Category

Show more

Computer and Marathi language - संगणक आणि मराठी भाषा

 संगणक आणि मराठी भाषा निबंध

प्र. १. :- संगणक म्हणजे काय ? संगणकाची वैशिष्ट्ये सांगा?

उत्तरे : संगणकाला इंग्रजीत Computer असे म्हणतात. संगणक हे एक इलेक्ट्रॉनिक साधन आहे. त्याचबरोबर संगणक हे मानवाला बौद्धिक प्रक्रियेत मदत करतो. मानवाची बुद्धिमत्ता संगणकाच्या बुद्धिपेक्षा श्रेष्ठ आहे. कारण संगणक या बुद्धिमान यंत्राची रचना मुळातच मानवाने केली आहे. आजच्या युगामध्ये संगणाकामुळे जग फारच जवळ येत चालेल आहे. यासाठी संगणक म्हणजे काय हे पाहणे गरजचे आहे.

व्याख्या:

१. संगणक म्हणजे स्मृतिकेत साठविलेल्या माहितीचे दिलेल्या आज्ञावलीनुसार गणितातील कृती आणि तार्किक संकल्पना वापरुन संस्करण करण्याची क्षमता असलेले इलेक्ट्रॉक उपकरण होय."

2. संगणक हे त्याला मिळालेल्या सुचनेप्रमाणे दिलेल्या संख्यांची आकडेमोड अथवा माहितीचे पृथ्यकरण अचूकपणे पण थोड्या वेळेत करणारे इलेक्ट्रॉनिक यंत्र आहे."

३. संगणक हे बहुउद्देशीय माहिती संस्करणाचे चिन्हांतरण यंत्र होय. ४. संगणक म्हणजे ज्यामध्ये स्मृतिका साठविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक साधनाद्वारे माहिती साठवून ठेवली जाते.. संगणकाची वैशिष्ट्ये :

१) वेग :

संगणकाचे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे काम करण्याची प्रचंड गती होय. गणितीय आकडेमोड आणि माहितीवरील प्रक्रिया करण्याचा संगणकाचा वेग विश्वास बसणार नाही इतका प्रचंड वेग असतो. त्यास Binding Rate असे म्हणतात. कोणतीही चूक न होऊ देता अचूक माहिती देण्यासाठी संगणकाला महत्त्व प्राप्त झाले आहे. एखाद्या गणितज्ञाला ज्या आकडेमोडी करण्यासाठी १०० वर्ष लागतील तेच काम संगणक एका मिनिटात करतो म्हणजे त्याचा वेग हा मानवाच्या वेगापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मानवाला उपग्रह, परग्रहभ्रमण, हवामानाचा अंदाज आदी क्षेत्रात विकास करता येतो.

३) स्मरणशक्ती :

संगणकाला मानवाने दिलेली माहिती तो साठवू शकतो प्रचंड प्रमाणात अशी माहिती साठविण्याची क्षमता संगणकाकडे आहे. संगणकाच्या मुख्य यंत्रात असा स्मरण कोश असतो. याशिवाय बाह्य अशा साधनांतदेखील माहिती साठविता येते. उदा. १९४६ साली सुप्रसिद्ध अणुबाँब व शास्त्रज्ञ जॉन व्हॉन यांनी संगणक स्मरणकोशाचा विकास केला.

३) अचूकता

संगणकाचा मुख्य वैशिष्ट्ये अचूकता होय. यामध्ये संगणकाचा वेग कितीही असला तरी त्याच्या कामाची हमी मात्र १०० टक्के अचूकता असणारी आहे. कोणतेही काम संगणकाद्वारे केले तर जशा मानवाने सूचना दिली तशी अचूक माहिती देणारे यंत्र म्हणजे संगणक होय. कारण संगणक हे इलेक्ट्रॉकी साधन असल्यामुळे स्वतः कधीच चूक करत नाही. 

४) पुनरावृत्ती क्षमता :

संगणकास एखादे काम परत परत करण्यासाठी सांगितले तर तो त्याच वेगाने व अचूकतेने काम करु शकतो. एकच आकडेमोड कोट्यवधी वेळेस त्याच वेगाने व अचूकतेने तो करु शकतो.

५) अष्टपैलूत्व :

संगणक कोणतेही काम तर्कशुद्ध पद्धतीने करु शकते. त्यामुळे जीवनातील विविध क्षेत्रांत त्याचा वापर होत आहे. उदा. शिक्षण, बँक, व्यापार उद्योग, रेल्वे,वाहतूक, विज्ञान, औषध इ. 

६) यांत्रिकीकरण :

संगणक हे एक इलेक्ट्रीकल यंत्र असल्यामुळे एखादा सुचना दिल्या की, (Stop) आज्ञा (Order) येईपर्यंत तो कार्य करत राहतो. याला मानवाची आवश्यकता नसते. म्हणजेच संगणक चालू किंवा बंध करण्यासाठी मानवाची जास्त आवश्यकता लागत नाही. 

७) सर्तकता :

मानवाप्रमाणे थकणे, कंटाळा येणे, चुका होणे अशा बाबी संगणकाबाबत संभवत नाहीत. इलेक्ट्रॉनिक्सच्या साधनांनी ते यंत्र तयार केलेले असते. ही साधने टिकाऊ व मजबूत असतात. त्यामुळे त्याच वेगाने व अचूकतेने त शेवटपर्यंत कार्य करतो. 

८) तर्कशुद्धता :

संगणकास तार्किक पायऱ्या व तर्कशुद्धतेच्या सूचना दिलेल्या असतात. त्यामुळे इतर यंत्रे, आणि संगणक यांच्यात महत्त्वाचा फरक म्हणजे संगणकाची तर्कशुद्धता ही चांगली राहते.

प्र. २. रा :- संगणकाच्या मर्यादावर टीप लिहा ?
किंवा
संगणकाच्या उणिवा सांगा ?

उत्तर : संगणक हे जरी इलेक्ट्रिक साधन असले तरी सर्वच काम संगणकावर होत नाहीत. तसेच एखाद्या वस्तचा उपभोग घेता येतो. तसे त्याच्या उणिवा ही असतात. म्हणजेच संगणकांचे फायदे व दोष यांचा अभ्यास करावा लागतो.

१) विचारशक्तीची असमर्थता :

संगणकात मनुष्याच्या शक्तीपेक्षा लाखोपटीने गती व अचूकता आहे. पंरतू मनुष्याप्रमाणे संगणक विचार करु शकत नाही. मानवाप्रमाणे त्यास बुद्धी आणि सामान्य ज्ञान नाही. त्याला दिलेल्या चुकीच्या सूचना तो दुरुस्त करु शकत नाही. त्याला चकीची समीकरणे दिलीतर त्यानुसार तो आकडेमोड करुनच चुकीची उत्तरे देतो. म्हणजे जशा सूचना तसे उत्तरे संगणक येत असल्यामुळे विचारशक्तीची असमर्थता ही मर्यादा जाणवते. २) दुरुस्ती करण्याची 

असमर्थता :

संगणकाला मेंदू नसल्यामुळे त्याला जर चुकीच्या सूचना दिल्या तर तो दुरुस्त करु शकत नाही. कारण संगणक हा मानवाच्या सुचनेप्रमाणे कार्य करत राहतो.

३) मानवी सुचनावर अवलंबून :

संगणक हा तसा सांगण्याप्रमाणे चालणारे इलेक्ट्रिकल यंत्र आहे. मनुष्य ज्याप्रमाणे सूचना देईल त्याचप्रमाणे तो काम करतो. ते स्वतःहून माहिती निर्माण करु शकत नही.

थोडक्यात कुठल्याही नाण्याला दोन बाजू असतात. संगणक चांगले आणि वाईट ही आहे. कारण संगणकामुळे अनेक फायदे होतात तर अनेक उणिवा सुद्धा दिसून येतात. विचार, भावना, कल्पना, सुचना ही मर्यादा दिसून येतात.

प्र. ३ . रा :- विविध क्षेत्रामध्ये संगणकाचा उपयोग कसा केला जातो ते लिहा.

किंवा

'संगणकाचा उपयोग' यावर टीप लिहा.

उत्तर : संगणकाचा उपयोग हा विविध क्षेत्रामध्ये केला जातो. उदा. बँक वाहतूक, शिक्षण, दवाखाना, व्यापार, कार्यालय, क्रिडाक्षेत्र, आरक्षण विभाग मुद्रण चित्रपट, संरक्षण क्षेत्र, हवामान अंदाज, उत्पादन क्षेत्र इ. साठी आणि आकडेमोड करण्यासाठी तयार करण्यात आलेले तंत्र आज जीवनातल्या विविध घटकात संगणकाचा वापर केला जातो. ते खालीलप्रमाणे १. आर्थिक क्षेत्र : दैनंदिन व्यापार, उद्योग व व्यवसायाचे हिशेब संगणकाद्वारे ठेवता येतात.

