स. १५१६ मध्ये 'युटोपिया ग्रंथात आदर्श राज्याची कल्पना मांडताना राजकीय, आर्थिक व सामाजिक समानतेवर भर दिला होता. इ.स. १७७६ मध्ये अमेरिकेला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अमेरिकेनेही आपल्या स्वातंत्र्याच्या जाहीरनाम्यात सर्व लोक समान आहेत म्हणून सर्वांना समान हक्क असावेत' अशा मूलभूत समानतावादी मूल्यांचा आवर्जून उल्लेख केला. इ.स. १७८९ मध्ये फ्रेंच राज्यक्रांतीने सर्व मानवाच्या कल्याणासाठी स्वातंत्र्य, समता, बंधुता या तीन महान समानतावादी तत्त्वांना जन्म दिला. फ्रानानेसुद्धा 'मानवास स्वातंत्र्य आणि समानतेचा नैसर्गिक हक्क आहे. कारण प्रत्येक मनुष्य जन्मतःच स्वतंत्र असतो', असे अभिवचन आपल्या राष्ट्रीय सभेच्या घोषणेत दिले. इ.स. १९९७ मध्ये रशियाने लेनीनच्या नेतृत्वाखाली साम्यवादी क्रांती यशस्वी केली आणि आर्थिक विषमतेला मूठमाती देऊन सर्व नागरिकांना आर्थिक, सामाजिक व राजकीय क्षेत्रात समानतेचा हक्क दिला. इंग्लंडमध्येसुद्धा नागरिकांना समान हक्क व स्वातंत्र्य मिळाले. होते.
इ.स. १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर १९५० मध्ये जी राज्यघटना तयार झाली, त्यातील आत्मासुद्धा समाजवादीच आहे. मानवामानवामध्ये जरी विविधता (रंग, रूप, वैशिष्ट्यांबाबत) असली तरी ती नैसर्गिक आहे. परंतु सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्रात निर्माण झालेली विषमता मात्र मानवनिर्मितच आहे.
समानता
समानता म्हणजे समाजातील कोणत्याही व्यक्तीला सामाजिक किंवा आर्थिक घटकांच्या आधारावर विशेष अधिकार न देता सर्वांना समानतेची वागणूक देणे. समाजातील मानवनिर्मित कृत्रिम विषमतेचे पटक नष्ट करून प्रत्येक व्यक्तीला आपल्या विकासाकरता समान आणि पूर्ण संधी देणे होय, मानवनिर्मित विषमता म्हणजे जन्म, कुळ, वंश, जात, धर्म, पंथ, लिंग, रंग, दर्जा आणि संपत्ती यांवर आधारित भेदाभेद होय, समानतेमुळे प्रत्येक व्यक्तीला कायद्यानुसार समानतेने विले जाते. कोणत्याही तन्हेचा भेदाभेद केला जात नाही. समान न्याय व समान संरक्षण मिळते. व्यक्तिमत्त्वाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांना समान संधी प्राप्त होतात. भारतीय राज्यघटनेने आपल्या नागरिकांना समानतेचे मूलभूत अधिकार दिलेले आहेत.
लक्षात ठेवा -
समानता म्हणजे सर्वांना समान संधी देणे, मानवनिर्मित विषमता नष्ट करणे, कोणालाही जन्मसिद्ध विशेषाधिकार न देणे.
समानतेचे विविध प्रकार
- नैसर्गिक समानता - निसर्गाने मानवात भेदाभेद केला नाही. जन्माने सर्व सारखे, पवित्र असतात. मानवाने उच्च-नीच भेद केले ते नष्ट होऊन प्रत्येकाला समानतेची वागणूक, संधी प्राप्त झाली पाहिजे.
- सामाजिक समानता समाजात प्रत्येक व्यक्तीची प्रतिष्ठा राखली पाहिजे. प्राचीन काळी अस्पृश्यांना दिली गेलेली वागणूक तसेच स्त्रियांना दिले जाणारे समाजातील स्थान पाहिले की, समाजिक समानतेचे महत्व समजते.
- आर्थिक समानता आर्थिक समानता म्हणजे सर्वांची आर्थिक स्थिती सारखी वा समान वेतन असा अर्थ मुळीच नाही; तर सर्व व्यक्तींना जीवनावश्यक वस्तू आणि सेवा योग्य प्रमाणात मिळून त्यांना स्वतःचा विकास करण्याची समान संधी उपलब्ध करून देणे म्हणजे आर्थिक समानता प्रस्थापित करणे होय. आर्थिक स्थिती उंचावण्यासाठी प्रत्येक व्यक्तीला आपल्या कर्तृत्वानुसार, गुणानुसार, पात्रतेनुसार योग्य संधी मिळाली पाहिजे.
- राजकीय समानता प्रत्येक नागरिकाला शासन कार्यात भाग घेण्याची समान संधी मिळाली पाहिजे. सर्वांना समान अधिकार मिळायला हवेत. भारतीय संविधानाने "एक मत, एक मूल्य' ही संकल्पना मान्य केली आहे.
- नागरिक समानता कायद्याने सर्व नागरिकांना समान हक्क, समान कर्तव्ये प्राप्त झाली पाहिजेत. सर्वांना समान संरक्षण व सर्वांना न्याय मिळाला पाहिजे. सामाजिक विषमतेच्या आधारावर कोणालाही विशेषाधिकार न देता सर्व नागरिकांना समानतेची वागणूक मिळाली पाहिजे तरच प्रत्येक व्यक्ती आपला सर्वांगीण विकास व उन्नती करू शकेल.
प्राचीन भारतीय तत्त्वज्ञान म्हणजे अध्यात्मवादात संपूर्ण चराचर सृष्टीच्या मुळाशी एक परमतत्त्व असून त्या शक्तीकडूनच सृष्टीचे संचलन व नियंत्रण केले जाते, असे मानले जाई. या शक्तीनेच संपूर्ण सृष्टी मडविली आहे. या परमशक्तीचाच अंश सर्व सजीव पटकांमध्ये विद्यमान असतो. त्याला आपण आत्मा, प्राण असे संबोधत असतो. सर्व समान आहेत, सर्वांत एकच आणि सारखाच आत्मा आहे हे प्राचीन काळीही मानले जाई, असे दिसते. असे समानतेचे तत्त्व महत्त्वपूर्ण आहे.
बंधुता
बंधुता हे महत्त्वाचे तत्त्व आहे. बंधुता म्हणजे व्यक्तीची प्रतिष्ठा आणि राष्ट्राची एकात्मता राखणारी बंधुता.
व्यक्तिस्वातंत्र्याइतकेच नागरिकांमध्ये परस्परांबद्दल प्रेम, जिव्हाळा व आत्मीयता असणे आवश्यक आहे. तरच ऐक्यभावना निर्माण होऊन समाजाचा व राष्ट्राचा विकास होऊ शकेल. या ऐक्यभावनेलाच बघुना म्हणतात. आपण सर्व एकाच राष्ट्राचे नागरिक आहोत, राष्ट्रीय हिताच्या भावनेने बांधले गेले आहोत. आपल्याला जसे काही व्यक्तिगत अधिकार आहेत तशीच सामाजिक व राष्ट्रीय जबाबदारीही आपल्यावर असून ती पार पाडणे हे आपले कर्तव्य आहे. ही जाणीव प्रत्येकात निर्माण झाली पाहिजे, अशी घटनेची आपल्याकडून अपेक्षा आहे.
तोकशाही समाजात विविधतेला भरपूर वाव असतो. भारतात विविध धर्म, संप्रदाय, संस्कृती, भाषा यांमधील लोक राहत असल्यामुळे हा एक विविधरंगी व वैचित्र्याने नटलेला देश आहे. असे विविधतेचे वातावरण लोकशाहीला मारक नसून पूरक आहे. लोकशाही समाज वैचारिक विविधतेचे स्वागतच करतो, वैचारिक भेद, मतभिन्नता, रुचिवैचित्र्य व कल्पनास्वातंत्र्य नष्ट करून एकसूत्रीपणा आणता येईल. कदाचित त्यामुळे शासकीय कार्यक्षमताही वाढेल. परंतु जीवनमान सांस्कृतिक दृष्टीने दरिद्री बनेल. मानवी प्रज्ञेचा विलास खुरटून जाईल. विविधतेने संपन्न व समृद्ध लोकशाही समाज निर्माण करायचा असेल व टिकवायचा असेल तर त्यासाठी ही विविधता सामावून व पचवून घेण्याइतकी विचारांची व अंत:करणाची विशालता तरुण वर्गात निर्माण केली पाहिजे. हे काम अर्थातच शिक्षणाने केले पाहिजे. या प्रकारे लोकशाहीत बंधुतेच्या तत्त्वाला अतिशय महत्त्व आहे.
स्वातंत्र्य हे देखील महत्त्वाचे तत्त्व आहे. व्यक्तिस्वातंत्र्य हा लोकशाही विचारसरणीचा गाभा आहे. त्यामुळे प्रत्येक नागरिकाला मतस्वातंत्र्य आहे. आपली मते प्रगट करण्याचा अधिकार आहे. भारतात अनेक धर्माचे व पंथाचे लोक कित्येक शतकांपासून वास्तव्य करीत आहेत. एकाच धर्मात अनेक पंथही आहेत. या निरनिराळ्या धर्माच्या व पंथाच्या लोकांच्या वेगवेगळ्या श्रद्धा आहेत. वेगवेगळ्या पद्धतीच्या उपासना आहेत. त्या बाळगण्याचे व वैयक्तिक जीवनात त्यानुसार आचरण करण्याचे प्रत्येकाला स्वातंत्र्य राहील. व्यक्तित्वाची प्रतिष्ठा मान्य केली म्हणजे व्यक्तिविकासाचे महत्त्वही मान्य करावेच लागते. घटनेनुसार आज प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या आवडी-निवडीनुसार शिक्षण घेऊन वा व्यवसाय करून आपला विकास करून घेण्याचे पूर्ण स्वातंत्र्य राहील.
भारताच्या राज्यघटनेने नागरिकांना स्वातंत्र्याच्या अधिकाराअंतर्गत सहा प्रकारची स्वातंत्र्ये दिलेली आहेत. भाषण व अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य, शांततेने व निःशस्त्र एकत्र जमण्याचे स्वातंत्र्य, संघटन करण्याचे स्वातंत्र्य, भारतात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचे स्वातंत्र्य, भारताच्या कोणत्याही प्रदेशात राहण्याचे व स्थायिक होण्याचे स्वातंत्र्य आणि व्यवसाय व उद्योगधंदा करण्याचे स्वातंत्र्य ही ती सहा स्वातंत्र्ये आहेत.
या प्रकारे अहिंसा, समता, बंधुता, स्वातंत्र्य ही इतिहासातील महत्त्वाची तत्त्वे आढळता .
इतिहासातील संरचना : अर्थ, उपयोग,
अध्यापनात वापर
विद्यार्थी मित्रांनो, प्रत्येक विषयाची एक स्वतंत्र अशी स्वतःची संरचना असते. संरचनेमध्ये विषयातील आशयाला अर्थपूर्ण व सुसूत्रतेने विभाजित केले जाते. विषयाची माहिती घेणाऱ्याच्या दृष्टिकोनावर संरचनेचे स्वरूप ठरते. संरचना ही परिवर्तनशील असते. संरचनेमध्ये विषयाचे ज्ञान व माहिती समाविष्ट असते. एकाच विषयाची संरचना विविध पद्धतींनी व प्रकारांनी दर्शविता येते. कोणत्याही विषयाच्या अध्यापनातून त्या विषयाच्या संरचनेला महत्त्वपूर्ण स्थान दिलेले आढळते.
इतर विषयांप्रमाणेच इतिहासाचीही संरचना आवश्यक ठरते. इतिहासात विविध अंगे असलेली आढळतात. जसे स्थल, काल, घटना. या अंगांमध्ये परस्परसंबंध असतो. हा परस्परसंबंध अध्यापन करताना आपण स्पष्ट करायचा असतो. हा परस्परसंबंधी स्पष्ट करणारी मांडणी म्हणजे विषय संरचना कोणतीही संरचना अंतिम असत नाही, हेही लक्षात ठेवणे आवश्यक आहे. आपापल्या अनुभवा प्रमाणे आपल्याला संरचना मांडायची असते आणि त्या संरचनेचा विकास करायचा असतो. इतिहासातील कोणतीही घटना एखाद्या विशिष्ट क्षेत्रातली असते. उदाहरणार्थ, राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, इत्यादी. तर कुठल्या ना कुठल्या स्थळी घडलेली असते. उदाहरणार्थ, प्रादेशिक, राष्ट्रीय किंवा जागतिक असते. कुठल्या ना कुठल्या काळात घडलेली असते. उदाहरणार्थ, प्राचीन, मध्ययुगीन, अर्वाचीन इतिहास संरचनेतील त्या विशिष्ट घटनेचे स्थान कळले की ती घटना आपण जास्त जाणीवपूर्वक शिकवू. इतर त्याच काळातील तशाच घटना व इतर घटनाही लक्षात घेता येतील आणि त्यातून सामाजिकीकरण घडू शकेल.
