उत्पादकाची वर्तणूक Producer's Behavioपॉल सॅम्यूल्सन
व्याख्या -
"बाजारात अस्तित्वात असलेल्या किंमती, विक्रेता व विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय."
|
पॉल सॅम्यूल्सन |
बाजारात विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू व सेवांचे उत्पादन करणे हे उत्पादकाचे मूलभूत कार्य आहे. बाजारातील मागणी व पुरवठ्याच्या साहाय्याने वस्तू व सेवांच्या किंमती ठरतात, म्हणून मागणीप्रमाणे पुरवठ्याचा अभ्यास करणेही आवश्यक आहे. पुरवठ्याद्वारे किंमत आणि नगसंख्यांचा पुरवठा यातील संबंध स्पष्ट होतो. त्यामुळे पुरवठा व पुरवठ्याशी संबंधित संकल्पना समजून घेणे आवश्यक आहे.
एकूण उत्पादन, साठा आणि पुरवठा एकूण उत्पादनः उत्पादन हे उत्पादन प्रक्रियेद्वारे केले जाते. विशिष्ट कालावधीत अर्थव्यवस्थेत उत्पादित केलेल्या वस्तूंच्या नगसंख्यांची एकूण बेरीज म्हणजे एकूण उत्पादन होय. म्हणून विशिष्ट कालावधीत उत्पादन कार्यासाठी वापरलेल्या सर्व उत्पादन घटकांच्या मदतीने उत्पादन केलेल्या एकूण नगसंख्या म्हणजे एकूण उत्पादन होय. साठा आणि पुरवठा साठा व पुरवठा ह्या दोन्ही परस्पर संबंधित संकल्पना आहेत. पण अर्थशास्त्रात या दोन्ही संकल्पनांचा वेगळा अर्थ आहे. साठा साठा हा पुरवठ्याचा स्त्रोत आहे. साठ्याशिवाय पुरवठा शक्य नाही. विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे विक्रीसाठी उपलब्ध असलेली एकूण नगसंख्या म्हणजे साठा होय.
साठा हा संभाव्य पुरवठा असतो. उत्पादनातील वाढीबरोबर साठ्यात वाढ होते. सर्वसाधारणपणे साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो. कारण एकूण साठ्यात सध्याचा साठा व मागील साठा या दोघांचाही समावेश असतो. टिकाऊ वस्तूंच्या संदर्भात जर बाजार किंमती कमी असतील, तर सर्व साठा विक्रीसाठी आणला जात नाही, तर काही भाग साठवला जातो. पण नाशवंत वस्तूंचा उदा. भाज्या, मासे इत्यादीचा साठा व पुरवठा समान असतो. कारण ह्या वस्तू दीर्घकाळापर्यंत साठवून ठेवता येत नाहीत, म्हणून साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त किंवा पुरवठ्याबरोबर असतो. पण पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त नसतो. राखीव किंमतः विक्रेत्याने गृहीत धरलेली अपेक्षित किंमत म्हणजे राखीव किंमत होय. राखीव किंमत ही पुरवठ्याचा आधार असते. पुरवठाः पुरवठा ही सापेक्ष संकल्पना आहे. तो नेहमी किंमत, वेळ आणि नगसंख्यांचे परिमाण या संबंधात व्यक्त केला जातो.
व्याख्या:
पॉल सॅम्यूल्सनच्या मते, 'बाजारात अस्तित्वात असलेल्या किंमती, विक्रेता व विक्रीसाठी इच्छुक असलेल्या वस्तूंची नगसंख्या यातील संबंध म्हणजे पुरवठा होय.
"विशिष्ट वेळी विशिष्ट किमतीला साठ्यातील जो भाग प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणला जातो, त्यास पुरवठा असे म्हणतात. पुरवठा हा साठ्यातील प्रवाह आहे तर साठा हो पुरवठ्याचा स्रोत (उगम) आहे. याचाच अर्थ विशिष्ट वेळी विशिष्ट किंमतीला विक्रेत्याने प्रत्यक्ष विक्रीस आणलेल्या वस्तूंची नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय. उदा. समजा शेतकल्याने २००० कि.ग्रॅ. तांदळाचे उत्पादन केले. तोच साठा होय. या साठ्यातील ₹३० दराने ८०० कि. ग्रॅ. तांदूळ प्रत्यक्ष बाजारात विक्रीसाठी आणले. ८०० कि. ग्रॅ. तांदूळ हा बाजारातील प्रत्यक्ष पुरवठा होय. वरील व्याख्यांवरून पुरवठ्यासाठी आवश्यक असलेले चार पटक स्पष्ट होतात.
- वस्तूची नगसंख्या
- विक्रीची इच्छा
- वस्तूंची किंमत
- विशिष्ट कालावधी
- विशिष्ट कालावधीत विक्रेत्याकडे अस्तित्वात असलेली एकूण नगसंख्या म्हणजेच साठा होय. यालाच संभाव्य पुरवठा असे म्हणतात. विशिष्ट किमतीत विशिष्ट कालावधीत विक्रेत्याने विक्रीसाठी आणलेली नगसंख्या म्हणजेच पुरवठा होय.
- साठा हा उत्पादनावर अवलंबून असतो. पुरवठा हा साठा व किंमतीवर अवलंबून असतो.
- साठा हा स्त्रोत आहे. पुरवठा हा प्रवाह आहे.
- साठा हा पुरवठ्यापेक्षा जास्त असतो, पण पुरवठा हा साठ्यापेक्षा जास्त असू शकत नाही.
विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला विविध नगसंख्यांचा केलेला पुरवठा दर्शविणारा तक्ता म्हणजेच पुरवठा पत्रक होय. पुरवठा पत्रक दोन प्रकारचे असते.
१) वैयक्तिक पुरवठा पत्रक: विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला बाजारातील एका विक्रेत्याकडून विक्रीसाठी आणलेल्या नगसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजेच वैयक्तिक पुरवठा पत्रक होय.
उदा.
|
वैयक्तिक पुरवठा पत्रक |
वरील पत्रकावरून असे स्पष्ट होते की, किंमत वाढली असता X वस्तुचा पुरवठा वाढतो. किंमत १ ₹ असताना विक्रेता X वस्तुच्या १० नगसंख्यांचा पुरवठा करतो. किंमत ५ ₹ एवढी वाढली असता पुरवठा ५० नगसंख्या एवढा वाढतो.
२) बाजार पुरवठा पत्रक:-
विशिष्ट कालावधीत विविध किंमत पातळीला बाजारातील सर्व विक्रेत्यांनी विक्रीसाठी आणलेल्या वस्तूची नगसंख्या दर्शविणारे पत्रक म्हणजेच बाजार पुरवठा पत्रक होय. विविध किंमत पातळीला केलेल्या वैयक्तिक पुरवठ्याची बेरीज केल्यास बाजार पुरवठा मिळतो. बाजार पुरवठ्याची संकल्पना पुढील कोष्टकाच्या साहाय्याने स्पष्ट करता येईल.
|
बाजार पुरवठा पत्रक |
वरील तक्त्यात दर्शविल्याप्रमाणे विविध किंमत पातळीला अ, ब व क या विक्रेत्याने केलेल्या पुरवठ्याची बेरीज केली असता बाजार पुरवठा मिळतो. १ ₹ किंमतीला बाजार पुरवठा ६० नगसंख्या एवढा आहे जेव्हा किंमत ५ ₹ पर्यंत वाढते तेव्हा पुरवठा १८० नगसंख्या एवढा होतो.
- पुरवठा ठरविणारे घटक
- बाजार पुरवठा ठरविणारे काही महत्वाचे घटक पुढीलप्रमाणेः
१) वस्तुची किंमतः
किंमत हा वस्तुच्या पुरवठ्यावर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. जास्त किंमतीला अधिक पुरवठा केला जातो व कमी किंमतीला कमी पुरवठा केला जातो.
२) उत्पादन खर्च
उत्पादन घटकांच्या किंमती वाढल्या तर उत्पादन खर्च वाढतो व पुरवठा कमी होतो. ३)स्थती उत्पादन तंत्रातील सुधारणांमुळे उत्पादन खर्च कमी होऊन उत्पादन वाढते व पुरवठाही वाढतो.
४) सरकारची धोरणेः
सरकारची धोरणे उदा. कर, अनुदान, औद्योगिक धोरण इत्यादी मुळे उत्पादन व पुरवठा वाढेल किंवा कमी होईल हे सरकारची धोरणे व स्वरूप यांवर अवलंबून असते.
(५) बाजारपेठेचे स्वरूप
स्पर्धेच्या बाजारात वस्तुचा पुरवठा जास्त असतो. कारण अनेक विक्रेते असतात. पण मक्तेदारीच्या बाजारात एकच विक्रेता असल्यामुळे पुरवठा कमी असतो.
६) इतर वस्तूंच्या किंमती:
इतर वस्तुच्या किंमती वाढल्यास नफ्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे उदयोजक आपल्या उत्पादन सामग्रीचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करतील. उदा. गव्हाच्या किंमती वाढल्या तर, शेतकरी दिलेल्या तांदुळाच्या उत्पादनाऐवजी आपली शेती गव्हाच्या उत्पादनासाठी वापरेल, त्यामुळे तांदुळाचा पुरवठा कमी होईल.
(७) पायाभूत सुविधा:
बीज, दळणवळण, वाहतूक . पायाभूत सुविधांचा परिणाम उत्पादन प्रक्रिया व पुरवठ्यावर होतो. या सुविधांच्या अभावामुळे पुरवठा कमी होतो.
८) आयात व निर्यात निर्यातीमुळे देशातील वस्तूंची उपलब्धता कमी होते, म्हणून पुरवठा कमी होतो. तर आयातीमुळे देशातील पुरवठा वाढतो.
९) भविष्यकालीन अंदाज:
नजीकच्या भविष्यात किमती वाढण्याची शक्यता असल्यास उत्पादक साठा वाढवेल, त्यामुळे पुरवठा कमी होईल.
१०) नैसर्गिक परिस्थितीः
कृषी उत्पादनाचा पुरवठा नैसर्गिक परिस्थितीवर अवलंबून असतो. उदा. पाऊस व चांगले हवामान असल्यास कृषी उत्पादन वाढून पुरवठा वाढेल.
प्रस्तावना सन १८९० मध्ये प्रकाशित झालेल्या "अर्थशास्त्राची मूलतत्वे" या ग्रंथात प्रा. आल्फ्रेड मार्शल यानी पुरवठ्याचा नियम स्पष्ट केला आहे. या नियमाद्वारे किंमत व पुरवठा यातील परस्पर संबंध स्पष्ट केला आहे.
पुरवठा नियमः
प्रा. मार्शलच्या मते, "इतर परिस्थिती स्थिर असताना अधिक किंमतीला जास्त नगसंख्या विक्रीसाठी आणल्या जातात व कमी किंमतीला कमी नगसंख्या विक्रीस आणल्या जातात.'
वरील नियमावरून असे स्पष्ट होते की, इतर परिस्थिती स्थिर असताना अधिक किंमतीला विक्रेता जास्त नगसंख्यांचा पुरवठा करील तर कमी किंमतीला कमी नगसंख्यांचा पुरवठा करील. पुरवठ्याचा नियम कोष्टक व आकृतीच्या साहाय्याने पुढीलप्रमाणे स्पष्ट करता येईल.
|
पुरवठा पत्रक |
|
नग पुरवठा वक्र |
आकृती क्र. ४.१
वरील आकृतीत 'क्ष' अक्षावर नगसंख्यांचा पुरवठा दर्शविला आहे व 'य' अक्षावर किंमत दर्शविली आहे. आकृतीत 'पप' हा पुरवठा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा असून तो किंमत व पुरवठा यांचा समसंबंध दर्शवितो.
पुरवठ्याच्या नियमाची गृहीतके
पुरवठ्याचा नियम हा परिस्थितीजन्य आहे. म्हणून किंमत बदलते व पुरवठा ठरविणारे इतर घटक स्थिर असतात असे गृहीत धरण्यात आले आहे.
ही गृहीतके पुढीलप्रमाणे:
१) उत्पादन खर्चात बदल नाही:
उत्पादन खर्चात बदल होत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे. उत्पादन खर्चातील बदलामुळे विक्रेत्याच्या नफ्यात बदल होईल आणि त्याच किंमतीला पुरवठ्यात बदल होईल.
२) उत्पादन तंत्रात बदल नाही:
उत्पादन तंत्र किंवा उत्पादन पद्धतीत कोणताही बदल होत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे. वस्तूची किंमत कायम असताना सुधारित तंत्रज्ञानामुळे पुरवठ्यात वाढ होईल.
३) सरकारी धोरणात बदल नाही:
सरकारच्या व्यापार विषयक व करविषयक धोरणात कोणताही बदल होत नाही, असे गृहीत घरण्यात आले आहे.
४) वाहतूक खर्च स्थिर:
वाहतूक खर्च व वाहतूक सुविधा यात कोणताही बदल होत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे. उदा. चांगल्या वाहतूक सुविधांमुळे किंमत तीच असताना पुरवठ्यात वाढ होईल.
५) भविष्यकालीन किंमतीचा अंदाज नाही:
भविष्यकाळात वस्तूंच्या किंमतीत होणाऱ्या बदलाविषयी उत्पादकाला कोणताही अंदाज करता येत नाही, असे गृहीत धरण्यात आले आहे.
6) हवामानात बदल नाही:
हवामानात कोणताही बदल होत नाही. पावसाचे प्रमाण योग्य असून पूर, भूकंप अशी कोणतीही नैसर्गिक आपत्ती नाही, कि ज्यांच्यामुळे पुरवठा घटू शकेल.
७) इतर वस्तूंच्या किंमती स्थिरः
इतर वस्तूंच्या किंमती स्थिर आहेत, असे गृहीत धरण्यात आले आहे. जर इतर वस्तूंच्या किंमतीत बदल झाला तर उत्पादक उत्पादन घटकांचा वापर इतर वस्तूंच्या उत्पादनासाठी करेल. त्यामुळे नियम अंमलात येणार नाही.
८) स्थिर उत्पादन प्रमाण:
विशिष्ट कालावधीत उत्पादनाचे प्रमाण स्थिर आहे, असे गृहीत धरण्यात आले आहे.. पुरवठ्याच्या नियमाचे अपवाद काही अपवादात्मक परिस्थितीत किमंत वाढल्यास पुरवठा कमी होतो व किंमत कमी झाल्यास पुरवठा वाढतो. हे अपवाद पुढील प्रमाणे.
१) श्रमाचा पुरवठाः
श्रमाच्या पुरवठ्याच्या संदर्भात मजूरीचा दर वाढला असताना (कामाचे तास) श्रमाचा पुरवठा वाढतो. त्यामुळे पुरवठा वक्र वर जातो. पण त्यानंतर मजुरीचा दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो. कारण मजुरीच्या स्वरूपात जास्त रक्कम मिळाल्यानंतर श्रमिक विश्रांतीच्या अपेक्षेने श्रमाचा पुरवठा कमी करतो. म्हणजेच एका विशिष्ट पातळीनंतर वेतन दर वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो.
|
श्रमाचा मागे वळणारा पुरवठा वक्र |
आकृती क्र. ४.२
१) वरील आकृतीत 'क्ष' अक्षावर श्रमाचा पुरवठा दर्शविला आहे व 'य' अक्षावर मजूरीचा दर दर्शविला आहे. पनप' हा मागे वळणारा पुरवठा वक्र आहे. वेतनदर 'अक" पर्यंत वाढल्यास श्रमाचा पुरवठा वाढतो. पण त्यानंतर 'क' ते क' असा वेतनदर वाढल्यास श्रमाचा पुरवठा 'अब' वरून अब" असा कमी होतो. म्हणून श्रमाचा पुरवठा वक्र नप'' असा मागे वळतो. हा मागे वळणारा श्रमाचा पुरवठा वक्र असे स्पष्ट करतो की, मजूरीचा दर 'अक" पेक्षा जास्त वाढल्यास श्रमाचा पुरवठा कमी होतो. म्हणूनच श्रमाचा पुरवठा वक्र मागे वळतो.
२) बचतः सामान्यपणे व्याजदर वाढले असता बचतीचे प्रमाण वाढते. पण काही व्यक्तींना व्याजाच्या स्वरूपात निश्चित, नियमित उत्पन्नाची आवश्यकता असते. अशा व्यक्तीच्या संदर्भात व्याजाचा दर वाढल्यास बचतीचे प्रमाण कमी होते आणि व्याजाचा दर कमी झाल्यास बचतीचे प्रमाण वाढते. उदा. समजा एका व्यक्तीला व्याजाच्या स्वरूपात २०० ₹ एवढया स्थिर उत्पन्नाची आवश्यकता आहे. अशी व्यक्ती व्याजाचा दर ४% असताना ५००० ₹ बचत करील. व्याजाचा दर ४% वरून ५% वाढला असता बचतीचे प्रमाण ५००० ₹ वरून ४००० ₹ एवढा कमीहोईल. हा पुरवठ्याच्या नियमाला अपवाद आहे.
३) रोख रकमेची गरज जर विक्रेत्याला त्वरित रोख रकमेची गरज असेल तर तो कमी किंमतीलाही जास्त पुरवठा करील.
४) कृषी उत्पादनः पुरवठ्याचा नियम कृषी उत्पादकाला लागू होत नाही. कारण कृषी उत्पादन हे हवामानावर अवलंबून असते. अनिश्चित हवामानातील बदलामुळे कृषी उत्पादन क होते. तसेच कृषी उत्पादन विशिष्ट कालावधीत घेतले जाने त्यामुळे किंमत वाढली तरी पुरवठा वाढविता येत नाही.
५) भविष्यकालीन किंमतीचा अंदाज: भविष्यकाळात किंम कमी होणार असा अंदाज असल्यास विक्रेता कमी किंमतीला पुरवठा वाढवेल, याउलट जर भविष्यात किंमत वाढणार असअंदाज असल्यास विक्रेता वर्तमानकाळातील वस्तुचा पुरवठ कमी करील.
दुर्मिळ वस्तु: ज्या वस्तू दुर्मिळ कलात्मक आहेत अशा वस्तूंच्या किंमती वाढल्या तरी पुरवठा वाढविता येत नाह त्यामुळे या वस्तू नियमाला अपवाद आहेत.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog