सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues) - (Social problems in Contemporary India)
समकालीन भारतातील सामाजिक समस्या
सामाजिक प्रश्न (मुद्दे) ( Social Issues)
प्रश्न १ :- धार्मिक अल्पसंख्याकाची संकल्पना सांगून अल्पसंख्यांकांची वैशिष्ट्ये व उदिष्ट्ये स्पष्ट करा.
(Causes & Problems of Religious Minorities ) धार्मिक अल्पसंख्यांक यावर निबंध लिहा.
उत्तर :
प्रस्तावना :- प्रत्येक समाजात त्या समाजातील विविध समूहात, घटकात धार्मिक, सांस्कृतिक, राजकीय, आर्थिक घटकाधारावर ऐक्य आवश्यक आहे. समाज विघटित होऊ नये म्हणून लोकाचे सहअस्तिवाचे, सहमतीचे शांततेचे संबंध अपरिहार्य आहेत. परंतु सामाजिक भेद, सांस्कृतिक विविधता, राजकीय विरोध, आर्थिक विसंवाद आणि एैतिहासिक शत्रुत्व असेल तर ऐक्य असत नाही. भारतात मुस्लिम, दलित, आदिवासी यांचे धार्मिक, सांस्कृतिक भाषिक, प्रादेशिक विविधतेने त्यांचे ऐक्य आणि एकात्मतेच्या समस्या निर्माण झाल्या आहेत. भारतीय समाज जाती, धर्म जमात, प्रदेश, भाषा, संस्कृती वर्गात विभागला आहे.
अल्प संख्याकाच्या समस्याच्या पार्श्वभूमीचा आढावा घेताना आर्यानी विषम श्रेणीरचना, जाती निर्माण केल्या. विवाह निषेध, अन्ननिषेध, व्यवसायावर निर्बंध घातले. तसेच भारतात मुस्लिम ख्रिश्चन आले. बौद्ध, शीख, जैन, संप्रदायाने हिंदुस आव्हान दिले. विविध निर्बंधाने विविध गटात शत्रुत्व निर्माण झाले. आर्यानी अनार्य, द्रवीडास गुलाम केले. मोगलानी स्वाऱ्या केल्या. १६ व्या शतकात डच, फ्रेंच, पोर्तुगीज, इंग्रज व्यापारी भारतात आले. जातीने शुद्र गौण ठरले तर बौद्ध, जैन, पार्सी, ख्रिश्चन अल्पसंख्य ठरले. १९४७ ला भारत स्वातंत्र झाला. भारत पाक विभाजनाने अनेक समस्या निर्माण झाल्या. त्यातून काश्मीरचा प्रश्न अद्यापही प्रलंबीत आहे. फाळणी होताना मुस्लीम बहुल आसाम, बांगाल, सिंच, पंजाबात दंगली झाल्या त्यातून सांप्रदायीकता समस्या निर्माण झाली. त्यात इस्लाम व खिश्चनाची मूळे विदेशी आहेत.
धर्म, भाषा, गट, जात, प्रदेश, वंश या आधारावर समाजाची विभागणी अल्पसंख्य प्रभावी किंवा बहुसंख्य गट अशी होते. संख्येच्या बलावर बहुसंख्य गट, अल्पसंख्य गटाची कुचंबना करतो. बहुसंख्य अल्पसंख्यकावर अन्याय, अत्याचार करतात. त्यांना संरक्षण मिळाले नाही तर असुरक्षीततेच्या मानसिक वैफल्यातून समाज एकात्म होत नाही अल्पसंख्य आणि बहुसंख्य गटात भेद स्पष्ट होतो आणि अल्पसंख्य गौण समूह ठरतो. कारण प्रभावी गटापेक्षा त्याची संख्या कमी आहे. बहुसंख्यकाच्या स्पर्धेत अल्पसंख्यकास लाभ होत नाहीत कारण त्याचा दुय्यम दर्जा असतो.
अल्पसंख्य ही संकल्पना अर्थ, व्याख्या :
अल्पसंख्य शब्दाची उत्पत्ती लॅटीने शब्द मायनर पासून आग्लभाषेत (Minority) तयार झाला. म्हणजे अल्पसंख्य लहानगट त्यामागे सांख्यिकी अर्थ आहे. जागतिक महायुद्धापासून अल्पसंख्य संज्ञेकडे लक्ष वेचले. मानवशास्त्रज्ञ, व समाज शास्त्रज्ञांनी अल्पसंख्य समूहाचे विश्लेषण केले आहे. अर्थात अल्पसंख्य ही संज्ञा संदिग्ध आहे. ज्याची एखाद्या राज्यात ५० टक्के पेक्षा कमी लोकसंख्या असते तो समूह अल्पसंख्य ठरतो. परंतु एखाद्या राज्यात अल्पसंख्य बहुसंख्य ठरतो. उदा. काश्मीर मध्ये मुस्लीम बहुसंख्य ठरतात. पंजाबमध्ये शीख बहुसंख्य ठरतात. म्हणून अल्पसंख्य बहुसंख्य ह्या सापेक्ष संकल्पना आहेत. निरपेक्ष संकल्पना नाही. काश्मीर मध्ये हिंदु अल्पसंख्य ठरतात.
अल्पसंख्य म्हणजे सांस्कृतिक, भाविक, धार्मिक, आर्थिक, राजकीय दृष्टया प्रभावहीन गट, त्याचे संरक्षण करावे लागते. कारण प्रभावी वर्ग त्यावर प्रभाव टाकतो. म्हणून तो मागास राहतो, धर्म, संस्कृती वंश, लिंग भेदाने तो तळातळा वर्ग ठरतो तो दुय्यम ठरतो, त्यास सत्ता, संपत्ती, प्रतिष्ठा प्राप्त होत नाही. व बहुसंख्यक गट त्याचे शोषण करतो. त्याचे प्रभावी गटाशी दुय्यम संबंध असतात. समाजिक जीवनातील भेद, नीतीमुळे अल्प संख्यगटाचे प्रभावी गटाशी दुय्यम संबंध असतात. बहुसंख्यकाकडे सत्ता असते. म्हणून अल्पसंख्य गट सामाजिक, आर्थिक, राजकीय सत्तेच्या दृष्टिने गौण असतो.
व्याख्या :
- त्याची स्वतंत्र अस्मिता असते आणि दर्जाची जाणीव असते.
- ऑक्सफोर्ड इंग्लीश शब्दकोष :- अल्पसंख्य लहान, दुय्यम आणि कनिष्ठ ही वस्तुस्थिती आहे.
- कॉलीन्स :- बहुसंख्य गटापेक्षा ५० टक्केपेक्षा कमी लोकसंख्येचा समूह तो वांशिक, धार्मिक दृष्ट्या विभिन्न असतो.
- ब्राऊन, राऊसेक:- अल्पसंख्य असे व्यक्ती आहेत. ते प्रभावी गटापेक्षा वेगळे आहेत. ते वांशिक, धार्मिक, राष्ट्रीयत्वाने व सांस्कृतिक दृष्ट्या वेगळे आहेत.
- लुईस वर्थ :- अल्पसंख्यकाच्या शारिरीक, सांस्कृतिक वैशिष्ट्याने समाजापासून वेगळी वागणूक दिली जाते. ते सामाजिक जिवणापासून वंचित ठरतात.
भारतीय राज्यघटनेत कलम २९,३०,३५० (अ). ३५० (ब) कलमान्वये भाषिक, धार्मिक, सांस्कृतिक, अल्पसंख्य समजले. सर्वोच्च न्यायालयाने ५० टक्के पेक्षा कमी लोकसंख्या असलेला राज्यातील समूह तो एखाद्या खेड्यात, वार्डात, बहुसंख्य असेल परंतु राज्यात संख्याधारे ठरविला जातो, परंतु तो देशाचा निवासी/ नागरिक असावा. एनसायक्लोपेडिया ऑफ ब्रिटानिकात अल्पसंख्य समूहास सांस्कृतिक, वंशिक समूह संबोधले आहे. समाजशास्त्रीय दृष्ट्या ज्याचे बहुसंख्यकापेक्षा वेगळे सांस्कृतिक वर्तन असते, त्याची भाषा धर्माच्या दृष्टिने इतर समूहापेक्षा वेगळा असतो. राजकीय प्रभावहीन असतो. त्याबाबत पूर्वग्रह असतात. त्यांना समाजात समान सहभाग/ पुरस्काराची संधी नसते. बहुसंख्य त्यांच्या बाबद भेद करतात त्यांचे बहुसंख्यकाशी संबंध सामाजिक संरचनेवर अवलंबून असतात.
अल्पसंख्य समूहाची वैशिष्टये :
- लुईस वर्थच्या शब्दात अल्पसंख्य समूहाची खालील वैशिष्ट्ये आहेत. समाजात दुय्यम स्थान, दुय्यम भाग (Subordinate segment of society)
- विशिष्ट सामाजिक, धार्मिक सांस्कृतिक गुणधर्म प्रभावी गटापेक्षा वेगळी वैशिष्ट्ये असतात.
- अल्पसंख्य समूहाबावत बहूसंख्य समूह भेदनीतीचा अवलंब करतो.
- अल्पसंख्य गटाचे दमन केले जाते. त्यांच्यावर अपात्रता लादल्या जातात. अल्पसंख्य समूहात स्वचेतना, एकतेची भावना सदस्यात सामाजिक, मानसिक, ऐक्य असते.
- अल्पसंख्यकास अनुवंश, जन्माने अल्पसंख्य हा दर्जा प्राप्त होतो..
- अल्पसंख्य हा आंतर्विवाही गट आहे.
अल्पसंख्य गटाची उद्दिष्टये :
- स्वप्रतिमा आणि संस्कृती टिकविणे.
- राजकीय आक्रमकता.
- प्रभावी गटापासून राजकीय, सांस्कृतिक स्वातंत्र्य प्राप्त करणे.
- बहुसंख्यकाशी सम्मीलन करताना ऐक्य रुढी टिकविणे. अशा प्रकारे धार्मिक अल्पसंख्यांक या संकल्पनेचा विचार करता येतो.
प्रश्न २ :- भारतातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्या कारणासहीत स्पष्ट करा. भारतातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्येची कारणे सांगा.
भारतातील धार्मिक अल्पसंख्यांकांच्या समस्यांची चर्चा करा.
उत्तर :
प्रस्तावना :- भारतातील अल्पसंख्य गटात मुस्लिम, खिश्चन, शीख, जैन, पार्सी, ॲग्लो इण्डियन, बौद्ध, ज्यु इत्यादीचा समावेश होतो. तसेच इतर मागास गट, अनुसूचित जाती, जमातीचा समावेश होतो. प्रत्येक अल्पसंख्यगटाच्या संस्कृती, प्रादेशिकता, धर्म, भाषा, वंशात वैशिष्ट्ये पूर्ण समस्या आहेत. तर पार्सी, जैन, बौद्ध, समुदायाने समायोजन, सम्मीलन केल्याने समस्या उद्भवल्या नाहीत. तसेच पार्सी वगळता त्यांचे मूळ भारतीय आहे..
अल्पसंख्यकाच्या समस्या :
अल्पसंख्यकांच्या समस्यात अनुक्रमे
- जातीवादी राजकारण
- आत्मचिकित्सेचा आणि विज्ञानाचा अभाव.
- सामाजिक मागासलेषणा, आर्थिक मागासलेपणा, दारिद्य
- आधुनिक शिक्षणाचा आभाव, निरक्षरता.
- संकुचित विचाशचा धार्मिक प्रभाव.
- राष्ट्रीय प्रवाहापासून वेगळी प्रवृत्ती, पराभूत वृत्ती.
- शिक्षण, संस्कृती, राहणीमानाचा गौण दर्जा,
- दुय्यम प्रतीचे नागरीकत्व.
- सुधारणेचा अभाव, स्त्रीयावर अत्याचार,
- समायोजन, एकात्मता, सम्मीलनाची समस्या.
- धर्मनिरपेक्षता, लोकशाही मूल्ये, राजकारण समस्या राजकीय एकात्मतेची समस्या.
- भाषा समस्या, आर्थिक, राजकीय सत्ता व सत्ता संबंधाची समस्या, राजकीय सत्ताहिनता
- वंश समस्या, वंशाची प्रतिमा स्तरीकरण, वंशिक संघर्ष, राष्ट्रीय विघटन,
- भाषा, धर्म, प्रदेश, संस्कृती, संप्रदायवाद, स्थानिक लोकाशी संघर्ष.
- समाजापासून विलगता, निकृष्ट व्यवसाय
- हिन्दूतील बाह्यजाती समूह, अल्पसंख्य बहुसंख्य संघर्षाचे संबंध
- स्वायतत्ता समस्या सुधारणास विरोध, नैराश्य,
प्रमुख अल्पसंख्यकाच्या समस्या :
- मुस्लीम अल्पसंख्यक :
- मुस्लीम जेथे बहुसंख्य आहेत तेथे दारिद्र्य आहे. त्याच्या घाण वस्त्यामुळे आरोग्य धोक्यात येते हिंदु मुस्लीमात सांस्कृतिक भेद आहेत.
- हिंदू मुस्लीमाचे निवासस्थान वेगळे आहेत. भाषा, श्रृद्धा पूजा स्थळे, हॉटेल्स वेगळी आहेत. विवाह पद्धती, मृताचे विधी वेगळे आहेत.
- हिंदू मुस्लीमात आंतर्जातिय विवाह होत नाहीत. त्यामुळे मानसिक ऐक्य नसते.
- हिंदु मुस्लीमात आपसात प्राथमिक संबंध ठेवतात. ऐकमेकाच्या सामाजिक कार्य, उत्सवात सहभागी होत नाहीत. हिंदु मुस्लीमाची सम्मीलना पेक्षा संरचनात्मक बहु विविधता आहे.
- हिंदु मुस्लीमात कौटुंबिक सामाजिक पातळीवर आंतरक्रिया नाहीत. त्याचा विवाह, धर्म, कुटूंब पद्धती वेगळी आहे. इस्लाम सनातनी धर्म आहे. तो सुधारणा नाकारतो त्यांची, कुराण, हदीस,ऊलेमावर श्रद्धा आहे.
- मुस्लीम सनातनी आहेत. (Orthodot) अर्थिक, शैक्षणिक दृष्ट्या मागास आहेत. त्यांना नगरीसेवा, संरक्षण, उद्योगात नौकऱ्या नाहीत. ९० टक्के मुस्लीम स्त्रीया आणि ७० टक्के मुस्लीम निरक्षर आहेत. त्यांचे नौकरीत १.५ टक्के प्रमाण आहे. प्रामुख्याने कमी उत्पन्न, वेतन असलेले व्यवसाय करतात. शैक्षणिक गुणवत्तेआभावी स्पर्धा करु शकत नाहीत. गुन्हेगारी, तस्करीत गुंतलेले असतात.
- मुस्लीमाचा सेक्युलॅरिझमवर विश्वास नाही. प्रथम मुस्लीम समजतात नंतर भारतीय समजतात. कुटूंब नियोजन करित नाहीत. पाकिस्थानचे, मुस्लीम राष्ट्राचे समर्थक आहेत. बुद्धीनिष्ठ विचारांचा अभाव आहे. इस्लामी कायदे कानुचा आग्रह धरतात देशाशी एकनिष्ठ नाहीत. भारताचे घटक न मानता आंतरराष्ट्रीय मुस्लीम समुदायाचे घटक मानतात. काश्मीर पाकिस्थानचा भाग समजतात. तेथे हिंदुवर अत्याचार करतात. काश्मिरमध्ये हिंदु १५ टक्क होते. १९९१ ला १ टक्के राहिले मुस्लीम १९८१ ला ८३ टक्के हरेते, १९९२ मध्ये ९७ टक्के झाले. कारण हिंदुना स्थलांतराची सक्ती करतात. मुस्लीम वंदेमातरमला विरोध करतात. जेथे मुस्लीम बहूल आहेत तेथे शुक्रवारी सुट्टीचा आग्रह धरतात. सक्तीने धर्मांतर घडवून आणतात.
- भुस्लीम राजकीय प्रभावी दबाव गट आहे. त्यांच्या तक्रारी नोकरीत, प्रतिनिधीत्व नाही. जगातील सर्वाधिक मुस्लीम भारतात आहेत. त्यांची संख्या १२ कोटी आहे. ऐतिहासिक स्थितीतून त्यांच्या समस्या निर्माण झाल्या त्यांच्या कायदा, सुरक्षितता शिक्षण, कल्याण, आरोग्य सार्वजनिक सेवा ॠहण, न्याय, परवाने समस्या आहेत. त्याचे ३ ते ५ टक्के नोकरीत प्रतिनिधीत्व आहे. कारण स्पर्धेचा अभाव डॉक्टर केवळ २ टक्के आहेत. त्यांना वाटते की आमच्या बाबत भेदभाव केला जातो. त्यामुळे आक्रमक दहशातवादी होत आहेत.
- जातीय हिंसाचार, दंगलीत मुस्लिमाची प्राणहानी, वित्तहानी होते त्यांना •वाटते पोलिस, प्रशासकीय यंत्रणा मुस्लीमाच्या विरोधात आहेत.
- मुस्लिमात आश्रफ, अजलत श्रेणी आहेत. व्यवसाय, राजकीय सत्ताधारावर उच्चवर्ग, मध्यम, कनिष्ठ, मध्यम व कनिष्ठ वर्ग आहेत. मुस्लिम, भाषिक प्रादेशीक वशिक, सांस्कृतिक दृष्टया विखुरले आहेत. जम्मू काश्मीरात ६६ टक्के, आसाम मध्ये २५ टक्के, बंगाल, केरळात २० टक्के, युपीमध्ये १५ टक्के, ३५६ जिल्ह्यापैकी ९ जिल्हात बहुसंख्य १९ जिल्हयात २५ ते ५० टक्के, २९ जिल्ह्यात २० टक्के आहेत.
- मुस्लिम धार्मिक समुदाय आहे. त्यांचे राजकारण सांप्रदायीक आहे. तसेच त्याचा उर्दु भाषेचा आग्रह आहे. परंतू प्रत्येक राज्यात मुस्लिम प्रादेशिक भाषिक आहेत. त्यांचा बहुसंख्यकाचा राष्ट्रीय जीवनात कृतीशील सहभाग नाही. ते धर्म आणि राजकारण एकच समजतात.
- हिंदूंच्या मुस्लिमांविरुद्ध तक्रारी :
- मुस्लिम देशाशी एकनिष्ठ नाहीत. अल्पसंख्य असून बहूसंख्य होण्याचा प्रयत्न करतात.
- मुस्लिम भारताच्या विभाजनास जबाबदार आहेत.
- कुटुंब नियोजन करीत नाहीत. बहुपत्नित्व प्रजननानी लोकसंख्या वाढवितात.
- त्यांची भारतापेक्षा मुस्लिम राष्ट्रावर निष्ठा आहे.
- अल्पसंख्य असून बहुसंख्यांकावर दबाव आणतात.
- मुस्लिम क्रूर, धर्मवेडे, असहिष्णू आहेत आणि हिंदू विरोधी आहेत.
- त्यांच्या दुहेरी निष्ठा आहेत.
मुस्लिमांचा समान नागरी कायद्यास विरोध आहे. कुराण, शरियत उलेमा आणि वैयक्तिक मुस्लिम कायद्याचे समर्थन करतात. उलेमा व वैयक्तीक कायदा बदलास विरोध करतात. कुराण सुन्नत आधारावर कायद्याचा आग्रह धरतात. हे कायदे धर्माचा भाग समजतात. हे कायदे बदलले तर मुलभूत हक्काचे उल्लंघन समजतात. परंतू मुस्लिम देशांत कायद्यात बदल केले आहेत. मुस्लिमांत भय का निमार्ण झाले? कारण जनसंघ, भाजप, आर.एस.एस. विहिंप हिंदू राज्याचे समर्थन करतात. हिंदूत्व राष्ट्रीयत्व समजल्याने मुस्लिम अराष्ट्रीय ठरतात. जमाते इस्लामी मुस्लिम लीगमध्ये जातात. बाबरी मशीद प्रकरणाने अधिक विचलीत इ आले. देवरस, गोवळक, सावरकर, दिन दयाल उपाध्याय यांच्या हिंदूत्व संकल्पनेने मानसिक भयगंडाने पछाडले.
मुल्सिमाचे एकच स्थान कब्रस्थान नाही तर पाकिस्तान, दुध मांगो खीर देंगे काश्मिर मांगो भून देंगे या भूमिकेने त्यांना असुरक्षित वाटते. त्यांना राष्ट्रनिष्ठा नाहीत समजतात. हिंदू राष्ट्र कल्पनेच्या भयगंडाने ते पछाडले आहेत.तर मुस्लिमांच्या तक्रारी आयोध्या शिलान्यास केला. मुस्लिमांचा व्होट बँक म्हणून वापर केला जातो. मुस्लिमांचा इतिहास विकृतपणे शिकविला जातो. बहूसंख्य समाज सुख शांतीने जगू देत नाही. पाठ्य पुस्तकाम हिंदू पुराण कथा, देव देवतांचे चित्रण आहे.
शाळेत मुस्लिम मुलांवर संस्कृत लादली जाते. त्यांना भारतीय समजले जाते. त्यांना असतान वागणूक दिली जाते. मुलतत्ववादी समजले जाते. परस्परांबाबत गैर समजूवीचे प्रश्न निर्माण झाले आहेत. परंतु सत्य आहे मुस्लिम बहुसंख्य तेथे जातीय तणाव होतो. सीमावर्ती भागातून भारतात लांतर होते. ते राजकीय पक्ष मुस्लिमांच्या मतासाठी समान नागरी कायदा करू शकत नाहीत. हजला कन्सेशन देतात. तसेच मुस्लिमाने इतर समाजाशी समायोजन केले नाही. बहुसंख्य मुस्लिम असणारे हिंदूंवर अत्याचार करतात. उदा.- मालेगाव, भिवंडी. मुस्लिम स्त्रिया पडदा पाळतात. सुधारणास विरोध केल्याने गल्फ देशातील पैशामुळे बहुसंख्य होण्याची हिंदूंना भीती वाटते. तसेच त्यांचे राजकीय अभिजन त्यांना माथेफीरू बनवितात.
- खिश्चन अल्पसंख्य
- 1)भारतात पंधराशे वर्षापूर्वी सिरीयन खिश्चन भारतात आले. हिंदू खिश्चनात सांस्कृतिक भेद आहेत. त्यांचा जीवनविषयक दृष्टिकोण वेगळा आहे. हिंदू ख्रिश्चनांचे सण, श्रद्धा, पुजा, विधी वेगळे आहेत. सांस्कृतिक मीन्नता आहे. त्यांचे सामाजिक संगठन, गट, मृताचे विधी वेगळे आहेत. खिश्चन चर्चमध्ये उपासना करतात. त्यांच्या गटात वृध-वर निवड करतात. ख्रिश्चन हिंदूचे प्राथमिक संबंध नाहीत. दोघांत विवाहाअभावी संमेलन होत नाही. भारता २.६० टक्के ख्रिश्चन आहेत. त्यापैकी ६० टक्के दक्षिण भारतात आहेत. नागालॅण्ड, मिझोराममध्ये ख्रिश्चन बहूसंख्य आहेत. केरळ, गोवा, मणिपुर, मेघालयात ३३ टक्के आहेत.
- त्यांना धार्मिक दडपणाखाली रहावे लागते.
- आदिवासी खिश्चनात वांशिक भेद आहेत.
- ख्रिश्चन दक्षिणेत सुस्थिर झालेत परंतू उत्तरेत त्यांना विदेशी समजले जाते.
- दलित वर्गातील लोक ख्रिश्चन झाले.
- ख्रिश्चन विदेशी मिशनरींशी संबंधीत आहेत.
- चिश्चनाच्या मुस्लिमाप्रमाणे वंदे मातरम, रामराज्य चळवळीस विरोध आहे.
- खिश्चनाच्या धार्मिक मिशनरी कार्याची समस्या आहे. सक्तीने धर्मातर करतात हा आरोप केला जातो. तसेच अलिकडे चर्चवर हल्ले करणे वाढले आहे. खिश्चन मिशनरी विरुद्ध अनेक आंदोलने झाली. विशेषतः आदिवासींचे मागास लोकांचे आमीष दाखवून धर्मातर करतात इ. आरोप असून सुद्धा
२) खिश्चन राजकीय पक्षाचा विचार करीत नाहीत.
३) धर्म व राजकारण वेगळे समजतात. भारतात ४०० मिशनरी ७०७२ शाळा, ११४ कॉलेज, ११३ तांत्रिक संस्था, ७४ प्रशिक्षण कॉलेज, १८३ तांत्रिक शाळा, विश्वनाच्या आहेत. त्यात २.५ दशलक्ष लाभ घेतात.
ह्या व्यतिरिक्त बौद्ध, जैन, शिख अल्पसंख्य आहेत. त्यांनी भारतीय जीवनात समायोजन केले. अलिकडे शिख समुदायाने फुटीरवादी चळवळ पंजाबी सुभा, खलिस्तानची मागणी केली. दहशतवाद माजविला. अकाली दल स्वतंत्र खलिस्तानचे समर्थन करतो त्यामागे पाकिस्तानचा हात होता. इतर अल्पसंख्य दलित व आदिवासी :
घटनेत मागास जाती जमातीस आरक्षणाची तरतूद तसेच अल्पसंख्यांकाच्या रक्षणाची तरतूद केली आहे. शिखांची संख्या २.९ टक्के आहे. जैन, बौद्ध, शीख •मुर्तिपूजक नाहीत. हिंदूचे सण साजरे करतात. कर्मावर श्रद्धा ठेवतात. शीख गुरु आणि ग्रंथ साहेबावर श्रद्धा ठेवतात. शीख, बौद्ध व जैन, पारशी यांनी हिंदूंशी आत्मसात्मीकरण केले आहे. शीख हिंदूची जवळीकता आहे. बौद्ध, शीख, जैन, पारशी आणि हिंदूंधी जवळीकता आहे. परंतू हे धर्म गो पूजक नाहीत. अनुसुचित जाती १४.६० टक्के अनुसुचित जमाती ६.९४ टक्के, इतर धर्मिय १७.८ टक्के आहेत. काश्मिर लक्षद्विप वगळता भारतात सर्वत्र हिंदू आहेत. त्यांची संख्या ६१.२२ टक्के आहे. जातीस प्रादेशिक आधार असून प्रत्येक जातीच्या रुढी, विवाह, मृत्यु संस्कार वेगळे आहेत. जात आणि संप्पतीचा संबंध आहे. शीख धर्माची मूळे भारतीय आहेत. लिपी गुरुमुखी असून भाषा पंजाबी आहे. इस्लाम विरोधी संघटीत पंथ म्हणून शीख धर्माचा उदय झाला. गुरुद्वारा प्रबंधक समिती ही धार्मिक संघटना तर शिरोमणी आकाली दल हा राजकीय पक्ष आहे. इंग्रजांनी शिखांत अल्पसंख्यकाची जाणीव करून दिली. त्यामुळे त्यांनी स्वतंत्र पंजाबी सुभ्याची मागणी केली. १९८० पासून खलिस्तानवादी चळवळ भिद्रनवाले व जगजित चौहाण यांनी सुरु केली. अनेक अतिरेकी कारवाया केल्या.
भारतातील अल्पसंख्य आणि बहुसंख्यकातील संबंध :
सम्मीलन विविधतेतून एकात्मता, सत्तासंबंध आणि मुल्य व्यवस्थेच्या आधारा स्पष्ट करता येतात.
- अल्पसंख्य गटाने बहुसंख्य (प्रभावी) गटाशी सौख्याचे संबंध ठेवणे बहुसंख्यकांच्या संस्कृतीचे आत्मसात्मीकरण करणे.
- बहुविधता टिकविणे अल्पसंख्यकांना राजकीय प्रतिनिधीत्व देणे, संस्कृती जपणे आणि अस्मिता मान्य करणे.
- वैधानिक गटाने उच्च दर्जा देणे.
- वैधानिक संरक्षण देणे.
प्रत्यक्षात अल्पसंख्य बहुसंख्यकाशी सौख्याचे संबंध ठेवत नाहीत. राजकीय स्वातंत्र्याची मागणी करतात. स्वनिर्णयाचा अधिकार मागतात. बहुसंख्यकावर प्रभाव ठाकतात. आक्रमक होतात. त्यांना बहुसंख्यकाची भीती वाटते. अल्पसंख्यकास बहुसंख्यकाबाबत शुत्रूत्वाची भावना आहे. कारण बहुसंख्य अल्पसंख्य स्त्रियांचे लैंगिक शोषण करतात. प्रभावी गटाचा आर्थिक, सामाजिक, राजकीय दर्जा नाकारुन त्यांच्या शोषणातून मुक्तता करतात. अल्पसंख्यकाचे अधिकार सुरक्षित रहावे म्हणून भारतीय राज्यघटनेतील तरतूदी:
नागरिकांच्या मुलभूत हक्काबरोबर भारतीय राज्य घटनेत अल्पसंख्यकास विशिष्ट धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अधिकार दिले आहेत. त्याचा उद्देश बहुसंख्यकाने अल्पसंख्यकाच्या धार्मिक, सांस्कृतिक, भाषिक वेगळेपणावर आक्रमण करू नये म्हणून शासकिय शैक्षणिक स्तरावर यांच्या जागा आरक्षित ठेवल्या. त्याचा उद्देश अल्पसंख्यकाच्या भाषा, लिपी, धर्म, संस्कृतिचे जतन करणे आहे. धार्मिक अल्पसंख्यकास धार्मिक आचरणाचे स्वातंत्र्य दिले. धर्माधारावर भेदाभेद केला जाणार नाही. सामाजिक, आर्थिक न्याय तत्वाने समाजातील इतर घटकाबरोबर दुर्बल घटकांनी यावे त्यादृष्टीने अनुसुचित जाती-जमाती, अॅग्लोइंडियन, सामाजिक, आर्थिक मागास आणि इतर अल्पसंख्यकासाठी घटनात्मक तरतुदी केल्या. द अँग्लोइंडियन यांना संसदेत व राज्यात प्रतिनिधीत्व दिले. तसेच आर्टीकल २९ अन्वये अल्पसंख्य मागासवर्गियास संरक्षण दिले जात, भाषा, धर्म, वंशाधारावर नोकरी, शिक्षण व सार्वजनिक ठिकाणी प्रवेश नाकारला जाणार नाही. त्यांना धर्माचरणाचे भाषांचे शिक्षणप्रसाराचे स्वातंत्र्य परंतू घटनात्मक संरक्षण देऊन सुद्ध हे गट समान पातळीवर आले नाहीत. सत्तेचे लाभ बहुसंख्यकांना मिळतात. अल्पसंख्य त्या लाभापासून वंचित राहतात. कारण त्यांच्या सवलती आरक्षणास विरोध आहे.
सारांश :
अल्पसंख्य ही संज्ञा स्पष्ट करणे अशक्य आहे. भारतीय राज्यघटनेत अल्पसंख्य गट मान्य केला पंरतू व्याख्या दिली नाही. अल्पसंख्यकाच्या सामाजिक, धार्मिक, आर्थिक, राजकीय, सांस्कृतिक, प्रादेशिक, भाषिक समस्या आहेत. त्या इतिहासातून अल्पसंख्यकात्वाने निर्माण झाल्या. त्यांच्या समस्यांचे अनेक आयाम आहेत. भारता मुस्लिम, शीख, खिश्चन, अॅग्लो इंडियन, पारसी, बौद्ध, जैन, जू अल्पसंख्य आहेत. इस्लाम, खिश्चन, पारशी विदेशी आहेत. बौद्ध, जैन, शीख, अॅग्लो इंडियन यांची मुले देशी आहेत. प्रामुख्याने खिश्चन, ईस्लाम या अल्पसंख्यकाबाबत बहुसंख्यकाच्या मनात भ्रम आहे. कारण ख्रिश्चन मुस्लिमांची संख्या वाढत आहे. तसेच सक्तीने धर्मातर घडवून आणतात. विदेशी पैशाच्या ओघामुळे गरिब, मागास जाती, आदिवासींचे धर्मांतर करतात. उलटपक्षी मुस्लिम खिश्चनांना येथील त्यांची सत्ता गेल्याने असुरक्षित वाटते. अल्पसंख्यकाची काही वैशिष्ट्ये आहेत. अल्पसंख्यकाच्या काही समस्याही आहेत. त्यांचे सामाजिक, आर्थिक, राजकीय शोषण केले जाते. म्हणून समाज प्रवाहापासून वेगळे होतात. अल्पसंख्यकात उच-निच, प्रादेशिक, वार्षिक, सांस्कृतिक भेद आहे. त्यांचे नेतृत्वच त्यांचे शोषण करते. तर बहुसंख्यकाचे नेतृत्व अल्पसंख्यकांना समान नागरि कायदा असणार नाही ही व्होट बँकेसाठी ग्वाही देतो. बहुसंख्यकाच्या राष्ट्रवाद, हिंदुत्ववाद, मातृभूमी यामुळे अल्पसंख्यकांना असुरक्षितता वाटते. तसेच सवलती नको त्यामुळे बहुसंख्यकावर अन्याय होतो. गुणवत्ता स्तर खालावतो. अपात्र असणाऱ्यास संघी मिळते. आरक्षणाने विषमता वाढते. अल्पसंख्यक अनुसुचित जाती-जमातीचे फाजील लाड केले जातात. ख्रिश्चन इस्लामचे जनन प्रमाण अधिक आहे. बहुविवाहाने लोकसंख्या वाढेल. एकिकडे अल्पसंख्यकास विरोध दुसरीकडे जाती-जमातीच्या आरक्षणास विरोध ह्या भावनेतून दलितांवर अत्याचार होतात. दलित, दलितेत्तर संघर्षातून मुख्य प्रवाहापासून दूर जातात. त्याकरिता बहुसंख्यकाने उदार व्हावे, अल्पसंख्यकाने सहनशील व्हावे.
प्रश्न ३: भटक्या जमातीच्या समस्या स्पष्ट करा.
(Causes & Problem of Nomadic Tribes ) भटक्या जमातीच्या समस्यांचा आढावा घ्या.
उत्तर :
प्रस्तावना :- ब्रिटिशांनी आपल्या वसाहतवादी हितसंबंधाचे रक्षण करण्यासाठी आदिवासी जमार्तीवर अन्याय होईल, असा गुन्हेगार जमाती कायदा केला होता. या कायद्यांतर्गत ३१३ जमातींची नोंद गुन्हेगार जमाती अशी शासकीय
कागदोपत्री करण्यात आली. ह्या ३१३ जमातीमध्ये भटक्या व अर्धमटक्या जमातींची संख्या अधिक आहे. परंतू भटक्या नसणाऱ्याही काही जमातींची नोंद गुन्हगार जमातींच्या यादीमध्ये ब्रिटिश शासकांनी जाणूनबुजून केली होती. जोपर्यंत शासन आपल्या गॅझेटमध्ये " ........ही जमात गुन्हेगार जमात नाही' असे पसिद्ध करीत नाही तो पर्यंत शासकीय कागदपत्रांमधील गुन्हेगार जमात अशी नोंद रद्द होऊ शकत नाही. सरकारी गॅझेटमध्ये प्रसिद्ध झाले की, त्या जमातीची 'विमुक्त जाती' अशी नोंद शासकीय कागदपत्रांमध्ये केली जाते. आतापर्यंत शासनाने १९८ जमातींची नावे सरकारी गॅझेटमध्ये जाहीर करून त्यांना विमुक्त जाती असा दर्जा दिला आहे.
२००८ नंतरच्या काळात संयुक्त राष्ट्र संघटनेने केलेल्या शिफारशीमुळे शासकीय कागदोपत्री असणारी गुन्हेगार जमात ही नोंद पूर्णपणे रद्द झालेली आहे. गावात कोठेही चोरी झाल्यानंतर किंवा दरवडा पडल्यानंतर आता पोलीसांचा ससेमिरा एकेकाळी गुन्हेगार जमात अशी नोंद असणाऱ्या जमातीच्या मागे लागू शकत नाही असे असले तरीही गुन्हेगार जमात या नोंदीशी निगडीत असणारे काही प्रश्न संपत वा संपले नाहीत. उदा. जो पर्यंत शासन गॅझेटमध्ये प्रसिद्ध करित नाही. तोपर्यंत त्या जमातीला विमुक्त जात असा दर्जा प्राप्त होत नाही. व आरक्षणाचे लाभ मिळू शकत नाही. गुन्हेगार जमात या नोंदीमुळे सुमारे १०० वर्ष अन्याय सहन करून ही 'विमुक्त जाती' असे प्रमाणपत्र मिळू न शकणाऱ्या जमातीची एकुन संख्या ३१३ १९८ = ११५ आहे. महाराष्ट्रात ११५ भटक्या व अर्धभटक्या जमाती आरक्षणाचे लाभ मिळण्यापासून वंचित झालेले आहेत. १. दर्जाचा प्रश्न :
"भटक्या जमाती" असा दर्जा प्राप्त होण्यापेक्षा अनुसूचीत जमाती असा दर्जा प्राप्त झाला, की, आरक्षणाचे सर्व प्रकारचे लाभ अधिक प्रमाणात पदरात पड़तात. यामुळे भटकी जमात अशी नोंद असणाऱ्या जमातीची आपल्याला अनुसूचीत जमात असा दर्जा शासनाकडून मिळावा अशी मागणी असते.
उदा. महाराष्ट्रात भटकी समात (NT) असणाऱ्या धनगर जमातिची त्यांना अनुसूचीत जमात (ST) असा दर्जा मिळावा. अशी अनेक वर्षापासूनची मागणी आहे. व्होट बँकेचे राजकारण करणारे पक्षनेते आणि सत्तारूढ शासनातील मंत्री भटक्या जमातीच्या ह्या मागणीला पाढ़ींबा दर्शवून त्यांना आपल्या मागे ओढण्याचा सातत्याने प्रयत्न करीत असतात, अशी स्थिती महाराष्ट्रात अनेक वर्षापासून सुरु आहे.
याशिवाय काही जाती व जमातींना आपल्याला अनुसुचीत दर्जा मिळवयास हवा होता. परंतू शासनाकडून तो मिळू शकला नाही आता किमान भटकी जमात असा दर्जा मिळून आरक्षणाचे लाभ मिळावे, असे त्यांना वाटत असते. यासाठी मोर्चे काढले जातात. आंदोलने ही सुरू असतात. उदा. नागपूर शहरात गोवारी लोकांनी काढलेल्या विशाल मोर्चात काही क्षुल्लक घटनामुळे पळापळ सुरू झाली. यामुळे उडालेल्या गोंधळात व चेंगराचेंगरीत १०० पेक्षा ही अधीक गोवारे स्त्री पुरुष मृत्युमुखी पडले या घटनेनंतर नागपूर शहरात गोवारी स्मारक उभे झाले. उड्डानपुलाला 'शहिद गोवारी उड्डानपूल' असे नावही मिळाले परंतू ST किंवा NT असा कोणताही दर्जा मिळाला नाही. दुसरे उदाहरण हलवा कोष्टी लोकांची आहे. महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या वा मान्यता दिलेल्या अनुसुचीत जमातीच्या यादीमध्ये हलबा हलबी अशी दोन नावे आहेत त्यांची संख्या १००० ही कमी आहेत. महाराष्ट्र शासनाच्या यादिमध्ये हलवा कोष्टी असे नाव असावयास हवे होते. परंतू कोष्टी हा शब्द त्या ठिकाणी नसणे ही एक प्रकारे तांत्रीक स्वरूपाची चूक आहे. ते तांत्रीक चूक दुरुस्त करून आपल्याला सर्व आरक्षणाचे लाभ मिळावेत. अशी 'हलवा कोष्टी' लोकांची मागणी आहे. महाराष्ट्रात गॉड गोवारींना ST मानले जाते. गोंड गोवारी फारच थोडे आहेत. गोवारी बाबतही अशीच तांत्रीक चुक घडली असे त्यांचे म्हणणे आहे. जात असा
महाराष्ट्रात गोवारी व हलवा यांच्या मागणया अद्यापही पूर्ण झाल्या नाहीत. गोवारी व हलवा कोष्टी लोक मान्यताप्राप्त आणि विश्वसनीय स्वरुपाचे पुरावे देऊन अनुसूचित जमात किंवा भटकी जमात असा दर्जा सिद्ध करु शकले नाही वा शकत नाही, असे या मागणीच्या संदर्भात शासनाचे म्हणणे आहे. हलवा कोष्टी व गोवारी ह्यांचा प्रश्न भिजत घोंगड्यासारखा पडला आहे. या प्रश्नावरही २५-३० वर्षांपासून मतांचे राजकारण सुरु आहेत. महाराष्ट्रात आरक्षणाचे लाभ मदरात पाडून घेण्यासाठी विमुक्त जाती. अर्धभटक्या व भटक्या जमातींची एक संघटनाही स्थापन झालेली आहे. या तीनही प्रकारच्या लोकांची एकूण संख्या महाराष्ट्रात ६० लाखांपेक्षाही जास्त आहे, असा या संघटनेचा दावा आहे. ६० ख ही संख्या वर्षानुवर्षे व्होट बँकेचे राजकारण करण्यास पुरेशी आहे, हे महाराष्ट्रातील सामाजिक वास्तव आहे. विमुक्त जाती आणि भटक्या जमातींचे प्रश्न हा २०-२५ वर्षापासून महाराष्ट्रातील आदिवासींचा एक महत्त्वपूर्ण प्रश्न झाला आहे.
- आरोग्यविषयक प्रश्न :
महाराष्ट्रासारख्या विकासाबाबत प्रगतिशील असणाऱ्या राज्यात आदिवासींचे आरोग्यविषयक प्रश्नही गंभीर स्वरुपाचे आहेत. वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी केलेल्या सर्वेक्षणातून मोठ्या संख्येने आदिवासी हे लाल रक्तपेशींचे प्रमाण कमी असणे, सिकलसेल यासारख्या आनुवंशिकतेतून येणाऱ्या आजारांचे शिकार झालेले दिसून आले. गडचिरोली जिल्ह्यात सेवाभावी कार्य करणाऱ्या डॉ. राणी अभय बंग यांना अंगावरचे आजार काढणाऱ्या आदिवासी स्त्रियांची संख्या मोठी असल्याचे दिसून आले. दूषित पाणी हे आदिवासी मुलांच्या आणि विविध प्रकारच्या साथीच्या रोगांचे कारण असल्याचे तज्ज्ञ अभ्यासकांना सर्वेक्षणात आढळून आले आहे. आहारात जीवनसत्त्वाच्या उणिवेतून निर्माण होणाऱ्या व उद्भवणाऱ्या रोगांची संख्या आदिवासींमध्ये अधिक आहे.
कुपोषणाचे शिकार झालेल्या लहान मुलांची संख्या कोरकू जमातीत अधिक आहे. कोरकू मुलांच्या आरोग्यविषयक प्रश्नाला एक सामाजिक सांस्कृतिक पैलूही आहे. तो म्हणजे कोरकुंमध्ये वयाच्या १४ व्या किंवा १५ व्या वर्षी विवाह होतो. त्यानंतर लगेच मुले होऊ लागतात. मुलीच्या शरीराची पुरेशी वाढ झालेली नसते. तसेच गरीबीमुळे ती स्वतःही कुपोषित असतात. तसेच पहिले मुल झाल्या नंतर एक वर्ष किंवा १० महिन्यानेच दुसरे मूल अशी लागोपाठ चार किंवा पाच मुले होतात. साधारणतः प्रत्येक कुटुंबात चार ते सात मुले असल्याचे दिसून येते. ही मुले जन्मतःच कुपोषित असतात. त्यांना मातेचे दुध तसेच बाहेरचा सकस आहार मिळू शकत नाही. म्हणून कुपोषित आणि बालमृत्यू यांचे प्रमाण वाढते. प्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे मुलांची प्रकृती लवकर विधडते. अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे पालक त्यांना दवाखान्यात न नेता भूमका म्हणजे भगताकडे घेऊन जातात आणि देवपूजा, नक्स किंवा जादुटोणा ह्यांचेच इलाज करतात. अगदी शेवटी डॉक्टरकडे नेतात. यातच मूल दगावते. मेळघाटमधील सर्वेक्षणातून हीच वस्तूस्थिती निदर्शनास आली आहे. दुर्गम भागातील आदिवासींपर्यंत आरोग्यविषयक सोयी पुरेशा प्रमाणात पोहचू शकल्या नाहीत.
- शिक्षणविषयक समस्या :
महाराष्ट्रातील आदिवासींमध्ये शिक्षणाचे प्रमाण कमी आहे. भिल्ल या सर्वात मोठ्या आकाराच्या आदिवासी जमातीत साक्षरता दर सर्वात कमी म्हणजे ४१.९ आहे तर सर्वात जास्त साक्षरता दर म्हणजे ६५.८ महादेव कोळी जमातीत आहे. उच्च शिक्षणाचे प्रमाण कमी असून पदवीधरांची संख्या एक टक्क्यापेक्षाही कमी असणाऱ्या जमातींची संख्या अधिक आहे. शासनातील पदासाठी आवश्यक असणाऱ्या पात्रताविषय अटींची पूर्ती करणारे उमेदवार अनुसूचित जमातीत मिळत नाही. यामुळे आरक्षित असूनही ती पदे योग्य उमेदवार मिळेपर्यंत तशीच रिक्त राहतात.
आश्रमशाळांच्या संख्येत बरीच वाढ झाल्यामुळे गेल्या दशकात साक्षरता दरात सुमारे २० टक्के वाढ झाल्याचे दिसते. तथापि आदिवासी मुला-मुलींचे शिक्षणातील गळतीचे प्रमाण सर्वात जास्त आहे. आश्रमशाळांचे शालांत परिक्षेचे निकाल असमाधानकारक आहे. शासकीय अनुदानप्राप्त आश्रमशाळांमधील आर्थिक गैरव्यवहार मोठ्या प्रमाणावर उजेडात येऊ लागले आहेत. यामुळे आश्रमशाळांची संख्या वाढली असली तरी त्या आदिवासी मुला-मुलींमध्ये शिक्षण घेण्याची आवड निर्माण करण्यात अपयशी ठरल्या आहेत, असे शिक्षण तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
आदिवासी मुला-मुलींना त्यांच्या मातृभाषेतून किमान प्राथमिक शिक्षण देण्याची सोय नाही. दुर्गम भागात प्राथमिक शाळा कमी आहेत. विशेषतः एकशिक्षकी शाळांची संख्या अधिक आहे. अशा शाळांमध्ये शिक्षकांच्या नियुक्त्या लवकर होत नाही. परगावावरुन केवळ नोकरीसाठी त्या गावात येणारे शिक्षक नियमितपणे शाळेत येत नाहीत. आदिवासी गावात मुला-मुलींची शाळेतील उपस्थिती नियमित नसते. लहान बहीण-भावंडांचा सांभाळ करणे, इंधनासाठी लाकूडफाटा गोळा करणे, पाणी भरणे यासारख्या कामांची जबाबदारी मुला मुलींवर असते. यामुळे शिकणाच्या वयात ते शिक्षणाची संधी मिळण्यापासून वंचित राहतात. आजच्या स्पर्धायुक्त जगातील जीवनसंघर्षाला तोंड देण्यासाठी औपचारीक शिक्षणाची काही गरज आहे. याबाबत अद्यापही आदिवासी पालक फारसे जागृत झालेले नाहीत. यामुळे आदिवासी मुला-मुलींच्या शैक्षणिक विकासाचा आलेख फारसा उंचावत नाही.
- आयोग्य प्रथांचा प्रभाव :
आदिवासींच्या जीवनावर अद्यापही कालविसंगत झालेल्या काही प्रथा प्रभाव आहे. उदा. १४-१५ व्या वर्षीच आदिवासी मुलींचे विवाह होतात. कमी वयात विवाह ही कोरकू जमातीपुरती मर्यादित समस्या नाही, तर ही अनेक जमातींशी निगडीत समस्या आहे, असे सर्वेक्षणात टाटा विज्ञान संस्थेलाही आढळून आले आहे. शरीराची वाढ पूर्ण झालेली नसताना बाळांतपणे लादली जातात. बालवयातील विवाहाच्या प्रथेमुळे आदिवासी महिलांच्या आरोग्यविषयक प्रश्नांमध्ये वाढ झालेली आहे. मद्यपान करण्याचे प्रमाण आदिवासी जमातीतील पुरुषांमध्ये बरेच वाढले आहे. घरातील पुरुषाच्या दारु पिण्याचा सर्वाधिक त्रास त्याच घरातील स्त्रियांना सहन करावा लागतो. यामुळे दारु विक्रीची दुकाने बंद करणे, दारुला गावबंदी करणे याबावत आदिवासी स्त्रिया पुढाकार घेऊ लागल्या असल्याचे दृश्य गडचिरोली जिल्ह्यात दिसू लागले आहे. तथापि आदिवासी • क्षेत्रात दारुबंदीच्या चळवळीने अद्यापही जोर धरला नाही. सणवार व उत्सवाच्या निमित्याने संपूर्ण कुटुंबाने मद्यपान करण्यात सहभागी होण्याच्या प्रथेचे निष्ठेने पालन करण्यात धन्यता वाटणाऱ्या आदिवासींची संख्या नाममात्रही कमी झालेली नाही. नवस बोलणे व तो फेडणे, देवदेवतांना प्रसन्न करुन घेण्यासाठी पशूंचे बळी देणे, जादूटोणा करणाऱ्या मांत्रिकाच्या नादी लागणे ही आदिवासी जीवनपद्धती काही लक्षणे अद्यापही फारशी कमी झालेली नाही.
- जमिनीची परात्मता
जमिनीवरचे आदिवासींचे मालकीहक्क हिरावून त्यांना जमिनीपासून परात्म करण्याचे प्रकार देशातील अन्य भागांप्रमाणे महाराष्ट्रातही घडत आहेत. धुळे जिल्ह्यात सर्वोदयी कार्यकर्त्यांनी आदिवासींना संघटित करुन लढा दिल्यामुळे महाराष्ट्र शासनाला आदिवासींच्या जमिनीच्या हस्तांतरणावर प्रतिबंध लावणारा कायदा १९७५ मध्ये करावा लागला. जंगलामध्ये मोकळ्या असणाऱ्या जमिनीवर आदिवासी शेती करतात. परंतु शासकीय नियमाप्रमाणे आदिवासींनी ते जंगलाच्या जमिनीवर केलेले अतिक्रण असते. नियमानुसार या अतिक्रमणाविरुद्धच्या शासकीय कार्यवाहीचा ससेमिरा आदिवासींमागे सुरु होतो. त्याचा मुकाबला करण्यात किंवा त्याला चुकविण्यात आदिवासींची शक्ती, पैसा व वेळ खर्च होतो. अतिक्रमित वनशेतीसाठी जमीनपट्टे त्यांना देण्याचे अश्वासन त्यांना शासनातर्फे दिलेही जाते. परंतु त्या आश्वासनाची प्रत्यक्ष व्यवहारपूर्ती करताना शासनालाही एका नियमाचा सामना करावा लागतो. तो नियम म्हणजे झुडपी जंगलाचा नियम होय.
भारतात जंगलांचे क्षेत्र झपाट्याने कमी होत असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या जंगलाखाली असणारी जमीन जंगलामधून मुक्त करण्यासंबंधीचे नियम अत्यंत कठोरपणे अमलात आणले जातात. विविध प्रकारची तपासणी पूर्ण झाल्यानंतरच वनक्षेत्राखाली असणारी जमीन मुक्त करण्यास अनुमती केवळ अपवादात्मक स्थितीतच केंद्र शासनाकडून दिली जाते. ही प्रक्रिया पूर्ण होण्यास बराच दिर्घकाळ लागतो. महाराष्ट्रात झुडपी जंगले मोठ्या प्रमाणावर आहेत. यामुळे झुडपी जंगलातील जमिनीचे पट्टे आदिवासींना देण्यात विभिन्न प्रकारच्या अडचणींचा सामना महाराष्ट्र शासनाला करावा लागतो. वनशेतीचे पट्टे कोलाम आदिवासींना देण्याचा प्रश्न अनेक वर्षापासून भिजत घोंगड्यासारखा पडला आहे. कोलामांसारखी स्थिती झूडपी जंगलाच्या परिघात राहणाऱ्या अन्य आदिवासी जमातींचीही आहे. झुडपी जंगले हा विकासाच्या प्रक्रियेतील एक मोठा अडसर असल्याचे महाराष्ट्रात म्हटले जाते.
- कृषीक्षेत्रावरील भार कमी करण्याची समस्या :
२००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रात सुमारे ५० टक्के आदिवासी भूमिहीन शेतमजूर आहेत. ३० टक्के आदिवासी अल्पभूधारक आहेत. अन्य व्यवसाय या वर्गात केवळ १७ टक्के आदिवासी येतात. आदिवासी वगळून उर्वरित भारतीय लोकसंख्येत भूमिहीन शेतमजूरांचे शेकडा प्रमाण कमी आहे आणि अन्य व्यवसाय गुंतलेल्या लोकांचे शेकडा प्रमाण जास्त आहे. याचा अर्थ शेतीवर आदिवासींचा भार अधिक आहे असा होतो. हा भार कमी झाल्याशिवाय आदिवासींमधील दारिद्र्याचे प्रमाण कमी होऊ शकत नाही हे निश्चित. आदिवासी वस्त्या दुर्गम भागात आहेत. महाराष्ट्रात अद्यापही दळणवळणाच्या साधनांचा पुरेसा विकास झालेला नाही. उद्योग व्यवसायांच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या मूलभूत सेवा सुविधा आदिवासींची वस्ती असणाऱ्या भागात नाहीत. यामुळे येथे उद्योग व्यवसायांचा विकासच होत नाही वा उद्योग व्यवसायाच्या विकासाची गती अत्यंत मंद आहे. आदिवासींमध्ये शिक्षणाचे प्रमाणही उंचावत नाही. केवळ नावापुरते साक्षर असणाऱ्या आदिवासींची संख्या जास्त आहे. शारिरिक श्रमाव्यतिरिक्त तांत्रिक कौशल्यावर आधारित व्यवसायात रोजगाराच्या संघी मिळू शकत नाही. यामुळे १९५१ पासून विकासाची प्रक्रिया आदिवासी क्षेत्रात सुरु झालेली असूनही आदिवासी समाजात शेतीवरील भार कमी झालेला नाही. तसेच त्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या राहणीमानाच्या दर्जातही फारशी सुधारणा झालेली नाही.
याशिवाय दारिद्र्य, आर्थिक शोषण, कर्जबाजारीपणा, बोलभाषा व लिपीच्या संरक्षणाची सम शेतीविषयक प्रश्न आणि नक्षलवादी चळवळीतून निर्माण झालेल्या दहशतवादाला तोंड देण्याचा प्रश्न या सर्व समस्यांना महाराष्ट्रतील आदिवासी लोक तोड देत आहेत. उदा. गडचिरोली जिल्ह्यात गैरआदिवासीप्रमाणेच प्रामुख्याने नागरी भागात राहणाऱ्या आदिवासी लोकांकडूनही नक्षलवादी चळवळीचे कार्येकर्ते जोरजबरदस्तीने खंडणी वसूल करतात. ह्या सर्व समस्यांची व प्रश्नांची सविस्तर चर्चा आपण या पूर्वीच्या भागात केलेली आहे.
अशा प्रकारे भटक्या जमातींच्या समस्या सांगता येतात.
प्रश्न ४ :- अंधश्रद्धेची कारणे सांगून अंधश्रद्धा रोखण्यासाठीचे उपाय स्पष्ट करा. (Problems of Superstitions- Causes & Remedies)
किंवा
अंधश्रद्धेची कारणमिमांसा करुन त्यावरील उपाय योजनेचा आढावा घ्या.
उत्तर :
प्रस्तावना :- माणसे अंधश्रद्धेला बळी पडतात कारण त्यांनी हरघडी अधार शोधावा असेच सामाजिक वास्तव आहे. स्वतःच्या आगतिकतेतून, शोषणातून, अस्थिरतेतून मनाला प्रासंगिक दिलासा देण्यासाठी अंधश्रद्धेचा भ्रामक पण हवाहवासा वाटणारा आधार माणसे घेणारच. परिस्थिती बदलली, आधार शोधण्याची गरज संपली वा कमी झाली की आपोआप अंधश्रद्धा कमी होतील हा नेहमी केला जाणारा युक्तिवाद तर्कशुद्ध वाटला तरी प्रत्यक्षात चित्र वेगळेच असते. आपल्या अडीअडचणीच्या काळात अंधश्रद्धेला मानवी मन कवटाळते हे खरेच, पण त्याबरोबरच आपल्या अमर्याद हव्यासाची भूक भागवण्यासाठीही अंधश्रद्धांची पाठराखण होत असते. त्यामुळे हा कधी न संपणारा खेळ बनतो. आपणाला जे हवे आहे ते मिळण्याची शक्यता, अशक्यता वा इष्टनिष्टता याचा डोळस विचार तर केला जात नाहीच, परंतु त्यासाठी बाबांचे आशीर्वाद, महाराजांची अंगठी, मांत्रिकाचे मंत्रतंत्र, शुभमुहूर्त, जप, अनुष्ठाने, यज्ञयाग या कार्यकारणभावाला संपूर्ण सुट्टी देऊन करावयाच्या उपाययोजनांचा फोलपणाही त्यांना जाणवत नाही. याचे खरे कारण हेच की या सगळ्यांमध्ये काडीचाही तथ्यांश नाही, अशी परखड सत्य वैज्ञानिक जाणीव कधी निर्माण झालेलीच नसते. या उलट असेल बाबा काहीतरी आपल्याला न समजणारे अशीच मानसिकता तयार केलेली असते. जोपासली जाते. वैज्ञानिक जाणिवांचा सगळा इतिहास हा हे न समजलेले समजून घेण्याचा प्रवास आहे.
अंधश्रद्धेचा अर्थ :
जी गोष्ट वादातीतपणे मूर्खपणाची असते, जीला कार्यकारण भाव आजीवात नसतो तीला अंधश्रद्धा म्हणता येते.
अंधश्रद्धेची कारणे :
- अज्ञान :- भारतीय समाजातील व्यक्ती हा अज्ञानी आहे. अज्ञानामुळे तो अंधश्रद्धांना बळी पडतो. परंपरेने चालत आलेल्या गोष्टी करण्यात तो धन्यता मानतो. विचारांच्या कसोटीवर एखादी गोष्ट तपासून घ्यावी असे त्याला वाटतच नाही कारण तो ज्ञानी नाही. त्याच्या अज्ञानामुळे त्याला कधी देवाच्या नावाने तर कधी पाप-पुण्याच्या मितीने अंधश्रद्ध बनविले जाते. शिक्षणाचा अभाव असल्यामुळे अंधश्रद्धा अधिकच बोकाळली आहे.
- सुख प्राप्तीची अभिलाषा: माणसाला दैनंदिन जीवनात सुख आणि आनंद मिळावा असे सातत्याने वाटते. तो मिळविण्यासाठी तो विविध मार्ग चोखाळत असतो. सुख जास्तीत जास्त मिळावे आणि ते कमी वेळात मिळावे यासाठी तो अंवश्रद्धेचा बळी ठरतो. देवपूजा, यज्ञ, करणी भानामती, नवस या दुष्टचक्राल तो अडकत जातो. व्यक्तीची अतिरेकी सुख प्राप्तीची अभिलाषा ही देखील अंधश्रद्धा निर्माण होण्याचे एक कारण आहे.
- वैज्ञानिक दृष्टीकोनाचा अभाव :- प्रत्येक कार्याला कारण असते त्यामुळे कार्यकारणभावाच्या कसोटीवर प्रत्येक गोष्ट तपासून घेतली पाहिजे. असा वैज्ञानिक दृष्टीकोन भारतीयात क्वचितच दिसतो. अंधपणे प्रत्येक गोष्टींवर विश्वास ठेवून अंधश्रद्धेला चालना देण्याचा प्रताप शिकलेली माणसेही करतान दिसून येतात. वैज्ञानिक दृष्टीकोन बाळगुण कर्मकांडातील फोलपणा ओळखण्याचा प्रयत्नही माणूस ज्यावेळ करत नाही. तेव्हा अंधश्रद्धा अधिकच वाढत जाते.
- पुराणमतवाद: भारतीय समाज पुराणमतवादी असून भाकड कथा आणि चमत्कारावर तो डोळे झाकूण विश्वास ठेवतो. परंपरेने चालत आले आहे या नावाखाली तो बऱ्याच अंधश्रद्धा आजही जोपासताना दिसून येतो. पुराणमतवादी मानसिकतेमुळे दिवसेंदिवस अंधश्रद्धा वाढतच चालल्या आहेत.
- मानसिक भीती :- प्राचीन काळातला माणूस निसर्गातील विदिव घटनांमुळे भयभीत होत असे. यातून त्याने अनेक देवता निर्माण केल्या. विविध अतार्किक गोष्टी निर्माण केल्या. आजचा आधुनिक काळातील माणूसही स्वतःला मानसिकदृष्ट्या असुरक्षित समजतो. आपल्याला मानसिक सुरक्षितता मिळावी व आपण भीतीमुक्त जीवन जगावे यासाठी तो बुद्धीला न पटणाऱ्याही गोष्टी करत राहतो आणि यातूनच अंधश्रद्धा निर्माण होतात. मानसिक भीतीने ग्रस्त असलेला माणूस तार्किकतेने विचार करतच नाही.
- चिकीत्सा न करण्याचा नियम :- एक शब्दप्रामाण्य. दोन गंथप्रामाण्य तीन व्यक्ती स्वतः श्रद्धेची चिकित्सा करत नाही आणि इतरांनी श्रद्धेची चिकित्सा केलेली तिला चालत नाही. शब्दप्रामाण्य याचा अर्थ असा की, व्यक्तीचा शब्द प्रमाण मानावयाचा, त्याची चिकित्सा करावयाची नाही. व्यक्तीनं सांगितलेला शब्द हे अंतिम सत्य आहे. त्याबाबत तपासण्याची चिकित्सा करण्याची गरजच नाही. अशी भूमिका अनेकदा घेतली जाते. त्यामुळं श्रद्धेची चिकित्सा होणं दुरापास्त होऊन बसतं.
- पूर्वापार अंधश्रद्धा कायम :- नवस करावा, तो फेडण्यासाठी कर्जबाजारी होऊन सार्वजनिक ठिकाणी पशुहत्या करावी. मेलेल्या व्यक्तीच्या पिंडाला कावळा शिवेल का याची वाट पाहत श्मशानात महत्त्वाचे तासनतास वाया घालवत ताटकळत बसावे. वर्तणुकीत फरक पडल्यावर भूतबाधेची शंका घेऊन मांत्रिक वा भगताच्या आधीन व्हावे. अचानक पेटणारे कपडे, पाडणारे दगड, अंगावरच्या विव्याच्या फुल्या याला भानामतीची करामत समजूर भयग्रस्त बनावे. मृतात्म्याला प्लँचेटच्या वाटीवर बोलावून प्रश्नांची उत्तरे मागावीत. आयुष्यातील सारे महत्त्वाचे निर्णय, थोतांड असलेल्या जन्मपत्रिकेच्या दावणीला बांधुन, नियतीवादी बनावे. मुलगा होण्यापासून ते अखिल विश्वाचे कल्याण होण्यापर्यंतच्या विविध हेतूंसाठी अन्नधान्याची नासाडी करत दोन हजार वर्षापूर्वीचे यज्ञयागाचे स्तोम माजवावे. जातीच्या खानदानपणाच्या नावाखाली विधवा विवाहाला विरोध करावा. शरीरधर्म असणाऱ्या मासिक पाळीत स्त्रीरोगतज्ज्ञानेही स्वतःला अपवित्र समजावे. पावसाने ओढ घेतली तर राज्यपालाने परमेश्वराची प्रार्थना करण्याचा फतवा काढावा आणि हातातून वस्तू काढण्याचे चिल्लर चमत्कार करणाऱ्या आणि स्वतःच्या सहाय्यकालाही खुनापासून वाचवू न शकणाऱ्या कोण्या बाबाच्या पायावर राष्ट्र वाचवण्यासाठी पंतप्रधान आणि राष्ट्रपतींनी लोटांगण घालावे.
- कर्मकांडांना महत्त्व :- भारतीय समाज कर्मकांडी आहे. पुजा, नवस, यज्ञ, बळिप्रथा, बुवाबाजी यांना नकोतेवढे महत्त्व येथील माणसे देतात. कर्मकांडांचा प्रभाव जसजसा वाढत जातो तसतशी अंधश्रद्धा अधिकच वाढत राहते. ९. खुळ्या कल्पनांना महत्त्व :- भूत, भानामती, बुवाबाजी, ज्योतिष यासारख्या खुळ्या कल्पनांनवर फार विश्वास ठेवून त्याच गोष्टींचा स्वीकार करणे अंधश्रद्धेला खतपाणी घालणारा ठरतो. स्वतंत्र पद्धतीने विचार करण्याची शक्ती माणसाने सोडून दिली की तो अंधश्रद्धेच्या जाळ्यात फसत जातो.
अशाप्रकारे अंधश्रद्धेची कारणे सांगता येतात.
अंधश्रद्धेच्या प्रतिबंधासाठी उपाययोजना :
अंधश्रद्धा कमी होण्यासाठी आणि अंधश्रद्धेच्या प्रतिबंधासाठी पुढील उपाययोजना सांगता येते.
- वैज्ञानिक दृष्टीकोणाला चालना :- अंधश्रद्धा प्रतिबंधासाठी प्रत्येक व्यक्तीत वैज्ञानिक दृष्टिकोण विकसीत करणे गरजेचे आहे. माणसाने विज्ञानाची कास धरल्यास तो अंधश्रद्धेपासून स्वतःची मुक्तता करू शकतो. प्रत्येक घटने मागील कार्यकारणभाव तपासून डोळसपणे प्रत्येक गोष्ट केल्यास अंधश्रद्धा कमी होऊ शकतात.
- शिक्षण :- अज्ञानाच्या व अंधश्रद्धेच्या गर्तेत फसलेल्या माणसांना बाहेर काढायचे असेल तर शिक्षण हा एक उत्तम मार्ग आहे. शिक्षणाद्वारे व्यक्ती स्वतंत्र विचार करायला लागतो आणि श्रद्धा व अंधश्रद्धेतील फरक त्याला समजून येतो. तसेच शिक्षणाद्वारे व्यक्तीत वैज्ञानिक दृष्टीकोण हा रुजविला जाऊ शकतो.
- विवेकाचा विचार - काय योग्य आणि काय अयोग्य याचा विचार करणे म्हणजे विवेक होय. प्रत्येक व्यक्तीला विवेकी विचार करण्याची आवश्यकता आहे. पुजा, नवस किंवा कर्मकांड यांच्यातील फोलपणा समजुन घेऊन अयोग्य गोष्टींचा त्याग करणे गरजेचे बनले आहे. तरच अंधश्रद्धेचे निर्मुलन होऊ शकते.
- नागरिकांची जागरुकता : अंधश्रद्धेवर प्रतिबंध घालायचा असेल तर समाजातील सर्व नागरिकांनी जागरुक होण्याची गरज आहे. बुवाबाजीच्या जाळ्यात न अडकता व चमत्कारावर विश्वास न ठेवता सत्याचा शोध माणसाने घेतल्यास तो अंधश्रद्धेपासून तो दुर राहु शकतो.
- धर्मचिकित्सा : भारतामध्ये संत, समाजसुधारणा याने सातत्याने धर्मचिकित्सा केली आहे. धर्माच्या नावाने चुकिचे आणि अंधश्रद्धाळू विचार प्रसारीत करण्याचे कार्य काही स्वार्थी लोकांनी सातत्याने केले आहे. या चुकिच्या विचारांना दुर करून धर्माचा खरा अर्थ जाणून घेतला पाहीजे. सत्यनारायण, यज्ञ, बळीप्रथा, नवस, यात्रा यामुळे धर्माच्या नावाने फक्त अंधश्रद्धेचाच प्रचार करण्यात आला आहे. या अंधश्रद्धेला थांबवायचे असेल तर धर्माचा खरा अर्थ जाणून घेतला पाहीजे. धर्म म्हणजे रुढी, परंपरा, उपासनापद्धती, सज्जनपणा. सदगुण येवढाच अर्थ नाही. तर धर्म म्हणजे नैतीक व सांस्कृतीक मुल्यांचा ठेवा होय. या पद्धतीची जाणीव प्रत्येकात निर्माण झाल्यास अंधश्रद्धा रोकता येऊ शकेल.
- कायद्याची गरज :- अंधश्रद्धा हा सामाजिक रोग आहे. अंधश्रद्धेमुळे बऱ्याचवेळा हत्या, अनैतिक व्यवहार, आर्थिक लुट असे प्रकार मोठ्या प्रमाणात घडुन येतात. करणी, भानामतीच्या नावाखाली निष्पाप लोकांना मानसीक व शारीरिक त्रास दिला जातो. यापासून त्यांची मुक्तता करायची असेल आणि अंधश्रद्धा निर्मुलन घडवायचे असेल तर अंधश्रद्धेला रोकणारा कडक कायदा होणे गरजेचे आहे. ज्यामुळे लोकांच्या श्रद्धेचा फायदा घेऊन त्याना अंधश्रद्धाळू वनवणाऱ्या लोकांना रोखता येईल.
अशा प्रकारे अंधश्रद्धा निर्मुलनाचे उपाय सांगता येतात.
Nice post
ReplyDelete