अकराव्या व्या शतकामधील प्रबोधन आणि महाराष्ट्रातील समाजसुधारक विषयी माहिती
अकराव्या व्या शतकामधील प्रबोधन
पार्श्वभूमी
महाराष्ट्राच्या तसेच भारताच्या इतिहासात १९ वे शतक हे महत्त्वाचे मानले जाते. या शतकाच्या सुरुवातीच्या काळात भारतात इंग्रजी राजवट स्थिर झाली. महाराष्ट्रात सुरू झालेल्या इंग्रजी राजवटीमुळे नव्या युगाचा प्रारंभ झाला. राजकीय क्षेत्रात पडून आलेल्या या बदलाचा परिणाम सर्व क्षेत्रांवर झाला. इंग्रजांच्या शिस्तबद्ध नियोजित व कार्यक्षम शासन पद्धतीस सुरुवात झाली. त्यामुळे ब्रिटिश पूर्व काळातील महाराष्ट्राच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनातील अराजकता, अशांतता, बेशिस्तपणा व अनास्था याला पायबंद बसला. महाराष्ट्राच्या सामाजिक जीवनात हळूहळू परिवर्तन घडून येण्याची प्रक्रिया सुरू झाली. इंग्रजी राजवटीत महाराष्ट्रात नव्या विचारांचे वारे वाहू लागले. त्यामुळे येथील समाजातील जुन्या चालीरीती, रूढी, परंपरा, अंधश्रद्धा व जातिव्यवस्था यातील दोष निदर्शनास येऊ लागले. समाजजीवनामध्ये सुरू झालेल्या या परिवर्तनामुळे येथील आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवन ढवळून निघाले. ग्रंथप्रामाण्य रूदीप्रियता, धार्मिक प्रभाव, कर्मकांड व परंपरावाद यांचा प्रभाव असलेल्या महाराष्ट्रातील समाजात पाश्चात्त्यांचे आधुनिक, वैज्ञानिक, पुरोगामी व बुद्धिप्रामाण्यवादी विचार आत्मसात करणे ही बाब सोपी नव्हती. येथील समाज आपली परंपरागत चालत आलेली जीवन पद्धती व संस्कृती सोडण्यास सहजासहजी तयार नव्हता; परंतु काळाच्या ओघात नवविचारांमुळे सुरू झालेले परिवर्तन तो रोखू शकत नव्हता. समाज एक प्रकारच्या कोंडीत सापडला होता, तो संक्रमणावस्थेतून वाटचाल करत होता. समाजास या काळात योग्य दिशा दाखवण्याचे परिवर्तनाचे कार्य याच शतकात झाले.
समाजाच्या राजकीय, आर्थिक, धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक जीवनात आधुनिक, वैज्ञानिक, प्रगत व पुरोगामी विचारांचा स्वीकार केल्याशिवाय आपल्या समाजाचा सर्वांगीण विकास होणार नाही याची जाणीव महाराष्ट्रातील इंग्रजीतून नवशिक्षण घेतलेल्या बुद्धिप्रामाण्यवादी व पुरोगामी विचारांच्या सुशिक्षित तरुणांना झाली. पाश्चिमात्य इंग्रजी ग्रंथांच्या अभ्यासामुळे स्वातंत्र्य, समता, बंधुता, लोकशाही, उदारमतवाद व बुद्धिप्रामाण्यवाद यांसारख्या मूलभूत संकल्पनांचे ज्ञान समाजाला झाले. नवशिक्षणाने प्रभावित झालेल्या तरुण बगाने येथील समाजाचे निरीक्षण करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांना जाणीव झाली की आपल्या समाजातील धार्मिक आचारविचार, जातिसंस्था, अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा दूर केल्याशिवाय समाजाची प्रगती होणार नाही. परिणामी, महाराष्ट्रातील प्रगत व पुरोगामी विचारांच्या विचारवंतांनी येथील क्षेत्रातील म्हणजे राजकीय, आर्थिक, शतकामधील प्रबोधन धार्मिक, सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधनास सुरुवात केली.
महाराष्ट्रातील धार्मिक जीवन १९ व्या शतका महाराष्ट्रातील समाजजीवनात धर्माला फार महत्त्वाचे स्थान समाजजीवनावर धर्मसंस्थेचा फार मोठा पगडा होता. समाजजीवन बहुतेक सर्व अंगे धार्मिक आचार व विचारांनी व्यापून टाकली होती धर्माची मूलभूत व सत्य तत्त्वे बाजूस पडली होती. हिंदू धर्मात्र कर्मकांड, व्रतवैकल्ये, दानधर्म, अनुष्ठाने, इ. चे महत्त्व वाढल होते. धर्मगुरू, शास्त्री, पुरोहित, पंडित व ज्योतिषी यांचे प्रस्थ ह त्यांना खऱ्या धर्माचा विसर पडला होता. तंत्र-मंत्र, जादूटोणा भूतपिशाच्च विद्या यांना महत्त्व प्राप्त झाले होते. दानधर्म व अनुष्ठारे यावर मोठ्या प्रमाणात खर्च केला जात असे. त्यामुळे समाजात आळशी पुरोहितांचा वर्ग निर्माण झाला होता. या काळात अंधश्रद्धा, रूढी व परंपरा यांना जास्त महत्त्व प्राप्त झाले होते. हिंदू धर्मात पंच व उपपंथांचा उदय झाला होता. पंथ श्रेष्ठत्वाची भावना प्रबळ होती. • धर्माचे खरे व सत्य स्वरूप मागे पडून धर्मात बेबंदशाही निर्माण झाली होती.
महाराष्ट्रातील समाजजीवन १९ व्या शतकात महाराष्ट्रातील परंपरागत रूढ असलेल्या समाजात वर्णव्यवस्था, जातिव्यवस्था, श्रेष्ठ-कनिष्ठ, स्पृश्य-अस्पृश्य इ. बाबतीत कडक निर्बंध अस्तित्वात होते. वैज्ञानिक व प्रगत दृष्टिकोन, तर्कनिष्ठ विचार यापेक्षा समाजातील चालीरीती, रूढी व परंपरा यांना फार महत्त्व होते. धार्मिक विचार व आचारांचा प्रभाव समाजजीवनावर मोठ्या प्रमाणात होता. हिंदू धर्म व धर्ममार्तंडांनी निर्माण केलेल्या वर्ण व जातिव्यवस्थेमुळे येथील समाज अनेक जाती-उपजातींमध्ये दुभंगलेला होता.
१९ व्या शतकात महाराष्ट्रातील समाज व्यवस्था ही पुरुषप्रधान होती. एकत्र कुटुंब पद्धती अस्तित्वात होती. या काळात स्त्रियांची स्थिती हलाखीची होती. स्त्रीजीवन हे अनेक रूढी, परंपरा, चालीरीती व धर्मबंधनांमुळे जखडलेले होते. स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन प्रतिगामी स्वरूपाचा होता. स्त्रियांना शिक्षण घेण्याचा अधिकार नव्हता. विचारांचे स्वातंत्र्य नव्हते. धर्मग्रंथ वाचण्याचे अधिकार नव्हते. समाजात सती पद्धत, बालविवाह, विधवा विवाह बंदी, केशवपन, बहुपत्नीत्व व देवदासी इ. अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा अस्तित्वात होत्या.
१९ व्या शतकाच्या प्रारंभी महाराष्ट्रात ब्रिटिशांची सत्ता स्थापन झाली. थोड्या कालावधीतच ती स्थिर झाली. इंग्रजांच्या राजवटीमुळे महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली. प्रबोधन चळवळ म्हणजे काय?- प्रबोधन व चळवळ हे दोन शब्द आहेत. प्रबोधनाचा अर्थ पुढीलप्रमाणे समाजात प्रचलित असलेल्या आचार विचार व व्यवहारात जेव्हा दोष उत्पन्न होतात तेव्हा समाजाला पुन्हा बुद्धिनिष्ठ व विज्ञाननिष्ठ पद्धतीने जागृत करण्याच्या प्रक्रियेला 'प्रबोधन' म्हणतात. विशिष्ट समुदायाने एकत्र येऊन सर्वांच्या हितासाठी केलेला एकत्रित प्रयत्न असतो. एखादी मार्गदर्शक व्यक्ती किंवा विचार प्रणाली त्यामागे असते. त्या प्रेरणेने झालेल्या प्रयत्नास 'चळवळ' असे म्हणतात. महाराष्ट्रातील प्रबोधन चळवळीची कारणे महाराष्ट्रात ब्रिटिशांच्या राजवटीत लोकांमध्ये वैचारिक जागृती खालील कारणांमुळे घडून आली
- पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव बुद्धिप्रामाण्यवाद, वैज्ञानिक दृष्टिकोन राष्ट्रवाद, औद्योगीकीकरण, उदारमतवाद, व्यक्ति स्वातंत्र्य व समता ही पाश्चात्त्यांची विचारसरणी होती. ब्रिटिश राजवटीमुळे या संस्कृतीची ओळख महाराष्ट्रीय जनतेस झाली. ब्रिटिशांनी शिक्षणात समतेचे धोरण स्वीकारले. राज्यकारभार करताना समतेचे व न्यायाचे धोरण अवलंबले. दळणवळणात सुधारणा व सुविधा निर्माण केल्या. कायदयाच्या क्षेत्रात समानता प्रस्थापित करून येथे शांतता निर्माण केली. त्यातून नवशिक्षित लोकांमध्ये आपली संस्कृती व धर्म या विषयीची अस्मिता जागृत झाली. येथील जाणत्या लोकांना आपल्या संस्कृतीच्या पुनरुज्जीवनाची आवश्यकता भासू लागली. अशा प्रकारे वैचारिक जागृती घडून आली.
- पाश्चात्त्य शिक्षणाचा प्रभाव ब्रिटिश प्रशासन व ख्रिस्ती मिशनऱ्यांनी येथे कारकून तयार करण्यासाठी, ख्रिस्ती धर्माचा प्रसार करण्यासाठी पाश्चात्य शिक्षण देण्यास सुरुवात केली. शिक्षण सर्व जातिधर्माच्या मुलांमुलींसाठी खुले केले. यातून काही सुधारकांना आपल्या अधोगतीची व मागासलेपणाची जाणीव झाली. आपल्या समाजातील अंधश्रद्धा, खुळचट कल्पना, अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा इत्यादी आपल्या अधोगतीची कारणे आहेत हे समजले. यातूनच धार्मिक व सामाजिक सुधारणा चळवळी महाराष्ट्रात सुरू झाल्या.
- ख्रिस्ती मिशनरींचे कार्य महाराष्ट्रातील समाजव्यवस्था व येथील परंपरागत धर्म यातील दोष दाखवण्याचे काम ख्रिस्ती मिशनऱ्यांनी केले. त्यांनी येथील समाजातील अनिष्ट चालीरीती, रुढी परंपरा यावर कडाडून टीका केली. त्यामुळे येथील विचारवंतांनी आपल्यातील दोष दूर केल्याशिवाय आपला समाज सुधारणार नाही हे ओळखले. यामुळे महाराष्ट्रातील धर्मसुधारणा चळवळीस व प्रबोधनास चालना मिळाली.
- वैज्ञानिक व भौतिक सुधारणा ब्रिटिशांनी वैज्ञानिक दृष्टिकोन व भौतिक सुधारणा यांचा अवलंब करून आपला व्यापार वाढवला. आपल्या साम्राज्याचा विस्तार केला. ब्रिटिशांच्या या भौतिक प्रगतीमुळे ते विकसित आहेत, आपण अविकसित आहोत याची जाणीव भारतीयांना झाली. त्यातून महाराष्ट्रात प्रबोधनाची चळवळ सुरू झाली.
- धर्मविचारप्रसाराची साधने ख्रिस्ती मिशनन्यांनी महाराष्ट्रात व सर्व भारतभर ख्रिस्ती धर्माचा प्रचार व प्रसार सुरू केला. त्यांनी १९ व्या शतकात मुद्रणकलेचा विकास केला. धर्म प्रसारासाठी भारतात बोलल्या जाणाऱ्या सर्व भाषांचा अभ्यास करून त्या त्या भाषेत बायबलची भाषांतरे केली. छापील ग्रंथ तयार केले. यातून महाराष्ट्रातील समाज व धर्मसुधारकांनी प्रेरणा घेतली. छापखान्यांची निर्मिती केली. आपल्या लोकभाषेत वृत्तपत्रे, नियतकालिके, समाज प्रबोधनाची विविध साधने निर्माण केली. त्यातून बाळशास्त्री जांभेकर, तर्खडकर बंधू, लोकहितवादी इत्यादींनी प्रबोधनपर लेखन केले. परिणामी महाराष्ट्रातील समाज जागृत झाला.
- धार्मिक व समाजसुधारणा चळवळी ख्रिस्ती मिशनऱ्यांनी हिंदू धर्मातील दोष दाखवले. त्यावर टीका केली. येथील धार्मिक जीवन, परंपरा, धार्मिक विचार व आचार यांचा अवमान केला. त्यामुळे धर्मसुधारणा चळवळीस चालना मिळाली. तसेच येथील सुधारणावादी विचारांच्या लोकांनी अंधश्रद्धा, अनिष्ट चालीरीती, रूढी व परंपरा यांना दूर करण्यासाठी सुधारणा चळवळी सुरू केल्या. या धर्म व समाजसुधारणांचा प्रारंभ प्रथम बंगाल व नंतर महाराष्ट्रात सुरू झाला.
वरील विविध कारणांमुळे महाराष्ट्रात जागृतीस प्रारंभ झाला. धार्मिक बाबींचे व समाजातील दोषांसंबंधीचे विषयांचे चिंतन शिक्षित वर्गात सुरू झाले. या चिंतनातून आत्मपरीक्षण सुरू झाले. आपला ऐतिहासिक वारसा, भव्य व दिव्य असतानाही हे केवळ समाजातील दोषांमुळेच घडले म्हणून धर्म व समाजजीवनातील दोष नष्ट करण्यास सामाजिक परिवर्तनास महाराष्ट्रात सुरुवात झाली. या प्रक्रियेला महाराष्ट्रातील आय समाजसुधारकांनी चालना दिली. ब्राम्हो समाज, प्रार्थना समाज, आर्य समाज, सत्यशोधक समाज इत्यादींचा उदय झाला. या संघटनांनी सामाजिक एकतेचे, बुद्धिप्रामाण्यवादाचे विचार येथील समाजात रुजवण्यास सुरुवात केली.
महाराष्ट्रातील समाजसुधारक
१) जगन्नाथ शंकरशेठ (इ.स. १८०३ मे १८६५) -
मुंबई ही महाराष्ट्राची ऐतिहासिक, सांस्कृतिक व आर्थिक राजधानी आहे. त्या मुंबईचे शिल्पकार म्हणून जगन्नाथ उर्फ नाना शंकरशेठ यांना ओळखले जाते. जगन्नाथ शंकरशेठ यांचा जन्म १० फेब्रुवारी १८०३ रोजी झाला. ठाणे जिल्ह्यातील मुरबाड येथील मुरकुटे हैं कुटुंब व्यवसायासाठी मुंबईत आले. मराठी, इंग्रजी व संस्कृत भाषेत ते प्रगत होते. त्यांनी आपल्या श्रीमंतीचा व विद्वत्तेचा वापर समाजसुधारणेसाठी केला. जनकल्याणाच्या विविध योजना त्यांनी राबवल्या व्यापारामुळे इंग्रज अधिकारी वर्गामध्ये त्यांचा दबदबा होता.
जगन्नाथ शंकरशेठ |
शिक्षणाशिवाय लोकांचा उद्धार होणार नाही हे ओळखून एलफिन्स्टन यांच्या मदतीने त्यांनी 'चॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी' स्थापन केली. या सोसायटीने मुंबईत व मुंबई बाहेर अनेक शाळा सुरू केल्या. 'स्टुडंट लिटररी अॅण्ड सायंटिफिक सोसायटीच्या स्थापनेसाठी नानांनी फार मोठी आर्थिक मदत दिली. स्त्री शिक्षणाबद्दल नानांना फार आस्था होती. स्त्रियांना शिक्षण मिळाले पाहिजे म्हणून त्यांनी आपल्या राहत्या घरी मुलींसाठी शाळा सुरू केली. पुढे त्यांनी एलफिन्स्टन कॉलेज सुरू केले. सरकारने मुंबई इलाख्याच्या शिक्षण व्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'बोर्ड ऑफ एज्युकेशन' ची स्थापना केली. त्याचे सदस्यत्व नानांना बहाल करण्यात आले. त्याचंच रुपांतर पुढे शिक्षण खात्यात झाले. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा सहभाग मोलाचा होता. जनतेची दुःखे सरकारच्या निदर्शनास आणण्यासाठी दादाभाई नौरोजी यांच्या समवेत त्यांनी 'बॉम्बे असोसिएशन' या संस्थेची स्थापना केली. नानांनी आपल्या अधिकाराचा आणि संपत्तीचा समाजासाठी सढळ हाताने वापर केला. नाना मुंबईच्या कायदे मंडळाचे सदस्य होते. त्यांनी गोरगरिबांना व अनेक संस्थांना आर्थिक मदत केली. ते दानशूर होते, सार्वजनिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना त्यांनी प्रोत्साहन दिले. त्यामुळेच त्यांना मुंबईचे 'शिल्पकार' असे म्हणतात. आचार्य अत्रे त्यांच्याविषयी म्हणतात, 'नाना हे खऱ्या अवनि मुंबईचे अनभिषिक्त सम्राट होते. ३१ जुलै १८६५ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
२) आचार्य बाळशास्त्री जांभेकर (इ. स. १८१२ ते १८४६) -
नवीन उंचावलेल्या ज्ञानाच्या कलेमुळे समाजाची दुविधा मनःस्थिती झाली होती. तो चाचपडत होता. अशा परिवर्तनाच्या काळात व्यापकदृष्टीने समाज जागृती आणि मार्ग दाखवण्याचे महत्त्वाचे कार्य जांभेकरांनी केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकरांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील पोंभुर्ले येथे ६ जानेवारी १८१२ रोजी झाला. सध्या हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्या आहे. त्यांना कुशाग्र बुद्धिमत्तेची देणगी मिळालेली होती. संस्कृत इंग्रजी, गुजराथी, बंगाली, फारसी आदी भाषा त्यांनी आत्मसात केल्या इतर विषयातही त्यांनी प्रावीण्य मिळवले होते. शिक्षण पू झाल्यानंतर ते 'बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी मध्ये डेप्युटी सेक्रेश या महत्त्वाच्या पदावर रूजू झाले. सरकारच्या वतीने अक्कलकोटचा युवराजाचे शिक्षक झाले. नंतर ते एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये असि प्रोफेसर झाले. त्यांच्या विद्वत्तेचा तो यथोचित सन्मान होता. पुढे त्यांनी शिक्षकांच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून काम केले. मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळा तपासणीसाठी निरीक्षक म्हणून सरकारने त्यांची नियुक्ती केली.
वेगवेगळ्या पदांवर कार्य करत असतानाच इतिहास संशोधन, शिलालेख वाचन, ताम्रपटांचा शोध यांमध्ये ज्ञान संपादन केले. त्यांनी इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर पुस्तके लिहिली. त्यांनी 'शून्यलब्धी', 'हिंदुस्थानचा इतिहास, "हिंदुस्थानचा प्राचीन इतिहास', 'सार संग्रह .', 'इंग्लंडचा इतिहास ग्रंथ लिहिले. या शिवाय ज्ञानेश्वरीचे पाठभेदासह संपादन केले.
आचार्य बाळशास्त्री जांभेकर |
वृत्तपत्र हे समाजजागृतीचे अत्यंत महत्त्वाचे साधन आहे याचा मागोवा घेऊन १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठी भाषेतील पहिले पत्र सुरू केले. १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे मासिक सुरू केले. आदा सुधारक, मराठी वृत्तपत्राचे जनक, आय इतिहास संशोधक सुधारणावाद्यांचे प्रवर्तक, शिक्षणतज्ज्ञ, श्रेष्ठ पत्रकार, एक व्यवहारवाद सुधारक म्हणून जांभेकरांचा सन्मान केला जातो. त्यांना महाराष्ट्रातील अग्रणी सुधारक मानले जाते. इ. स. १७ मे १८४६ रोजी बनेश्वर ये यांचा मृत्यू झाला.
3) दादोबा पांडुरंग तर्खडकर :-
मराठी भाषेचे विद्वान, मराठी भाषेचे व्याकरणकार म्हणून परिचित असलेल्या दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचा जन्म इ. स. ९ मे १८९४ रोजी मुंबईत झाला. त्यांना मराठी व्याकरणाचे पाणिनी असे म्हणतात. ते धार्मिक वृत्तीचे होते. शिक्षण पूर्ण करून जावरा संस्थानच्या नबाबाचे शिक्षक म्हणून काम केले. त्यानंतर त्यांना एलफिन्स्टन संस्थेत सुरतला शिक्षक म्हणून नियुक्ती मिळाली. १८५२ मध्ये डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झाली. भिल्लांच्या बंडाचा बीमोड त्यांनी कुशलतेने केला. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणून त्यांनी काम केले. दादोबा पांडुरंगांच्या कार्याची पोच म्हणून सरकारने त्यांना 'रावबहादूर' ही पदवी दिली.
दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणांचा पुरस्कार केला. महाराष्ट्रातील नवतरुणांत आधुनिक ज्ञानविज्ञानामुळे एक नवी दृष्टी निर्माण झाली होती. त्यामुळे आपल्या समाजातील दोष व उणिवा यांची जाणीव त्यांना होऊ लागली. या जाणिवेतूनच १८४४ मध्ये त्यांनी सुरत येथे दुर्गाराम मंछाराम, दिनमणी शंकर दलपतराय इत्यादींच्या सहकार्याने 'मानवधर्म सभा' स्थापन केली. ईश्वर एक आहे. मनुष्यमात्राची जात एक आहे. धर्म एक आहे. परमेश्वरप्राप्तीसाठी भक्ती करावी, सर्वांशी समानतेने वागावे इत्यादी उदात्त तत्त्वांचा पुरस्कार केला. परंतु कार्यकर्त्यांच्या अभावामुळे ती संस्था फार काळ टिकू शकली नाही. त्यानंतर भिकोबा चव्हाण, राम बाळकृष्ण जयकर यांसारख्या मित्रांच्या मदतीने दादोबांनी मुंबई येथे १८४९ मध्ये परमहंस सभा स्थापन केली. यातूनच पुढे प्रार्थना समाजाच्या स्थापनेला गती मिळाली. आधुनिक ज्ञान व विज्ञानाशिवाय समाजाची प्रगती होणार नाही, हे समाजाला पटवून देण्याचे त्यांचे प्रयत्न अत्यंत मोलाचे मानले जातात. त्यांचा मृत्यू इ. स. १७ ऑक्टोबर १८८२ रोजी झाला.
४) भाऊ महाजन (इ.स. १८१५ ते १८९०) -
समाजसुधारणेसाठी सडेतोड व समतोलपणा जोपासणारे भाऊ महाजन हे सुधारकांच्या मालिकेतील एक होत. त्यांचे नाव भाऊ महाजन कुटे होते. त्यांचा जन्म कुलाबा जिल्हयातील पेण येथे १८१५ मध्ये झाला. बाळशास्त्री जांभेकरांचे ते वर्गमित्र होते. ते 'दर्पण' व 'दिग्दर्शन' यात लेखन करत होते. पुढे त्यांनी 'प्रभाकर' नावाचे साप्ताहिक सुरू केले. त्यांनी 'धूमकेतू' व 'ज्ञानदर्शन' मधून सामाजिक विषयांवर लेखन केले. मराठी वृत्तपत्रक्षेत्रात त्यांचे नाव 'प्रभाकर' या मालिकेमुळे अखंड चालू राहिले आहे. इ. स. १८९० मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
५) लोकहितवादी (इ. स. १८२३ मे १८९९) -
महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या क्षेत्रातील अग्रणी म्हणून लोकहितवादींना ओळखले जाते. लोकहितवादींचे नाव गोपाळ हरी देशमुख असे होते. त्यांचा जन्म इ. स. १८ फेब्रुवारी १८२३ रोजी पुणे येथे झाला. इंग्रजी, संस्कृत, फारसी, गुजराधी, हिंदी इ. भाषा त्यांनी आत्मसात केल्या. दुभाषी या पदावर ते नियुक्त झाले. पुढे शिरस्तेदार, मुन्सफ, इनाम कमिशनर, जज्ज आदी पदांवर त्यांनी काम केले. त्यांना सरकारने 'रावबहादूर' ही पदवी दिली होती. लोकहितवादी अनेक पदे व पदव्या शासनाकडून व लोकांकडून मिळवून सन्मानित झाले. भाऊ महाजन यांच्या 'प्रभाकर' मध्ये त्यांनी हिंदू समाजाला उद्देशून जे लेखन केले त्याला 'शतपत्रे' असे म्हणतात. त्यातून त्यांचा पुरोगामी दृष्टिकोन व समाजहिताविषयीची कळकळ दिसून येते. 'लक्ष्मीज्ञान', 'गीतातत्व', 'जातिभेद', 'भरतखंडपर्व', "भिक्षुक', 'लकेचा इतिहास', 'ऐतिहासिक गोष्टी', 'पानिपतची लढाई', 'कलियुग' आदी ग्रंथांचे लेखन केले.
लोकहितवादी द्रष्टे विचारवंत होते. समाजातील अनिष्ट रूढी, परंपरा, अंधश्रद्धा, खुळया समजुती इत्यादींवर त्यांनी सडेतोड विचार मांडले. समाजातील बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व यावर त्यांनी हल्ला केला. स्त्रियांच्या समानतेचे विचार त्यांनी मांडले. भारतीय समाजाची जातिव्यवस्थेमुळे अधोगती झाली आहे यावर लोकहितवादींनी जोरदार टीका केली. उच्चवर्णीयांनी आपल्या वर्ण श्रेष्ठत्वाचा त्याग करून समाजहितासाठी नवीन आचारविचाराचा स्वीकार करावा असा त्यांनी आग्रह धरला. लोकहितवादींचे धार्मिक सुधारणेविषयीचे विचार अत्यंत चिंतनीय आहेत.
लोकहितवादींनी लोकांच्या निष्क्रियतेवर टीका करून कृतिशील बनले पाहिजे असा आग्रह धरला. त्यांनी १९ व्या शतकाच्या भारतीय समाजव्यवस्थेतील दोष आणि वैगुण्य यांवर अचूक बोट ठेवले. लोकहितवादांचे सामाजिक व धार्मिक प्रश्नावरील विचार पुरोगामी होते. त्यांनी समाजजीवनाच्या विविध क्षेत्रांत सुधारणा करण्याचा आग्रह धरला. म्हणूनच त्यांना सर्वांगीण सुधारणेचे 'आक्यप्रवर्तक' मानतात, ते व्यवहारवादी होते. समाजाची प्रगती होण्यासाठी इंग्रजी विद्या, भौतिकशास्त्राचे ज्ञान, आधुनिक उद्योगधंदे यांचा त्यांनी आग्रह धरला. तसेच समाजाच्या दुःखाचा शेवट होईल अशी त्यांची धारणा होती. लोकहितवादी शास्त्रशुद्ध विचारसरणीचे प्रवर्तक होते. समाजातील भेदभाव नष्ट झाले तरच समाज एकजिनसी बनेल आणि त्याच समाजात राष्ट्रीयत्वाची भावना वाढीस लागेल असे त्यांचे मत होते. काळानुसार धर्मात व चालीरीतीत बदल करावेत, जातीयता नष्ट करावी, स्त्रियांना शिक्षण व बरोबरीचे स्थान दयावे, आळशीपणा सोडून उद्योगी बनावे, स्वशासन पद्धती, प्रवृत्तीवादी होणे या सर्व मार्गांनी समाजसुधारणा होऊ शकतात हे त्यांनी शिकवले. त्यामुळेच त्यांना लोकहितवादी म्हणून ओळखले जाते. इ. स. ९ ऑक्टोबर १८९२ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
६) भाऊ दाजी लाड (इ. स. १८२४ ते १८७४) -
महाराष्ट्रातील एक निष्णात डॉक्टर, विदयापंडित, संशोधक व समाजसेवक म्हणून भाऊ दाजी लाड यांची ओळख आहे. रामचंद्र विठ्ठल लाड म्हणजेच भाऊ दाजी लाड यांचा जन्म ७ सप्टेंबर १८२४ रोजी गोव्यातील माजरे येथे झाला. उद्योगधंद्यासाठी लाड कुटुंब मुंबईस आले. येथेच भाऊ दाजींचे पदवीपर्यंतचे शिक्षण झाले. त्यानंतर ते दोन वर्षे एलफिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये विज्ञानाचे शिक्षक होते. १८४५ मध्ये मुंबईत ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. भाऊ दाजींनी नोकरी सोडून त्या कॉलेजमध्ये विदयार्थी म्हणून प्रवेश घेतला. त्यांनी १८५१ मध्ये वैद्यकीय पदवी संपादन केली. अचूक निदान व कुशल शस्त्रक्रिया यामुळे त्यांचा या व्यवसायात नावलौकिक निर्माण झाला. त्यांनी कुष्ठरोगावर एक चांगले औषध शोधून काढल्यामुळे त्यांना 'धन्वंतरी' म्हणून ओळखले जाते. त्यांनी ज्ञानप्रसारक सभेमार्फत शिक्षण प्रसार व सामाजिक जागृती करण्याचे प्रयत्न केले. त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला. मुलींच्यासाठी आर्थिक झळ सहन करून एक शाळा सुरू केली. मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेतही त्यांचा पुढाकार होता. समाजातील अनिष्ट प्रथा, परंपरा नष्ट करण्यासाठी त्यांनी मोहीम उघडली. विधवा विवाहाचा पुरस्कार केला.
त्यांनी जगन्नाथ शंकरशेठ यांच्या मदतीने १८५२ मध्ये 'बॉम्बे असोसिएशन' ही संघटना स्थापन केली. भारतातील राजकीय स्वरूपाची ती पहिली संघटना होती. या संघटनेमार्फत भारतीयांच्या अडीअडचणी सरकारसमोर मांडल्या, ईस्ट इंडिया असोसिएशनच्या कार्यातही भाऊ दाजी सहभागी होते. लायसेन्स बिलाचा व्यापार व व्यवसायावर विपरीत परिणाम होईल म्हणून भाऊ दाजींनी त्याला विरोध केला. इतिहास संशोधनाच्या क्षेत्रातही डॉ. लाड यांचे कार्य उल्लेखनीय आहे. त्यांनी नवसमाज घडवून आणण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांतून प्रयत्न केले, सामाजिक व राजकीय समस्या सोडवण्यासाठी संघटनात्मक सनदशीर मार्गाचा पुरस्कार केला. इ. स. ३१ मे १८७४ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
७) विष्णुबुवा ब्रम्हचारी (इ. स. १८२५ ते १८७१)
महाराष्ट्रातील आय सुधारकात समाजसुधारणेच्या कार्यातील वेगळेपणामुळे वेगळे दिसणारे विष्णुबुवा ब्रम्हचारी यांचा जन्म कुलाबा (रायगड) जिल्ह्यातील शिरवली येथे १८२५ मध्ये झाला. त्यांचे नाव विष्णु भिकाजी गोखले असे होते. लहानपणीच त्यांचे वडील वारल्यामुळे त्यांचे बालपण कष्टात गेले. त्यांना फारसे शिक्षण घेता आले नाही. मात्र त्यांनी परिश्रमपूर्वक वेदाध्ययन व व्यावहारिक शिक्षण घेतले. आर्थिक अडचणींमुळे त्यांना वेगवेगळी कामे करावी लागली. विष्णुबुवांचा ओढा धर्मग्रंथ, संस्कृत अभ्यास याकडे होता. त्यांनी परिश्रमपूर्वक धार्मिक ग्रंथांचा अभ्यास केला. याच्या जोडीला कथा, कीर्तन, पुराण, प्रवचन यात त्यांना गोडी होती. या काळात ख्रिस्ती मिशनऱ्यांनी वैदिक धर्मावर आक्षेप घेऊन आपल्या धर्माचा प्रचार सुरू केला होता. त्यांच्या सेवाभावी वृत्तीने समाजातील अशिक्षित, गरीब लोकांची मने जिंकून घेतली. त्याचबरोबर उदात्त मानवतावादी ख्रिश्चन धर्मतत्त्वांच्या आधारे सुशिक्षित वर्गाला प्रभावित करण्याचे प्रयत्न सुरू केले. विष्णुबुवा ब्रम्हचारी यांनी ख्रिश्चन धर्मप्रचारकांना उत्तर देण्यासाठी मुंबईत जाहीर व्याख्याने देण्यास सुरुवात केली. आपल्या व्याख्यानातून वैदिक धर्मावरील आक्षेपांचे खंडन करून वैदिक धर्म कसा महान आहे हे लोकांना पटवून दिले. त्यांचा युक्तिवाद सडेतोड होता.
विष्णुबुवांनी 'वर्तमानदीपिका' या वृत्तपत्राद्वारे वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिले. त्यासाठी समाजाचे सर्व घटक समान आहेत असे त्यांनी प्रतिपादन केले. पुनर्विवाह, प्रौढविवाह, घटस्फोट, शुद्धिकरण या विषयी त्यांचे विचार पुरोगामी होते. आपल्या समाजातील अंधश्रद्धा खुळ्या समजुती व लोकभ्रम दूर करण्यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील राहिले. त्यांनी 'भावार्थ सिंधू', 'वेदोक्त', 'धर्मप्रकाश', 'सुखदायक' राज्यप्ररणी निबंध', 'सहजस्थितीचा निबंध' 'बोधसागर रहस्य', 'सेतुबंधानी टीका' इत्यादी ग्रंथ लिहिले. इ.स. १८ फेब्रुवारी १८७९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
८) महात्मा जोतीबा फुले (इ. स. १८२० ते १८९०)
आधुनिक महाराष्ट्रातील समाजसुधारणा चळवळीचे प्रणेने म्हणून जोतीबा फुले यांना ओळखले जाते. एक फ्रांतिकारी व सुधारक म्हणून जोतीबांचा लौकिक आहे. बहुजन समाजाला हक्कांची जाणीव करून देणारे आणि प्रस्थापितांच्या अन्यायाविरुद्ध लढणारे महामानव म्हणजे महात्मा जोतीबा फुले होत.
महात्मा जोतीबा फुले यांचा जन्म इ. स. ११ एप्रिल १८२७ रोजी पुणे येथे झाला. जोतीबांचे आजोबा पुण्यात स्थायिक झाले. आपल्या उदरनिर्वाहासाठी त्यांनी फुलांचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे ते फुले म्हणून ओळखले जाऊ लागले. महात्मा फुले यांच्या आईचे नाव चिमणाबाई असे होते. महात्मा फुले यांना शिक्षणाची गोडी होती. महाराष्ट्रात स्त्रियांच्या शिक्षणासाठी व उद्धारासाठी महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांनी मोलाचे कार्य केले. इ. स. १८४८ मध्ये पुणे येथे त्यांनी मुलीसाठी पहिली शाळा सुरू करून स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली. इ. स. १८५२ मध्ये दलितांना शिक्षण देण्यासाठी पहिली शाळा सुरू केली. महात्मा फुले यांनी विधवा पुनर्विवाहास चालना दिली. त्यातूनच त्यांनी इ. स. १८६४ मध्ये पुण्यात एक पुनर्विवाह घडवून आणला. विधवा स्त्रियांच्या मुलांना दत्तक घेऊन फुले यांनी समाजक्रांतीस प्रेरणा दिली. त्यांनी पुण्यात स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधाची स्थापना केली.
सावित्रीबाई फुले यांनी स्वत: यात महणाऱ्या मुलांची देखभाल केली. अस्पृश्यता हा मानवजातीला कलंक आहे, असे ते मानत. अस्पृश्यांना शिक्षण दिल्याशिवाय त्यांच्यात प्रगती होणार नाही असा त्यांचा ठाम विश्वास होता. त्यांनी स्वतःच्या घरातील पिण्याच्या पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. सामाजिक कार्य अस्पृश्य व दलितांच्या प्रश्नाला महात्मा फुले यांनी मनस्वी चालना दिली. त्याचप्रमाणे स्त्रीजात ही युगानुयुगे पुरुष वर्गाच्या दास्यात सापडली होती. त्यातून स्त्रियांची सोडवणूक करण्यासाठी महात्मा जोतीबा फुले यांनी सक्रिय योगदान दिले. पुनर्विवाहाच्या चळवळीला पाठिंबा दिला. केशवपन, बालहत्या, बालविवाह व अस्पृश्यता निवारण या विषयांवर समाजाचे प्रबोधन केले. विधवांची विटंबना आणि जन्मलेल्या बालकांची हत्या रोखण्यासाठी इ. स. १८६३ मध्ये 'बालहत्या प्रतिबंधक गृहा'ची स्थापना केली. काशीबाई नावाच्या विधवेचा मुलगा स्वतः दत्तक घेतला. विधवेच्या केशवपनाची चाल बंद व्हावी म्हणून त्यांनी न्हाव्यांचा संप घडवून आणला.
धर्मभेदमूलक विद्वेष, जातिभेदमूलक उच्च-नीचभाव,स्त्रीदास्य, हिंदूधर्म संस्थेतील मूर्तिपूजा आणि संस्कृत भाषेतील कर्मकांड यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी महात्मा फुले यांनी २४ सप्टेंबर १८७३ रोजी 'सत्यशोधक समाजाची' स्थापना केली. सर्व जातिघमांचे नागरिक सत्यशोधक समाजाचे सदस्य व्हावेत यासाठी योजना तयार केली. समाजासाठी मौलिक आणि प्रासंगिक असे दोन्ही प्रकारचे लेखन करून पुस्तके प्रसिद्ध केली. बहुजन समाजावर लादलेलो मानसिक गुलामगिरी स्पष्ट करण्यासाठी 'ब्राम्हणांचे कसब', 'गुलामगिरी', 'सत्सार' इत्यादी निबंध लिहिले. सामाजिक परिस्थितीची मुळे खोलवर रुजली असून हिंदूधर्माच्या शुद्धीकरणाशिवाय प्राप्त सामाजिक परिस्थितीवर मात करता येणार नाही, याचा महात्मा फुले यांना ठाम विश्वास होता. जोतीरावांच्या ऐतिहासिक सामाजिक कार्याचे मोल जाणून ब्रिटिश सरकारकडून १६ नोव्हेंबर १८५२ रोजी विश्रामबाग वाड्यातील भव्य समारंभात त्यांना शालजोडी अर्पण करण्यात आली.
महात्मा जोतीबा फुले |
समाजात सुधारणा होण्यासाठी, जातिभेदावर तीव्र प्रहार करणारे, स्त्री-पुरुष समानतेसाठी झटणारे, मानवाला स्वातंत्र्य, समता व बंधुप्रेम यांचे महत्त्व समजावून देऊन त्याचे स्वत्व जागविणारे महात्मा जोतीराव फुले हे महाराष्ट्राच्याच नव्हे, तर भारतीय समाजक्रांतीचे जनक होते.
शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य
शेतकऱ्यांचे अज्ञान, मागासलेपणा, दारिद्र्य यांमुळे महाराष्ट्रातील शेतकरी अतिशय अडचणीत होता. शेतकरी व बहुजन समाज यांच्यात परिवर्तन घडवून आणण्याची क्षमता व त्यांचे दैन्य व दुःख दूर करण्याची क्षमता केवळ शिक्षणातच आहे, हे फुले यांनी अचूक हेरले. 'शेतकऱ्यांचा आसूड' या आपल्या ग्रंथात त्यांनी शेतकऱ्यांचे विदारक चित्र रेखाटून शिक्षणाअभावी या समाजाची स्थिती पुढीलप्रमाणे शब्दबद्ध केली आहे.
विदये विना मती गेली । मती विना निती गेली। निती विना गती गेली । गती विना वित्त गेले । वित्त विना शूद्र खचले। एवढा अनर्थ एका अविदयेने केला। महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांच्या विदारक अवस्थेचे हे वर्णन डोळ्यांसमोर ठेवून त्यांची स्थिती सुधारण्यासाठी त्यांना मदत करण्याची प्रतिज्ञा केली. त्यातून पुढे शिक्षण, वसतिगृह, सिंचन, धरणे, तलाव, विहिरी यांच्यासारखे अनेक उपाय सुचवले. इ. स. १८८८ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या चिरंजीबांच्या कार्यक्रमात महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचे प्रतिनिधी' म्हणून पारंपरिक पोशाखात उपस्थित राहून शेतकऱ्यांचे गाणे मांडले. याच कार्यक्रमात त्यांनी जनतेसाठी शिक्षणाची मागणी केली. महात्मा फुले यांनी हंटर कमिशनपुढे 'प्राथमिक व माध्यमिक शिक्षण मोफत व सक्तीचे करावे अशी आग्रही मागणी केली.
या त्यांच्या महान कार्यामुळे जनतेने त्यांना 'महात्मा' ही पदवी बहाल केली. त्यांचा मृत्यू इ. स. २८ नोव्हेंबर १८९० रोजी झाला. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या महान कार्याचा वारसा त्यांच्या पत्नी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी चालवला.
९) सावित्रीबाई फुले (इ.स. १८३१ मे १८९७)
सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३१ रोजी सातारा जिल्हयातील खंडाळा तालुक्यातील नायगाव येथे झाला. त्यांचे वडील खंडोजी नेवसे-पाटील हे गावचे पाटील होते. त्यांच्या घराण्याला प्रतिष्ठा होती. सावित्रीबाईंचा विवाह महात्मा जोतीबा फुले यांच्याशी झाला होता.
सावित्रीबाई फुले |
सावित्रीबाईंनी पतीच्या कार्यात निष्ठेने साथ दिली. महात्मा फुलेंनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेत सावित्रीबाईंनी शिक्षिका म्हणून कार्य केले. महाराष्ट्रातील त्या पहिल्या स्त्री शिक्षिका होत. त्या अशिक्षित होत्या तरी त्यांनी स्वतः घरी शिकून पुढे शिक्षिकेचे काम। केले. सनातनी लोकांना सावित्रीबाईंचे हे कृत्य आवडले नाही. त्यांनी सावित्रीबाईंना खूप त्रास दिला. त्यांच्या अंगावर चिखलफेकही केली. सावित्रीबाईनी अपमान, निंदानालस्ती सहन करत आपले शिक्षणाचे पवित्र कार्य चालूच ठेवले. अस्पृश्योद्घाराच्या कार्यातही त्यांचा मोलाचा सहभाग होता. महात्मा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधगृह आपल्या घरीच सुरू केले. या गृहातील अनाथ मुलांचे संगोपन सावित्रीबाईंनी केले. त्या अनाथ मुलांच्या 'माऊली' होत्या. अत्यंत प्रेमाने व मातेच्या वात्सल्याने सावित्रीबाईंनी या मुलांचे संगोपन केले.
महात्मा फुले यांच्या सर्व कार्यांत त्यांनी समर्थपणे साथ दिली. सावित्रीबाई या स्वयंप्रकाशित स्त्री होत्या. महाराष्ट्राच्या स्त्रीविषयक चळवळीतील अग्रगण्य नेत्या, प्रौढ शिक्षणाच्या पुरस्कर्त्या आणि आयशिक्षिका म्हणून क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे कार्य मोलाचे आहे. स्त्रियांना शिक्षणाची संजीवनी देऊन त्यांचे जीवन सर्वार्थाने सन्माननीय व सर्व शक्तिमान बनवण्यासाठी त्यांनी अथक प्रयत्न केले. 'आधी केले मग सांगितले' अशा प्रकारचा संदेश समस्त स्त्रीवर्गासाठी आपल्या कर्तव्यसंपन्न जीवनकार्यातून दिला आहे. त्यांनी विनावेतन शिक्षणांचे कार्य केले. सावित्रीबाईंचा जन्मदिवस महाराष्ट्रात 'बालिका दिन' म्हणून साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांनी लिहिलेल्या 'काव्यफुले' आणि 'बावन्नकशी सुबोध रत्नाकर' या काव्य संग्रहातून मोठ्या प्रमाणात समाज प्रबोधनाचे विचार व्यक्त केले आहेत. त्यांनी महात्मा जोतीबा फुले यांना लिहिलेली काही पत्रे उपलब्ध आहेत. सारांश, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अज्ञानाच्या अंधकारात चाचपडणाऱ्या स्त्री-शूद्रांना ज्ञानाचा प्रकाश दाखविला. विशेषत: महात्मा जोतीबा फुले यांच्या मृत्यूनंतर 'सत्यशोधक समाजाची' धुरा त्यांनी समर्थपणे सांभाळली. अशा या महान व कर्तबगार स्त्रीचा मृत्यू प्लेगच्या रोग्यांची शुश्रूषा करताना प्लेगची बाधा झाल्यामुळे इ. स. १० मार्च १८९७ रोजी झाला.
(१०) बाबा पद्मनी (इ. स. १८३१ से १९०६)
बाबा पद्मजींचा जन्म बेळगाव येथे १८३१ मध्ये झाला, त्यांचे आडनाव मुळे होते. त्यांचे घराणे व्यापारासाठी सुरतेत स्थिरावले. त्यांचा जवाहिरांचा व्यापार होता. परचे वातावरण धार्मिक असल्यामुळे त्यांच्यावर धार्मिक संस्कार चांगले झाले होते. त्यांचा ओढा धर्माचरण व धर्माभ्यासाकडे होता. वडील बेळगावात सरकारी नोकरीत असल्यामुळे त्यांचे शिक्षण तेथील मिशनरी स्कूलमध्ये झाले. पुढे त्यांच्या वडिलांची बदली मुंबईत झाली. तेथे त्यांनी इंग्रजी, मराठी, संस्कृत, कन्नड, गुजराती अशा भाषांचा अभ्यास केला. मुंबईत त्यांनी विल्सन फ्री चर्च स्कूलमध्ये शिक्षण घेतले. याचबरोबर त्यांना ख्रिस्ती धर्माचे शिक्षणही मिळाले. ख्रिस्ती धर्मातील मानवतावादामुळे ते ख्रिस्ती धर्माकडे आकृष्ट झाले. परिणामी १८५४ मध्ये त्यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला.
त्यानंतर बाबा पद्मजी पुणे येथे आले. त्यांनी फ्री चर्चच्या शाळेत शिक्षकाची नोकरी केली. पुढे त्यांच्यावर बायबल ट्रस्ट सोसायटीच्या संपादकाचे काम सोपवण्यात आले. त्यांनी समाजातील अनिष्ट चालीरीती, खुळ्या कल्पना बंद व्हाव्यात म्हणून जागृतीचे कार्य सुरू केले. त्यांचा मूर्तिपूजा व जातिभेदास विरोध होता. ते परमहंस सभेचे सक्रिय सदस्य बनले. विधवा पुनर्विवाहाचे ते पुरस्कर्ते होते. त्यांनी 'यमुना पर्यटन' या कादंबरीतून स्त्रियांच्या दुःखाला वाचा फोडली, सामाजिक व धार्मिक सुधारणांसाठी त्यांची तळमळ होती. त्यांनी 'अरुणोदय' हे आत्मचरित्र लिहिले. इंग्रजी-मराठी व संस्कृत मराठी असे शब्दकोश लिहिले. या शिवाय इतरही बरेच लेखन त्यांनी केले आहे. त्यांच्या लिखाणातूनही समाजसुधारणेची तळमळ स्पष्ट होते. समाजातील अपप्रवृत्ती दूर व्हाव्यात हाच त्यांचा हेतू होता. इ. स. १९०६ मध्ये त्यांचा मृत्यू झाला.
(११) विष्णुशारी पंडित (इ.स. १८२०२८०९)
एकोणिसाव्या शतकातील भारतीय समाजाच्या मानसिकतेचा विचा करता स्त्रियांच्या उद्घारासाठी ज्यांनी आयुष्यभर प्रयत्न केले अशा समाजसुधारक विष्णुशास्त्री पंडित हे अग्रणी होते. विष्णुशास्त्री पंडितांचा जन्म इ. स. १८२७ मध्ये सातारा येथे झाला. त्यांचे वडील परशुरामशास्त्री हे बावधनचे रहिवासी होते. वडिलांकडून विष्णुशास्त्रींन संस्कृत भाषेचे शिक्षण मिळाले. 'इंदुप्रकाश' या साप्ताहिकार्य संपादक होते. याच वृत्तपत्रातून त्यांनी आपली सुधारणावादी म निर्भीडपणे मांडली. त्यांनी स्त्रियांच्या उद्घारासाठी प्रामाणिकपणे कार्ड करण्याचा निर्धार केला. खेड्यापाड्यात जाऊन व्याख्याने दिली नसाठी भरपूर लेखन केले. स्त्री शिक्षण, विधवा स्त्रियांने प्रश्न, केशवपन, परदेशगमन, विवाह, जातिभेद इत्यादी प्रश्नांव त्यांनी आपले सडेतोड विचार मांडले.
विष्णुशास्त्रींनी 'पुनर्विवाह उत्तेजक मंडळी' या सभेची स्थापना केली. या सभेमार्फत विधवांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य केले. त्यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या 'विधवा विवाह' या ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. दरम्यान सरकारने विधवा विवाहाला मान्यता देणारा कायदा मंजूर केला. त्यांनी आपल्या विचारांवरील निष्ठा एका विधवेशी विवाह करून प्रत्यक्ष कृतीने सिद्ध केली. बाल-विवाहाच्या पद्धतीमुळे विधवा मुलींचे आयुष्य मातीमोल होत आहे त्यामुळे या पद्धतीला त्यांनी विरोध केला. त्यांचे साहित्यक्षेत्रातील योगदान मोठे आहे. 'ब्राम्हण बन्या विवाह विचार'. 'पुरुष मुक्त व्याख्या', 'विधवा 'विवाह', 'हिंदुस्थानाचा इतिहास', 'तुकाराम बाबांच्या अभंगाची गाथा', 'संस्कृत व धातुकोश', 'इंग्रजी व मराठी कोश' हे त्यांचे निवडक ग्रंथ आहेत. विष्णुशास्त्री पंडित यांचा मृत्यू इ. स. १८७६ मध्ये झाला.
१२) सार्वजनिक काका (इ. स. १८२८ से १८८०)
सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणून सार्वजनिक काकांची ओळख महाराष्ट्राला आहे. गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका होय. त्यांचा जन्म ९ एप्रिल १८२८ रोजी सातायात झाला नोकरीनिमित्त ते पुण्यास गेले. मात्र त्यांना थोड्याच दिवसांत नोकरी सोडावी लागली. पुढील शिक्षण पुण्यातच घेऊन त्यांनी वकिलीच व्यवसाय सुरू केला. व्यवसाय सांभाळत त्यांनी सामाजिक कार्यातह लक्ष घालण्यास सुरुवात केली. वासुदेव बळवंत फडके यांचे वकील सरकारच्या दबावामुळे कोणीही घेत नव्हते, मात्र मोठ्या सार्वजनिक काकांनी घेतले.
भारतात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुणे येथे सनदशीर मान कार्य करणारी सार्वजनिक सभा औंधचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिध यांच्या अध्यक्षतेखाली १८७० मध्ये स्थापन झाली. त्यात मुख्य सहभाग सार्वजनिक काकांचाच होता. न्या. रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूप दिले सनदशीर राजकारण करत जनजागृती व त्यांना संघटित करण्याम कार्य त्यांनी केले. या सभेमार्फत जनतेच्या अडीअडचणी समजाव घेऊन सरकारपर्यंत पोहचवण्याचे कार्य काकांनी हाती घेतले .
सभेमार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी त्याचा फार फायदा झाला. १९८७६-७७ मधील चा महाराष्ट्रातील जनतेला जबरदस्त फटका बसला. सरकारने कोणत्याही प्रकारची मदत जनतेला केली नाही. सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत दिली. त्यांनी • ब्रिटिश साम्राज्ञीकडे भारतीयांना सामाजिक व राजकीय दर्जा दयावा, स्वावलंबी बनवणारे शिक्षण द्यावे, राजकीय हक्क दयावे अशी . मागणी केली. देशाच्या उन्नतीसाठी लघुउद्योगाचा आग्रह त्यांनी आला होता. त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार केला. स्वदेशीचा प्रचार व प्रसार करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले. ठिकठिकाणी स्वदेशी मालाची दुकाने काढली. वृत्तपत्र स्वातंत्र्याचे ते पुरस्कर्ते होते. हिंदू धर्मातील जाती भेदाला त्यांचा विरोध होता.
रेल्वे उतारूचे प्रश्न, संस्थानिकांचे अधिकार राज्यातील दंगे याबाबत त्यांनी सरकारला सल्ले देऊन लोकहिताचे कार्य केले. सार्वजनिक सभा ही जरी राजकीय संस्था असली तरी सामाजिक सुधारणेतील त्यांचा सहभाग महत्त्वाचा आहे. सार्वजनिक काकांचा मृत्यू इ. स. २५ जुलै १८८० रोजी झाला.
१३) डॉ. रा. गो. भांडारकर (इ. स. १८३७ ते १९२५)
प्रार्थना समाजाच्या स्थापनेत रा. गो. भांडारकर असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राला ते परिचित आहेत. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे ६ जुलै १८३७ रोजी झाला. त्यांचे आडनाव पत्की असे होते, मात्र त्यांचे पूर्वज खजिन्यात अधिकारी असल्यामुळे त्यांना भांडारकर असे उपनाव मिळाले. मुंबई विद्यापीठातून त्यांनी एम. ए. ची पदवी संपादन केली. जर्मन विद्यापीठाची पीएच. डी. त्यांनी मिळवली. ते उच्च विद्याविभूषित होते. कर्ते, धर्म व समाजसुधारक, भाषातज्ज्ञ, प्राचीन इतिहासाचे संशोधक, प्राच्चविद्या संशोधक, संस्कृत भाषेचे पंडित अशा वेगवेगळ्या नात्यांनी महाराष्ट्र त्यांना ओळखतो.
प्रार्थना समाजाच्या स्थापनेत भांडारकरांचा समावेश होता. प्रार्थना समाजाची तत्त्वे, उद्दिष्टे आणि प्रतिज्ञा या तयार करण्यासाठी त्यांनी फार परिश्रम घेतले. हिंदू धर्मातील मूर्तिपूजा, अवतारकल्पना, बहुदेवताबाद इ. बाबींना डॉ. भांडारकरांनी विरोध केला. समाजातील या अपप्रवृत्ती व अनिष्ठ रूढी दूर व्हाव्यात म्हणून त्यांनी प्रयत्न केले. वेद, उपनिषदे, भगवद्गीता, संतवाङ्मय इ. प्राचीन धर्मग्रंथांचा आधार देऊन त्या कशा चुकीच्या आहेत ते दाखवून दिले. समाजसुधारणेसाठी जागृती करणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी अनेक लेख लिहिले. डॉ. भांडारकरांनी बालविवाह प्रतिबंध, विधवा पुनर्विवाह संमती, वयाचा कायदा यांसारख्या सामाजिक सुधारणावा आग्रह धरला. स्त्री शिक्षण अस्पृश्यता निवारण, मध्यपानबंदी, देवदासी प्रथा बंदी इ. सामाजिक सुधारणाचा पुरस्कार केला. त्यांनी | आपली मते निर्भीडपणे लोकांसमोर मांडून जनजागृती केली. त्यांनी विधवा विवाहाचा पुरस्कार केला. त्यांनी स्वतःच्या विधवा मुलीचा पुनर्विवाह घडवून आणून विचाराला कृतीची जोड दिली, ते मुंबई प्रांताच्या लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य, केंद्रीय लेजिस्लेटिव्ह कौन्सिलचे सदस्य होते. त्यांना अनेक मानसन्मान मिळाले होते. डॉ. भांडारकरांनी इतिहास व प्राचीन संस्कृती यात संशोधन करून विपुल लेखन केले. 'अल हिस्टरी ऑफ डेक्कन', 'वैष्णविझम', 'शैविझम अँड अदर मायनर रिलिजन्स', 'हिस्टरी ऑफ इंडिया' इ. विपुल ग्रंथसंपदा होती. डॉ. रा. गो. भांडारकरांचा मृत्यू इ. स. २४ ऑगस्ट १९२५ रोजी झाला.
१४) बेहरामजी मलवारी (इ. स. १८५२ ते १९१२)
बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक आणि विधवा पुनर्विवाह पद्धतीचे समर्थक, समाजातील दुर्बल घटकांचे कैवारी म्हणून बेहरामजी मलबारी यांना महाराष्ट्राच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. गुजरातमधील बडोदा येथे बेहरामजी मलबारी यांचा जन्म १८५३ मध्ये पारशी कुटुंबात झाला. त्यांचे शिक्षण इंग्रजी मिशनऱ्यांच्या शाळेत • पूर्ण झाले. बेहरामजी यांनी बालविवाहाच्या प्रथेला विरोध केला. त्यांनी १८८४ मध्ये काही टिपणेही त्या संदर्भात प्रसिद्ध केली. यात त्यांनी बालविवाहाच्या प्रथेवर व त्यामुळे येणाऱ्या वैधव्यावर प्रकाश टाकला. समाजातील विधवांचे प्रश्न आणि अकाली प्राप्त होणारे वैधव्य याला बालविवाह पद्धती जबाबदार आहे हे विचार त्यांनी समाजासमोर मांडले. बालविवाह पद्धतीच्या निर्मूलनासाठी बालविवाहाचे अनिष्ट परिणाम स्पष्ट करणारे पाठ शालेय अभ्यासक्रमात घ्यावेत, विधवांना पुनर्विवाहाचा हक्क असावा, विधवा विवाहाचे पौरोहित्य करणाऱ्यांना वाळीत टाकले जात असे त्यास बंदी करावी इत्यादी मागण्या त्यांनी शासनाकडे केल्या. त्यांचे विचार मूलगामी होते. त्यांच्या वैचारिक जागृतीच्या मोहिमेतूनच पुढील काळात संभवनीय विधेयक मंजूर झाले. समाजसुधारणेच्या कार्याबरोबरच बेहरामजी पत्रकारितेच्या क्षेत्रातही लिखाण करत होते. त्यांनी 'इंडियन स्पेक्टंटर' हे साप्ताहिक सुरू केले. दादाभाई नौरोजी यांच्या 'व्हॉइस ऑफ इंडिया' या नियतकालिकात ते लेखन करत. त्यांनी दयाराम गिडुमल यांच्या मदतीने 'सेवासदन' ही संस्था स्थापन केली. 'गुजराथ अॅण्ड गुजराथीज', 'नीती विनोद', 'बालविवाह व महिलांवर सक्तीने लादण्यात आलेले वैधव्य काही टिपणे इत्यादी ग्रंथ लिहिले, बेहरामजी मलबारी यांचा मृत्यू इ. स. १९१२ मध्ये झाला.
१५) गो. ग. आगरकर (इ.स. १८५६ ते २८९५) -
गोपाळ गणेश आगरकर हे व्यक्तिस्वातंत्र्य व बुद्धिप्रामाण्याचा पुरस्कार करणारे विचारवंत होते. त्यांचा जन्म कराड जवळील टेंबू येथे इ. स. १४ जुलै १८५६ मध्ये झाला. घरची आर्थिक स्थिती बेताची होती. मॅट्रिकपर्यंतचे शिक्षण कराड, रत्नागिरी, अकोला या ठिकाणी झाले.. • लहानसहान नोकऱ्या करून आणि जिद्दीने प्रयत्न करून १८७५ मध्ये मॅट्रिक परीक्षा पास झाले. अनंत अडचणींना सामोरे जात त्यांनी पुण्यात एम. ए. पर्यंतचे शिक्षण घेतले. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर आगरकरांनी समाजसेवा व जनजागृतीच्या कार्याला वाहून घेतले. त्यांनी विष्णुशास्त्री चिपळूणकर, लोकमान्य टिळक यांच्या मदतीने पुणे येथे न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. पुढे लो. टिळकांच्या मदतीने 'केसरी' व 'मराठा' ही वृत्तपत्रे सुरू केली. त्यातील केसरीचे संपादन आगरकर करत होते. लो. टिळक व इतरांच्या समवेत आगरकरांनी पुणे येथे 'डेक्कन एज्युकेशन सोसायटी'ची स्थापना केली. या संस्थेच्या वतीने 'फर्ग्युसन कॉलेज' सुरू करण्यात आले. त्याच कॉलेजचे ते प्रिन्सिपॉल होते. आगरकरांनी केसरी सोडून 'सुधारक' हे वृत्तपत्र लोकजागृतीसाठी सुरू केले.
गो.ग. आगरकर |
आगरकरांनी बुद्धिप्रामाण्याच्या आधारावर सामाजिक सुधारणेचा पुरस्कार केला. त्यांनी व्यक्तिस्वातंत्र्याचा आग्रह धरला. व्यक्ती विकासातून समाजाचा विकास होतो असे त्यांचे मत होते. व्यक्तीच्या विकासाला विचार, व्यवसाय व विवाह स्वातंत्र्य असले पाहिजे असे त्यांनी प्रतिपादन केले. त्यांनी व्यक्तिवादाला बुद्धिवाद व भौतिकवाद यांची जोड दिली. आगरकरांनी बालविवाह, जातिभेद, केशवपन, धर्माच्या नावावर चाललेल्या गैर प्रकारांना विरोध करून सामाजिक सुधारणांचा पुरस्कार केला. आगरकरांच्या लेखनात समाजहिताची तळमळ होती. त्यांनी अज्ञान, अंधश्रद्धा, दांभिकता याला विरोध केला. 'केसरीतील निवडक निबंध', 'सुधारकातील वेचक लेख', 'वाक्य मीमांसा', 'वाक्याचे पृथक्करण इत्यादी ग्रंथांचे लेखन केले. समाज परिवर्तनाच्या चळवळीतील अवहेलना सहन करण्याची तयारी असणारे आगरकर एक श्रेष्ठ समाजसुधारक होते. आगरकरांचा मृत्यू इ. स. १७ जून १८९५ रोजी झाला.
२६) पंडिता रमाबाई (इ. स. १८५८ ते १९२२)
पंडिता रमाबाई यांनी बुद्धिमत्ता व कर्तबगारी यांच्या जोरावर महाराष्ट्रात अलौकिक कार्य केले. त्यांचा जन्म कर्नाटकातील मंगळूर जिल्हयातील गंगामुळ या गावी २३ एप्रिल १८५८ रोजी झाला. त्यांचे पूर्ण नाव रमाबाई अनंतशास्त्री डोंगरे असे होते. वडिलांनी त्यांना प्राचीन हिंदू शास्त्रांचे चांगले शिक्षण दिले होते. १६ व्या वर्षी त्यांचे आई-वडील मृत्यू पावले. पोरक्या झालेल्या पंडिता रमाबाई व बंधू श्रीनिवास यांनी तीर्थयात्रेला जाण्याचा निर्धार केला. सहा वर्षांच्या भारतभ्रमणानंतर त्या कलकत्त्यात दाखल झाल्या. तेथे त्यांनी आपल्या पांडित्याने व संस्कृत ज्ञानाच्या आधारे लोकांना थक्क केले. लोकांनी त्यांना 'सरस्वती' व 'पंडिता' या पदव्या देऊन गौरवले. पुढे त्यांना पंडिता रमाबाई असे संबोधले जाऊ लागले. त्यानंतर त्यांचा विवाह झाला, मात्र पंडिता रमाबाईना संसार सुख लाभले नाही. त्यानंतर त्या पुण्यात आल्या. तेथे स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती करण्यासाठी आई महिला समाजाची स्थापना १८८२ मध्ये केली. देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे असे त्यांनी प्रतिपादन केले त्यांनी हंटर कमिशनपुढे साक्ष देताना स्त्री शिक्षणासाठी आग्रह धरला. त्या मिशनन्यांच्या मदतीने इंग्लंड व अमेरिकेला गेल्या. ख्रिश्चन धर्मातील सेवाभावी वृत्ती व मानवतावादी विचारांमुळे त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला. त्यांनी आपले संपूर्ण लक्ष स्त्री शिक्षणावर केंद्रित केले.
पंडिता रमाबाई |
१७) न्या. म. गो. रानडे (इ. स. १८४२ ते १९०१)
न्यायमूर्ती रानडे |
न्या. रानडे हे सामाजिक सुधारणेचे पुरस्कर्ते होते. बुद्धिवादी असल्यामुळे सद्विचाराने वाईट गोष्टींचा त्याग करावा, भूतदया, प्रेम, त्याग, चांगुलपणा आदी गुणांचे आचरण करावे असा त्यांचा आग्रह होता, समाज व्यवस्थेतील दोष दूर झाल्याशिवाय लोकांत नैतिक मूल्यांचा विकास होणार नाही असे त्यांचे मत होते. मानवाची प्रतिष्ठा उंचावण्यासाठी समाजसुधारणेची गरज आहे. राजकारण, अर्थकारण, समाजकारण आणि धर्मकारण ही समाजाची विविध अंगे असून ती एकमेकाला पूरक आहेत.
न्या. रानडे यांनी जातीयता, जातिभेद, उच्च-नीचता, वंशभेद, जन्मभेद, सदसद्बुद्धीकडे दुर्लक्ष इत्यादींमुळे भारतीय समाजाची अवनती झाली आहे. समाजाची उन्नती व्हावयाची असेल तर सदसद्विवेकबुद्धी, समता, न्याय, बंधुभाव या तत्त्वावर आधारित समाज रचना होणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते. समाजसुधारणेसाठी शासनानेही कायदे करणे गरजेचे आहे असा त्यांचा आग्रह होता. आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांनी प्रार्थना समाजाची स्थापना केली. हिंदू धर्मातील दोष दूर करण्याचा प्रयत्न त्यांनी प्रार्थना सभेमार्फ केला. सार्वजनिक सभेची त्यांची जवळीक, सामाजिक परिषदेतील योगदान महत्त्वपूर्ण होते. त्यांनी विधवा विवाहाचे समर्थन केले मुंबईत त्यांनी एक विधवा विवाह घडवून आणला. त्यांनी सनदशी राजकारणाचा पाया घातला. हिंदी राजकारणाला अर्थशास्त्रीय विचारांच जोड दिली. अशा प्रकारे समाजकारण, राजकारण, अर्थकारण क्षेत्रात न्या. रानडे यांनी आपल्या वैचारिक योगदानाने जागृती घडवण्या कार्य केले. इ. स. १६ जानेवारी १९०१ रोजी न्या. रानडे यांचा मृत् झाला.
१८) वस्ताद लहूजी साळवे
वीर वस्ताद लहूजी साळवे यांचा जन्म इ. स. १८०० मा पुणे येथे झाला. त्यांचे वडील राधू साळवे हे पेशव्यांच्या शिकारखान्य नोकरीस होते. पुण्यातील शनिवारवाड्यावर इंग्रजांनी भगवा झेंडा उतरवून 'युनियन जॅब' फडकविला. या प्रकाराने लहूजींच्या मनात इंग्रजांविरुद्ध चीड निर्माण झाली. आपल्या घराजवळ त्यांनी तालीम बांधून काढली व तेथे बलोपासनेबरोबरच शस्त्रास्त्रे बालविण्याचे प्रशिक्षण दिले. लहुजींच्या तालमीमध्ये महात्मा जोतीबा फुले यांच्यासारखे अनेक विचारवंत व राष्ट्रप्रेमी तरुण तयार झाले.
वस्ताद लहूजी साळवे |
अशा प्रकारे १९ व्या शतकात महाराष्ट्रात धर्मसुधारणा चळवळी आणि समाजसुधारणा चळवळीने एका नव्या युगाचा पाया घातला. या शतकातील आदय समाजसुधारक, धर्मसुधारणा चळवळी व प्रमुख समाजसुधारक यांचे कार्य सर्व दृष्टीने मोलाचे आहे. या प्रबोधन कालखंडात समाजसुधारकांनी विविध क्षेत्रांत गतिमानता निर्माण करण्यात मोलाचे योगदान दिले. हे मान्य करावे लागेल.
Tag:-
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog