सायबर गुन्हेगारीचे स्वरूप सांगून त्याचे परिणाम (Cybercrime- Nature & Effects.)
सायबर गुन्हेगारीचे स्वरूप सांगून त्याचे परिणाम सांगा.
(Cybercrime- Nature & Effects.)
किंवा
सायबर गुन्हेगारीवर निबंध लिहा.
उत्तर :प्रस्तावना :- आधुनिक काळात माहिती तंत्रज्ञानाचा विकास हा मोठ्या प्रमाणात घडुन आला आहे. संगणक, इंटरनेट, सोशल मिडीया, आदी साधनाद्वारे माहितीचे आदानप्रदान मोठ्या प्रमाणात होत आहे. जग जवळ आले आहे नव्हे तर जग खेडे बनले आहे. मानवी जिवनाच्या विकासासाठी आणि सामाजिक उन्नतीसाठी या माहिती तंत्रज्ञानाचा वापर वरदान ठरला आहे. परंतू या माहितीच्या देवाण घेवाणीमध्ये जसा विकास घडतो तसाच या माहितीचा चुकिचा वापर केल्या मुळे सायबर गुन्हेही घडतात. आज सायबर गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढतांना दिसून येत आहे.
१) सायबर गुन्हेगारीचा अर्थ :
संगणक किंवा माहिती तंत्रज्ञानाचा वापर गैरप्रकारांसाठी आणि गुन्हेगारीसाठी केला जातो त्यावेळी सायबर गुन्हा घडतो. आणि सातत्याने अशा पद्धतीचे गैर प्रकार केल्यानंतर सायबर गुन्हेगारी निर्माण होते. पांढरपेशी गुन्ह्यामधील गुन्हेगारीचा हा नविन प्रकार आहे.
२) सायबर गुन्हेगारीचे स्वरूप :
अ) सायबर गुन्हेगारीत दुसऱ्याच्या फाईल्स, प्राग्राम, माहिती चोरली जाते.
ब) अवैधमार्गाने दुसऱ्याच्या संगणकाचा किंवा ई-मेल, फेसबुक यांचा पासवर्ड (गुप्त संकेतांक) चोरून माहीती चोरली जाते आणि त्या माहितीचा गैरवापर केला जातो.
क) उच्चशिक्षीत व ज्यांना संगणकांचे ज्ञान आहे असे लोकच सायबर गुन्हे करतात.
ड) सायबर गुन्ह्यामध्ये प्रामुख्याने मुळ माहितीला किंवा चित्रफित, फोटो यांना विक्षिप्त करून प्रसारीत करण्याचाही प्रयत्न केला जातो.
इ) सायबर गुन्ह्यांचे स्वरूप हे दुसऱ्यांना मानसिक त्रास देण्याचे किंवा • इतरांना आर्थिक नुकसान पोहचविण्याचे असते. ई) सायबर गुन्हेगारीत गुन्हा करणारा दुसऱ्याच्या नावाने गुन्हा करतो.
३) सायबरगुन्हेगारीची कारणे :
- दुसऱ्याच्या ज्ञानाचा आपल्या फायद्यासाठी उपयोग करण्याच्या हेतूने दुसऱ्याची माहिती त्याच्या संगणकातून चोरणे.
- ऑनलाइन बँकींग करणाऱ्यांचा पासवर्ड चोरून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेण्यासाठी सायबर गुन्हा केला जातो.
- एखाद्या व्यक्तीचा अपप्रचार करण्याच्या हेतूने फेसबुक, व्हॉट्सअॅप, यावरून अश्लिल माहिती प्रसारीत करणे.
- आपल्या ज्ञानाचा चुकीचा वापर करून दुसऱ्यांना त्रास देण्याच्या मनोवृत्तीतून सायबर गुन्हे केले जातात.
- एकतर्फी प्रेमातून ही सायबर गुन्ह्यांना चालना मिळाली आहे.. ६) स्वतःच्या ज्ञानाचा अहंकार दाखविण्यासाठीही सायबर गुन्हे घडतात.
- महत्त्वाची माहिती चोरण्याच्या उद्देशानेही सायबर गुन्हे घडतात. अशा प्रकारे सायबर गुन्हे घडण्याची कारणे सांगता येतात.
4) सायबर गुन्हेगारीचे परिणाम :
आज सायबर गुन्हेगारीमुळे अनेक सामाजिक परिणाम घडून येत आहेत. मूळ ज्ञानाची चोरी करून त्यावर स्वतःचा स्वार्थ साधन्याचे प्रकार वाढल्यामुळे मुळ माहितीचा निर्माता अनेक फायद्यापासून वंचित होत आहे. फेसबुकच्या माध्यमातून बदनामिकारक माहितीचा प्रचार करून सामाजिक तेढ निर्माण केली जात आहे. सायबर गुन्ह्यांमूळे अनेकांना मानसिक त्रास सहन करावा लागतो आणि वेळ प्रसंगी अनेकजन आत्महत्या ही करत आहेत. सायवरगुन्ह्यांचा वापर वाढत असल्यामुळे अनेकांना आपला बँकेतील पैसा ही गमवावा लागला आहे. राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाची माहिती चोरीला जाण्याची भीती कायम निर्माण झाली आहे. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारीचा परिणाम घडून येत आहे. अशा प्रकारे सायबर गुन्हेगारीचे स्वरूप व परिणाम सांगता येतात.
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog