Category

Show more

डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा

डेव्हिड रिकाडांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत सांगा  

 डेव्हिड रिकाडचा आर्थिक विकासाचा सिध्दांत : -

 अभिमतपांतिय अर्थशास्त्रज्ञ डेव्हिड रिकाड यांनी सन १८१७ मध्ये प्रकाशित केलेल्या ' The principles of Political Economy and Taxation ' या पुस्तकात आर्थिक विकासाचे विचार मांडले . अॅडम स्मिथ प्रमाणे यांनीही आर्थिक विकासाचा स्वतंत्र सिध्दांत मांडला नाही . रिकार्डाचे आर्थिक विकासाचे विचार हे बहुतांशी कार्ल मार्क्सच्या विचारासारखे आहेत . से पुढील प्रमाणे आहेत . 

( १ ) घटत्या उत्पादनाचा सिध्दांत

 रिकार्डोच्या मते अर्थव्यवस्थेत घटत्या उत्पादनाची प्रवृत्ती ही नैसर्गीक असते . त्यामुळे कृषी क्षेत्रात घटत्या उत्पादन फलाचा नियम लागू पडतो . त्यामुळे शेतीचा आर्थिक विकास मंदावून त्याचा अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होतो . हे टाळण्यासाठी विदेशातून अन्नधान्याची आयात करावी , नव्हे तर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती वाढून जीवनमानाचा दर्जा घसरतो . त्यामुळे आर्थिक विकास मंद होतो . अशा पध्दतीने घटत्या उत्पादनाचा व आर्थिक विकास यांचा संबंध स्पष्ट केला आहे . 

( २ ) मजुराची मजुरी 

श्रम हा आर्थिक विकासातील एक महत्वपूर्ण घटक आहे . त्यांच्या कार्याबद्दलचा मोबदला म्हणून त्यांना मजुरी दिली जाते . श्रमिकाकडे श्रमशिवाय उत्पादनाचे कोणतेच साधन नसते . तसेच ते संख्येने जास्त असतात . म्हणून त्यांना निर्वाह वेतन पातळी एवढेच वेतन दिले जाते . पण त्यांच्याकडून वेतनापेक्षा कितीतरी जास्त पटीने उत्पादन करून घेतले जाते . एकंदर त्यांचे उत्पन्न कमी असल्यामुळे अर्थव्यवस्थेत एकंदर मागणी कमी होते . त्यामुळे मागणी अभावी अर्थव्यवस्थेत मंदी येवून आर्थिक विकास मंदावला जातो . 

( ३ ) भांडवल संचय

 रिकार्डोच्या मते भांडवल संचयामुळे आर्थिक विकास होतो . अर्थव्यवस्थेत भांडवल संचय हा फक्त उत्पादक वर्गाकडूनच केला जातो . कारण त्यांचा उपभोग उत्पन्नापेक्षा कमी असतो . तसेच भांडवल हे दोन प्रकारचे असतात .

 १ ) स्थिर भांडवल व 

२ ) बदलते भांडवल . जेव्हा या दोन्ही प्रकारच्या भांडवलात वाढ होते तेव्हा

आर्थिक विकासाचा वेग वाढतो . 
                    थोडक्यात वरील प्रमाणे रिकार्डो यांनी आपले आर्थिक विकासाचे विचार मांडले आहेत . 
टीका : 
  1.  भांडवलदारांना बचत करणारा वर्ग म्हणून अवास्तव महत्त्व दिले आहे . 
  2.  समाजाची तीन वर्गात केलेली विभागणी अवास्तव . 
  3. अवास्तव ग्रहीते आधार मानलेली आहेत .
  4.  रिकार्डोने तांत्रिक बदलाकडे दुर्लक्ष केले आहे .
  5.  लोकसंख्या वाढत असताना वेतनाचा दर वाढत नाही असे म्हणणे चुकीचे 
  6. विकास सिद्धांताऐवजी वितरण सिद्धांत मांडला अशी टीका केली जाते . 
  7.  निर्हस्तक्षेपाचे धोरण अव्यवहार्य 
  8.  व्याज दराकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे . 
  9.  स्थित अवस्थेची कल्पना चुकीची आहे .
बीए प्रथम वर्षे अर्थशास्त्र विकास सिधांत


Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English