संरचनेचा उपयोग आपल्याला विविध कारणांनी करणे आवश्यक ठरते. संरचनेमुळे पाठ्यपुस्तकातील पटकांना आवश्यकतेप्रमाणे उपघटकांत सहजपणे विभाजित करता येते. एका उपघटकाचा दुसन्या उपघटकाशी असणारा संबंध लक्षात येतो. सूक्ष्मतेने पटकाचे अध्ययन अध्यापन होते. पाठ्यपुस्तकात कोणत्या पटकाला जास्त महत्त्व दिले गेले आहे ते कळते. विषयांतर्गत समवाय असणाऱ्या घटकांचा तुलनात्मक अभ्यास करता येतो. वार्षिक नियोजन, घटक नियोजन, शैक्षणिक साधनांचे नियोजन, इत्यादींमध्ये संरचनेची महत्त्वपूर्ण मदत होते. संरचनेच्या ज्ञानामुळे अध्यापन प्रभावी व सफल होते. म्हणून
संरचना महत्त्वपूर्ण आहे. वरील विवेचनावरून अध्यापनात संरचनेचा वापर आवश्यक आहे, हे कळते. हा वापर कसा करायचा, ते पुढीलप्रमाणे
१८५७ चा राष्ट्रीय उठाव' ही अर्वाचीन काळातील राष्ट्रीय इतिहासातील राजकीय घटना ही घटना जर आपण पेतली, तर त्यासोबत अर्वाचीन काळातील राष्ट्रीय, राजकीय इतिहासाच्या सर्व घटना या टप्प्यात घ्याव्या लागतील. फ्रेंच राज्यक्रांती, अमेरिकन क्रांती रशियन क्रांती या घटनाही या टप्प्यात याव्या लागतील. त्यातील समानमूत्र विद्यार्थ्यांना शोधता येतील आणि विद्यार्थी सामान्यीकरणाकडे जाईल. इतिहासात तपशीत जास्त असला तरी इतिहास म्हणजे केवळ तपशील नाही, तर सामान्यीकरण आवश्यक आहे.
या इतिहासाच्या संरचनेचा अध्यापनावर परिणाम होतो. अध्यापन करताना त्या घटकातील अनेक मुद्दे संबोध येतात. त्यांच्या परस्परसंबंधातून व्याख्या वा नियम तयार होतात. उदाहरणार्थ, जगातील क्रांत्या हा पटक, या घटकातील निरंकुश राजसता, सरजामशाही भांडवलशाही साम्राज्यशाही अन्यायाचा प्रतिकार इत्यादी संबोध आहेत. त्यांच्या परस्परसंबंधातून काही नियम तयार होतात. उदाहरणार्थ, अन्यायाची परिसीमा झाली की जनता क्रांती करून उठते. भांडवलशाहीच्या विकासातून साम्राज्यशाही निर्माण होते. ही बचे हे साध्य असले पाहिजे, कोणती अध्यापनपद्धती से तत्त्व शिकवताना उपयुक्त ठरू शकेल याचा शिक्षक आपोआपच विचार करू लागतो आणि आशय आणि पद्धती एकत्रित जुळतात. आपल्याला अवगत असलेल्या विविध अध्यापन पद्धतीचा अध्यापक वेगळ्या पद्धतीने विचार करू शकतो आणि अध्यापन अधिक परिणामकारक व अर्थपूर्ण खेऊ शकते.
"इंग्रजांचा भारतात प्रवेश व सत्तास्थापना ह पटकात संरचनेतील स्थान, आधुनिक भारताचा राजकीय इतिहास' असे निश्चित करता येते. संस्थाने खालसा करणे, इंग्रजी सत्तेचा पाया घालणे, इंग्रजांचा मराठ्यांच्या राज्यात प्रवेश, तैनाती फौजेची पद्धती, व्यापार करता करता राजकारणात हस्तक्षेप, इंग्रजांची भारतात सत्तास्थापना यां मुद्यांच्या परस्परसंबंधातून काही नियम तयार होतात. उदाहरणार्थ, कोणत्याही देशावर आपली सत्ता स्थापन करायची असेल तर त्या देशातील कमकुवत घटक माहीत करून घेणे आवश्यक ठरते, देशातील विविध राज्ये व प्रदेशांमध्ये एकी नसेल तर दुसरा देश आपले वर्चस्व प्रस्थापित करण्यास प्रेरित होतो. अशी तत्त्वे मुलांना त्यातून कळू शकतात व अध्यापन अर्थपूर्ण होते.
'जर्मनीचे एकीकरण' ह्या पटकासोबत इटालीचे एकीकरण ही घटनाही या टप्प्यात घ्यावी लागेल. त्यातील समान मूल्य मुले शोधू शकतील. संरचनेतील या घटकाचे स्थान आधुनिक जगाचा राजकीय इतिहास असे निश्चित करता येते. या घटकात जकात संघ स्थापना, एकीकरणाची वाटचाल, मार्गाची निश्चिती, नव्या मनूचा प्रारंभ, लोह व रक्त घोरण', एकीकरण या मुद्यांच्या परस्परसंबंधांतून काही नियम तयार होतात. उदाहरणार्थ, कोणतेही प्रश्न लष्करी ताकदीच्या बळावर सुटू शकतात. तलवारीच्या जोरासोबत मुत्सद्देगिरीही आवश्यक असते तेव्हाच विजय मिळतो. अशी तत्वे मुलांना त्यातून कळतात. व मुले सामान्यीकरण करतात..
भारतीय प्रबोधन' हा घटक घेतला तर संरचनेतील या घटकाचे स्थान 'आधुनिक भारतातील सामाजिक इतिहास' असे निश्चित करता येईल. ह्या घटकामध्ये प्रबोधनात मध्यम वर्गाचे कार्य स्त्रियांची स्थिती, जातिभेद निर्मूलनाची चळवळ, धर्मसुधारणा चळवळ, विविध संस्थांची स्थापना, राष्ट्रीय भावनेच्या बीजांची रुजवणूक या मुद्यांच्या आधारे त्यांच्या परस्परसंबंधातून काही तत्त्वे तयार होतात. उदाहरणार्थ, स्त्रियांची स्थिती सुधारल्याशिवाय कोणत्याही समाजाची प्रगती होऊ शकत नाही, वैचारिक परिवर्तन झाल्याशिवाय समाजसुधारणा होऊ शकत नाही, श्रद्धा अनिष्ट चालीरीती नष्ट करण्यासाठी धर्मसुधारणा चळवळ आवश्यक ठरते. सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक सुधारणांमुळे सामाजिक प्रबोधन होऊन राष्ट्रीय भावनेची बीजे समाजात रुजतात. अशी तत्त्वे शोधून मुले सामान्यीकरणाकडे जातात व अध्यापन अर्थपूर्ण बनते. वरीलप्रमाणेच आपण जो विषयांश शिकवणार आहोत, त्यातील तत्त्वे विद्यार्थ्यांना शोधायला लावून सामान्यीकरणाकडे नेल्यास अध्यापन अर्थपूर्ण होण्यास मदत होते. म्हणून अध्यापनात संरचनेचा वापर करणे आवश्यक ठरते.
सारांश
इतिहासाबद्दल भिन्न कल्पना अस्तित्वात आहेत. निरनिराळ्या काळातील उल्लेखनीय घटनांची कारणे, परिणाम यांची इतिहासात चर्चा असते. ज्या काळात इतिहासलेखन होते, त्या काळातील मूल्ये, परिस्थिती, आदर्श यांचा इतिहासलेखनावर परिणाम होतो. इतिहासाचे विविध स्रोत आहेत. त्याच्या आधारे इतिहासकार इतिहास लिहितो. मानवी संस्कृतीच्या प्रगतीचे दर्शन इतिहासात घडते. भूतकालीन घटना उद्बोधक व प्रेरणादायी असतात. म्हणून इतिहासाचा समावेश अभ्यासक्रमात असावा. इतिहास हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरण १९८६ नुसार ठरविलेली दहा गाभाभूत तत्त्वे पूर्ण करण्यासाठी महत्त्वपूर्ण असा विषय आहे. इतिहास विषयाच्या संरचनेमुळे अध्यापन प्रभावी व सफल होते.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog