वायु प्रदुषणाचा अर्थ कारणे परिणाम व उपाय - Meaning, causes, effects and solutions
वायु प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे परिणाम व उपाय सूचवा. उत्तर :- प्रस्तावना :- वातावरणात विविध वायुंचे एक निश्चित प्रमाण असते 'तसेच त्यांच्यात एक निश्चित गुणोत्तर ही असते. सजीवाच्या अस्तीवासाठी हवाहा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मानव कांही दिवस पाण्याशिवाय कांही आठवडे अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पण हवे शिवाय कांही मिनीटसद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे मानव हवेशिवाय जगू शकत नाही. निरोगी स्वास्थ्यासाठी शुद्ध हवेची गरज असते. मानसाला दररोज किमान १६ किलो शुद्ध ऑक्सीजनची गरज असते. परंतु वाढत्या औद्योगिक विकासाबरोबर वातावरणातील वायुंचे प्रमाण असंतुलित व प्रदुषीत होत गेले मानवाच्या विविध क्रियातून पर्यावरणात विविध दुषीत पदार्थ सोडले जात आहेत त्यामुळे हवेचे प्रदूषण वेगाने वाढत आहे. व्याख्या :- World Health otganisation (W.H.O.):- "सभोवतालच्या पर्यावरणाला व मानवाला इजा हाईल इतकी हवा अस्वच्छ होणे म्हणजे हवेचे प्रदूषण होय त्याचा मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो." २) परकिंस हेन्री :- "जेव्हा वातावरणात अनावश्यक तत्वाचा प्रवेश होतो तेंव्हा त्याचे मौलीक संतुलन बिघडते. वे...