Category

Show more

Economic Development Measurements / Problems ( आर्थिक विकासाच्या मापनातील अडचणी / समस्या )

आर्थिक विकासाच्या मापनातील अडचणी समस्या

Economic Development Measurements / Problems 

आर्थिक विकासाच्या संकल्पनेनुसार एखादे राष्ट्र विकसीत , विकसनशील किंवा अविकसीत आहे . हे ठरविता येते . त्यासाठी आर्थिक विकासाचे अचुक व काटेकोरपणे मापन करणे आवश्यक असते . परंतु खरोखरच आर्थिक विकासाचे काटेकोरपणे मापन करता येते का ? या प्रश्नाचे उत्तर नकारात्मकच द्यावे लागेल . कारण आर्थिक विकासाचे मोजमाप करण्यात अनेक अडचणी आहेत . त्यापैकी प्रमुख अडचणी पुढीलप्रमाणे आहेत . 

१ ) राष्ट्रीय उत्पन्नाचे चुकीचे मापन :

 राष्ट्रीय उत्पन्नाचे वरुन दोन राष्ट्राची तुलना करुन विकासासंबधीचे निष्कर्ष काढले जातात . राष्ट्रीय उत्पन्नात वाढ झाली तर देशातील लोकांना वस्तु व सेवा मुबलक प्रमाणात मिळूण त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडून येते . परंतु वाढत्या उत्पन्नाबरोबर लोकसंख्याही वाढली असेल तर लोकांचे जीवनमान उंचवणार नाही . म्हणजे राष्ट्रीय उत्पन्न अधिक म्हणून विकास अधिक अशा प्रकारचे वरील विधान चुक ठरते . म्हणून आर्थिक विकासाचे मोजमाप अचूक करता येत नाही . 

२ ) दरडोई उत्पन्न :

 दरडोई उत्पन्नाचा वापर करून विकासाचे मोजमाप करता येते . जसे ज्या देशातील लोकांचे दरडोई उत्पन्न जास्त तो विकसीत व दरडोई उत्पन्न कमी तो अविकसीत अशी तुलना केली जाते . पण दरडोई उत्पन्नाचे मापन करुन निष्कर्ष काढणे तेवढे सोपे काम नाही . एखादी व्यक्ती न्यूनतम आवश्यकतेच्या सिद्धांतावर विश्वास ठेवील असेल तर तीला कमी उत्पन्नात देखील अधिक समाधान मिळेल . म्हणजेच कमी उत्पन्न म्हणजे कमी समाधान अशा प्रकारचे विकासासंबधी विधान करता येत नाही. म्हणून भौतिक उत्पन्नाच्या साह्याने विकासाचे मोजमाप करता येते . असे म्हणणे चुकीचे वाटते.

३ ) बाजारात न मिळणाऱ्या वस्तु व सेवा:

 बऱ्याच वस्तु व सेवा या बाजारात मिळू शकत नाहीत . कसल्याही प्रकारचा मोबदला न घेता केलेले घरकाम हे उत्पन्न समजले जात नाही . त्यामुळे त्यांचा समावेश राष्ट्रीय उत्पन्नात करता येत नाही . तर विकसीत राष्ट्रात त्यांना अधिक महत्त्व देवून राष्ट्रीय उत्पन्नाचे मोजमाप केले जाते .  त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात फरक दिसून येतो व अशा उत्पन्नाची तुलना करुन विकास ठरविणे चुकीचे ठरते .

 ४ ) प्रत्येक राष्ट्राचे उद्देश वेगवेगळे असतात :

 प्रत्येक राष्ट्राची संस्कृती , धर्म , चालीरित्या , समस्या वेगवेगळी असते . त्यामुळे प्रत्येकाचा प्राधान्यक्रम वेगवेगळा असतो . म्हणून सर्व राष्ट्रांना एकच निकष लावून विकासाचे मोजमाप करणे चुकीचे ठरते . तसेच प्रत्येक राष्ट्राचे चलन वेगवेगळे असते . चलनाचा विनिमय दर वेगवेगळा असतो , काही देशातील चलनाचे मूल्य इतर देशाच्या चलनाच्या मानाने जास्त असतात . अशा वेळी दोन राष्ट्राच्या चलनावरुन, उत्पन्नावरुन किंवा क्रय शक्तीवरुन विकासाची योग्य प्रकारे तुलना करता येत नाही.  थोडक्यात वरील प्रमाणे आर्थिक विकासाच्या मापनातील अडचणी म्हणून सांगता येतात .

आर्थिक विकास बीए द्वितीय वर्ष BA 2nd year economics

आर्थिक विकासाच्या मार्गातील अडचणी आणि समस्या



Comments

Popular posts from this blog

All project solutions in PDF format

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

A Living God - Patrick Lafcadio Hearn (Koizumi Yakumo) Full Chapter