डेव्हिड रिकाडोंची आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा
डेव्हिड रिकाडोंची आर्थिक विकासाची प्रक्रिया स्पष्ट करा
आर्थिक विकासाची प्रक्रिया ( Process of Economic Development ) : -
अॅडमस्मिथ प्रमाणे डेव्हिड रिकार्डोने देखील विकास प्रक्रियेमध्ये भांडवल संचयाला महत्त्वाचे स्थान दिले आहे . विकासाची प्रक्रिया समजावून घेण्यासाठी एकूण उत्पन्न व शुद्ध उत्पन्न यातील फरक लक्षात घेणे महत्वाचे आहे. विशिष्ट कालावधीमध्ये उत्पादन केलेल्या वस्तुंचे बाजारी मूल्य म्हणजे एकूण उत्पन्न होय. तर एकूण उत्पन्नातून श्रमिकांचे वेतन व भांडवलावरील चालू खर्च वजा जाता जी रक्कम शिल्लक राहते त्यास शुद्ध उत्पन्न असे म्हटले जाते . ह्याच शुद्ध उत्पन्नाचा संचय करण्याचे कार्य भांडवलदार करित असतो.
संचित उत्पन्नाचा वापर जेव्हा गुंतवणुकीसाठी करण्यात येतो. तेंव्हा विकासाच्या प्रक्रियेला सुरुवात होते . भांडवल संचयाचा दर हा बचत करण्याची क्षमता व बचत करण्याची इच्छा यावर अवलंबून असते. तर बचत क्षमता व इच्छा हे अर्थव्यवस्थेतील नफ्याच्या दरावर अवलंबून असते .
रिकार्डोचे मते, नफ्याचा संबंध वेतनाशी आहे. एवढेच नाहीत तर नफा आणि वेतन यामधील संबंध व्यस्त स्वरूपाचा असतो . जसे वेतनदर कमी तर भांडवलादारचा नफा जास्त व वेतनदर जास्त तर नफ्याचा दर कमी तसेच वेतन अन्नधान्याच्या किंमतीवर देखील अवलंबून असते. आणि अन्नधान्याची किंमत ही जमिनीची उत्पादकता किती आहे यावरून ठरत असते याचा अर्थ असा की , अन्नधान्याच्या किंमतीमध्ये बदल झाला असता त्याचा परिणाम वेतनदारावर होतो.
रिकार्डोनी शेतीमधील उत्पादन तंत्राचा देखील विचार केला आहे. शेतीमध्ये सुधारित तंत्राचा वापर केला तर शेतीची उत्पादकता वाढते . त्यामुळे सरासरी खर्च कमी येतो व अन्नधान्याच्या किंमती कमी होतात, श्रमिकाचे निर्वाह वेतन देखील कमी होते . परंतु भांडवलदाराच्या नफ्यामध्ये वाढ होते. व येथून विकासाची प्रक्रिया पुन्हा सुरू होते . नफा वाढला की , भांडवलसंचय वाढतो . भांडवलदार अधिक उत्पादनासाठी अधिक गुंतवणूक करतात. श्रमाच्या मागणीत वाढ होते. त्याचा परिणाम वेतनदर वाढण्यावर होतो. परिणामतः लोकसंख्या वाढते , अन्नधान्याची मागणी वाढते. धान्याच्या किंमती वाढतात . वेतनात वाढ होऊन नफ्याचे प्रमाण कमी होते. थोडक्यात , जोपर्यंत अधिक नफा होत राहील तोपर्यंत भांडवल संचय वाढतो व विकासाची प्रक्रिया सुरू राहते. असे रिकार्डोचे मत आहे .
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog