Category

Show more

Malthu's Theory of Economic Development - Principles of Political Economy

 माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत स्पष्ट करा . 

माल्थसचा आर्थिक विकासाचा सिद्धांत ( Malthu's Theory of Economic Development ) : 

जगातील अर्थशास्त्राचे पहिले प्राध्यापक म्हणून काम करण्याची संधी थॉमस रॉबर्ट माल्थस यांना मिळाली . आर्थिक विकासाच्या सनातनवादी विचारामध्ये माल्यराचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आहे . कारण माल्थसचे विवेचन सनातनवादी विचाराच्या चौकटीत बसणारे असले तरी त्यांचे असे काही विचार आहेत की ज्याचा आधार घेवून विकसित देशाचा विकास कसा अविरतपणे होईल आणि याच क्रियेचा वापर विकसनशील देशाच्या विकासाच्या क्रिया कशा गतीमान करता येतील या दृष्टीने मार्गदर्शक ठरणारे आहेत . 

माल्थस हा स्मिथ सारखा आशावादी नव्हता तर तो निराशावादी दृष्टीकोनाचा होता . यांचे कारण म्हणजे अठराव्या शतकाच्या उत्तरार्धातील निर्माण झालेल्या अनेक समस्याही असू शकेल . उदा . अन्नाचे दुर्भिक्ष वाढत्या किंमती , बेकारी , दारिद्रय रोगराई इत्यादी . म्हणून माल्यासने समकालीन अर्थतज्ज्ञापेक्षा आर्थिक विकासाच्या समस्येमध्ये रस घेतलेला आहे . माल्थसने आपल्या ' Principles of Political Economy ह्या १८२० मध्ये लिहिलेल्या ग्रंथाच्या पहिल्या खंडात मूल्य आणि वितरणाची चर्चा केली आहे तर दुसऱ्या खंडामध्ये ( The Progress of wealth ) आर्थिक विकासासंबंधिचे विचार मांडले आहेत . 

' लोकसंख्येचा सिद्धांत यामुळे मार्शल जगाला परिचीत असले तरी त्यांनी अर्थशास्त्रातील अनेक प्रश्नाचा अभ्यास केला आहे . चिंतन केले आहे . उपाययोजना सुचविलेल्या आहेत . त्यामुळे तर इतर सनातनवादी विचारवंतापेक्षा वेगळे स्थान प्राप्त झाले आहे . आर्थिक विकास : माल्थसच्या मते , कोणत्याही देशाचा विकास हा त्या देशातील संपत्तीच्या वाढीवर अवलंबून असतो. त्याचबरोबर संपत्तीचे वितरण देखील तेवढेच महत्त्वाचे असते असे माल्थसने दाखूवन दिले आहे . 

देशातील  संपत्तीची वाढ , श्रमिकाने केलेले एकुण उत्पादन आणि त्याचे मूल्य यावर अवलंबून असते . संपत्तीची वाढ जेवढी अधिक असते . तेवढा देशाचा आर्थिक विकास अधिक असतो . असे म्हणता येईल . परंतु वितरणाकडे मात्र दुर्लक्ष करून चालणार नाही . आर्थिक विकासाची क्रियाही आपोआप घडून येणारी नसते . तर त्यासाठी आवश्यक ते प्रयत्न करणे महत्त्वाचे असते . महत्वाच्या घटकाकडे अधिक लक्ष द्यावे लागते . माल्यसने आर्थिक विकास व लोकसंख्या याच्यातील संबंध कशा प्रकारचा असतो याचे स्पष्टीकरण केले आहे . जसजसी लोकसंख्या वाढत जाते तसतसा आर्थिक विकास अधिक होतो असे म्हणणे चुकीचे आहे असे माल्थसने सांगितले . तसेच लोकसंख्या वाढ आर्थिक विकासाचे कारण म्हणता येणार नाही . तर आर्थिक विकासाचा परिणाम म्हणजे लोकसंख्या वाढ असे मात्र म्हणता येते.

 उलट अधिक लोकसंख्या वाढ ही विकासास सहाय्यभूत ठरत नसून विकासामध्ये अडथळा निर्माण करते . असे माल्थसने स्पष्ट केले आहे . अशाने विकासाची प्रक्रिया सुरळीत चालण्याऐवजी चढ - उताराची राहील . लोकसंख्या वाढीची प्रवृत्ती नैसर्गिक जरी असली तरी उत्पादनात मात्र फारशी वाढ होऊं शकत नाही . हे पटवून देण्यासाठी माल्थसने स्पेन , पोर्तुगाल , हंगेरी , तुर्कस्थान आणि आशिया व आफ्रिका खंडातील बऱ्याच देशाचे उदाहरण दिले आहे . माल्थसच्या मते , देशामध्ये उत्पादन वाढीचा वेग वाढवावयाचा असेल व देशाचा आर्थिक विकास जलद गतीने घडवून आणावयाचा असेल तर भूमी , श्रम , भांडवल आणि संघटन ह्या चार उत्पादन घटकाचे योग्य प्रमाणात एकत्रीकरण होणे आवश्यक आहे . त्याचबरोबर भांडवल संचयाला देखील विकासाच्या दृष्टिने महत्त्व द्यावयास पाहिजे . तरच विकासामध्ये गती निर्माण होते व ती अधिक काळ टिकून देखील राहते . परंतु भांडवल संचय नफ्यांच्या प्रमाणावर अवलंबून असते . माल्थसचे असे मत आहे की , देशामध्ये जेवढा नफा अधिक होईल तेवढा भांडवलाचा साठा अधिक होतो . परंतु भांडवल संचय करण्याचे कार्य एकटा भांडवलदार वर्ग करू शकतो . श्रमिकांची बचत क्षमता कमी असल्यामुळे भांडवल संचय करणे श्रमिकाला शक्य नसते . 

थोडक्यत  भांडवल संचय जितका अधिक तितका आर्थिक विकास अधिक असे माल्यसने प्रतिपादन केले आहे .

 प्रभावी मागणी : --

 आर्थिक विकासामध्ये लोकसंख्या वाढीला महत्व आहे . परंतु लोकसंख्या वाढली म्हणजे आर्थिक विकासाला चालना मिळेल असे मात्र म्हणता येणार नाही . म्हणून अशाच वाढत्या लोकसंख्येचे महत्व विकासामध्ये आहे की , लोकसंख्या वाढीमुळे प्रभावी मागणीत वाढ घडून येते . व अशीच लोकसंख्या विकासाला प्रेरणा देखील देते . ज्या देशामध्ये प्रभावी मागणीची कमतरता असेल त्या देशाचा आर्थिक विकास होऊ शकत नाही . त्या देशाच्या विकासावर मर्यादा पडते . बचत ही दोन प्रकारची असते.

 एक स्वेच्छेची बचत , जी लोकांकडून स्वेच्छेने गोळा करण्यात येते . दुसरा प्रकार म्हणजे सक्तीची बचत , जी . देशातील लोकाकडून सक्तीकरून वसूल केली जाते . परंतु सक्तीने बचत गोळा करण्यात येत असल्यामुळे उपभोग खर्चात कपात होते . त्यामुळे उपभोगात घट होते व प्रभावी मागणी कमी होते . यामुळे उत्पादकाच्या नफ्याच्या दरात घट होते व याचा प्रतिकूल परिणाम गुंतवणुकीवर होतो , म्हणून सक्तीची बचत केव्हाच विकासास पोषक ठरत नाही . थोडक्यात , प्रभावी मागणीच्या कमतरतेमुळे आर्थिक विकासात अडचण निर्माण होते असे माल्थसला म्हणावयाचे आहे . वरील मत मांडत असताना माल्यसनी जे.बी.से.नी मांडलेला ' प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करतो . हा सिद्धांत अमान्य केला . कारण हा सिद्धांत जर मान्य केला असता तर देशामध्ये कधीच कमी किंवा जास्त उत्पादन होऊ शकत नाही . 

असे ' से ' चा नियम सांगतो . परंतु माल्थसला हे मान्य नव्हते . माल्यसच्या मते अति उत्पादनाची अवस्था देशामध्ये निर्माण होणे अगदी शक्य आहे . हे त्याच्या ' Theory of over production ' मध्ये स्पष्ट केले आहे . श्रमिक हा उत्पादनात श्रमाचा पुरवठा करणारा घटक म्हणून काम करीत असतो पण त्याच वेळेस तो उपभोक्ता सुद्धा असतो . परंतु प्रत्यक्षात मात्र जेवढ्या मूल्याचे उत्पादन करतो त्या पेक्षा कमी मोबदला त्याला दिला जातो . त्यामुळे त्याने सर्वच उत्पन्न उपभोगावर खर्च केला तरी उत्पादनात ज्या प्रमाणात भर घातली त्या प्रमाणात त्या वस्तूची तो मागणी करू शकत नाही . थोडक्यात , जेवढ्या वस्तुचा तो पुरवठा करतो तेवढ्या वस्तुची मागणी मात्र करू शकत नाही . त्यामुळे देशात उपभोग न्यूनतेची स्थिती निर्माण होते . व त्याचा परिणाम म्हणून प्रभावी मागणी देखील कमी होते . प्रभावी मागणी कमी असेल तर अतिउत्पादनाची स्थिती देशामध्ये निर्माण होते . मागणी पेक्षा वस्तुचा पुरवठा अधिक असल्याने वस्तुच्या किंमती घटतात . विक्री कमी , नफा कमी भांडवलदाराचा भांडवल संचय देखील कमी शेवटी आर्थिक विकासाचा वेग कमी . म्हणजे अशा परिस्थितीत आर्थिक विकासाचा वेग अधिक होणे शक्य नाही असे मावस यांनी मांडले आहे . माल्थसने प्रभावी मागणी अभावी अतिरिक्त उत्पादनाची जी स्थिती येते ती नष्ट करण्यासाठी अंतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचा विस्तार झाला पाहिजे असा उपाय सुचविला आहे . यासाठी श्रमविभाजनाच्या तत्वाचा वापर केला पाहिजे व वाहतूक व दळणवळणाची साधने मोठया प्रमाणात उपलब्ध झाली पाहिजेत . माल्थसच्या मते , मागासलेल्या राष्ट्राच्या बाबतीत श्रमिक व उत्पादक वर्गाचा श्रमपुरवठ्याचा व मागे वळणारा असतो . यासाठी त्यांनी आयर्लंड व मेक्सिको सारख्या मागासलेल्या राष्ट्राचे उदाहरण घेतले आहे . 

अशा राष्ट्रामध्ये अधिक श्रम करण्यासाठी वेतन दर फारच कमी असतो . त्याच बरोबर नफ्याचा दर देखील कमी असतो म्हणून श्रमपुरवठ्याचा वक्र मागे वळणारा असतो असे माल्थसचे मत आहे . यासाठीच आंतर बाजारपेठेची उपलब्धता झाली पाहिजे . तरच प्रभावी मागणीत वाढ होऊन किंमतीची पातळी वाढेल . त्याचा परिणाम म्हणून येतनदर आणि नफ्याचा दर ही वाढतो म्हणजे श्रमिक आणि उत्पादक या दोधाचाही फायदा होतो . त्यामुळे श्रमिकास व उत्पादकास आपली उत्पादकता वाढविण्यास प्रोत्साहन मिळते . 

त्यातूनच आर्थिक विकास घडवून येतो . अनुत्पादक उपभोक्ता खर्चामध्ये वाढ करून देखील प्रभावी मागणीमध्ये वाढ करता येते असे माल्थसने सुचविले आहे . 

मूल्यमापन : 

माल्थस सनातनवादी विचारधारेतील असून अॅडमस्मिथ व रिकार्डो यांच्या पेक्षा वेगळेपण असणारा आहे . हे त्याच्या लिखाणातून अभ्यासातून सिद्ध झाले आहे . ' से ' च्या पुरवठा आपली मागणी निर्माण करतो या सिद्धांतास यांनी विरोध केला आहे . हे कसे चुकीचे आहे . याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी केले आहे . प्रभावी मागणीची कल्पना , बचत आणि गुंतवणुकीशी संबंधीत आहे हे स्पष्ट केले . म्हणून माल्थस हा केन्स आणि कलेकी झा आधुनिक अर्थशास्त्राच्या जवळचा वाटतो असे मत हिगिन्स यांनी व्यक्त केले आहे . आज प्रचलित असणारे बरेचसे उपाय माल्थसच्या विवेचनात दिसू येतात . त्यांनी जमिनीच्या पुनर्वाटपावर भर दिला . भुमिसुधारणा झाली पाहिजे . असे माल्यसचे मत होते . विकसनशील देशाचा आर्थिक विकास मंदगतीने का होतो याचेही स्पष्टीकरण अनेक राष्ट्राची उदाहरणे देऊन केले आहे . संतुलीत विकास तत्वावर भर दिला . व्यापाराचा . बाजाराचा विस्तार झाला पाहिजे तरच देशाचा विकास होतो अशी अग्रही भूमिका मांडली . तसेच अविकसित राष्ट्राच्या कृषी विकासाचा परिणाम निश्चित त्या राष्ट्राच्या औद्योगिक विकासावर देखील होतो . असे महत्त्वपूर्ण विचार मांडले . म्हणूनच असे म्हटले जाते की , आधुनिक विचारांचे मूळ माल्थसच्या विचारामध्येच आहे . एवढेच नाही तर ' केंद्रीज विचारपंथातील प्रथम पुरुष ' असा केन्स यांनी उल्लेख केला आहे . एवढे असून सुद्धा बरेचसे दोष माल्थसच्या विवेचनात राहून गेले आहेत . म्हणून काही अर्थतज्ज्ञांनी विचारवंतांनी माल्थसच्या सिद्धांतावर टीका केली आहे . ती खालीलप्रमाणे . 

टीकात्मक परीक्षण :

  1.  माल्थसचा सिद्धांत शाळकरी मुलासारखा आहे . उथळ आहे . अशी टीका कार्लमार्क्स यांनी केली आहे . 
  2.  माल्थस हा आशावादी नसून निराशावादी आहे .
  3. वाढती लोकसंख्या विकासात अडसर निर्माण करते हा विचार बऱ्याच विचारवंताना मान्य नाही . 
  4. प्रभावी मागणी वाढविण्यासाठी अनुत्पादक उपभोक्ता खर्चात वाढ झाली पाहिजे असे म्हणणे चुकीचे आहे .. 
  5.  माल्यसने अतिरिक्त उत्पादनाच्या स्थितीवर मात करण्यासाठी बाजारपेठेच्या विस्तारावर भर दिला आहे . परंतु अविकसित राष्ट्रात प्रभावी मागणी कमी असू शकेल . परंतु अतिरिक्त उत्पादनाची स्थितीच निर्माण होत नाही . तर ती कशी नियंत्रित करता येईल याचा विचार करणे
  6. प्रभावी मागणीस अतिरिक्त महत्त्व देण्यात आले आहे .
  7. फक्त उत्पादकच भांडवल संचय करू शकतो असे म्हणणे देखील निराधार आहे . चुकीचे आहे . 
  8. विकसित राष्ट्राच्या दृष्टिने निरूपयोगी . वरील दोष ह्या सिद्धांतात असले तरी ते नजरेआड करण्यासारख्ये आहेत . कारण प्रचलित प्रश्नाचा अभ्यास करण्याचे कार्य माल्थसने या सिद्धांतामधून केले आहे , म्हणून माल्थसचे विचार केव्हाही श्रेष्ठच ठरणारे आहेत .

BASY


Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English