Category

Show more

सामाजिक व्यक्तीमत्व - Personality

 व्यक्तीमत्व (Personality)

प्रश्न १ :- सामाजिक व्यक्तीमत्व म्हणजे काय? 

उत्तर :

प्रस्तावना :- व्यक्तीचे अंतरंग हा सामाजिक मानसशास्त्राचा महत्वाचा अभ्यासविषय आहे. व्यक्तीमत्वाच्या अभ्यासाशिवाय हा शास्त्र पूर्ण होत नाही. दैनंदिन व्यवहारात व्यक्तीमत्व हा शब्द वेगवेगळ्या अर्थाने वापरला जातो.

उदा:- एखाद्या माणसाचे व्यक्तीमत्व किती आकर्षक आहे. किंवा त्याला काहीच आकर्षक व्यक्तीमत्व नाही.

व्यवहारिक भाषेत एखाद्या सुंदर किंवा देखण्या व्यक्तीला आकर्षक व्यक्तीमत्व आहे असे म्हटले जाते. पण ते शास्त्रीयदृष्ट्या चूकिचे आहे. म्हणजेच या ठिकाणी व्यक्तीमत्वाचा अर्थ मर्यादित व चुकिच्या अर्थाने घेतला जातो. केवळ व्यक्तीचे बाह्य सौंदर्य म्हणजे व्यक्तीमत्व नाही तर त्या व्यक्तीच्या वर्तनामागील व्यक्तीमत्वाची रुपरेषा म्हणजे सामाजिक व्यक्तीमत्व होय. व्यक्तीमत्वाचा 

अर्थ :

"व्यक्तीमत्व या शब्दास इंग्रजीमध्ये Personality असे म्हणतात. Personality हा इंग्रजी शब्द Persona या लॅटीन शब्दापासुन बनलेला आहे. Persona या शब्दाचा अर्थ अस्पष्ट, असंदिग्ध आहे. Persona या शब्दाचा अर्थ मुखवटा असा आहे. व्यक्तीमत्व म्हणजे व्यक्तीचे बाह्य किंवा दिखाऊ रुप होय. सामाजिक व्यक्तीमत्वाचा खालील काही व्याख्येवरून सामाजिक व्यक्तीमत्वाचा अधिक अर्थ स्पष्ट करता येईल.

सामाजिक व्यक्तीमत्वाच्या व्याख्या :

१) अकोलकर : 

'व्यक्ती ज्या भूमिका पार पाडते व त्याद्वारे आपली इतरांवर छाप पाडते या क्रियेस व्यक्तीमत्व ही संज्ञा वापरली जाते." 

२) ऑलपोर्ट :

बाह्य परिस्थितीशी समायोजन साधण्यासाठी ज्या माणसिक क्रियाप्रक्रियांच्या संघटित वैशिष्ट्यपूर्ण रीतिने प्रत्येक व्यक्तीकडून उपयोग केला जातो ते गतिमान असे व्यक्तीगत मानसिक संघटन म्हणजे व्यक्तीमत्व होय

३) थाऊलेस :

"विविध परिस्थितीत व्यक्तीच्या वर्तन वैशिष्ट्याचे मार्ग निश्चित .करणारी भावनात्मक प्रमाण व्यवस्था म्हणजे व्यक्तीमत्व होय."

४) विम्बॉल थंग :

"स्वतःच्या सामाजिक स्थानाला व भूमिकेला साजेल अशा पद्धतीने वर्तन करण्यासाठी लागणारी योग्य ती लक्षणे वृत्ती, मुल्ये व कल्पना यांची सुसंघटित समष्टी म्हणजे व्यक्तीमत्व होय."

सामाजिक व्यक्तीमत्वाच्या वरील विविध व्याख्येवरून सामाजिक व्यक्तीमत्वाची संकल्पना आपल्या लक्षात येते. व्यक्तीमत्व म्हणजे व्यक्तीची शारिरीक आणि मानसिक ठेवण होय. केवळ व्यक्तीचे दिसणे किंवा व्यक्तीचे वाह्यरंगरुप म्हणजे व्यक्तीमत्व नव्हे तर बाह्य रुपाबरोबरच व्यक्तीचा स्वभाव, त्याच्या स्वभावाचे गुणधर्म म्हणजे व्यक्तीमत्व होय. व्यक्तीचे दिसणे आणि त्याचे वागणे या दोन्ही गोष्टी मिन्न-भिन्न आहेत. व्यक्तींचे व्यक्तीमत्व शारिरीक गुणवैशिष्ट्यावर ज्याप्रमाणे अवलंबुन असते त्याचप्रमाणे व्यक्तीचे मानसिक गुणधर्म, त्याचे स्वभाववैशिष्ट्ये व्यक्तीमत्वावर प्रभाव टाकत असतात.

व्यक्तीचे सामाजिक व्यक्तीमत्व त्याची बुद्धीमत्ता, मुळस्वभाव, चारित्र्य, सामर्थ्य, सर्जनशीलता, सामाजिकता इत्यादी शारिरीक घटकांवर तसेच काही जैविक आणि सामाजिक सांस्कृतिक घटकांवर अवलंबुन आसते.

प्रश्न २ :- व्यक्तीमत्वाचे मूलभूत आणि जैविक घटक स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रस्तावना :- व्यक्तीचे बाह्य स्वरुप किंवा शारिरीक रचना हा व्यक्तीमत्वाचा महत्वाचा घटक आहे म्हणुनच व्यक्तीमत्वाच्या जडण घडणीमध्ये शारिरीक घटक महत्वपूर्ण आहे. तसेच शरीराचे इतर अवयवसुद्धा महत्वपूर्ण आहेत ज्यामध्ये व्यक्तीची बुद्धीमत्ता, व्यक्तीचा स्वभाव, व्यक्तीची मुळ प्रवृत्ती, चारित्र्य, व्यक्तीचे अभिव्यक्ती सामर्थ्य त्याची प्रतिक्रिया, तसेच व्यक्तींची सर्जनशीलता आणि सामाजिकता व चिकाटी किंवा काटकसर यांचा समावेश होतो म्हणुनच वर उल्लेख केलेल्या घटकाला व्यक्तीमत्वाचे मूलभूत घटक मानले जाते. या मूलभूत घटकांचे वर्णन खालीलप्रमाणे आहे. व्यक्तीमत्वाचे मूलभूत घटक :

१) शारीरिक ठेवण:-

 व्यक्तींची शारीरिक ठेवण कशी आहे यावर त्याचे व्यक्तीमत्व अवलंबुन असते. म्हणूनच शारीरिक रचना प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा महत्वाचा भाग आहे. व्यक्तींची उंची, वजन, चेहऱ्यावरील हावभाव, व्यक्तीचा आवाज इत्यादींचा समावेश शारीरिक घटकांमध्ये होतो. ज्या व्यक्तीच्या शरीरात रक्ताचा साठा मुबलक आहे असे व्यक्ती उत्साही, आशावादी असतात. ज्या व्यक्तीचे शरीर प्रधान असते ते व्यक्ती निरुत्साही, निराधावादी, चिडचिले असतात.

२) बुद्धीमत्ता :- 

व्यक्तीमत्वाचा हा एक मूलभूत घटक आहे व्यक्तीचे व्यक्तीमत्व आणि त्याची बुद्धीमत्ता यांचा अत्यंत जवळचा संबंध आहे. व्यक्तींची मज्जासंस्था आणि बुद्धीमत्ता यांचा परस्पर असतो. व्यक्तींच्या शरीराअंतर्गत असणाऱ्या ग्रंथी व त्याचे स्त्राव यांच्यावर माणसाचा स्वभाव अवलंबुन असतो. प्रत्येक व्यक्तीचा मेंदू आणि त्याची बुद्धीमत्ता परस्परसंबंधीत असते.

व्यक्तीची बुद्धीमत्ता म्हणजे नेमके काय हे निश्चित सांगता येत नाही. तरीसुद्धा योग्य तो निर्णय घेण्याचे माणसाच्या अंगी असलेले सामर्थ्य म्हणजे बुद्धीमत्ता होय. प्रत्येक व्यक्तीचे व्यक्तीमत्व त्याच्या अंगी असणाऱ्या बुद्धी निदर्शकावर अवलंबुन असते. बुद्धीमत्तेमध्ये व्यक्तीची विचार करण्याची कुवत, निरीक्षण शक्ती, स्मृती, कल्पनाशक्ती त्याची हुशारी, हजरजबाबीपणा, युक्तीवाद या सर्वांचा समावेश होतो. वरील सर्व गुण ज्या व्यक्तीमध्ये चांगल्या प्रकारे असतील त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व चांगले आहे असे म्हटले जाते.

३) मुळ स्वभाव किंवा प्रकृती :-

प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तीमत्वामध्ये ज्याप्रमाणे बुद्धीमत्तेचा महत्वाचा सहभाग असतो त्याचप्रमाणे व्यक्तीच्या मुळ स्वभावाला किंवा त्याच्या प्रकृतीला अतिशय महत्व असते असे मत विचारवंत ऑलपोर्ट यांनी मांडले आहे. व्यक्तीचा मुळ स्वभाव म्हणजे त्याचे भावनिक स्वरुप होय. त्यामध्ये व्यक्तीचे वर्तन, संवदेना, प्रतिक्रिया देण्याची शक्ती, भावनिक लहर तिची गती इत्यादींचा संबंध घनिष्ठ आहे. व्यक्तीच्या शारीरिक वाढीबरोबर त्यांचा मुळ स्वभाव काही अंशी बदलत असतो.

दैनंदिन व्यवहारात आपण नेहमी एखाद्या व्यक्तीचा स्वभाव शांत आहे, रागीट आहे, संयमी आहे असे जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचा संबंध व्यक्तींच्या मुळ प्रकृतीशी असतो. म्हणूनच जशी प्रकृती असते तसे व्यक्तीचे व्यक्तीमत्व असते.

४) संकल्प आणि चरित्र :-

व्यक्तीची शारिरीक रचना, बुद्धीमत्ता, मुळ स्वभाव याबरोबरच व्यक्तीची संकल्प शक्ती आणि चारित्र्य हा देखील व्यक्तीमत्वाचा मूलभूत घटक आहे. एखादी व्यक्ती घाडसी आहे की, आळशी, उत्साही आहे की धरसोड वृत्तीची आहे यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाची परिपूर्ण माहिती मिळू शकते.

संकल्प आणि चारित्र्य या दोन्ही गोष्टी परस्पपूरक आहेत. व्यक्तीमध्ये असलेले नैतिक गुणधर्म म्हणजे चारित्र्य होय. नैतिक गुणधर्मामध्ये सर्व चांगल्या गोष्टीचा समावेश होत असतो. ज्या व्यक्तीचे संकल्प चांगले असतात तो चांगल्या कृती करतो त्यामुळे त्याचे चारित्र्यसुद्धा चांगले असते म्हणूनच व्यक्तीच्या चांगल्या संकल्पावर चारित्र्यावर त्याचे व्यक्तीमत्व अवलंबुन असते.

(५) अभिव्यक्तीचे सामर्थ्य :-

 व्यक्तीच्या अभिव्यक्ती सामर्थ्यातुनही त्याचे व्यक्तीमत्व प्रकट होत असते. अभिव्यक्ती म्हणजे व्यक्तीच्या मनातील विचार, भावना, इच्छा इत्यादींना योग्य शब्दांचा किंवा अन्य माध्यमांच्याद्वारे व्यक्त करण्याचे कसब किंवा कुशलता म्हणजे अभिव्यक्ती होय. व्यक्ती जे बोलतो ते करतो किंवा नाही यावर त्याचे सामर्थ्य अवलंबुन असते. व्यक्तीच्या सामर्थ्यावर त्याचा कणखरपणा अवलंबुन असतो. व्यक्तीच्या मनात असणाऱ्या भावना त्या चांगल्या किंवा वाईट असतील समोरच्या व्यक्तींचा विचार न करता अभिव्यक्त करणे हे देखील व्यक्तीमत्वाचे एक अंग आहे काही व्यक्ती आपल्या मनातील विचार, भावना, इच्छा मोकळेपणाने व्यक्त करतात तर काहीजण मनात साठवून ठेवतात. व्यक्तीच्या या प्रकृतीनुसारच व्यक्तीचे व्यक्तीमत्व अंतर्मुख आहे की, बहिर्मुख आहे हे निश्चित होत असते. बहिर्मुख व्यक्तीच्या ठिकाणी अभिव्यक्ती सामर्थ्य चांगले असते. म्हणजेच व्यक्तीचे अभिव्यक्ती सामर्थ्य हा देखील व्यक्तीमत्वाचा महत्वाचा घटक आहे.

६) प्रतिक्रिया चापल्य :- 

प्रक्रिया चापल्य यास हजरजबाबीपणा असेही म्हणतात. जवळपासच्या घडणाऱ्या घटना, प्रसंग इत्यादींचे व्यक्तींच्या मनात संवेदना होऊन त्यासंदर्भात ताबडतोब प्रतिक्रिया देणे म्हणजे प्रतिक्रिया चापल्या होय. ज्या व्यक्तीच्या अंगी प्रतिक्रिया देण्याचे सामर्थ्य अधिक असेल त्याचे व्यक्तीमत्व प्रभावी मानले जाते. याच्या उलट ज्या व्यक्तीमध्ये एखाद्या घटनाबाबत, प्रसंगासंबंधी प्रतिक्रिया देण्याचे सामर्थ्य नसेल किंवा नंतर तो प्रतिक्रिया व्यक्त असेल तर त्याचे व्यक्तीमत्व प्रभावी मानले जात नाही. म्हणूनच प्रत्येक व्यक्तीने नेहमी गतिमान, क्रियाशील राहिले पाहिजे. परंतु एखाद्या विशिष्ट पेचप्रसंगात, गंभीर, धोकादायक परिस्थितीमध्ये शांतपणे विचार करुन प्रतिक्रिया देणे अभिप्रेत असते.

म्हणजेच विशिष्ट प्रसंगामध्ये व्यक्ती त्यासंदर्भात आपले मत कसे प्रकट करतो यावरही त्या व्यक्तीचे व्यक्तीमत्व अवलंबुन असते. 

७) समाजशीलता किंवा सामाजिकता : 

कोणताही व्यक्तीसमाजाशिवाय राहु शकत नाही. म्हणुनच समाजशीलता किंवा सामाजिकता हा व्यक्तीमत्वाचा मूलभूत घटक आहे. व्यक्ती समाजभिमुख असणे म्हणजे त्याची सामाजिकता होय. व्यक्तीची परस्परांशी असणारी सहानुभूती सहकार्य, मैत्री, आत्मप्रवृत्ती, नम्रता, विनयशीलता इत्यादी अनेक घटक सामाजिकता यामध्ये येतात. व्यक्ती सामाजिक आहे की असामाजिक यावरुन त्याचे व्यक्तीमत्व निर्धारित होत असतात. व्यक्तीला समाजात जीवन जगताना समाजाबरोबरच जीवन व्यतीत करावे लागते.

८) चिकाटी किंवा काटकसर : 

चिकाटी किंवा काटकसर हा देखील व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा मुलभूत घटक आहे. चिकाटी आणि काटकसर हा गुण यशासाठी आवश्यक आहे चिकटी आणि काटसरीच्या अभावामुळे काही असामान्य व्यक्तीसुद्धा जीवनसंघर्षात अयशस्वी होतात. तर सामान्य व्यक्ती चिकाटीच्या गुणांमुळे प्रतिकुल परिस्थितीसुद्धा यशस्वी होताना दिसुन येतात. म्हणजेच चिकाटी आणि काटकसर, सतत कार्य करण्याची प्रवृत्ती हे सुद्धा व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावर प्रभाव टाकणारे घटक आहेत.

समारोप :- 

अशाप्रकारे व्यक्तीमत्वाच्या मूलभूत घटकांमध्ये, व्यक्तीची शारिरिक रचना किंवा शारिरीक ठेवण, व्यक्तीमध्ये असणारी बुद्धीमता व्यक्तीचा मुळ स्वभाव किंवा प्रकृती संकल्प आणि त्याचे चारित्र्य व्यक्तीचे अभिव्यक्ती सामर्थ्य, हजरजवाबीपणा किंवा प्रतिक्रिया चापल्य, व्यक्तींची समाजशीलता किंवा सामाजिकता आणि चिकाटी व काटकसर इत्यादी घटकांचा समावेश होतो. या वरील विविध मूलभूत घटकांवर व्यक्तीचे व्यक्तीमत्व अवलंबुन असते.

प्रश्न ३:- व्यक्तीमत्वातील जैविक मूलभूत घटक स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तावना :- व्यक्तीचे व्यक्तीमत्व जैविक मूलभूत घटकांवर आवलंबून असते. किंग्जले डेव्हिस यांनी व्यक्तीमत्वाचे मुळ (The roots of Personality) या घटकांवर सविस्तर चर्चा केली आहे.

व्यक्तीच्या व्यक्तीमत्व जडण-घडणीमध्ये अनुवंश हा महत्वपूर्ण घटक आहे. तशीच प्राप्त परिस्थितीसुद्धा प्रभाव पाडत असते. म्हणजेच व्यक्तीमत्व जडण-घडणीमध्ये जशी अनुवांशिकता महत्वाची असते तशीच सामाजिक, सांस्कृतिक पार्श्वभूमीसुद्धा महत्वाची असते.

किंग्जले डेव्हिस यांच्या मते, अनुवांशिक घटकाद्वारे व्यक्तीमत्वाची जी जडण-घडण होते त्यामध्ये जैविक प्रक्रिया महत्वाची असते. म्हणुनच त्यास व्यक्तीमत्वाचे जैविक मूलभूत घटक असे म्हणतात. व्यक्तीचे व्यक्तीमत्व हे त्या व्यक्तीला तिच्या माता-पित्याकडून प्राप्त होणाऱ्या आनुवांशिक घटकांवरच म्हणजेच जैविक घटकावर अवलंबुन असते. व्यक्तीला अनुवांशिकतेमुळे किंवा जैविक प्रक्रियेद्वारे जे व्यक्तीमत्व

प्राप्त होते त्यामध्ये मानवी प्रजनन व्यवस्था, रंगसुत्रे इत्यादी जैविक घटकांचा समावेश होतो. व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाची जडण-घडण जैविक घटकांबरोबरच सामाजिक व सांस्कृतिक घटकांवरही अवलंबुन असते. ज्यामध्ये सवयी, शिकणे, सांकेतिक आदान-प्रदान किंवा एकदंरित सामाजिकरण या प्रक्रियेचा समावेश होतो. म्हणजेच व्यक्तीमत्व विकासात एका बाजुला जैविक घटक तर दुसऱ्या बाजुला सामाजिक सांस्कृतिक घटक महत्वाचे असतात. एकंदरित मानवी व्यक्तीमत्व हे केवळ एकाच घटकांवर अवलंबुन नसते तर ते अनेक संबंधीत घटकांवर अवलंबुन असते. व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाला अनेक घटकांची पुष्टी असल्याशिवाय त्याचे व्यक्तीमत्व विकसित होऊ शकत नाही. म्हणूनच जैविक आणि सामाजिक व सांस्कृतिक अशा दोन्ही घटकांचा विचार करावा लागतो.

व्यक्तीच्या व्यक्तीमत्व विकासात साधारणपणे जैविक प्रजनन, संक्रमन अवस्था, रंगसुत्रे, इत्यादी जैविक मूलभूत घटकांचा परिणम अधिक होत असतो तर संक्रमण यंत्रणा, सांकेतिक देवाण-घेवाण, सामाजिकता, सांस्कृतिक पार्श्वभूमी, नैसर्गिक पर्यावरण, विज्ञान, सामजिकरण इत्यादी सामाजिक, सांस्कृतिक घटकांचा परिणाम होतो. व्यक्तीमत्वाचे जैविक आणि सामाजिक सांस्कृतिक घटक खालील आकृतीवरुन आपल्या लक्षात घेतला.

व्यक्तीचे व्यक्तीमत्व

अ) जैविक घटक

  1. जैविक प्रजजन आवस्था
  2.  संक्रमण आवस्था
  3.  रंगसुत्रे


ब) सामाजिक सांस्कृतिक घटक

  1.  संक्रमण यंत्रणा
  2. सांकेतिक अदान-प्रदान
  3. सांस्कृतिक पार्श्वभूमी
  4.  नैसर्गिक पर्यावरण
  5. विज्ञान

वरील आकृतीच्या साहाय्याने आपणास व्यक्तीमत्वाचे जैविक मूलभूत घटक आणि सामाजिक-सांस्कृतिक घटक सहजपणे लक्षात येतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे ती म्हणजे व्यक्तीच्या व्यक्तीमत्व जडण-घडणीमध्ये जैविक आणि सामाजिक सांस्कृतिक घटक दोन्ही महत्वपूर्ण असले तरी सामाजिक-सांस्कृतिक घटकांपेक्षा जैविक घटक हा अधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावतो. याबाबत कोणतेही मतभेद असु शकत नाही. नवीन अभ्रकसुद्धा त्याच्या जन्मानंतरच्या पहिल्या काही दिवसात त्याचे स्वभाववैशिष्ट्ये दिसुन येतात ही स्वभाववैशिष्ट्ये म्हणजे त्या मुलाचे व्यक्तीमत्व दर्शक जैविक प्रेरक असतात.

अकोलकर यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीच्या व्यक्तीमत्वावरुन त्याच्या स्वभाववैशिष्ट्यावरून त्या व्यक्तीच्या व्यक्तीमत्व विकासासंबंधी

आपण भाष्य करु शकतो. "मुलाचे पाय पाळण्यात दिसतात" या मराठी म्हणींचा अन्वयार्थ हाच आहे. समारोप : अशाप्रकारे आपणास व्यक्तीच्या व्यक्तीमत्व विकासात महत्वपूर्ण

असणाऱ्या जैविक आणि सामाजिक सांस्कृतिक घटकांचे विश्लेषण करता येते.

प्रश्न ४ :- स्वत्व म्हणजे काय सांगुन स्वत्वाची जाणीव स्पष्ट करा. 

उत्तर :

प्रस्तावना :- प्रत्येक मानवी स्वभावाचे महत्वाचे वैशिष्ट्ये म्हणजे व्यक्तीचे स्वत्व होय. प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या अस्तित्वाची जाणीव असते. व्यक्तीचे स्वत्व हे त्याच्या जिवंतपणाचे लक्षण असते. समाजात व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. म्हणजे एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीपासुन वेगळा असतो. प्रत्येक व्यक्तीचे स्वतःचे एक खास वेगळेपण असते. प्रत्येक व्यक्तीला आपल्या व्यक्तीमत्वाप्रमाणे स्वत्वाची जाणीवदेखील असते. मी माझे, यामधुन स्वतःला स्वत्वाची जाणीव होत असते. स्वत्वाचा अर्थ आणि

 व्याख्या :

स्वत्व याचा अर्थ जीव असाही सांगितला जातो. ज्ञात पदार्थ जाणुन घेण्याचे सामर्थ्य असलेला जो ज्ञाता तेच स्वत्व होय. स्वत्व या शब्दाच एक विशिष्ट असा मानसशास्त्रीय अर्थ आणि आशय आहे. व्यक्तीचे व्यक्तीमत्व व त्याचे स्वत्व यांचा घनिष्ठ परस्परसंबंध आहे. व्यक्तीचे अनुभव, क्रिया-प्रतिक्रिया, सामाजिक प्रवृत्ती इत्यांदीना एक वेगळा घाट प्राप्त होत असतो त्यालाच स्वत्व असे म्हणतात. व्यक्तीचे स्वतः संबंधीचे संवेदन आणि समाजाकडे पाहण्याचा विशिष्ट दृष्टिकोन यांमध्ये त्याचे व्यक्तीमत्व सामावलेले असते. स्वत्व म्हणजे नेमके काय यासंदर्भात खालील काही व्याख्या सांगितल्या आहेत.

१) विल्यम जेम्स :

"ज्या ज्या भौतिक अथवा मानसिक वस्तु किंवा शक्तीचा माणुस माझ्या माझ्या म्हणून आत्मीयतेने उल्लेख करतो अशा सर्व बाबींचा समुच्चय म्हणजे स्वत्व होय. 

२) मार्क बाल्डविन :

"स्वत्व हे सामाजिक जीवनाचे फलित आहे. प्रत्येक व्यक्ती म्हणजे समाजाची घटक असण्यापेक्षा समाजनिर्मित व समाजाचे फलित आहे.

३) किम्बॉल यंग :

"नवोदित बालकांचे जेव्हा इतर व्यक्तीशी उघड, उघड संबंध प्रस्थापित होतात तेव्हा स्वत्वाची प्रतिक्रिया सुरुवात होते. " 

४) किंग्जले डेव्हिस :

"सामाजिकरण प्रक्रियेचा आत्मा म्हणजे स्व ची निर्मिती व त्याचा हळूहळू होणारा विकास होय. व्यक्तीच्या स्वच्या स्वरुपात व्यक्तीमत्व आकाराला येते व त्यामुळेच मन कार्यरत होते. "

स्वत्व या संकल्पनेच्या वरील विविध व्याख्येवरुन आपल्या लक्षात येते की, यामध्ये सामाजिकतेला महत्व असते. व्यक्ती जन्माला येते त्या वेळी व्यक्तीजवळ शरीर मन इत्यादींनी बनलेले व्यक्तीत्व असले तरी त्यावेळी त्याला स्वत्वाची जाणीव निर्माण झालेली नसते. म्हणुनच स्वत्वाच्या जाणीवेला उदय आणि परिपोष कसा होते हे समजून घेणे आवश्यक असते.

स्वत्वाची जाणीव :

व्यक्ती जेव्हा जन्माला येतो तेव्हा त्याला त्याच्या स्वत्वाची जाणीव झालेली नसते. एखाद्या नवजात अर्भकाला त्याच्या शरीराच्या अस्तित्वाची जाणीव नसते. आपले शरीर नेमके कसे आहे ते कोणत्या अवयवांशी बनलेले आहे याचे त्यास ज्ञान नसते. कालांतराने त्याला त्याच्या शरीराची ओळख होते. आपण मुलगा आहोत की मुलगी याचीही त्याला विशिष्ट काळानंतर जाणीव व्हायला लागते.

स्वत्व आणि व्यक्तीमत्व या दोन्ही गोष्टी परस्परपुरक आहेत. यामध्ये ज्याप्रमाणे साम्य आहे तसेच भेद देखील आहे. व्यक्तीमत्व म्हणजे व्यक्तीच्या इच्छा, गरजा, भावना इत्यादींनी बनलेले संघटन सुसंघटित वर्तन होय. तर स्वत्व म्हणजे या व्यक्तीमत्वाच्या रुपरेषेच्या आवरणात लपलेले स्वतःचे स्वत: लाच केवळ ज्ञात असलेले स्वरुप होय.

व्यक्तीचे इतरांना जे व्यक्तीमत्व दिसते त्यापेक्षा त्या व्यक्तीचे स्वत्व हे निराळे असते. व्यक्तीला आपले कतृत्व, आपली काम करण्याची कुवत किंवा क्षमता, आपल्यामध्ये असणारे चांगले वाईट गुण इत्यादींची जाणीव असते त्याचा संबंध त्या व्यक्तीच्या स्वत्वाशी असतो. प्रत्येक व्यक्तीचा स्वतःकडे पाहण्याचा एक विशिष्ट दृष्टिकोन असतो. व्यक्तीच्या व्यक्तीमत्वाचा अहंपणा हा एक महत्वाचा भाग असतो. जो त्याला स्वत्वाच्या जाणीवेतुन प्राप्त झालेला असतो.

अशाप्रकारे व्यक्तीमत्व स्वत्य आणि स्वत्वाची जाणीव या तिन्ही संकल्पना परस्परसंबंधीत आहेत.

Personality

Think Work VM knowledge 

Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English