आर्थिक वृद्धी वर परिणाम करणारे घटक
विकासाचे अर्थशास्त्र
आर्थिक वृद्धी म्हणजे उत्पन्नातील, उपभोग आतील वाढ होय. विकसित राष्ट्रांनी आपला आर्थिक विकासाचा वेग दीर्घकाळ टिकून देशातील लोकांच्या जीवनमान, आयुर्मानात किती प्रमाणात वाढ झाली आहे याचे मापन आर्थिक प्रदीप द्वारे केले जाते. एखाद्या राष्ट्राचा दर्जा हा त्याच्या आर्थिक वृद्धी दरावर अवलंबून असतो. पण असा आर्थिक वृद्धी दर अनेक घटकांना प्रभावित झालेला असतो. थोडक्यात आर्थिक वृद्धी वर प्रभाव टाकणारे प्रमुख घटक खालीलप्रमाणे सांगता येतात.
1) भांडवल -
भांडवल निर्मिती होणे म्हणजे भौतिक उत्पादन साधनांची निर्मिती होय. देशांत भांडवलाची पर्याप्त मात्रा व दर्जा असल्याशिवाय देशाची व्यापक प्रमाणावर आर्थिक प्रगती होऊ शकत नाही. भांडवलाच्या कमतरतेमुळे उद्योग, व्यापार व कृषी क्षेत्राची प्रगती खुंटते. म्हणून भांडवल हा आर्थिक वृद्धी वर प्रभाव टाकणारा महत्त्वाचा घटक आहे.
2) श्रम -
श्रमाला मानवी संपत्ती असे म्हटले जाते. कारण हे उत्पादनाचे सक्रिय साधन आहे. कोणत्याही देशाची वास्तविक संपत्ती ही देशातील सुखी, संपन्न व व्यवस्थ मानव ही आहे. श्रमिकांचे संख्या कमी असल्यास देशाच्या आर्थिक प्रगतीत अनेक अडथळे निर्माण होतात. म्हणून मानवी संपत्तीला उत्पादनाच्या प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. प्रो. किंगडल बजृ च्या मते, देशाची लोकसंख्या व आकार, स्त्री-पुरुष प्रमाण, धन व्यवसाय मधील वितरक व कार्यक्षम या सर्व गोष्टी देशाच्या आर्थिक वृद्धीवर परिणाम करतात.
3) तांत्रिक प्रगती -
आर्थिक वृद्धी वर परिणाम करणारा तिसरा महत्त्वपूर्ण घटक म्हणजे तांत्रिक प्रगती हा आहे. तांत्रिक प्रगतीमुळे श्रम व भांडवल त्यांच्या उत्पादकतेत वाढ होते, किमान उत्पादन व्यायात कमाल दर्जेदार उत्पादन होते. कमी वेळात चांगल्या वस्तूचे उत्पादन होते. व अशा वस्तूंना बाजारपेठेत मागणी जास्त असते. त्यामुळे आर्थिक वृद्धी झपाट्याने होते. पण या उलट ज्या परिस्थितीत तांत्रिक ज्ञान अभावी सर्व मार्ग खुंटतात त्याचा विपरीत परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेवर होतो.
4) नवप्रवर्तन
5) उद्योजकता व उपक्रम -
आर्थिक वृद्धी वर परिणाम करणारा हा पाचवा घटक आहे. औद्योगिक विकासात उद्योजकांची किंवा उपक्रमाची भूमिका अतिशय महत्त्वाचे असते. त्यांना 'औद्योगिक जहाजाचा कप्तान' असे म्हणतात. नैसर्गिक संसाधने, श्रम , भांडवल या सर्वांचा योग्य पद्धतीने वापर करून आर्थिक विकास घडवून आणणारा उपक्रम मी असतो. उपक्रमी नसेल तर देशातील मौल्यवान साधनसंपत्तीचा काहीच उपयोग होणार नाही. विकसित देशात उपक्रमाची संख्या बरीच असून ते भांडवलाला सक्रिय करून आर्थिक वृद्धी करू शकतात याउलट विकसनशील देशात धाडसी उपक्रमाची संख्या फारशी नसल्यामुळे जलद आर्थिक विकास संभवत नाही.
थोडक्यात वरील प्रमाणे अनेक घटक आर्थिक बुद्धीच्या जोरावर प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष परिणाम करतात.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog