Consumer's Behaviour - उपभोक्त्याचे वर्तन
Consumer's Behaviour Economics - प्रा. स्टॅन्ली जेव्हॉन्स
प्रा. स्टॅन्ली जेव्हॉन्स यांच्या मते, वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागविण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय.
प्रस्तावना
सूक्ष्म अर्थशास्त्र हे अर्थव्यवस्थेतील वैयक्तिक घटकांच्या वर्तणुकीशी संबंधित असते. व्यावहारिक दृष्टीने प्रत्येक व्यक्ती उपलब्ध साधन-सामग्रीच्या सहाम्याने आपल्या गरजा भागविण्याचा प्रयत्न करत असते. सारे तर, मनुष्याच्या गरजा अमर्यादित आहेत. त्यामुळे सर्व मानवी गरजा एकाचवेळी पूर्ण होऊ शकत नाहीत. परंतु विशिष्ट गरज एखादया निश्चित वेळी पूर्णपणे भागविता येते. उपभोक्त्याच्या वर्तणुकीचा अभ्यास म्हणजेच उपयोगिता विश्लेषण हे आपल्याला महत्तम समाधान प्राप्त करण्यासाठी उपभोक्त्याकडून गरजा भागवण्याचे कसे प्रयत्न केले जातात त्याचे स्पष्टीकरण देते.
साधारणपणे, उपयोगिता म्हणजे वस्तूची उपयुक्तता होय. परंतु अर्थशास्त्रानुसार उपयोगिता म्हणजे वस्तूमधील गरज पूर्ण करण्याची
शक्ती होय. प्रा. स्टॅन्ली जेव्हॉन्स यांच्या मते, "वस्तूमध्ये असणारी मानवी गरज भागवण्याची क्षमता म्हणजे उपयोगिता होय."
- उपयोगितेची वैशिष्ट्ये
- सापेक्ष संकल्पना
- व्यक्तिनिष्ठ संकल्पना
- नैतिकदृष्ट्या तटस्थ
- उपयोगिता म्हणजे उपयुक्तता नव्हे,
- उपयोगिता म्हणजे आनंद नव्हे उपयोगिता व समाधान वेगवेगळे आहेत
- मापन करणे कठीण
- गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते मागणीचा आधार
१) सापेक्ष संकल्पना -
उपयोगिता ही स्थल कालाशी संबंधित असते. म्हणजेच काळानुसार व स्थळानुसार उपयोगितेत बदल होत असतो.
उदा. उन्हाळ्यात सुती कपड्यांची तर हिवाळ्यात लोकरीच्या कपड्यांची उपयोगिता जास्त असते. तसेच मुंबईपेक्षा काश्मिरमध्ये लोकरीच्या कपड्यांची उपयोगिता जास्त असते.
२) व्यक्तिनिष्ठ संकल्पना
एखाद्या वस्तूची उपयोगिता सर्व व्यक्तींसाठी सारखी नसते. ती व्यक्तीनुसार बदलते कारण तोकांची रूची, पसंती, आवड-निवड यामध्ये फरक असतो.
उदा. निरक्षर व्यक्तीपेक्षा साक्षर व्यक्तीला पुस्तकाची उपयोगिता जास्त असते.
३) नैतिकदृष्ट्या तटस्थ
उपयोगितेच्या संकल्पनेत नैतिकतेचा विचार केला जात नाही. उपयोगिता नैतिकदृष्ट्या तटस्थ असते. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती कोणतीही गरज भागवू शकते. ही उपयोगिता चांगले किंवा वाईट, नैतिक किंवा अनैतिक असा फरक करीत नाही.
उदा. गृहिणीला भाजी कापण्यासाठी चाकूची उपयोगिता असते तर मारेकरी एखादयाला मारण्यासाठी चाकू वापरतो.
४) उपयोगिता म्हणजे उपयुक्तता नव्हे
उपयोगिता म्हणजे वस्तूमधील गरज भागविण्याची क्षमता होय. तर उपयुक्तता म्हणजे वस्तूपासून उपभोक्त्याचे होणारे हित होय. उपयोगिता व्यक्तीच्या | समाधानाची पातळी व्यक्त करते आणि उपयुक्तता वस्तूचे उपयोगमूल्य | दर्शविते. ज्या वस्तूमध्ये उपयोगिता असते ती उपयुक्त असेलच असे नाही.
उदा. धूम्रपान करणान्याला सिगारेटची उपयोगिता असते. परंतु सिगारेट आरोग्याला अपायकारक असल्यामुळे त्यात उपयुक्तता नसते.
५) उपयोगिता म्हणजे आनंद नव्हे
उपयोगिता आणि आनंद या दोन्ही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. वस्तूमध्ये उपयोगिता असली तरी तिचा उपभोग आनंद किंवा सुख देणारा असतोच असे नाही. उदा. आजारी मनुष्याला इंजेक्शनची उपयोगिता आहे. परंतु त्याला इजेशनपासून आनंद मिळत नाही.
६) उपयोगिता व समाधान वेगवेगळे आहेत
उपयोगिता व समाधान या जरी परस्परसंबंधित संकल्पना असल्या, तरी त्यात फरक | आहे. उपयोगिता म्हणजे मानवी गरज भागविण्याची क्षमता होय. तर समाधान म्हणजे व्यक्तीला होणारी सुखाची जाणीव होय. म्हणजेच उपयोगिता वस्तूशी संबंधित असते. तर समाधान हे व्यक्तीकडून अनुभवले जाते. उपयोगिता है अपेक्षित असे समाधान असते. तर समाधान ही प्रत्यक्ष अनुभूती असते.
थोडक्यात, उपयोगिता ही उपभोगाची सुरुवात असते, तर समाधान उपभोगाचा अंतिम परिणाम असतो..
७) मापन करणे कठीण
उपयोगिता ही मानसशास्त्रीय संकल्पना आहे. ती अदृष्य आणि अमूर्त आहे. तिचे संख्यात्मक म्हणजे अंकांमध्ये मापन करता येत नाही. परंतु एखादी व्यक्ती अंदाजाने उपयोगिता मापन करु शकते.
उदा. : जेव्हा तहानलेली व्यक्ती पाणी पिते तेव्हा होणान्या समाधानाच्या कमी-अधिक पातळीतून ती व्यक्ती उपयोगिता मिळवते.
(८) गरजेच्या तीव्रतेवर अवलंबून असते-
वस्तूची उपयोगिता ही व्यक्तीच्या गरजेची तीव्रता किंवा निकड यावर अवलंबून असते. जेवढी गरजेची तीव्रता जास्त तेवढी उपयोगिता अधिक असते. गरजेची तीव्रता कमी झाल्यास उपयोगिता कमी होते.
उदा. : भुकेलेल्या व्यक्तींसाठी अन्नपदार्थांची उपयोगिता जास्त असते. जसजशी भूक भागत जाते. तसतशी उपयोगिता घटत जाते.
९) मागणीचा आधार
उपयोगिता मागणीचा आधार आहे. एखादया वस्तूमध्ये उपयोगिता नसेल तर व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करणार नाही. जर ती वस्तू उपयोगिता देणारी असेल तरच व्यक्ती त्या वस्तूसाठी मागणी करेल. उदा. विद्यार्थ्यांना पेनची गरज आहे. म्हणून त्यांना पेनची जास्त उपयोगिता आहे.
- उपयोगितेचे प्रकार -
- रूप उपयोगिता
- स्थल उपयोगिता
- काल उपयोगिता
- सेवा उपयोगिता
- ज्ञान उपयोगिता
- स्वामित्त्व उपयोगिता
उपयोगितेचे प्रकार पुढीलप्रमाणे आहेत
१) रुप उपयोगिता
जेव्हा एखादया अस्तित्त्वात असलेल्या वस्तूचे आकारमान किंवा स्वरूप बदलल्यामुळे उपयोगिता वाढते, तेव्हा त्यास रुप उपयोगिता असे म्हणतात.
मातीची खेळणी बनवणे, लाकडापासून फर्निचर, कापडापासून पोषाख तयार करणे ही रूप उपयोगितची उदाहरणे आहेत.
२) स्थल उपयोगिता
जेव्हा वस्तूचा वापर करण्याच्या जागेत बदल झाल्यामुळे उपयोगिता वाढते तेव्हा त्यास स्थल उपयोगिता असे म्हणतात. जेथे उत्पादन होते तेथून, जेथे वस्तूचा उपभोग घेतला जातो त्याठिकाणी वस्तू स्थलांतरित केल्यामुळे देखील स्थल उपयोगिता निर्माण होते.
उदा. समुद्रकाठची वाळू बांधकामासाठी आणली असता तिची उपयोगिता वाढते.
३) काल उपयोगिता
काळानुसार वस्तूमध्ये जी उपयोगिता निर्माण होते त्यास काल उपयोगिता म्हणतात.
उदा. हिवाळ्यापेक्षा पावसाळ्यात छत्र्यांची उपयोगिता जास्त असते. वस्तूची साठवण करून आवश्यकतेच्या किंवा दुर्मिळतेच्या काळात वापर केला तर तीदेखील काल उपयोगिता होय.
४) सेवा उपयोगिता
जेव्हा समाजातील विविध घटकांदवा इतरांना व्यक्तिगत सेवा पुरवण्यात येतात. तेव्हा सेवा उपयोगिता निर्माण होते. डॉक्टरांकडून आजारी व्यक्तींना दिली जाणारी वैदयकीय सेवा, शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना प्राप्त होणारे ज्ञान, वकिलांकडून त्यांच्या अशिलांना मिळणारा सल्ला इत्यादी सेवा उपयोगितेची उदाहरणे आहेत. याबाबतीत उत्पादन व उपभोग या दोन्ही गोष्टी एकाच वेळी होत असतात.
५) ज्ञान उपयोगिता
जेव्हा उपभोक्ता विशिष्ट वस्तूबद्दल ज्ञान प्राप्त करतो तेव्हा त्यांची ज्ञान उपयोगिता वाढते. उदा. जेवा व्यक्तीला मोबाईल फोन (भ्रमणध्वनी) किंवा संगणकाच्या विविध कार्यप्रणालींचे ज्ञान होते तेव्हा त्यांची उपयोगिता वाढते.
६) स्वामित्व उपयोगिता
जेव्हा वस्तूची मालकी एका व्यक्तीकडून दुसन्या व्यक्तीकडे स्थलांतरित होते तेव्हा स्वामिन्त्र उपयोगिता निर्माण होते. उदा. जेव्हा ग्राहक विक्रेत्यांकडून वस्तू विकत घेतात तेव्हा त्यातून स्वामित्व उपयोगितेचा आनंद मिळवतात.
उपयोगितेच्या संकल्पना -
उपयोगितेच्या दोन मुख्य संकल्पना पुढीलप्रमाणे आहेत.
- एकूण उपयोगिता
- सीमान्त उपयोगिता
१) एकूण उपयोगिता म्हणजे वस्तूच्या सर्व नगांच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणान्या उपयोगितेची बेरीज होय. वस्तूच्या एकापाठोपाठ एक उपभोग घेतलेल्या सर्व घटकांपासून मिळालेली ही समग्र (एकूण) उपयोगिता असते.
TU = ∑MU OR
TUn = MU, + MU, + MU, ... MUn
ए.उ=∑ .सी.उ. (एकूण उपयोगिता म्हणजे सर्व सीमान्त उपयोगितांची बेरीज होय.)
TU→ Total Utility, M.U Marginal Utility.
n→ Number
२) सीमान्त उपयोगिता म्हणजे वस्तूच्या प्रत्येक नगाच्या उपभोगापासून व्यक्तीला प्राप्त होणारी अधिकतम (अतिरिक्त) उपयोगिता होय. ही वस्तूच्या शेवटच्या नगापासून मिळालेली उपयोगिता असते. थोडक्यात, एकूण उपयोगितेत शेवटच्या नगामुळे पडणारी भर म्हणजे सीमान्त उपयोगिता होय.
| MUn = TUnTU (n-1)
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog