Category

Show more

निरंतर विकासाचे नैसर्गिक साधन संपत्तीवरील परीणाम (Sustainable Development Effects on Natural Resources)

निरंतर विकासाचे नैसर्गिक साधन संपत्तीवर कोणते परीणाम होतात ? व तसेच वातावरणात बदल काणत्या घटकामुळे होतो.

किंवा

टिपा द्या.

  1. वातावरण
  2. भुमी
  3. महासागर / समुद्र
  4. शुद्ध पाणी
  5. जैव-विविधता
  6.  खाणकाम

उत्तर :

ज्या पध्दतीने लोकसंख्या वाढत आहे. त्या पध्दतीने मानवी सतत प्रगत होत चालले आहे. या मागचे कारण म्हणजे माहितीचे तंत्रज्ञान, नवनविन शोध, वाढते औद्योगिकरण इत्यादी एका बाजूने ही प्रगती होत असली तरी या प्रगतीमूळे नैसर्गिक सांधन संपत्तीवर प्रतिकूल परिणाम होत आहे. विकासाच्या नावाखाली नैसर्गिक सधान संपत्तीचा अमर्याद वापर सुरु आहे. या अमर्याद वापरमूळे निसर्गात असलेली जैव-विविधता, भूमी, शुध्दपाणी, वातावरण इत्यादी नैसर्गिक साधन संपत्तीवर परिणाम झालेला दिसून येतो. या नैसर्गिक साधन संपत्तीचा मानवी जीवनावर इतका दिसून येतो की, त्यांना अनेक समस्याना सामारे जावे जागत आहे. निसर्गात आढळणारे प्राणी व वनस्पती यांच्यावर देखील परिणाम झालेला दिसून येत आहे. या परिणामूळे काहि पाणी व वनस्पती पुल होत आहेत.

यात निरंतर विकासाचा विचार केला तर नैसर्गिक साधन सगतीच्या वेगवेगळ्या घटकावर परिणाम होतो. ते घटक खालील प्रमाणे आहेत.

वातावरण (Atmosphere):- 

निरंतर विकासासाठी नैसर्गिक साधनसंपतीची इतकी हानी होऊ लागली की पूर्णपणे वातावरणात बदल होत असलेला दिसून येतो. निरंतर विकासासाठी वृक्षतोड, कारखानदारी, धुम्रपान, औद्योगिकीकरण इत्यादी कारणामुळे वातावरणात खूप मोठ्या प्रमाणात दुषित होवून नैसर्गिक साधनसंपत्तीवर खूप मोठा परिणाम झालेला दिसून येतो. यामुळे प्राणी जीवनावर, तापमानात वाढ. वनस्पतीवर, ऑक्सीजनच्या प्रमाणात घट इत्यादी परिणाम वातावरणात झालेले दिसून येतात. असे परिणाम प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मानवी जीवनावर प्राणी जीवनावर, वनस्पती जीवनावर झालेले दिसून येतात. म्हणून निरंतर विकास करत असताना पर्यावरणाची हानी झाली की आपोआपच वातावरणावर परिणाम झालेला दिसून येतो.

महासागर / समुद्र (Ocean and Sea's):- 

महासागर आणि समुद्रामुळे देखील नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम झालेला दिसून येतो. दिवसेंदिवस सागरी प्रदुषणाचे प्रमाण वाढत असलेले आपणास दिसून येत आहे. हवा प्रदुषण, पाणी प्रदुषण, मृद प्रदुषण, कचरा प्रदुषण ह्या प्रमाणे सागरी प्रदुषणाचा सुध्दा पर्यावरणाच्या दृष्टीने अतिशय नुकसानकारक व घातक समस्या आहे. सागरी प्रदुषण निर्माण होण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यामध्ये कारखान्याचे वाढते प्रमाण, औद्योगिक सांडपाणी, रासायनिक खताचा वाढता वापर, खनिज तेल गळती, टाकाऊ पदार्थ इत्यादी अनेक कारणामुळे महासागरात आणि समुद्रात प्रदुषणाचे प्रमाण वाढत असलेले आपणास दिसून येईल. याचा परिणाम म्हणून पर्यावरणाचा समतोल ढासळला, जलदर प्राण्याचे अस्तित्व धोक्यात आले, तापमान वाढले, मानवी आरोग्यात बिघाड जलदर वनस्पतीचा हास इत्यादी गंभीर समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. म्हणून विकासाच्या दृष्टीने जर विचार केला तर महासागर आणि समुद्रामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम झालेले दिसून येत आहे.

शुध्द जल / पाणी (Fresh Water) :- 

पाणी हे निरंतर विकासाचा निर्देशक आहे. मानवाला आणि वनस्पतीला शुध्द पाण्याची आवश्यकता असते. यासाठी भरपूर पाण्यापेक्षा शुध्द पाणी अधिक महत्वाचे असते. निरंतर विकासाच्या दृष्टीने सध्या औद्योगिकीकरण, कारखान्याचे वाढते प्रमाण, औष्णिक जलप्रदुषण, रासायनिक खताचे कारखाने, वाढती लोकसंख्या इत्यादी प्रमाण खूप मोठ्या प्रमाणात वाढलेले दिसून येते. या घटकातून निघणारे घाण पाणी सरळ नद्यांना जावून मिळत असल्यामुळे मानवासमोर खूप मोठी गंभीर समस्या निर्माण झाली आहे. या पाण्यातून (वेगवेगळे आजार, पाणी दुषित, पर्यावरणाचा समतोल ढासळलेला दिसून येत आहे) मानवी व प्राणी जीवनावर परिणाम, साथीचे रोग, पर्यावरणाचे संतुलन बिघडणे, पिण्याच्या पाण्याची समस्या, जमीनीत क्षाराचे वाढते प्रमाण इत्यादी खूप मोठा परिणाम झालेला दिसून येत आहे. म्हणून निरंतर विकासाच्या दृष्टीने विचार केला तर जसजसा विकास होत जातो तशाच पध्दतीने नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम होतो, असे दिसून येते. यासाठी नैसर्गिक साधनसंपत्तीचे जतन करणे हे आजच्या काळाची गरज आहे.


भूमी / जमीन (Land):- 

जमीन ही मानवादी गरज पूर्ण करणारे एक नैसर्गिक साधन आहे. जमीनीचा आकार मर्यादित असतो. जसजसी लोकसंख्या वाढत जाते तसतसा जमीनीचा वापर वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी केला जातो. म्हणून त्याचा परिणाम म्हणून निसर्गाचा समतोल दिवसेंदिवस ढासळत चालला आहे. निरंतर विकासासाठी शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी रासायनिक खताचा व किटकनाशक यांच्या जास्त वापरामुळे मानवी आरोग्यात बिघाड, पिकाच्या वाढीवर परिणाम, उत्पादन क्षमतेवर परिणाम, जमीनीत क्षाराचे वाढते प्रमाण इत्यादी कारणामुळे नैसर्गिक साधनसंपत्तीवर परिणाम झालेला दिसून येतो. त्याच बरोबर वाढत्या औद्योगिकीकरणामुळे कारखान्यातील टाकाऊ पदार्थ खाणकामातील निरूपयोगी पदार्थामुळे भूमी प्रदुषण घडून येते. यात विविध कामे निरूपयोगी पदार्थ असतात व हे निरूपयोगी पदार्थ जमीनीतील सुपिकता, जमीनीचा कस कमी करतात, त्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीवरील परिणाम झालेला दिसून येतो.


चिरंतन विकास म्हणजे काय ? आणि त्याची निर्देशके सांगा.

उत्तर :

नैसर्गिक साधनांचा आणि मानवी विकासाचा जवळचा संबंध आहे निसर्गाने मानवाला जमीन, पाणी, उन, वारा यासारखी व इतर अनेक साधने विनामुल्य दिलेली आहेत. मानवाच्या मुलभूत गरजाची पूर्तता निसर्गाकडूनच केली जाते. परंतु मानवाने नैसर्गिक साधन संपत्तीचा अतिरेकी प्रमाणात उपयोग केल्यामुळे पर्यावरणाचा -हास होत आहे. पर्यावरणात असंतुलन निर्माण होत आहे. असे होत राहिल्यास पुढील पिढींना अनेक समस्यांना सामोरे जावे लागणार आहे. तेंव्हा चालू काळातील विकासाबरोबरच भविष्यकालीन विकासाचा विचार करण्याची आता वेळ आली आहे. भविष्यकालीन विकासाचा विचार म्हणजेच चिरंतर विकासची संकल्पना होय. ही संकल्पना जगात १९८० च्या दशकात विकसित झाली. परंतु याचा सविस्तर प्रचार करण्याचे कार्य "जागतिक पर्यावरण व विकास आयोगाद्वारे" करण्यात आला.

चिरंतन विकास :

  1. जागतिक पर्यावरण व विकास आयोगाच्या मते, "भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्याच्या पर्यावरणाच्या क्षमतेचा न्हास न करता वर्तमान पिढीच्या गरजा पूर्ण करणे म्हणजे चिरंतन विकास होय."
  2. चिरंतन विकास म्हणजे भविष्यकालीन पिढीला धोका न पोहचवता वर्तमान काळात केलेला आर्थिक विकास होय.
  3. चिरंतन विकास ही एक बदलाची प्रक्रिया आहे. त्यामध्ये संसाधनाचा पूर्ण उपयोग, तांत्रिक विकासाची अभिमुखता व संस्थात्मक बदल आणि गुंतवणुकीची दिशा यामध्ये अनुरूपता असणे आणि मानवी गरजा व महत्वकांक्षा पूर्ण करण्यासाठी वर्तमान व भविष्यकालीन सामर्थ्य वाढविणे म्हणजेच चिरंतन विकास होय. 

चिरंतन विकासाची निर्देशके (Indicators of Sustainable Development) : 

चिरंतन विकास हा अनेक निर्देशकांवर अवलंबून असतो. चिरंतन विकासाचे उद्देश साध्य करण्यासाठी निर्देशकाच्या साह्याने धोरण ठरविले जाते. निर्देशकांचा वापर करून चिरंतन विकासाचे मोजमाप केले जाते. चिरंतन विकासाची माहिती घेण्यासाठी निर्देशके उपयुक्त ठरतात. इ.स. १९९५ मध्ये 'चिरंतन विकास आयोगाने' निर्देशकांचा एक कृती आराखडा मंजूर केला.
चिरंतन विकास निर्देशकांचे वर्गीकरण प्रामुख्याने सामाजिक, आर्थिक, संस्थात्मक आणि पर्यावरणविषयक अशा चार भागांमध्ये करण्यात येते याचे सविस्तर विवेचन खालील प्रमाणे करण्यात येत आहे.

  1. लोकसंख्या :- कोणत्याही देशाची लोकसंख्या ही त्या देशाच्या विकासाला साह्यभूत ठरणारीही आहे आणि त्या देशाच्या आर्थिक विकासात अडथळाही आणणारीही आहे. जेवढी लोकसंख्या जास्त तेवढी पर्यावरणाची अवनती जास्त, अशा स्थितीत चिरंतन विकास साध्य करता येत नाही. चिरंतन विकासासाठी लोकसंख्येवर नियंत्रण असणे आवश्यक ठरते.
  2. जमीनीचा पर्याप्त वापर :- जमीन ही मानवची गरज पूर्ण करणारे एक नैसर्गिक साधन आहे. जमिनीचा आकार मर्यादीत असतो. जसजसी लोकसंख्या वाढत जाते. तस तसा जमीनीचा वापर वाढत्या लोकसंख्येची गरज भागविण्यासाठी केला जातो. जमीनीची धूप ही भारताच्या दृष्टीने गंभीर समस्या आहे, जमिनीची धूप होत राहिल्यास सुपीक जमीनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. जमीनीची उत्पादकता कमी होते. परंतु चिरंजन विकासाच्या दृष्टीने जमीनीची धूप होणार नाही तसेच जमिनीची सुपीकता नष्ट होणार नाही याची काळणी घ्यावी लागते.
  3. देशांतर्गत पाण्याचा उपयोग :- पाण्याचा वापर पिण्यासाठी केला जातो. शेती व उद्योगाच्या विकासासाठी देखील पाण्याचा वापर केला जातो. वरील सर्व कारणासाठी पाण्याची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर असेल तरच चिरंतन विकास होऊ शकतो अन्यथा नाही. पाण्याच्या उपलब्धते पेक्षाही पाण्याचा काटकसरीने वापर करणे अधिक महत्वाचे ठरते. शेतीसाठी गरजेपेक्षा जास्त पाण्याचा वापर केल्यास जमीनीची सुपीकता नष्ट होते. भविष्यकाळात अन्नधाण्याचे. उत्पादन घेण्यासाठी सुपीक जमीनीचा तुटवडा भासतो. तेंव्हा पाण्याचा वापर करीत असताना जमीनीची सुपिकता नष्ट होणार नाही. याची काळजी घ्यावी लागते. तसेच इतर कामासाठी पाणी कमी पडणार नाही याकडे देखील लक्ष द्यावे लागते. म्हणून पाण्याची उपलब्धता व वापर यावर चिरंतन विकास अवलंबून आहे. 
  4. जंगलांचे प्रमाण :- देशातील असणाऱ्या जंगलाच्या प्रमाणावर चिरंतन विकास अवलंबून असतो. विकासाच्या दृष्टीने एकूण जर्मनीच्या ३३ टक्के हिस्सा जंगलांनी व्यापलेला असला पाहिजे, परंतु भारतासारख्या विकसनशिल देशाचा विचार केल्यास १९८१ ते १९९० या दशकात दरवर्षी ०.६ टक्के या दराने जंगलाचे प्रमाण कमी झाले आहे, अशा प्रकारे जंगलाचे कमी होणारे प्रमाण वन्य जीवांना धोका निर्माण करणारे तर ठरतेच त्याही पेक्षा जमीनीची हानी फार मोठ्या प्रमाणावर होण्यास कारणीभूत ठरते. म्हणून चिरंतन विकासासाठी विशिष्ट प्रमाणात जमीनीचा भाग जंगलांनी व्यापलेला असला पाहिजे.
  5.  सकल देशी उत्पादन :- सकल देशी उत्पादनाचा दर देखील चिरंतन विकासाचा निर्देशक आहे. कारण या उत्पादनावरून देशाचा विकास निश्चित होतो. देशातील उत्पादनाचा दर जेवढा अधिक असेल तेवढा रोजगार अधिक निर्माण होतो. देशातील दारिद्र्य कमी होण्यास मदत होते. लोकांच्या कल्याणात वाढ होते आणि देशामध्ये स्थिरता निर्माण होते. यातूनच पर्यावरणाचा समतोल देखील साधता येतो.
  6.  वाहतुकीची सघनता :- देशात असणारी वाहतुकीची व्यवस्था देखील आर्थिक विकासाच्या दृष्टीने महत्वाची ठरते. देशामध्ये जर पुरेशी वाहुकीची व्यवस्था नसेल तर आर्थिक विकासात अडसर निर्माण होते. पुरेशी वाहतुकीची व्यवस्था असेल तर आर्थिक विकासाला चालना मिळते. परंतु वाहतुकीची साधणे पर्यावरणाचे प्रदुषण करणारे देखील ठरतात. अशा वेळी वाहतुक व दळणवळणाच्या क्षेत्रातील अद्यावत सुविधा महत्त्वाच्या ठरतात. म्हणून वाहतुकीची सघनता हीच चिरंतन विकासाचे निर्देशक ठरते.
  7. साधन सामग्रीची उपलब्धता :- कोणत्याही देशाचा आर्थिक विकास हा त्या देशातील विविध प्रकारच्या साधन सामग्रीच्या उपलब्धतेवर अवलंबून असतो. साधन सामग्रीचे प्रमाण जेवढे अधिक असेल तेवढा अधिक विकास, वर्तमान काळात होतो तसेच भविष्यकाळात देखील होऊ शकतो. परंतु साधन सामग्रीचे प्रमाण जर कमी असेल तर मात्र चिरंतन विकासाच्या दृष्टीने साधन सामग्रीचा काटकसरीने करावयाच्या वापरास महत्व प्राप्त होते. म्हणून देशातील उपलब्ध साधनसामग्री चिरंतन विकासाचा निर्देशक ठरते..
  8. उर्जेची उपलब्धता :- उर्जा हा आर्थिक विकासाचा एक घटक आहे. देशातील उर्जेच्या उपलब्धतेवर विजेचा उपयोग अवलंबून असतो. म्हणजे विजेचा पुरवठा आणि विजेची मागणी याचा चिरंतन विकासावर दुरगामी स्वरूपाचा परिणाम होतो. देशामध्ये उर्जेची निर्मिती अधिक प्रमाणात होत असेल तर चिरंतन विकास सहजपणे साध्य करता येतो, परंतु उर्जेची निर्मिती ही उर्जेच्या साधनावर अवलंबून असते उर्जेच्या निर्मितीसाठी साधारणपणे पाणी आणि कोळशाचा मोठ्या प्रामाणात वापर केला जातो. अलिकडे अणु पासून उर्जा निर्मितीच्या कार्यास अधिक महत्व प्राप्त झाले आहे. तसेच अपारंपारिक उर्जा निर्मिती साधनांचा देखील चिरंतन विकासाच्या दृष्टीने महत्व प्राप्त होत आहे.
  9. मानवी संसाधनाचा विकास :- देशातील मानवी संसाधनाचा विकास कितपत झाला आहे. यावर चिरतंन विकास अवलंबून असतो. मानवी संसाधन विकास निर्देशांक तयार करीत असताना आरोग्य, शिक्षण आणि आहार आणि आर्थिक स्थिती विचारात घेतली जाते. निर्देशांक ०.८ पेक्षा अधिक असेल तर मानवी विकास अधिक आहे असे समजण्यात येते. तर ०.५ पेक्षा निर्देशांक कमी असेल तर मानव विकास कमी समजण्यात येतो. मानव विकास जेवढा अधिक असेल तेवढा देशाचा चिरंतन विकास अधिक होतो.
  10. शुद्ध हवेचे प्रमाण :- हवा ही चिरंतन विकासाची निर्देशक आहे मानवाला आणि वनस्पतीला हवेची आवश्यकता असते. यासाठी भरपूर हवेपेक्षा शुद्ध हवा ही अधिक महत्वाची आहे. शुद्ध हवेचे प्रमाण जेवढे अधिक तेवढे पर्यावरण शुद्धः असे शुद्ध पर्यावरण मानवी व वनस्पती विकासाला पोषक ठरते. यातूनच चिरंतन विकास साध्य करता येतो. परंतु अलिकडच्या काळात हवेचे मोठ्या प्रमाणात प्रदुषण होत आहे. याचा विपरित परिणाम मानवी व वनस्पती जीवनावर होतो आहे. असेच होत राहिल्यास चिरंतन विकासात अडसर निर्माण होईल, म्हणून सर्वानी हवा प्रदुषीत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे, तरच चिरंतन विकास साध्य करता येतो.

या शिवाय बेरोजगारीचा दर, खतांचा वापर, आरोग्य सुविधा, बचतीचे प्रमाण, शिक्षणाच्या सोयी, महिलांचे समाजातील स्थान, नैसर्गिक आपत्तीचे व्यवस्थापन, लोकांचा सहभाग, विज्ञान आणि तंत्रज्ञान, नागरी समाजाची भुमिका इत्यादी चिरंतन विकासाची निर्देशके आहेत. यांच्या साह्याने आर्थिक विकासाच्या पातळीचे मोजमाप करता येते.

Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English