Category

Show more

आर्थिक विकासाचे सिध्दांत १ ( Theories of Economic Development )

आर्थिक विकासाचे सिध्दांत १( Theories of Economic Development - 

अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा.

प्रास्ताविक : - दुसऱ्या महायुध्दामुळे अनेक राष्ट्रांतील पायाभूत सुविधा उध्वस्त होवून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते . यातून अर्थव्यवस्थेला सावरून विकासाचा वेग वाढविणे आवश्यक होते . त्यामुळे अनेक अर्थशास्त्रज्ञांनी आर्थिक विकासाचे सिध्दांत मांडले . आर्थिक विकास म्हणजे देशाच्या स्थूल राष्ट्रीय उत्पादनात वाढ घडवून आणणे होय . म्हणजे देशातील नैसर्गीक साधन सामग्री , भांडवल व मानवी साधने यांच्या साह्याने अर्थव्यवस्थेत संख्यात्मक व गुणात्मक बदल घडवून आणणे होय . हे बदल कशा पध्दतीने होते . लोकांच्या राहणीमानात कशी वाढ होते , अर्थव्यवस्था विकासाकडे कशी वाटचाल करते याविषयी अनेक अर्थतज्ञांनी आर्थिक विकासाच्या सिध्दांताची मांडणी केली आहे . 

अभिमतपंतीयाचा विकासाचा सिध्दांत ( Classical Theories of Development )

 अॅडम स्मिथ यांना अभिमत पंतांचे ( सनातनवादी ) संस्थापक मानले जाते . त्यांनी आपले आर्थिक विचार ' आशावाद ' , ' निसर्गवाद ' व ' आदर्श हात ' यांच्या साह्याने मांडले . अॅडम स्मिथ नंतर त्यांचे अनुयायी रिकार्डो , जॉन स्टुअर्ट मिल , माल्थस , पीगू यांनी त्यांची विचार परंपरा पुढे चालू ठेवली . त्यामुळे या सर्वांना अभिमतपंतीय व त्यांच्या विचाराला सनातनवादी विचार असे म्हणतात . यातील प्रमुख अॅडम स्मिथ , रिकार्डो व माल्थस यांच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे विवेचन केले आहे.

अॅडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत 

 अॅडम स्मिथ यांनी आपल्या ' An Enquiry into the Nature . and causes of Wealth of Nation ' या १७७६ मध्ये प्रकाशित केलेल्या ग्रंथात आर्थिक विचार मांडले आहेत . अॅडम स्मिथ यांनी आर्थिक विकासाचा स्वतंत्र असा सिध्दांत कोठेच मांडला नाही . त्यांच्या आर्थिक विचारातच आर्थिक विकासाचे विवेचन मिळते . त्यामुळे त्यांचा सिध्दांत खालील प्रमुख घटकांद्वारे सांगता येतो.

  ( 1 ) Frenfare a strenare ( Naturalism and optimism ) -

 ' अर्थशास्त्र हे संपत्तीचे शास्त्र आहे त्यामुळे संपत्ती निर्माण करण्याची प्रेरणा व्यक्तीमध्ये मुळातच असते . व्यक्तीला स्वहित कशात आहे हे निसर्गतः समजते . त्यामुळे व्यक्तीहित व समाजहित एकदाच साधले जाते . हे सर्व निसर्गतःच ' अदृश्य हात ' करते . त्यामुळे आर्थिक विकास आपोआप घडून येतो . 

( २ ) निर्हस्तक्षेपाचे धोरण ( Laissez Faire policy ) - 

अॅडम स्मिथ यांच्या मते , मनुष्य मुळातच स्वार्थी आहे . त्यामुळे त्याला स्वतःचे हित कशात आहे हे समजते . म्हणून सरकारने निर्हस्तक्षेपाचे धोरण स्वीकारावे . जर सरकारने हस्तक्षेप केला तर मानवाचे कल्याण होण्याऐवजी अकल्याणच अधिक होते . त्यामुळे सरकारने ठरावीक व अत्यंत महत्वाची कार्ये स्वतःकडे ठेवून अन्य कार्यासाठी बाजारयंत्रणेला पूर्ण स्वातंत्र्य द्यावे . यालाच स्मिथचे निर्हस्तक्षेपाचे धोरण असे म्हणतात . अॅडमस्मिथ यांनी आर्थिक विकास विषयक प्रतिमान मांडत असतांना निर्हस्तक्षेपाचे तत्व प्रभावीपणे मांडण्याचे कार्य केले . कारण त्यांच्या मनावर नैसर्गिक नियमाच्या तत्वाचा प्रभाव पडला होता . निसर्गाच्या नियमावर विश्वास होता . निर्हस्तक्षेपाचे तत्व त्रिकालाबाधीत सत्य आहे . असे स्मिथमचे मत होते.
             निसर्गाच्या नियमानुसार प्रत्येक व्यक्तिला आपले हित कशामध्ये आहे हे समजू शकते . त्यामुळे प्रत्येकाला स्वतःचे हित साध्य करण्यासाठी परवानगी दिली पाहिजे . कारण व्यक्तीचे हित हेच समाजाचे हित असते . व्यक्तीचा विकास झाला म्हणजे सामाजिक हितासाठी वेगळी धडपड किंवा प्रयत्न करण्याची कांहीच गरज नसते . व्यक्तीला स्वातंत्र्य दिले म्हणजे आपणास लागेल तेवढी संपत्ती तो आपोआपच निर्माण करेल . त्यातून समाजाची संपत्ती वाढेल , त्या संपत्तीचा वापर व्यापार , उद्योगासाठी होईल व देशाचा आर्थिक विकास घडून येईल.
                      स्मिथ यांना व्यवहारातील व्यापारातील हस्तक्षेप मान्य नव्हता . सरकारने काही महत्त्वाची कार्ये देशाच्या व समाजाच्या हिताच्या दृष्टिने आपल्याकडे ठेवावीत व बाकीच्या सर्वच क्षेत्रामध्ये व्यक्तीला स्वातंत्र्य द्यावे . संरक्षण कायदा व सुव्यवस्था , रस्तेबांधणी इत्यादी कार्य सरकारकडे असावीत.
                   ज्यावेळी व्यक्तीगत स्वार्थापोटी मक्तेदारी निर्माण करण्याचा प्रयत्न व्यक्तीकडून होईल तेंव्हा ती मक्तेदारी दूर करण्यासाठी मक्तेदारीविरुद्ध कायदे करणे , बँक निर्मित चलन , व्याजदराचे नियंत्रण , सक्तीचे प्राथमिक शिक्षण इत्यादी बाबतीत स्मिथने सरकारच्या हस्तक्षेपाचे समर्थन केले . तर देशाचा व्यापार हा मुक्त स्वरूपाचा असावा त्यावर कसल्याच प्रकारचे बंधन नसले पाहिजे . म्हणूनच त्यांनी आर्थिक विकासाच्या कार्यामध्ये निर्हस्तक्षेपाच्या धोरणाचा पुरस्कार केला आहे. 

( ३ ) श्रमविभाजन ( Division of Labour )

 अॅडम स्मिथ यांच्या आर्थिक विवेचनात श्रमविभाजनाला अधिक महत्व आहे . त्यांच्या मते श्रमविभाजनाच्या तत्वामुळे उद्योगसंस्थेत मोठ्या प्रमाणात उत्पादन होते . अनेक कामे एका व्यक्तीकडून करून घेण्यापेक्षा एका व्यक्तीला एकच काम दिले तर तो त्या कामात कुशल बनेल , त्यामुळे उत्पादन व्यवस्था प्रगत होईल . त्यातून उत्पादन खर्च घटतो , वस्तूचा दर्जा सुधारतो व वस्तूचे एकत्रित परिमाण वाढून आर्थिक विकास आपोआप घडून येतो . श्रमिकाने एखाद्या वस्तुच्या एकाच भागाच्या उत्पादनावर अधिक लक्ष दिल्यास त्यामध्ये तो तबैज अथवा वाकबगार बनतो . कमी वेळेमध्ये अनेक सुट्या भागाचे उत्पादन करू शकतो . अधिक उत्पादन होण्यास मदत होते . देशांतर्गत वस्तुचा साठा पुरवठा वाढतो .
 देशात पुरेशी मागणी नसेल तर परदेशातही निर्यात केले जाईल यालाच स्मिथ यांनी ' मानवी स्वभावातील विनिमयाची नैसर्गिक प्रवृत्ती असे संबोधले आहे . श्रमविभागणीमध्ये एका वस्तुच्या निर्मितीचे काम अनेक विधेमध्ये वाटले जाते . त्यामुळे कमी खर्चात वस्तुची निर्मिती होते . वेळेची बचत होते . उत्पादकतेत वाढ होते . राष्ट्रीय उत्पन्न वाढते . रोजगार व वेतनात वाढ होते . लोकसंख्या वाढते . लोकसंख्या वाढल्याने बचत वाढते तर दुसऱ्या बाजूने वस्तुची मागणी वाढते . पुन्हा श्रमविभागणीच्या तत्वाचा वापर करून अधिक उत्पादन करता येते व मागणी आणि पुरवठ्यात संतुलन साधता येते . बहिर्गत बचतीचे फायदे मिळतात . उत्पादन खर्च कमी होतो . नफ्याचे प्रमाण वाढते . गुंतवणूकीस प्रोत्साहन मिळते . अशा प्रकारे श्रमविभाजनामुळे आर्थिक विकासाची प्रक्रिया गतीशील बनते व देशाचा आर्थिक विकास घडून येतो . म्हणून अॅडमस्मिय यांनी श्रमविभागणीच्या तत्वाचा पुरस्कार केला आहे . 

( ४ ) भांडवल संचय ( Capital Accumulation )

 अॅडमस्मिथ यांनी आर्थिक विकासामध्ये भांडवल संचयावर व बचतीवर अधिक भर दिला आहे . त्यांच्या मते ज्या अर्थव्यवस्थेमध्ये भांडवल संचय अधिक असेल अशा अर्थव्यवस्थेत नैसर्गिक साधनसंपत्तीचा योग्य प्रमाणात वापर होतो व आर्थिक विकास घडून येतो . म्हणजे भांडवल संचय हा आर्थिक विकासातील प्रमुख घटक आहे असे स्मिथनी प्रतिपादन केले आहे . परंतु हा भांडवल संचय कसा होतो . याचे स्पष्टीकरण स्मिथ यांनी पुढील प्रमाणे केले आहे . भूमी , श्रम , भांडवल , संघटन व तंत्रज्ञान ह्या सर्वच घटकाला स्मिथने महत्त्व दिले आहे . भांडवलदार , जमिनदार बचत करू शकतात पण श्रमिक मात्र बचत करू शकत नाही . कारण श्रमिका मिळणारा मोबदला म्हणजे मजुरी ही निर्वाह पातळी इतकी असते . म्हणून तो आपले सर्वच उत्पन्न उपभोगावर खर्च करतो . त्यामुळे त्याच्या उत्पन्नाचा हिस्सा शिल्लक राहू शकत नाहीत . म्हणून श्रमिक वर्ग बचत करू शकत नाही .
 वेतनाचा दर कमी असल्यामुळे उत्पादनाचा सरासरी खर्च कमी , त्यामुळे वस्तुची किंमत कमी आकारून अधिक विक्री करून , अधिक नफा कमविण्याचे कार्य भांडवलदार करित असतो . भांडवल संचय करू शकतो . जेवढा भांडवल संचय अधिक तेवढा देशाचा आर्थिक विकास अधिक होतो .
 त्यामुळे देशाच्या विकासासाठी भांडवल संचयाचा दर नेहमी वाढता असावयास पाहिजे असे अॅडमस्मिथ यांचे मत होते . अॅडमस्मिथ यांनी बदलता व्याजाचा दर भांडवल संचयावर परिणाम करतो याचेही स्पष्टीकरण केले आहे . थोडक्यात देशामध्ये बचत करण्याचे कार्य फक्त भांडवलदार करीत असतो . त्यामुळे भांडवल संचय देखील (अधिक होतो . अधिक संचय आर्थिक विकासास सहाय्यभूत ठरते . 

 ५ ) आर्थिक विकासाची प्रक्रिया 

अधिक होतो . अधिक संचय आर्थिक विकासास सहाय्यभूत ठरते . अॅडम स्मिथ यांच्या मते आर्थिक विकासाची प्रक्रिया स्वयंचलित असते . त्यामुळे कोणी विशेष प्रयत्न करण्याची आवश्यकता नाही . श्रमविभाजन व विशेषीकरणामुळे उत्पादन वाढते . त्यामुळे उत्पन्न वाढून मागणी वाढते . त्यामुळे पुन्हा उत्पादनात वाढ होते . अशी ही प्रक्रिया सतत चालू असते . अॅडमस्मिथच्या मते आर्थिक विकास ही स्वतःच्या गतीने पुढे जाण्याची प्रवृत्ती असते . तसेच ती अविरतपणे चालणारी प्रक्रिया आहे . तसेच ती संचयी स्वरूपाची प्रक्रिया आहे . विकासास सुरुवात झाली म्हणजे भांडवलाचा साठा वाढतो , रोजगारात व वेतनात देखील वाढ होते . 
उत्पन्न वाढते . त्यामुळे औद्योगिक विकासाला प्रेरणा मिळते.
 देतनात वाढ झाल्यामुळे लोकसंख्या वाढून भागणीत वाढ होते . बाह्य बचतीचा लाभ मिळून कमीत कमी खर्चात अधिक उत्पादन केले जाते . त्यामुळे अधिक विक्री होऊन नफ्याचे प्रमाण वाढते वाढत्या नफ्याचा वापर पुढे उत्पादनात व संशोधनात करण्यात येतो . उत्पादन यंत्रात सुधारणा घडून आणली जाते . अशा रितीने एकदा विकासास सुरुवात झाले म्हणजे पुढे आपोआप त्याच गतीने सुरू राहतो . असेच दिर्घकाळ चालत राहिले म्हणजे देशाचा सर्वागिण विकास होण्यास फार विलंब लागत नाही. 

( ६ ) स्थैतिक अवस्था ( Static state ) . -

 आर्थिक विकासाची प्रक्रिया सतत चालू राहते व त्यात उत्तरोत्तर वाढ होत जाईल ; पण याचा अर्थ असा नाही की आर्थिक विकास अमर्याद होईल . म्हणून अॅडम स्मिथ म्हणतो अर्थव्यवस्थेत स्थैतिक अवस्था येते . त्यानंतर कितीही प्रयत्न केले तर उत्पादन , उत्पन्न वाढविणे शक्य नसते . 
त्यामुळे कांही काळ जावू द्यावा लागतो . त्यानंतर पुन्हा विकासाला सुरूवात होते . अशा प्रकारची स्थैतिक अवस्था असते . याची जाणीव त्यांनी करून दिली . थोडक्यात वरील अनेक विचाराच्या एकत्रीकरणाला अॅडम स्मिथ यांचा आर्थिक विकासाचा सिध्दांत म्हणतात.
 टीका : 
                 अॅडम स्मिथ यांच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांतावर खालील प्रमाणे टीका केलेली दिसून येते . 
  •  पूर्ण स्पर्धेचे गृहीत अवास्तव . 
  • निर्हस्तक्षेपाच्या धोरणावर हस्तक्षेप . 
  • प्रत्येक व्यक्तीला स्वहित समजतेच असे नाही . 
  •  आर्थिक विकासात भांडवलाला आवश्यकतेपेक्षा अधिक महत्व दिले . 
  •  अर्थव्यवस्थेत स्थैतिक अवस्था नसते .

अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा.
अॅडम स्मिथच्या आर्थिक विकासाच्या सिध्दांताचे टीकात्मक परिक्षण करा.


                        

Comments

Popular posts from this blog

All project solutions in PDF format

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

A Living God - Patrick Lafcadio Hearn (Koizumi Yakumo) Full Chapter