वाङ्मयाचे संशोधन संपूर्ण माहिती
वाङ्मयाचे संशोधन मागील दोन मुद्यात समीक्षा, वाड्मयेतिहास यांचा थोडक्यात सांकल्पनिक परिचय करून घेतला. समीक्षा, वाङ्मयेतिहास आणि बाङ्मयाचे संशोधन यामधील सीमारेषा पुसट होत चालल्या आहेत. त्यामुळे संशोधकांना समीक्षा, इतिहास, संशोधन यामधील फरक ध्यानात येईनासा झाला आहे. या तिन्ही संकल्पनांची सरमिसळ झाल्याने समीक्षेची आणि संशोधनाचीही उंची आपोआप खाली येत आहे. ते टाळण्यासाठी त्या गोष्टी प्राथमिक अवस्थेत स्पष्ट करून घेतल्या. आता आपल्याला वाङ्मयाचे संशोधन समीक्षा आणि वाड्मयेतिहासाहून कसे वेगळे आहे, हे पाहावयाचे आहे. समीक्षा कलाकृतीमधील सौंदर्य उलगडून दाखविते. कलाकृतीमधील भावसौंदर्य, अर्थसर्सीदर्य रसिकांना आस्वादन करून घेण्यास समीक्षा साहाय्य करते. वाड्मयमूल्यांचे विश्लेषणही त्या कलाकृतीच्या विषयाच्या अनुषंगाने आणि कलाकृतीमध्ये आलेल्या आशयाच्या अनुषंगाने केले जाते. समीक्षा एकेका कलाकृतीच्या पलीकडे जाऊन विशिष्ट काळातील एका वाड्मयप्रकाराकडे बळते तेव्हा पुन्हा अर्थसौंदर्याची दृष्टी व भावसौंदर्याची दृष्टी क्षीण होऊन वाङ्मयाच्या प्रेरणा प्रवृत्तीचे, संवेदनेचे विधान करण्याकडे कल जातो. ही समीक्षेच्...