ऑनलाईन पद्धतीमुळे सर्व प्रकारचे हिशेब त्वरीत केले जातात. उदा. बिल तयार करणे, पावती करणे खात्यात नोंद करणे, नफा-तोटा पत्रक व ताळेबंद करणे इ. कामात संगणकाचा उपयोग होतो.

२. शिक्षण क्षेत्र :

इंटरनेटच्या माध्यमातून जगातील कोणत्याही विद्यापीठाशी त्वरीत संपर्क साधून माहिती घेता येते. संगणकावर आपण भाषा शिकतो. एखाद्या संकेतस्थळावर जावून जी आपणांस माहिती हवी ते मिळवून शकतो. उदा. शाळा महाविद्यालयातील कार्यालय, ग्रंथालयाचे काम संगणकार करता येते. आज कथा, कादंबरी, कविता, इ. ची माहिती अभ्यासता येते.

३. अभियांत्रिकी :

संगणकाच्या साह्याने यंत्राचे आराखडे तयार करता येतात. तसेच इमातर, पुल, मोटार, विमान इत्यादीचे आराखडे संगणकाच्या साह्याने करता येतात.

४. बँकिंग विभाग :

संगणकामुळे बँकेतील व्यवहार सुरळीत झाले आहेत. उदा. खाते उघडणे, चेक वटविणे, पासबुक, कॅशबुक व इतर हिशेद पत्रके संगणकीकृत झाली आहेत. ATM पद्धतीमुळे बँकिग सेवा उपलब्ध झाला आहे. ५. उत्पादन क्षेत्र :

संगणकामुळे उत्पादन क्षेत्रात तर क्रांतीच झाली आहे. वस्तू उत्पादनात रर्जा, अचुकता व वेग आला आहे. संगणकावर वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन्स, तयार करता येतात. त्यामुळे कमी कालावधीत नवनवीन नमुन्याच्या वस्तू बाजारात स्वस्त किंमतीत आणि भरपूर प्रमाणात उपलब्ध होत आहेत.

६. विमाक्षेत्र :

आयुर्विमा व सर्वसाधारण विमा या क्षेत्रात व्यवसाय वाढत आहे. त्याची सर्व माहिती व्यवस्थित ठेवणे जिकीरीचे असते. पंरतू संगणकामुळे प्रत्येक विमाधारकाची माहिती, पॉलिसी, देय दिनांक, रक्कम आदी सर्व माहिती अद्ययावत ठेवता येते. तसेच ही माहिती हवी तेव्हा उपलब्ध होऊ शकते. 

७. कार्यालय : 

कोणत्याही कार्यालयात कामकाज सुरळीत पार पाडावे यासाठी संगणकाचा वापर होतो. उदा. कागदपत्रे, फाईल्स बाळगणे, जागे अभावी अवघड होत आहे.  त्यामुळे संगणकाचा वापर करून प्रचंड माहिती कमी जागेत साठवता येते. लहान सीडी किंवा चुंबकीय फीत (मेमरीत) प्रचंड माहिती साठवता येते कार्यालयातील हिशेब व दैनंदिन व्यवहार आता संगणकावर होत असल्यामुळे कामात अचूकता व गती आली आहे.

८. क्रीडाक्षेत्र :

● क्रीडाक्षेत्रातील विविध खेळ संगणकावर खेळता येतात. किंवा कुठल्याही खेळासंबंधी माहिती मिळविता येते. उदा. खेळाडूचे वय, शारिरिक घटक, प्रत्यक्ष आहार, प्रशिक्षण कार्यक्रम इ. माहिती देऊन त्यास योग्य आहार कोणता असावा यांची माहिती मिळते.

९. हवामान अंदाज:

हवामानातील विविध घटनांचा अभ्यास करता येतो. उदा. हवामानाचा अंदाज, पर्जन्यविषयक माहिती, तापमान इ. माहिती संगणकामुळे शक्य झाली आहे. पुण्याच्या सी डॅक संस्थेने परम ८००० या संगणकामुळे भारतात हवमान अंदाजाविषयी क्रांतीच केली आहे. १०. वाहतूक नियंत्रण :

संगणकामुळे रेल्वे, रस्ते हवाई व सागरी वाहतुकीवर नियंत्रण करणे प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या शक्य झालेले आहे. सिग्नल पद्धती आता संगणकामुळे आपोआप चालत आहे.

११. आरक्षण :

बस, रेल्वे, विमान, जहाज इत्यादीच्या प्रवासाचे येण्याजाण्याचे आरक्षण संगणकामुळे सोपे झाले आहे. तसेच तिकीट तयार करणेदेखील संगणकावर होत आहे. त्यामुळे हिशेबही लवकर होत असतात. १२. वैद्यकीयक्षेत्र :

रोगाची लक्षणे संगणकाला दिल्यावर रोगाचे निदान करुन त्यावर योग्य औषधोपचारदेखील संगणक पुरवीत असतो. इ-मेलमुळे तर जगातल्या तज्ज्ञ डॉक्टरांचे मतदेखील घेऊ शकतो. १३. चित्रपटक्षेत्र :

चित्रपट, दुरदर्शन, संगीत, नाट्यक्षेत्रात संगणकाचा वापर खुप मोठ्या प्रमाणावर होत आहे. उदा. अॅनिमेशन, फिल्मस, संगीत रेकॉर्ड करणे, मुद्रण करणे, आवाज भरणे, आवाज कमी करणे इ. बाबी संगणकावर करता येतात. 

१४. संरक्षण क्षेत्र :

संरक्षण क्षेत्रातील युद्धाची साधने, रणगाडे, क्षेपणास्त्र, तोफा इत्यादीची माहिती मिळते. शत्रूवर योग्यपणे हल्ला करणे, शत्रुचे विमान अचूकपणे उडविता येणे संगणकामुळे शक्य झाले आहेत.

१५. मुद्रण विभाग :

पुस्तके, लग्नपत्रिका कार्डे, पावतीबुके इ. छपाई किचकट काम संगणकामुळे सुलभ आकर्षक व सुबक झाली आहे. मानव आपल्या मनासारखे मुद्रण अत्यंत कमी वेळात सहजगत्या उपलब्ध करु शकतो. "थोडक्यात संगणकाचा वापर बँक, रेल्वे, आरक्षण, वाहतुक, संरक्षण, कार्यालय, शाळा, चित्रपट, वैद्यकीय विभाग, हवामान खाते इ. क्षेत्रामध्ये संगणकाचा उपयोग होत आहे.

प्र.४ था:- शब्दप्रक्रिया (वर्ड प्रोसोसिंग) यावर टीप लिहा. 
'शब्दप्रक्रियेची' कार्यप्रणाली (वर्ड प्रोसोसिंग) याविषयी माहिती द्या.


उत्तर : जगातील सर्वच देशामध्ये संगणकाचा वापर केला जातो. आज संगणकाचे शिक्षण होणे काळाजी गरज आहे. युगामध्ये लिहिता वाचता येणे म्हणजे साक्षर नव्हे तर संगणक हाताळता येण म्हणजे शिक्षण होय. ही संकल्पना शिक्षणची आहे. 'शब्दप्रक्रिया या शब्दाला इंग्रजी वर्ड प्रोसोसिंग असे म्हणतात. दर्ड प्रोसोसिंग या इंग्रजी शब्दाचा शब्दशः अर्थ म्हणजे 'शब्दांवर प्रक्रिया करणे होय, म्हणजेच लेखनदृष्ट्या एकाद्या शब्दाचे स्पेलिंग, सुधारणे, एखादा मजकूर आघोरेखित करणे, काही मजकूर काढून टाकणे, इतर नवीन मजकूर समाविष्ट करणे हे सर्व करुन त्यांनतर तो लेख पुन्हा टाईप करावा लागत असे. टाईपरायटरमध्ये साधारणतः मजकुराच्या दोन-तीन प्रतीच स्पष्ट व समाधानकारक असत. त्याचबरोबर यामध्ये वेगवेगळ्या वळणांची व वेगवेगळ्या आकारांची अक्षरे काढणे शक्य नव्हते. त्यामुळे अशा प्रकारची यंत्रे कालबाह्य होऊन त्याची जागता आज संगणक घेत आहे.

संगणकामुळे वर्ड प्रोसेसर्सच्या वापरामध्ये भर पडून त्याचे काम वेगवान केले जाते. संगणकामध्ये मजकुराची जी फाईल तयार केली जाते. त्यामध्ये आपणांस हव्या त्या पद्धतीने बदल करणे, हवा तो रंग वापरण्यो या प्रक्रियेमुळे वर्ड प्रोसेसिंग ही अतिशय सोपी झाली आहे. संगणकामध्ये तयार केलेल्या मजकुराच्या आपणास हव्या तेवढ्या अनेक प्रती वर्ड प्रोसेसर प्रोग्रामला प्रिंट करण्याची आज्ञा देवून वाढविता येते.

.एखादा मजकूर सूसूत्रपणे समासासहित व्यवस्थित लावणे, परिच्छेदामध्ये योग्य अंतर ठेवणे, मजुकरातील दोन ओळीत अंतर ठेवणे मजकूर ठळक व अधोरेखित करणे, काही शब्दांचे वळण व आकार बदलणे यासारख्या प्रक्रियांना • वर्ड प्रोसेसिंग असे म्हणतात. वर्ड प्रोसेसिंग हे अत्यंत लवचकि असून खुप मोठ्या  प्रमाणावर वापरले जाते. अहवाल पत्रव्यवहार करणे, टाचणे अशासारखे टेक्स्ट आधारित दस्तऐवज तयार करण्यासाठी वर्ड प्रोसेसिंग सॉफ्टवेअरचा वापर करतात. मराठी भाषेमध्ये क्रमिक पुस्तकांसोबतच साहित्य, समीक्षा, संशोधनपर ग्रंथांचे लेखन, मोठ्या प्रमाणात होत आहे. तसेच मासिक, द्वैमासिक त्रैमासिक आणि नियतकालिकांचीही निर्मिती विपूल प्रमाणावर होताना दिसून येते. या सर्व ग्रंथनिर्मितीच्या मांडणी व सजावटीमध्ये शब्दप्रक्रियेचे स्थान महत्वपूर्ण आहे. 

शब्दप्रक्रियेची (वर्ड प्रोसेसिंग) कार्यप्रणाली :

१. अक्षररचना बदलणे: 

एखादा मजकूर टाईप केल्यानंतर त्या मजकुरातील अक्षररचना आपणास बदलता येते. आपल्या आवडीनुसार उपलब्ध अक्षररचनेतील कोणतीही अक्षररचना आपण बदलू शकतो. विविध प्रकारच्या अक्षररचनेला फाँट असे म्हणतात. मजकुरातील आकर्षकता वाढविण्यासाठी अक्षररचनेत वर्ड प्रोसेसिंगच्याद्वारे हवा तो बदल करता येतो.

२. अक्षरांचा आकार बदलणे: 

एखादा मजकुर कमी अथवा जास्त जागते बसविण्यासाठी अक्षरांच्या आकारात बदल करता येतो. अक्षरांचा आकार हा पॉईटमध्ये मोजला जातो. चार पॉईटपासून ६५० पॉईटपर्यंत अक्षरांचा आकार आपणास बदलता येतो. वाचकांचे लक्ष्य वेधण्यासाठी एखादे अक्षर वाक्य याला वेगळे वळण दिले जाते.

३. अक्षरांतील अंतर बदलणे:-

 टाईप केलेल्या मजकुरातील अक्षरांमध्ये योग्य अंतर, दोन ओळीतील अंतर, परिच्छेदातील अंतर वर्ड प्रोसेसिंग मुळे सोपे झाले आहे.

४. ओळीत योग्य अंतर ठेवणे :- 

दोन ओळीमध्ये योग्य अंतर ठेवून मजकूराची व्यवस्थीत मांडणी करणे. पत्रलेखन करताना मजकूर व पत्राचा मायना इ. बाबीची मांडणी करणे वर्ड प्रोसेसिंगमुळे सोपी, सरळ झाली आहे.

५. परिच्छेदांमध्ये योग्य अंतर ठेवणे :-

मजकुरातील दोन परिच्छेदांमध्ये योग्य अंतर राखून मजकूराची मांडणी करण्यात येते. सुटसुटीत लेखन व स्पष्ट परिच्छेद देण्यासाठी मजकुरातील सर्व परिच्छेदांमध्ये समान व योग्य अंतराची मांडणी करुन मजकुरात आकर्षकता निर्माण केली जाते.

६. योग्य समास सोडणे : 

मजकुरातील उजव्या व डाव्या बाजूला योग्य आवश्यक तेवढा समास सोडून मजकूर व्यवस्थित बसविण्याचे कार्य वर्ड प्रोसेसिंग करते.

७. अक्षररचना ठळक करणे :- 

मजकुरातील एखादे अक्षर, महत्त्वाची, वाक्य रचना मजकुरांचे शीर्षक, लेखक, ग्रंथ देश यासारख्या महत्त्वाची अक्षरे अधोरेखित करणे वर्ड प्रोसेसिंगमुळे सोपी झाली आहेत. ८. अक्षररचना अधोरेखित करणे :- मजकुरातील अत्यंत महत्त्वाचे शब्द, वाक्य, परिच्छेद करुन वाचकांचे लक्ष आशयाकडे वेधले जाते. तसेच मजकुरातील शब्द किंवा एखादे वाक्य महत्त्वपूर्ण असल्याचेच दर्शविण्यासाठी अधोरेखित कार्यप्रणालीचा उपयोग केला जातो. ९. अक्षरांचे वळण बदलणे:- मजकुरातील मुद्दा विशेष माहिती, एखादे अक्षर यासाठी इटॅलिल या प्रोग्रॉमचा वापर केला जातो.

१०. ओळींत योग्य अंतर ठेवणे:- 

मजकुरातील दोन ओळीमध्ये समान अंतर ठेवून मजकूर टाईप करता येतो. उदा. एखाद्या पत्राची रचना यानुसार योग्य ओळीन अंतर ठेवता येतो. मजकुरातील एखादा मुद्दा संपल्यानंतर नवीन मुद्दांसाठी मजकुरात योग्य अंतर राखण्याचे कार्य शब्दप्रक्रिया करीत असते.

प्र. ५. वा :- वर्ड प्रोसेसिंगचा उपयोग लिहा?
किंवा
वर्ड प्रोसेसिंग यावर टीपा लिहा ?

उत्तर : 

मानवी जीवनामध्ये संगणकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण सर्व मानवी व्यवहार संगणकावरच होत आहेत. वर्ड प्रोसेसिंग या संगणकीय प्रक्रियेमुळे मानवी व्यवहारात सुलभता, अचूकता, विश्वासार्हता निर्माण झाली आहे. यासाठी वर्ड प्रोसेसिंगचा उपयोग करावा लागतो. ते खालीलप्रमाणे,

  1. कच्चा मजकुराची व्यवस्थित व आकर्षक मांडणी करता येते
  2.  मजकुरातील शब्दरचनेत आवश्यक ते फेरबदल करता येतात.
  3.  मजकुरामध्ये चुका दुरुस्त करून व्याकरण दृष्ट्या भाषेची शुद्धता निर्माण करता येते. 
  4. मजकुरामध्ये आवश्यक तेथे छायाचित्रे, रेखाचित्रे, यांची योग्य मांडणी करता येते. 
  5. मजकुराची मांडणी, आकर्षकपणे करता येते. उदा. अक्षर, दोन ओळीतील अंतर अधोरेखित करणे इ.
  6. जास्तीचा मजकूर कमी जागेत बसविता येतो. 
  7.  महत्त्वाची शब्दरचना (बोल्ड) अधोरेखित आणि वळणदार बनवून मजकुराची आकर्षकता वाढविता येते.
  8. लेखात आवश्यक तेवढा आपल्या इच्छेनुसार बदल करून घेता येतो. 
  9. लेखात आवश्यक त्या ठिकाणी तक्ते, गणितीय सुत्रे, आकृत्या व चित्रे घेता येतात.
  10.  आवश्यकतेनुसार व दिलेल्या आज्ञेनुसार लेखाच्या अनेक प्रती काढता येतात.
  11.  एखादे पत्र जर वेगवेगळ्यापत्यावर अनेकांनी पाठवायचे असेल तर प्रत्येक वेळी पत्र टाईप न करता मेलमार्जिंग या सोईमुळे हे कार्य सुलभपणे करता येते.

आजच्या युगात संगणक ही मानवाची महत्त्वाची गरज बनली आहे. मराठी भाषेतील ग्रंथनिर्मिती, पत्रव्यवहार, फलक, पत्रके, जाहिरात मजकूर इत्यांदीना वर्ड प्रासेसिंगद्वारे सुंदर, आकर्षक व लक्षवेधी बनविणे आज शक्य झाले आहे.



Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English