Category

Show more

स्त्रियांच्या समस्या (Problems of Women) - Social problems in Contemporary India

 स्त्रियांच्या समस्या (Problems of Women)

प्रश्न १ :- लिंग भेदभावाची कारणे व स्वरूप स्पष्ट करा. लिंग भेदभाव करण्याची कारणे व स्वरूप विषद करा. 

(Causes of Gender Discrimination) लिंग भेदभाव करण्यामागील कारणे व स्वरूप सांगा.

 उत्तर :

प्रस्तावना :- भेदभावाचे अनेक प्रकार देशपरत्वे वेगवेगळे पाहावयास मिळतात. आर्थिक भेदभावामुळे सामाजिक भेदभाव निर्माण होते. तसेच वर्ग, दर्जा व सत्ता या आधारावर फेदभाव आढळते. यापैकी दर्जाची भेदभाव ही लिंग भेदभावशी संबंधित आढळते. सामाजिक गुणविशेषतील फरक आणि जीवनपद्धतीमुळे श्रेष्ठ-कनिष्ठता प्राप्त होते. तेव्हा दर्जाची भेदभाव आहे असे म्हटले जाते यात सामाजिक दर्जा अपेक्षित आहे.

भारतात लिंगाच्या आधारावर स्त्री-पुरुष भेदभाव पाहावयास मिळते. पुरूष स्त्रियांपेक्षा श्रेष्ठ, तर स्त्रिया कनिष्ठ दर्जाच्या हे परंपरागत रीतीने मान्य झालेले आढळते. स्त्री-पुरुषांतील भेदभाव म्हणजे लिंग भेदभाव समजली जाते. समाजातील दर्जा हा लिंगानुसार निश्चित होतो. समाजिक भूमिकादेखील त्यानुसार ठरविल्या जातात.

भारतात पितृसत्ताक पद्धती असल्याने कुटुंबात पुरुषांचा अधिकार असतो. वंश पित्याच्या नावाने चालू राहतो. विवाहानंतर स्त्रीला पतीचे यनाव मिळते. घरातील सर्व निर्णय पुरुषच घेत असतो. स्त्रियांना मात्र काहीच अधिकार नसतो. फक्त घरच्यांची सेवा करणे हा तिचा धर्म मानला जातो. नोकरी करणारी स्त्रीसुद्धा कनिष्ठच मानली जाते.

भारतीय मानसिकता :

भारतीय कुटुंबांमध्ये मुलगा जन्माला आल्यास आनंदोत्सव साजरा केला जातो. उलट मुलगी जन्मास आल्यावर दुःख होते. काही वेळेस मुलीची हत्यादेखील केली जाते. सध्या तर गर्भजल चिकित्सा पद्धतीने मुलीचा गर्भ काढून टाकला जातो. मुलीकडे पूर्ण दुर्लक्ष केले जाते. तिला शिक्षण तर मुळीच नसते. मुलगा मात्र वंशाचा दिवा समजून सर्व सुविधा मुलांना दिल्या जातात. चांगले खाऊ पिऊ घालतात, लाड-कौतुक होते. कुटुंबाचा खरा वारस म्हणून मुलांची चांगली जपणूक करण्यात येते. आई-वडिलांचा खरा आधार आणि म्हातारपणी सांभाळ गुलगाच करेल अशी भारतीय मानसिकता आढळते. ही मानसिकताच लिंग भेदभाव समजली जाते. धर्म व रुढी-परंपरेची त्याला जोड मिळते. हिंदू धर्मानुसार पितृऋण फेडण्यासाठी मुलगा असतो. मुलगा व्हावा म्हणून वैदिक काळात पुत्रकामेष्टी यज्ञाची रचना केलेली आढळते. अशा प्रकारे लिंग विषमतेला रूढी परंपरांची मान्यता मिळालेली असते.

लिंग भेदभावाचे स्वरूप :

स्त्री-पुरुष दोन्ही समाजाचे घटक आहेत. स्त्री-पुरुष समान असमानता हा खरा वादाचा, चर्चेचा विषय आहे. भारतात प्राचीन काळापासून स्त्री-पुरुष भिन्नता मानली जाते. परंतु स्वातंत्र्योत्तर कालखंडानंतर संविधानाने व कायद्याने स्त्री-पुरुष समान असल्याचे तत्त्व मान्य केले आहे व त्यावर आधारित नवसमाजाची, आधुनिक समाजाची चौकट बनवलेल आढळते: समाजिक जीवनात कुटुंबाचा समावेश होतो. कुटुंबाचा समावेश होतो. कुटुंबात स्त्री ही अनेक नात्यांनी वावरत असते. माता, पत्नी, भगिनी, कन्या व सासू अशी अनेक रुपाने असते. समाजाच्या चौकटीत बसविण्यासाठी स्त्रियांवर अनेक बंधने व नियंत्रणे घातलेली आढळतात. आपल्या समाजामध्ये स्त्री-पुरुष भेदभाव मोठ्या प्रमाणात पूर्वीपसून चालत आलेली आहे.

पुरुषप्रधान संस्कृतीत जन्माआधीपासून ते मृत्यूपर्यंत सर्व अवस्थांमध्ये स्त्री-पुरुष भेदभाव आढळते. त्यासाठी बनवलेले नियम, संस्कार हे स्त्रियांना कमी लेखणारे आढळतात. प्राचीन काळापसून 'पुत्रच व्हावा' यासाठी अनक संस्कार सांगितले आहे. व कन्या व्हावी असा कोठेही उल्लेख आढळत नाही. मोठी माणसे आशीर्वाद देताना 'अष्टपुत्र सौभाग्य' असाच देतात. कन्येचा उल्लेचा आढळत नाही. स्त्री-पुरुष असमानता हा नैसर्गीक, जैविक, सामाजिक व सांस्कृतिक आहे काय यांवर चर्चा करावयाची आहे.

लिंग भेदभावाची कारणे व स्वरूप : 

येईल भारतात लिंग भेदभाव आढळते. त्याचे स्वरूप पुढीलप्रमाणे सांगता

१) पितृसत्ताक पद्धती :- 

कुटुंबातील कर्तेपणा पुरुषाकडे असतो. पुरुषांचा अधिकार संबंध कुटूंबावर चालतो. घराण्याचा वंश हा पित्याच्या नावाने चालतो. म्हणूनच पुरूषाला 'वंशाचा दिवा' म्हटलेले आढळते. आपल्या कुटुंबातील सर्व निर्णय पुरूष घेत असतात. पुरुषप्रधान संस्कृतीत जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व अवस्थांमध्ये स्त्रियांना हीन लेखले जाते.


२) पुत्रच हवा (मुलांचा जन्मोत्सव) :- 

कुटुंबात मुलाचा जन्म झाल्यास मोठ्या उत्सव साजरा केला जातो. प्राचीन काळात पुत्रच जन्मावा म्हणून पुत्र कामेष्टी' सारखे यज्ञ करण्याची प्रथा होती. ऋग्वेद व अथर्व वेदात 'कन्या व्हावी' अशी इच्छा एकदाही व्यक्त केलेली नाही. 'पुत्रच व्हावा' अशी वारंवार इच्छा व्यक्त केलेली आढळते. कुटुंबात मुलाला सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातात. चांगले अन्न खाऊ-पिऊ घालतात. लाड, कौतुक केले जाते. घराचा वारस', 'वंशाचा दिवा' म्हणूनच सर्वोतोपरी काळजी घेतली जाते. आई-वडिलांचा आधार, म्हातारपणी मुलगाच सांभाळ करणार अशी धारणा आढळते.


३) कर्ता पुरुष:-

 रुषाला कुटुंबातील कर्ता पुरुष मानले जाते. कोणत्याही समस्यांबाबत पुरुषच विचार करतात व निर्णय घेतात. पुरुषार्थाची पात्रता निर्माण करण्यासाठी संस्कार केले जातात.

थोडक्यात, भारतीय समाजात पुरुष श्रेष्ठ तर स्त्रियांना कनिष्ठ समजले जाते. स्त्रियांचे स्थान व दर्जा दुय्यमच राहात आलेला आढळतो. लिंग भेदभाव नैसर्गिक आहे :

नैसर्गिकदृष्ट्या स्त्री-पुरुष यांच्यात मिन्नता आढळते. आत्मा जरी एक असला तरी शरीरचना मात्र अलग आढळते. मुलांमध्ये स्नायू शकती जास्त आढळते. म्हणजे स्नायू बळकट असतात. त्यांची वाढ जलद गतीने होते. म्हणून मुलांना वजनदार वस्तू उचलाविशी वाटते. तर कोठेतरी झाड, डोंगरमाथ्यावर चढावेसे वाटते. या भावनेमुळे मुलांच्या स्नायूंचा जास्त उपयोग होऊ शकेल असे वाटते. मुलींबाबत मात्र बोटांचे कौशल्य जास्त विकसित झालेले आढळतात. म्हणून त्यांना मणी किंवा फुलांची माळ ओढावीशी वाटते. मुली छोट्या बाहुल्या खेळतात. बाहुल्यांना कपडे घालणे, त्यांना भातुकलीच्या खेळातील स्वयंपाक करून जेवण वाढणे जास्त आवडते. मुलांची खेळणी वेगळी असतात. मातीची बैलगाड़ी बनवणे, पतंग उडवणे हे खेळ खेळतात. स्त्रियांमध्ये वात्सल्य उपजत असते. मातृत्वाची ओढ नैसर्गिक असते.

  1.  भावभावना :- स्त्री-पुरुष यांच्यात भाव-भावनाबावत भिन्नता आढळते. क्षमता, कौशल्य व वृत्ती भिन्न असतात. हे भेद उपजत असतात. कोमल भावना, सुंदरता व नाजूकता यास स्त्रिया प्राधान्य देतात, तर पुरुष शारीरिकदृष्ट्या बळाच्या जोरावर श्रेष्ठता प्राप्त करतात. पराक्रम गाजवतात. पुरुषांना बळाचे, शौर्याचे प्रतीक मानले जाते तर स्त्रियांना सौदर्याचे कोमलतेचे प्रतीक मानले जाते. मुलांमध्ये चटपटीत बुद्धी असते. पण पुरुषांप्रमाणे बलिष्ठ बुद्धी नसते. पुरुषांना रिझल्टस् प्राप्त करणे, उद्दिष्ट साध्य करणे, सत्ता, प्रतिष्ठा मिळविणे या गोष्टींमध्ये अधिक रस असतो. स्त्रियांना सुसंवाद, सहकार्य, सौंदर्य, सर्जकता, नेटकेपणा, वारकावे यांत जास्त आस्था असते.
  2. बालसंगोपन :- निसर्गाने स्त्रीकडें गर्भधारणा व बालसंगापणाची जवाबदारी सोपविली आहे. स्त्रियांनी घराबाहेरची कामे करू नयेत अशी योजना निसर्गाने केली आहे. निसर्गाचा तसा आदेश नसता तर स्त्रिया अधिक बलवान शरीर घेऊन जन्माला आल्या असत्या. म्हणून बालसंगोपन घरात राहूनच. घरातील सर्व कामे सर्व सदस्यांची सेवा करणे नैसर्गिकच म्हणावे लागेल. अर्थात, अर्थार्जनासाठी पुरुषांनी बाहेरची कामे करावी म्हणूनच स्त्री पुरुषांवर अवलबून राहणे नैसर्गिकच म्हणावे लागेल. गर्भधारणेमुळेच स्त्री-पुरुष भिन्नता आहे. यामुळेच स्त्री भावनाप्रधान बनली आहे. अर्थात, पुरुषांनी स्त्रियांशी बरोबरीने वागणे कर्तव्यच म्हणावे लागेल, मातृत्त्वाच्या आदर्शाने स्त्री पूजनीय होते व मातृत्त्व पद हे जगातील सर्वश्रेष्ठ पद आहे असे स्वामी विवेकानंद म्हणतात. लिंग भेदगाव सामाजिक आहे 
स्त्री-पुरुष भेदभावाचा इतिहास फार प्राचीन आहे. पितृसत्ताक पद्धतीला म्हणजे पुरुषी वर्चस्वाला सामाजिक मान्यता फार पूर्वीपासून पाहावयास आढळते. • त्यामुळेच स्त्री-पुरुष मिन्नता जोपासली गेली. स्त्रीला पुरुषाने आपल्या नियंत्रणात ठेवण्यास समाजाने मान्य केले आहे. स्त्री पुरुष भेदभाव बालपणासूनच सामाजिक अध्ययनातून शिकण्यात येत असे. लहानपणापासूनच मुला-मुलीच्या वर्तनात वेगळे-वेगळे वळण जाते की, जे भविष्यात त्यांना पत्नी, भाता, पती, पिता आदी भूमिका पार पाडावयाच्या असतात.

  1. बालसंगापनातील भेद :  मुला-मुलीमध्ये फरक आहे तसा त्यांच्या वर्तनातही आहे. कुटुंबात, शाळेत. समाजात मुलांना आपल्या लिंगाला अनुसरून वर्तन करण्याचे दडपण आणले जाते नव्हे तर शिक्षणच तसे मिळते. उदा. मुलांना रडणे अपेक्षित नसते. मुलांनी दणकट, शक्तिशाली व बलवर्धक असावे अशी अपेक्षा असते तर मुलींनी दंगामस्ती करू नये, भावाभावांच्या भांडणात मुलींना गप्प राहण्यास सांगण्यात येते. शिवाय अशी भावाशी भांडत राहिल्यास लग्नानंतर नवऱ्याशी भांडशील, म्हणून आपण नमतं घ्यावं अशी समज मुलींना देण्यात येते.
  2.  घरातील कामे :- घरात आई-वडील मुला-मुलींना कामे सांगत असताना स्त्री-पुरूष भेद करण्यात येतो. मुलींना आईला घरकामात, स्वयंपाकात, घुणी - भांडी, केरकचरा काढणे व घराची स्वच्छता यांसारखी कामे सांगितली जातात, तर मुलांना बाहेरची काम, लाईट-बील भरणे व बँकेत, पोष्टात पत्र टाकणे यांसारखी कामे सांगितली जातात.
  3.  खेळ खेळणे :- कुटुंबात मुला-मुलींनी कोणकोणते खेळ खेळावे रुढी - परंपरेप्रमाणे निश्चित झालेले असते व तसेच संस्कार त्यांच्यावर होतात. मुली चाहुलीशी खेळतात. बाहुलीला कपडे शिवणे, भातुकलीच्या खेळातून जेवू घालणे, स्वयंपाक करणे, असेच खेळ खेळण्यास दिले जातात. नव्हे आग्रह केला जातो. मुलांना धावणे, उंच उड्या मारणे, नेम मारणे, मातीची बैलगाडी बनविणे, पतंग उडवणे, व्यायामशाळेत पाठविणे यांसारखे खेळ खेळण्यास सांगितले जाते. मागरिट मिड नावाचे विचारवंत म्हणतात की, "पुरुषांचे अहंसामर्थ्य हे त्यांच्या कुटुबाचे कर्तेपण त्यांच्याकडे किती आहे यावर अवलंबून असते. या अहंसामर्थ्याच रक्षण करण्यासाठी समाजाने काही कार्यांना श्रेष्ठ स्थान दिले आहे व स्त्रियांना त्यापासून वंचित ठेवण्यात आलेले आहे. यामुळेच स्त्री-पुरुष भिन्नता ही कल्पना दृढ झालेली आढळते.
  4.  वर्गव्यवस्था :- भारतीय समाजात वर्गव्यवस्थेमध्ये स्त्री-पुरुष भिन्नता आढळते. कनिष्ठ वर्गात स्त्रियांचे स्थान दुय्यम असते. पुरुष स्त्रीवर अधिकार गाजवितात. मारहाण करतात. पतीने पत्नीला मारल्यास आपली प्रतिष्ठा गेली असे पत्नीला वाटत नाही. उलट पुरुष आहे मारणारच, अशी मनोभूमिका कनिष्ठ वर्गातील स्त्रियांमध्ये आढळते. काही वेळेस न मारणाऱ्या पतीकडे वेगळ्या नजरेने पाहिले जाते. वरिष्ठ वर्गात स्त्रियांचा दर्जा हा कनिष्ठच मानला जातो. मात्र अलीकडे माध्यमवर्गीय स्त्रीचा दर्जा मात्र समान मानला जातो. निर्णय घेण्यात स्त्रीचे मत विरचारात घेतले जाते.
  5. ग्रामीण व शहरी भाग :- आजही अनक ठिकाणी ग्रामीण व शहरी भागात स्त्री पुरुष मिन्नता जोपासली जाते. घरात जेवणे आटोपली की पुरुष वर्ग बाहेरच्या खोलीत जाणे व गप्पा मारणे, पानसुपारी खाणे ही पद्धतच असते. स्त्री मात्र पुरुषानंतर जेवणानंतर आवराआवर भांडी धुणे, नंतर घर स्वच्छ करणे. यांसारखी कामे रुढी परंपरेनेच चालत आलेली आढळतात. आधी पुरुषांची जेवणे व नंतर स्त्रियांनी जेवणे ही रूढी सर्रास आढळते. सण समारंभात हीच प्रथा चालत आलेली आहे. पतीच्या उष्ट्या ताटात पत्नीने जेवणे बहुमानाचे रूढी परंपराचे वर्चस्व असते.

लिंगभाव भेदभाव सांस्कृतिक आहे : आपल्या देशात स्त्री-पुरुष भिन्नता सांस्कृतिक क्षेत्रातही आढळते. कला,

साहित्य, नृत्य, शिल्पकला, चित्रकला, खान-पान, राहणीमान, केश वेशभूषा या सर्व गोष्टींमध्ये लिंग भेदभाव आढळते. मुळात कुटुंबातच लहानपणापासून लिंग भेदभाव जोपसली जाते. शिकवली जाते. त्यानुसारच वर्तन व्हावे असा कटाक्ष असतो. मुलींना स्वयंपाक घरकाम, शिवणकला व कलाकुसर यांसारख्या गुणांची शिकवण मुद्दाम देण्यात येते. नृत्य, गाणे म्हणणे याही क्षेत्रात मुलींना प्राधान्य देण्यात येते. मुलांना आज्ञाधारकपणा, स्वावलंबन, यशस्वी होणे यांसारख्या गुणांना जोपासण्याचे शिक्षण दिले जाते. आपल्याकडील रूढी परंपरांचा संबंध संस्कृतीशी असतो आणि संस्कृतीया संबंध मूल्यांशी असतो. स्त्रीया रूढी परंपराचे पालन करतात. म्हणजे ते संस्कृतीची आणि मूल्यांची जोपासना करतात. हे सर्व स्त्रियांनीच करावे ते पतीसाठी विवाहित स्त्रीने कुंकू लावावे. गळ्यात मंगळसूत्र घालावे, वटसावित्री पौर्णिमेला वडाची पूजा करावी. या पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांवर अनेक बंधने लादण्यात आली आहेत. भारतीय धर्मग्रंथ, पोथ्या, पुराणे, कहाण्या, इतिहास, लाकवाङ्मय यातून स्त्रियांच्या दुय्यम स्थानाचे वर्णन केलेले आढळते. सारी व्रते स्त्रियांनीच करावी. सर्व सण-समारंभात विधवाना बंदी आहे. याचा अर्थ नवन्याशिवाय स्त्रीचे अस्तितव कमीपणाचे आहे. हे परंपरानी लादलेले आहे.

लिंगभेदानुसार कामधंद ठरतो मेहनतीची, शारीरिक कष्टाची कामे पुरुषानी करावी. उदा., शेती करणे, युद्ध करणे, कामधंदा करून पैसा कमावणे, याउलट कमी मेहनतीची व घरातल्या घरात होऊ शकणारी कामे स्त्रियांसाठी राखून ठेवण्यात येतात. यात घरकाम, स्वयंपाक वा कलाकुसर या कामाचा समावेश होतो. आमच्या संस्कृतीचा शिकवण अशी असते की पुरुष म्हणजे बुद्धिवान, साहसी, पराक्रमी, धीट, तर स्त्री म्हणजे रडणारी भवनाप्रधान, हलके काम करणारी निर्णय न घेता येणारी होय. 

आजही काही आदिवासी संस्कृतीमध्ये स्त्रियांचे स्थान वरच्या दर्जाचे, कुटुंबांची सता स्त्रीच्या हाती असते. स्त्रिया मासेमारी करतात. तर पुरुष कलाकुसारीची, नृत्य, चित्रकला ही कामे करतात. उदा. मार्गरिड मिड यांनी अध्ययन कलेल्या न्यू गिनीमधील माणूस बेटावर असलेल्या जमातीत स्त्रिया दिवसभर कष्टाची कामे करतात, तर पुरुष मासेमारी शिकार करतात व मुलांचे संगापन ही करतात. लिंग भेदभाव जैविक आहे :

मुळताच स्त्री-पुरुष भिन्नता जैविक स्वरूपाची आहे. स्त्रीला गर्भधारणा होण्यासाठी अंडपेशी व पुरुषाला पुबीज निर्माण करण्याची क्षमता निर्माण होण्यासाठी दोहोंचे शरीर परिपक्व व्हावे लागते. वयाच्य १८ व्या वर्षी स्त्रीचे न पुरुषाची २१ व्या वर्षी शारीरिक परिपक्वता येते. मुलगा की मुलगी कोण ठरवितो. गर्भधारणा होण्यासाठी पुरुषांच्या शरीरातील पुवीजे व स्त्रीच्या शरीरातील अंडपेशी यांचा संयोग व्हावा लागतो. म्हणजे मूल जन्माला घालण्यासाठी स्त्री-पुरुष दोहोंचा सारखाच सहभाग असतो. मुलगा की मुलगी हे लैंगिक रंगसूत्रावर अवलंबून असते. पुरुष २३ व स्त्री २३ रंगसुत्र असे ४६ रंगसूत्र प्राप्त होतात. २३ वे रंगसूत्र X प्रकारचे असते. पुरुषांच्या पुवीजात २३ वे रंगसूत्र X किंवा Y असे असते. आईकडून X रंगसूत्र असते व वडीलांकडून X किंवा Y रंगसूत्र मिळते. तेविसावी जोडी XX किंवा YY बनते. यावरूनच मुलगी की मुलगा उरते. वडिलांकडून X रंगसूत्र मिळाले तर २३ वी जोडी XX बनते व गुलगी जन्मास येते. वडीलांकडून Y रंगसूत्र आईच्या X रंगसूत्रास मिळाले तर २३ वी जोडी XY बनेत व मुलगा जन्माला येतो. अशा प्रकारे लिंगभेदभावाची कारणे व स्वरूरूप विषद करता येते.

प्रश्न २ :- लिंग भेदभावाचे सामाजिक परिणाम स्पष्ट करा.

किंवा

लिंग भेदभावामुळे कोणते परिणाम घडवून येतात याची मांडणी करा.

उत्तर : प्रस्तावना :- समाजात लिंग भेदभाव ही समस्या झाली की स्त्रियांवर अनेक प्रकारचे सामाजिक, आर्थिक, राजकीय, बंधने लागू केली जातात. यांना कनिष्ठ मानले जाते. अनेक बंधने व मर्यादा येतात आणि स्त्रियांना मानवी हक्कापासून वंचित ठेवले जाते. 

  1.  सामाजिक परिणाम :- लिंग भेदभावामुळे समाजात स्त्रियांना गौण स्थान प्राप्त होते. अनेक मर्यादा घातल्या जातात. चूल आणि मूल इतके मर्यादित क्षेत्र स्त्रियांसाठी असते. घराबाहेर पडणे दुरापास्त होते तेव्हा स्त्रियांना शिक्षण आणि नोकरी तर लांबच असते.
  2. बालविवाह :- लिंग भेदभावातून बालविवाह करणे पसंत केले जाते. बालविवाहास धर्माची मान्यता देण्यात येते. पित्याने कन्यादान करणे हे पुण्याचे कर्म समजले जाते. परंतू स्वातंत्र्यानंतर मुलीचे विवाहाचे वय १८ वर्षे मुलाचे वय २१ वर्षे निश्चित करण्यात आले. त्याचा परिणाम अलीकडे बालविवाह प्रथा कमी झालेली आढळते.
  3. नोकरी करणे अयोग्य :- लिंग भेदभावाचा परिणाम स्त्रियांना नोकरी नाकरले जाते. अयोग्य समजले जाते. पुरुषांना स्त्रियांनी नोकरी करून पैसा कमावणे कमीपणाचे समजले जाते. स्त्रियांनी केवळ घरकाम करावे हे रुढी मान्य आहे. या दृष्टिकोनातून स्त्रियांना नोकरी करण्यास नाकरण्यात येते.
  4.  कौटुंबिक अयोग्यता :- स्त्रियांना कौटुंबिक जीवनातही अयोग्यता लावण्यात आलेल्या होत्या. कुटुंबात स्त्रियांचे स्थान व दर्जा हा दुय्यम, गौण समजला जात असे. घरकाम, परिसेवा एवढेच मर्यादित काम स्त्रियांचे होते. सून म्हणून सततचा छळ स्त्रियांच्या वाट्याला आलेला आढळतो. या दृष्टीने आई वडीलही मुलीला 'ओझे' समजत असत व जबाबदारी झटकण्यासाठी बालविवाह केले जात असत. पतीच्या मृत्यूनंतर 'विधवा' म्हणून जीवन जगणे हे अपमानजनक जीवन होय, सतत अवहेलनात जीवन जगावे लागे.
  5.  धार्मिक बंधने :- स्त्रियांवर सर्व धार्मिक बंधने टाकली होती. स्त्रियांना पौरोहित्याचे काम करण्यास बंदी आहे. विधवांना मात्र कोणतेव धार्मिक कृत्य करण्यास बंदी होती. त्यांना अशुभ मानले जात असे.

अशा प्रकारे लिंग भेदभावमुळे स्त्रियांवर अनेक बंधने, मर्यादा लादण्यात आलेल्या होत्या.

प्रश्न ३:- भारतातील स्त्री भ्रूणहत्येची कारणे सांगा. (Female Prostate :- Effect on Indian Society)

किंवा

स्त्री भ्रूणहत्या वाढण्यामागील कारणांची चर्चा करा.

उत्तर :

प्रस्तावना :- भारतीय समाजात स्त्रीयांना सातत्याने दुय्यम दर्जा देण्यात आला आहे. तिला हीन मानून पुरुषप्रधान व्यवस्थेने तिचे शोषन केले आहे. वेगवेगळ्या माध्यमातून स्त्रीयांचे शोषण केले जात असतांनाच त्याचे अस्तीत्वच संपविण्याचा प्रयत्न आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून आज केला जात आहे. मुलींच्या अर्भकांना गर्भातच ठार मारण्याचा प्रकार म्हणेजच स्त्री भ्रूण हत्या होय. स्त्री भ्रूणहत्यांचे प्रमाण सातत्याने वाढत आहे अशा हत्यांच्या कारणाचा शोध पुढील प्रमाणे घेता येतो. सी-भ्रूणहत्येची कारणे :

  1. वंशाचा दिवा :- वास्तवतः खरचं वंशाला दिव्याची गरज असते का? जर असेलच तर आजपर्यंत अशा किती दिवट्यांनी कुटुंब आणि समाजासाठी दिवे लावलेले आहेत. तरी वंशाचा दिवा लागतोच आणि ही मुलगाच पाहीजे. अशा प्रकारचा समाजमनावर पगडा असल्यामुळे कांहीजण मुलगा होईपर्यंत पाळणा हालतच ठेवतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे १९९३ मधील किल्लारी भूकंपानंतर अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. कारण अनेकांची मुले या घरणीकंपानी हिरावून नेली. म्हणून नंतर अनेक कुटुंबामध्ये 'वंशाला दिवा' हवा यासाठी महिलांच्या कुटूंब नियोजन शस्रक्रिया रि-ओपन करण्यात आल्या. अनेक महिलांना पुन्हा मातृत्त्व प्राप्त झालं. जिवघेण्या संकटानंतरही वंश व दंशाचा दिवा किती प्रभावी ठरतो याचा अनुभव आला.
  2. दुटप्पी मानसिकता :- स्त्री भ्रूणहत्या समस्येच्या कारणांचा विचार करता समाजाच्या मानसिकतेमध्ये या समस्येचं मूळ असल्याचे दिसून येते. विशेषतः समाजामध्ये उघड चर्चा करताना प्रत्येकजन मुलगा काय अनद्य मुलगी काय दोघेही सारखीच! असे म्हणत असला तरी मनात मुलावीच तिव्र इच्छा असते. एवढेच नव्हे तर एकीकडे स्त्री-पुरुष समानतेचा डांगोरा पिटायचा अन् दुसरीकडे गर्भातच मुलीची हत्या करायवी. देशात दरवर्षी १० लाख मुलींची गर्भातच हत्या होते. अशा दुटप्पी मानसीकतेमुळे मानवी जीवनाचा समतोल बिघडत चालला आहे.
  3. पुरुष प्रधान संस्कृती :- भारतामध्ये प्राचीनकाळापासून पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे सियांना हक्क, कर्तव्य, अधिकार, दर्जा इत्यादी बाबतीत गौण मानण्यात आलेले होते. त्यांना जन्मापासून मृत्यूपर्यंत परावलंबी बनवणारी 'पुरुषप्रधान व्यवस्था, जी नैसर्गिक नसून समाज निर्मित व्यवस्था आहे तरी पण समाजावर असलेली पुरुषी मानसिकता सी-भ्रूणहत्येच्या अनेक कारणांपैकी एक महत्त्वाचे कारण आहे.
  4. महिलांचा मुलासाठी आग्रह:- आपण समाजाचे अवलोकन केल्यास असे निदर्शनास येते की, महिलाच मुलासाठी खूप आग्रही असतात. त्यासाठी अनेक सल्ले, अनेक उपाय करण्याची तयारी असते. दि. १४ डिसे. २०११ रोजी रात्री लातूर जिल्हा- औसा तालुक्यातील गोंद्री गावच्या शिवारात नवजात की जातीचे अर्मक मृतावस्थेत आढळल्याची तक्रार पोलीस पाटील विठ्ठल पांडूरंग कांबळेनी दिल्यानंतर अज्ञात स्रीच्या विरोधात कलम ३१८ अन्वये औसा पोलीसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
  5. गर्भलिंग चाचणी: गर्भलिंग निदान व्यवसायात दरवर्षी ५०० कोटीची उलाढाल असल्याचे दिसून येते. (इ.स. २००८ मार्च लोकराज्य). सोनोग्राफी सारख्या आधुनिक तंत्राच्या माध्यमातून गरोदरपणाचे बारा आठवडे पूर्ण झाल्यानंतर गर्भलिंग निदान होत असल्यामुळे सोनोग्राफीच्या गैरवापरातून त्री भ्रूणहत्या समस्या दिवसेंदिवस विकट होत चालली आहे. ज्या जिल्ह्यामध्ये सोनोग्राफी सेंटर जास्त असेल त्या जिल्ह्यात मुलींचे प्रमाण कमी झाल्याचे आकडेवारीवरून सहज सिद्ध झाले आहे. विशेषत: मराठवाड्यातील बीड जिल्ह्यात मुलींचे प्रमाण सर्वात कमी २०११ च्या जनगणनेनुसार दरहजारी ८०१ एवढे खाली आले आहे.
  6.  भ्रूणहत्या (गर्भपात) :- मुलगी झाली म्हणून जन्मदात्या आईनेच (बीड तालुक्यातील चौसाळा गावामध्ये) नवजात अर्भकास गळा दावून ठार केले. अशाप्रकारे पूर्वी मुलगी जन्माला आल्यास तिला मारून टाकण्याचे प्रकार निदर्शनास येत. परंतु अलिकडे सोनोग्राफी या आधुनिक तंत्रज्ञानाने गर्भलिंग निदान होवून मुलीचा गर्भ आहे असे निश्चित झाले की तिला जन्मालाच येऊ दिले जात नाही. गर्भपात केला जातो. हे फक्त महाराष्ट्र किंवा भारतातच होते असे नव्हे तर न्यूजर्सी (अमेरिका) मध्येही होत आहे. 
  7.  डॉक्टरांची सदोष प्रॅक्टीस:- येथे गर्भलिंग चाचणी केली जात नाही असे लिहीले जात ले तरी बहुतांश सोनोग्राफी सेंटरमध्ये या कानाची खबर त्या कानाला न लागू देता जादा पैसे घेवून गर्भलिंग निदान केले जाते. निर्णय उघड सांगता येत नसेल तर सांकेतिक भाषेत (जग माता ही किंवा जय बालाजी) सांगीतला जातो. त्यांच्याही पुढे जाऊन प्रसुतीतज्ञ गर्भपात करून या हत्याकांडाला साथ देत असल्याचे दिसून येते. पैशासाठी संगनमताने हा गोराधंदा संपूर्ण भारतभर सुरू आहे.
  8.  कायदा कागदावरच :- स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठी देशात सर्वप्रथम महाराष्ट्र राज्याने सन १९८८ मध्ये गर्भलिंग तपासणी प्रतिबंध कायदा केला. महाराष्ट्रानंतर केंद्रसरकारने सप्टेंबर १९८४ मध्ये हा कायदा केला. पुढे इ.स. २००३ मध्ये सुधारणा करून गुन्हेगारांना ठोस शासन करण्याची तरतूद करण्यात आली. परंतु ताज्या आकडेवारीवरून सदरील कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी होते का? असा प्रश्न आहे.

अशा प्रकारे स्त्री भ्रूणहत्यांची कारणे सांगता येतात. 

प्रश्न ४ :- स्त्री भ्रूणहत्येची भारतीय समाजावरील झालेल्या परिणामांची चर्चा करुन स्त्री भ्रूणहत्या रोखण्यासाठीचे उपाय स्पष्ट करा.

किंवा
स्त्री भ्रूणहत्या या सामाजिक समस्येचा कोणता परिणाम झाला आहे, स्पष्ट करा.
किंवा
स्त्री भ्रूणहत्येचे परिणाम आणि त्यावरील उपाय योजना स्पष्ट करा.

उत्तर :

प्रस्तावना :- मूलींचे घटते प्रमाण हा राज्यांचाच नसून संपूर्ण देशाच्या चिंतेचा विषय झाला आहे. या विषयावर सर्वत्र चर्चा होत आहे. या निमित्ताने शासन, स्वयंसेवी संस्था विचारवंत व्यक्तिगत पातळीवर अनेक लोक पूढे येत असुन एक वैचारक मंथन देशभर सुरू आहे. स्त्रीला कमी लेखने किंवा तीला दुय्यम वागणूक देणे हा पुरुषी अहंकाराचा भाग आहे. मुलींचा बाप असणे म्हणजे सोयऱ्यापुढे झुकणे, हुंडा देणे लग्न समारंभाचा खर्च पेलणे, अशी समजूत समाजात सर्वत्र आढळत आहे. एवढयावरच ते थांबले नाहीतर मुलाने पाणी पाजल्यावर मुक्ती मिळते. मुलगा म्हातारपणची काठी आहे. यासारख्या अंधश्रद्धांही आहेत. दुसरीकडे कित्येक मुले आई वडिलांना घरबाहेर काढताना तर मुली आई वडिलांना साभाळ करताना दिसतात.

मुलगा किंवा मुलगी होणे ही स्त्रीवर आवलंबून नसून पुरुषामध्ये असणाऱ्या गुणसुत्रावर समानवाटा दयायचा कायदा आहे. परंतु तीला समान वाटा न देता विव्यावर अन्याय व अत्याचार केला जातो. कारण स्त्री ही कमकूवतव कमी बुद्धीची लेखली जाते व तिला समाजातील अनेक हक्क व अधिकारापासून वंचित ठेवण्यात आले आहे. कुटुंबात ज्यावळेस एखादी मुलगी जन्मास येते त्यावेळेस तिचा तिरस्कार केला जातो तीला कसलेच अधिकार दिले जात नाहीत मुलीचा जन्म म्हणजे कर्जबाजारीपणा अशी समाजीक मानसिकता तयार झाली आहे. उलट मुलीच्या जन्माचा अधिकार ही हिरावून घेतला जातो. एवढ्यातच ही विचारधारा थांबत नाही तर मुलगा हा वंशाचा दिवा आहे. पुत्रप्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती मलगा हाच म्हातारपनाची काठी हा पुरुषी अहंकार मुलगा आणि मुलीत भेद करतो. मुलाला महत्व व मुलीला कनिष्ठत्व प्राप्त करून देतो. मुलगी

कुटुंबात, विवाहात, धर्मात समाजात सुरक्षित असल्याचे कोठे दिसून आले नाही. मुलगी जन्माला येणार हे कळताच मुलीचे आई वडीलच तिचे कर्दनकाळ ठरतात. आणि मुलगी जन्मास येण्या आगोदरच तिची हात्या केली जाते. हे प्रमाण शहरीभागापुरतेच मर्यादित नसून हे ग्रामीण पातळीवर येऊन पोहचण्याने सध्या विविध हॉस्पीटलमध्ये गर्भलिंग निदान व गर्भपात करण्याचे प्रकार सुरु आहे.

स्त्रीभ्रुणहत्या ही अनेक कारणामुळे होते. म्हणजेच हुंडा पद्धती, सोनोग्राफीचा केला जाणारा दुरुपयोग, शासनाचे दोन आपत्य धोरण, वैद्यकीय क्षेत्रातील ढासाळलेली नितीमत्ता, समाजामध्ये निर्माण झालेली अंधश्रद्धा तसेच मुलगा हा वंशाचा दिवा हा समज तसेच पुत्रप्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती इत्यादी अनेक कारणांमुळे स्त्रीब्रुणहत्येचे प्रमाण वाढत आहे.

एस.टी.पी. सेंटरवर गर्भपात करण्यासाठी २ ते ४,००० रुपये व गर्भलिंग निदानासाठी ३ ते ५,००० रुपये फी आकारली जाते. स्त्रीभ्रुणहत्या रोखण्यासाठी शासनाच्या वतीने विविध उपाय कले जात असले तरी एम.टी.पी. सेंटरला परवानगी देण्याचे प्रमाण वाढले आहे. गेल्या काही वर्षात गर्भपात परीक्षा आणि त्यातून स्त्रीभ्रण हत्येचे प्रमाण वाढले आहे. यांचा विपरित परिणाम समाजावर होत आहे. स्त्रीभ्रूणहत्येचे परिणाम :

भारतीय समाजामध्ये अनेक सामाजिक समस्या दिसुन येतात. त्यातीलच एक प्रमुख समस्या म्हणुन स्त्रीभ्रुणहत्येकडे पाहिले जाते. 

या स्त्रीभ्रुणहत्येमुळे समाजावर अनेक दुष्परिणाम झालेले आहेत ते पुढील प्रमाणे.

  1.  स्त्री पुरुष प्रमाणात असमतोल निर्माण होईल.
  2.  लैगिक छळाची संख्या वाढेल.
  3.  वपुंची कमतरता निर्माण होईल.
  4. महिलावर शारिर विक्रीसाठी जबरदस्ती करण्यात येईल. 
  5.  सातत्याने होणा-या गर्भपातामुळे महिला मधील एकूनच प्रजनन क्षमता कमी होईल.
  6. स्त्रीत्रुणहत्येमुळे गुन्हेगारीस प्रोत्साहन मिळेल.
  7.  सामाजिक संतुलनात विघाड निर्माण होईल. 
  8. स्त्रीभ्रूणहत्येमुळे सामाजिक विकासात अडथळा निर्माण होईल.
  9. मुलीवरील अत्याचार वाढतील. 
  10.  मुलगी ही जातच नष्ट होण्याच्या मार्गास लागेल.

स्त्रीभुणहत्येवर पुढील प्रमाणे उपाय योजना आखता येतात :

  1. स्त्रीभ्रुणहत्या करणाऱ्या वैद्यकीय व्यावसायीकांना जलदगती न्यायालयाद्वारे तत्काळ कठोर शिक्षा करावी व त्याची वैद्यकीय व्यावसायाची अनुमती रद्द करण्यात यावी.
  2. मुलींसाठी शासनाने शिक्षण, विवाह, यासाठी आर्थिक मदत करावी. 
  3.  शासनाने तसेच विवीध सामाजिक संस्थांनी कवेळ मुलीच आसणाऱ्या पालकांना भरघोस सवलती आणि पुरस्कार प्रदान करावेत. 
  4. शासनाने मुलीच्या लग्नासाठी आर्थिक मदत दयावी.
  5. हुंडा घेणाऱ्या व देणाऱ्यावर कठोर कार्यवाही करण्यात यावी. 
  6.  गर्भलिंग निदान करणाऱ्या व्यक्तिवर कठोर कार्यवाही करण्यात यावी.
  7.  मुलीविषयक समाजामध्ये जागृती निर्माण केली पाहिजे.
  8.  मुलगा वंशाचा दिवा आहे. पुत्रप्राप्ती म्हणजे मोक्षप्राप्ती मुलगी हे परक्याचे घन असे चुकीचे विचार बदलले पाहिजे.
  9.  गर्भनिदान व स्त्रीभ्रुणहत्या करणाऱ्या माता पिता व त्याचे नातेवाईक यांनाही जलदगती न्यायालये स्थापन करुण कठोरात कठोर दंड द्यावेत. 

समारोप :

अशा प्रकारे वाढत्या स्त्रीभ्रुणहत्येमुळे समाजात स्त्री असमतोलता निर्माण होऊन समाजाला अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागेल. पुरुष प्रमाणात या स्त्रीभ्रूण हत्येमुळे महिलांचे लैंगिक शोषण मोठया प्रमाणात केले जाऊ लागले आहे. यावर वेळीच समाजातील विविध स्थरातून पायबंद घातला गेला पाहिजे. तरच स्त्रीभ्रूणहत्येचे प्रमाण थांबु शकते व स्त्रीला न्याय मिळु शकेल.

प्रश्न ४ :- लैंगिक अत्याचाराचे स्वरूप सांगून त्याच्या परिणाम व उपायांची चर्चा करा. (Sexual Harrasment: Effect & Measures)

किंवा

लैंगिक अत्याचाराचे सामाजिक परिणाम स्पष्ट करून अशा अत्याचाराच्या प्रतिबंधासाठीचे उपाय सांगा.

उत्तर : प्रस्तावना :- भौतिक प्रगतीच्या उत्तरोत्तर स्त्रीयाविरुद्धचे हिंसाचार वाढत आहेत. स्त्री पुरुष समानता तत्व मान्य करूनही रूढी, परंपरा नियमनाने स्त्रियांचे जीवन अपमानजनक बनत आहे. त्या पुरुषाच्या अत्याचाराला बळी पडत आहेत. त्यांची छेडछाड होते. त्यांचे अपहरण होते, बलात्कार होतात, हुंड्यापोटी जीवंत जाळले जाते. अशा हिंसाचाराची व्याप्ती कुटुंब ते समाज आहे. स्त्रीया विरुद्धाच्या हिंसाचारात दुखापत, इजा केली जाते. त्यात धमकी, ताकदीचा वापर केला जातो. हिंसाचारात शारिरिक मानसिक हानी पोहचविली जाते. लैंगिक अत्याचाराचे 

स्वरुप :

  1. स्त्रीयांच्या शरीराला स्पर्श करणे, अश्लील चाळे करणे.
  2.  स्त्रीयांची छेड़छाड करणे. 
  3.  स्त्रीयांवर बलात्कार करणे.
  4. स्त्रीवर सामुहिक बलात्कार करणे.
  5. स्त्रीला अमिष दाखवून तिच्यासोबत शरीरसंबंध ठेवणे. 
  6.  वैवाहिक जीवनात स्त्रीयांवर जबरदस्तीने शरीरसंबंध प्रस्थापितकरणे.
  7. धर्माच्या नावाने स्त्रीयांसोबत शारीरिक संबंध जोपासणे. (देवदासी इत्यादी)
  8. कामाच्या ठिकाणी स्त्रीला धमकी देवून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवण्यास बळजबरी करणे.

लैंगिक अत्याचाराचे परिणाम :

  1. लैंगिक अत्याचारामुळे स्त्री शारीरिक संबंधाबद्दल पूर्णतः नकारात्मक विचार 
  2.  लैंगिक अत्याचारामुळे स्त्रीयांना मानसिक धक्का बसतो. करायला लागते.
  3. लैंगिक अत्याचार झाल्यानंतर त्याबद्दल बदनामीची भिती स्त्रीयांच्या मनात
  4. सातत्याने राहते. त्यामुळे ते सातत्याने भितीमय वातावरणातच जीवन जगतात.
  5.  लैंगिक अत्याचारामुळे स्त्रीयांना लैंगिक अजारांनाही सामोरे जावे लागते. (एड्सग्रस्त व्यक्तीने लैंगिक अत्याचार केल्यास त्या स्त्रीला एड्स होण्याची भीती असते. तसेच योनीद्वारे मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होवून ते स्त्रीच्या जीवादरही बेतू शकते.)
  6. लैंगिक अत्याचाराच्या घटनांमुळे सामाजिक नैतिकतेचे अधःपतन घडून येते. ६) लैंगिक अत्याचार ज्या स्त्रीवर होतात, त्या स्त्रीबद्दल समाज कलूषीत विचार करतो आणि प्रसंगी अशा अत्याचारी ग्रस्त स्त्रीयांचे विवाह देखील होत नाहीत.
  7. लैंगिक अत्याचारामुळे महिला विकासात बाधा निर्माण झाली आहे. बसते.
  8. लैंगिक अत्याचारांच्या घटनांमुळे सामाजिक प्रगतीला खीळ ९) लैंगिक अत्याचारांमुळे दिवसेंदिवस लैंगिक गुन्ह्यात


लैंगिक अत्याचारांच्या प्रतिबंधासाठीचे उपाय : 

१. महिलांना छेडछाड प्रतिबंध :

अनादीकालापासुन महिलांना समाजात वा कुटूंबांत दुय्यमतेची वागणूक दिली जात होती. १९ व्या शतकातील महिलांच्या चळवळी समाज सुधारकांनी केलेली जागृती यातून समानतेची जाणीव जोर धरू लागली. भारतातील परिस्थितीतबाबत बोलायचे झाले तर परंपराच्या जोखडात तोलले गेलेले स्त्रीचे दुय्यममत्व, राज्यघटना व विवीध कायद्याच्या आधारे सुधारण्याचा प्रयत्न गेल्या ६० वर्षापासून केला जात आहे. तरीही स्त्रीयाच्या वाटयाला अधीकांश दु:खे आलेली दिसतात. समाजातील पुरूषप्रधान मानसिकता यावेळी खोलवर रुजली आहे. 

स्त्री ही माणुसच आहे व पुरूषाप्रमाणेच सर्व क्षमता तिच्यात आहेत हे मानायला समाज तयार होत नाही. तिच्यावर विवीध आक्षेप घेऊन तिच्या योनी शूचीतेलाच प्रमाण मानले जाते व अनेक क्षेत्रात तिच्यावर अविश्वास व्यक्त केला जातो. अनेक विकासाच्या संधीपासून तिला वंचीत ठेवण्यात येते. स्त्रीकडे एक मालकीची वस्तू या मानसिकतेने पाहणान्याचा दृष्टीकोन असल्याने स्त्री अनेक प्रकारच्या अत्याचारास बळी पडलेली दिसून येते.

  1. एखाद्या स्त्रीचा अपमान करण्याच्या हेतूने किंवा तिला मानसीक स्तरावर विचलीत करण्याच्या हेतूने स्त्रीचे मानसीक हनन केले जाते. त्याचे समाजात असलेले प्रकार पुढील प्रमाणे..
  2. स्त्री ची प्रतीमा डागाळेल या अर्थाने शब्द वापरून तिला चिडवणे टोमणे मारणे.
  3. (R) हावभाव करून अथवा तिच्या स्त्रीत्वाचा अपमान करणे उपहास करणे अश्लिल हातवारे करणे. 
  4.  लैंगिक बाबीचा उल्लेख होईल अशी गाणी म्हणने, पाठलाग करणे, धक्का देणे इ.
  5. शरिरावरील कपडे, रंग, वय यावर शेरा मारून अपमान करणे.
  6. व्दिअर्थी शब्द प्रयोग करून हसणे विनोद करणे. हात धरणे, चिमटे काढणे, जबरदस्तीने चुबन घेणे, अश्लिल चित्र दाखवीणे. स्त्रीला लज्जा वाटेल असे कृत्य करणे. सार्वजनीक ठिकाणी वरील प्रकारे स्त्रीच्या चारित्र्याचे (modesty ) चे हनन 
  7. होऊ नये यासाठी भारतीय दंड विधानात विशेष कलमांचा अंतर्भाव करण्यात आलाआहे.


  •  भादंवि कलम २९४ :- 

अश्लिल गीते व विभत्स कृती करून स्त्री सभ्यतेचा अपमान करणे अशा गुन्हयासाठी तीन महिने कैद किंवा दंड अशी एकत्रीत शिक्षा होऊ शकते.

  •  भादंवि कलम ५०९-

 एखाद्या स्त्रीस अपमान करण्याच्या हेतूने तिचा विनयभंग होईल असे शब्द हावभाव किंवा कृती करणे. अशा वर्तनास एक वर्षापर्यंत साधा कारावास होऊ शकतो किंवा दंड अथवा कारावास व दंड एकत्रीत होऊ शकतो. ३) भादंवि ३५४- स्त्री सभ्येतेवर हल्ला करणे व विनयभंग करणे अथवा बळजबरी करणे वरील गुन्हयासाठी दोन वर्षापर्यंत कैद अथवा दंड किंवा कैद व दंड होऊ शकतो.

स्त्री छेडछाड छळावर नियंत्रण आणण्यासाठी एकत्रीतपणे विचार करण्याची गरज आहे आवश्यक आहे जेणे

  1.  शाळा व महाविद्यालय स्तरावर छेडछाडीवर चर्चा होणे करून त्या बद्दल जाणीव जागृती होईल.
  2.  लिंग समभावावर अधारीत ग्रामीण व शहरी भागात तरुण तरुणासाठी, माध्यमीक शाळांमध्ये कार्यशाळा घेणे.
  3.  पालकांशी संवाद साधून मुलींचे मानसीक बळ उंचावणे,
  4. स्त्री विषयीची आदर भावना कुटूंबात निर्माण होण्यासाठी कुटूंबाचे समुपदेशन करणे.
  5.  कुटूंबात संवाद निर्माण करण्यासाठी विशेष प्रयत्न करणे पालक मेळाव्याचे या विषयवर आयोजन करणे. जागतिकीकरणाच्या लाटेत सामाजिक स्तरावर प्रचंड घुसळण निर्माण झालीआहे. एकीकडे तांत्रीक प्रगती आणि तंत्रज्ञाचे सार्वत्रिकीकरण आणि दुसरीकडे सर्वसामान्य लोकांची फसवणुक असे चित्र आहे. यामध्ये महिला व बालकाचे फार मोठे शोषन होताना दिसत आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर आतंराष्ट्रीय स्तरावर माणसाच्या जगण्याच्या परिस्थितीवर एकत्रितपणे विचार झाला. मानवीहक, शांती आणि विकास या मुलभूत उद्देशांनी जागतीक स्तरावर पूर्तता करण्यासाठी राष्ट्रसंघ, जागतीक बॅक आणि समाजातील प्रश्नांवर शास्त्रीय पद्धतीने अभ्यास करून ते प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक संस्था कार्य करीत आहेत..


  • बलात्कार विरोधी कायदा : 

स्वौच्या संमतीशिवाय तिच्या इच्छेविरूध्द बळजबरीने केलेला संभोग किंवा ठेवलेला शरीरसंबंध म्हणजे बलात्कार..

हजारो वर्षापासून स्त्री चे शील याला सर्वच धर्मानी, पंथांनी, संस्कृतींनी अत्योतिक महत्व दिले आणि तेव्हा पासूनच बाई म्हणजे बाईचे शरीर याला अग्रस्थानी ठेवले गेले. त्यात तिचे माणूसपण, कधी पडद्याआड गेले हे कळालेच नाही. यौनी शुविता त्याची पुरुषाकडे असलेली मालकी म्हणून मग संरक्षण याला परंपरांच्या विळख्यात जखडून कुटुंब व समाजस्तरावर मान्यता मिळत गेली. व पुढे युध्दामध्ये राजाला अपमानीत करण्यासाठी स्त्रीयांच्या शीलावर घाला चालण्याची मानसिकता तयार झाली. तसेच पती किंवा मालका व्यतिरिक्त इतर पुरुषाशी शारिरीक संबंत येवू न देण्याचे संकेत कठोरपणे पाळले जावू लागले. इतिहासामध्ये याचे आपल्याला अनेक दाखले मिळतात. युध्द काळात शत्रु पक्षावर विजय मिळवल्यावर त्याच्या संपत्तीची लूट होत असे त्याप्रमाणे सर्व वयोगटातील स्त्रीयांची ही लूट केली जात असे. आजही आपण पहातो देशांच्या सीमेवरील तैनात असलेल्या सैनिकाकडून त्या भागातील महिलांवर प्रचंड लैंगिक अत्याचार झालेले समोर आले आहेत.

स्त्रीला पुरुषांएवढेच सन्मानाने जगण्याचा माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. परंतु समाजातील काही पुरुष स्त्रियांना अपमानीत करण्यासाठी स्वत:ची कामेचा पूर्ण करण्यासाठी स्वीचा जबरदस्तीने संभोग करतात. ज्यातून तिच्या जीवनात अनेक सामाजिक, शारीरिक, मानसिक समस्या निर्माण होतात. या पुरुषीवृत्तीला पायबंद पाण्यासाठी स्त्रियांना सुरक्षितपणे जगता यावे तसेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास कठोर शिक्षा होण्यासाठी वरील कायदा काही सुखासुखी झालेला नाही. यासाठी देशभरातील स्त्री संघटनांना संघर्षात्मक पावले उचलावी लागलेली आहे. संघटनात्मक व्यूहरचना करून जनतेच्या रेटयाने हे सारे कायदे झाले आहेत.

हया कायद्यानुसार बलात्कार म्हणजे - एखाद्या स्त्रीच्या इच्छेविरूद, तिच्या समतीविना अथवा तिची संमती तिच्या अथवा तिच्या हितसंबंधी व्यक्तीच्या मृत्यूची किंवा गंभीर इजा करण्याची भीती घालून मिळविली असेल, आपण त्या स्त्रीचा कायदेशीर नवरा नाही हे माहीत असूनही, तसे आपण आहोत असे भासवून तिची संमती मिळविली असेल, अर्धवट मनःस्थितीत किंवा मादक पेयाच्या सेवनाने चढलेल्या धुंदीत तिच्याकडून संमती मिळविली असेल तरीही तिची संमती असली तरी एखाद्या पुख्याने एखाद्या स्त्रीशी संभोग केला तर त्यास 'बलात्कार' असे समजले जाते. 

  • पुराव्याचा कायदा :

  1. तोच नियम इस्पितळातील अधिकाऱ्यांनाही लागू आहे. बलात्कारासंबंधी कायद्यातील दुरुस्तीबरोबरच पुरावे सादर करणे, गुन्हा शाबीत करणे इत्यादी संदर्भात देखील सुधारणा करण्यात आल्या. बलात्कारासंदर्भातील खटले बंद दालनात चालवले जातील.
  2.  खटल्या संदर्भातील मजकुर न्यायालयाच्या परवानगी शिवाय छापणे, अथवा प्रसिध्द करणे बेकायदेशीर ठरवले जाईल. भारतीय पुराव्या संबंधीच्या कायद्यामध्ये ११४ अ हया नवीन कलमाचा समावेश करण्यात आला आहे.
  3. ३७६ अ, ब, क, ड मधील बलात्काराच्या खटल्यामध्ये जर आरोपीने संभोग केला हे सिध्द झाले व बळी पडलेल्या स्त्रीने आपली संमती नव्हती असे सांगितले तर तिचे म्हणणे सत्य आहे असे गृहित धरावे. म्हणजेच आपली संमती नव्हती हे सिध्द करण्याची जबाबदारी स्त्रीवर नाही.


बलात्काराचा गुन्हा सिध्द करण्यासाठी खबरदारीचे उपाय -

  1. बलात्कारासंबंधी कायदा असला तरी त्याची अमलबजावणी करणे फार कठीण होते. कारवाई करण्याच्या दृष्टीने स्त्रियांनी काही खबरदारी घेणे गरजेचे आहे. १. वैद्यकीय तपासणीच्या वेळी विश्वासू नातेवाईक किंवा स्त्री कार्यकर्ता हजर असण्याचा आग्रह धरावा.
  2.  जवळच्या सरकारी दवाखान्यात पुरेसे सहकार्य सरकारी दवाखान्याची मागणी करावी. नाही असे वाटल्यास दुसऱ्या वीर्य उपासणीसाठी आरोपीलान नेले जाते ना हे आवर्जून पहावे.
  3. आरोपींची संतती नियमन शस्त्रक्रिया झालेली माहीत असेल तर तसे नमुद करा बलात्कारीत खीने किळस, घृणा इत्यादी वाटण्यातून लगेच आघोळ करू नये वैद्यकीय तपासणी झाल्यावर आंघोळ करावी. बलात्काराच्या वेळेस अंगावर असणारे कपडेही धुवून यकू नयेत. त्यावरील डाग पुराव्यासाठी मदतकारक ठरतात.
  4. सामुहिक बलात्काराच्या वेळेस नावे सांगण्यास भिती वाटत असेल तर नावे माहित नाहीत पण पाहिल्यावर ओळखेन असे सांगावे. नाहीतर तुमच्या माहितीचे लोक आहेत, इत्यादी उणिवा विरोधी बाजुचे वकील शोधत राहतात. बलात्काराबरोबर अनेक वेळा मारहान होते. त्यावेळेस बलात्काराच्या बरोबरमारहाणी संदर्भातील ३२४ व ३२५ कलमेही लावण्याचा आग्रह धरावा. 
  5. केस चालू असतांना स्त्री संघटनातील अथवा विश्वासातील कार्यकर्त्या, नातलग हयांना बरोबर हजर ठेवावे
  6. मुख्य म्हणजे गुन्हा आपण केलेला नाही तर आपण बळी गेलेली स्त्री आहोत हे लक्षात ठेवून न भिता कारवाईस सुरूवात करावी. सरकारी वकिलाबरोबर मदतनीस म्हणून आपले वकील द्यावेत. त्यांना कोर्टास केस चालवता येत नसली, तर सरकारी लावर दबाव जरूर रहातो व न्याय मिळण्यास मदत होते.
  7. बलात्कारा संदर्भात समाजात अनेक गैरसमज असतात त्याबद्दल जनजागृती करून त्यातले सत्य समोर आणण्यासाठी खास प्रयत्न केले पाहिजेत, बलात्काराची बळी ठरलेल्या स्त्रीला अत्यंत सहानुभूतीपूर्वक, मैत्रीपूर्ण जिव्हाळ्याची गरज असते. तिच्याकडे बोटे न दाखवता तिला आधार दिला पाहिजे. एका स्त्रीवरील बलात्कार ही वटना संपूर्ण स्वीजातीस अपमानकारक आहे.


  •  कामाच्या ठिकाणी लैगिंक लळासंबंधी सर्वोच्च न्यायालयात आदेश

विशाखा आदेश :

कर्मचाऱ्यांचे कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळापासून संरक्षण करायला सध्या अस्तित्वात असणारे फैजदारी कायदे पुरेसे नाहीत. या नव्या आदेशापुळे ही गरज पुर्णायला मदत होईल खाजगी, सार्वजनिक, सरकारी, निमसरकारी व असंघटित ठिकाणी काम करणाऱ्या सर्वांना हा आदेश लागू आहे. कामाच्या ठिकाणी होणाऱ्या छळाचा मिळणाऱ्या वाईट वागणुकीचा दुष्परिणाम स्त्रियांच्या मानसिक आरोग्यावर व कार्यक्षमतेवर होत असतो. त्यामुळे लिंगसमानता आणि जीवन व स्वातंत्र्य या मूलभूत हक्काची पायमल्ली होते. कामाच्या ठिकाणी होणारा लैंगिक छळ रोखण्यासाठी मार्गदर्शन करणारा हा आदेश १३ ऑगस्ट १९९७ रोजी सर्वोच्च न्यायलयाने दिलेला आहे. राजस्थानातील सरकारी कार्यक्रमात साथीन म्हणून काम करत असतांना भँवरीदेवीने गावातील प्रतिष्ठित उच्च भरातील बालविवाह रोखला म्हणून चिडलेल्या ठाकूरांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. भंवरीदेवीला न्याय मिळावा, कामकरी स्त्रियांना कामाच्या ठिकाणी लैंगिक छळापासून संरक्षण मिळावे याकरिता कायमस्वरूपी उपाययोजना करावी याकरिता स्त्री संघटनांनी एकत्रित येऊन निर्माण केलेल्या विशाखा' या संस्थेने सर्वोच्च न्यायलयात याचिका दाखल केली. त्यावर देण्यात आलेला हा आदेश म्हणून ज्याला 'विशाखा आदेश' म्हणून ओळखला जातो. या निकालात लैंगिक छळाची व्याख्या पुढील प्रमाणे आहे.

नकोसा शारीरिक स्पर्श.

  1. शरीरसंबंधाची मागणी वा विनंती.
  2. लैंगिकता सूचक शेरे मारणे व अश्लिल बोलणे.
  3. अश्लिल चित्रे दाखवणे.
  4. लैंगिकतासूचक अशी शारीरिक, शाब्दीक वा निःशब्दपणे केलेली स्त्रीला नकोशी वाटणारी कोणतीही कृती. 

 लैंगिक छळा विषयी तकार :

काम करणाऱ्या स्त्रियांना असा काही त्रास असल्यास त्या कामाच्या ठिकाणी प्रमुखांनी तकारी ऐकून घ्यायची योग्य व्यवस्था करावी. लैंगिक छळाच्या प्रतिबंधनासाठी समिती नेमली जावी. समितीच्या प्रमुखपदी 'स्त्री' असावी. समितीत कमीत कमी ५० सभासद स्त्रिया असाव्यात. तसेच या समितीत स्वयंसेवी संस्थांचा एक प्रतिनिधी असावा येणाऱ्या तकारी गोपनीयतेने हाताळल्या जाव्यात. त्यावर वेळेचे बंधन असावे. तकारीची चौकशी ही तकारदाराचे संरक्षण करणारी असावी म्हणजे त्यांच्यावर दबाव येऊ नये. वा त्यांना भेदभावाची वागणूक मिळू नये. याची काळजी घेतली जावी. लैंगिक छळाच्या बळी ठरलेल्या स्त्रीला स्वता:ची किंवा दोषी व्यक्तीची बदली मागण्याचा पर्याय असावा. अशा समित्या नेमण्याची जबाबदारी कामाच्या ठिकाणीच्या जबाबदार व्यक्तीवर आहे. लैंगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी जाणीव जागृतीवर भर द्यावा असेन्यायालय म्हणते. त्याचप्रमाणे न्यायालयाने काही निर्देशही दिलेली आहेत. त्यात खालील गोष्टीचा समावेश केला आहे.

  1. हे नियम प्रसिद्ध करावे. म्हणजे ते जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोचतील.
  2.  सेवेच्या नियमांमध्ये या मुद्याचा समावेश होण्यासाठी आवश्यक ते बदल करावे.
  3.  औद्योगिक क्षेत्रातील नियमांमध्ये या मुद्याचा समावेश करावा म्हणजे खाजगी क्षेत्रात हा मुद्या दुर्लक्षिला जाणारा नाही.
  4. कामाच्या ठिकाणचे वातावरण हे स्त्री विरोध नाही तसेच स्त्री म्हणून तिला पक्षापाताची वागणूक मिळणार नाही असा विश्वास तिथे काम करणाऱ्या स्त्रियांना वाटायला हवा.
  5.  कर्मचाऱ्यांना अशा तकारी कार्यालयीन बैठकीमध्ये वा इतर योग्य त्या व्यासपीठावर मांडायची मोकळीक असावी.
  6. मालक कामगार बैठकीत या मुद्द्यावर चर्चा व्हावी. मालक / प्रमुख / व्यवस्थापनाच्या जबाबदाऱ्या :


१) प्रतिबंधक व्यवस्था म्हणून समित्या नेमाव्यात.

२) लैंगिक छळ हा शिस्तभंगाचा गुन्हा मानला जावा. त्या प्रमाणे सेवेच्या नियमात योग्य ते बदल करून या मुद्याचा समावेश करावा.

३) लैगिक छळाला प्रतिबंध करण्यासाठी, त्याबद्धल धोरणे, नियम जाहीर करून ते सर्वांना दिसतील असे वितरित करावे.

४) एखाद्या स्त्रीचा कामाच्या ठिकाणी लैंगिक छळ झाला आणि छळ करणारी व्यक्ती कामाच्या ठिकाणाशी संबंधित नसेल (पुर्ण पणे बाहेरची असेल तरीही व्यवस्थापनाने योग्य ती कारवाई करावी, कारण सुरक्षित कामाची जागा उपलब्ध करून देणे हे त्यांचे कर्तव्य आहे. या तरतुदी कोणाला लागू होतात.

सरकारी तसेच खाजगी क्षेत्र, हॉस्पिटल, विद्यापीठे, तसेच असंघटित क्षेत्र. मासिक वेतन घेणाऱ्या मानधन घेणाऱ्या स्वयंस्फूर्तीने काम करणाऱ्या पूर्णवेळ, अर्धवेळ काम करणाऱ्या स्त्रियांना याचा फायदा होऊ शकतो.

अशाप्रकारे लैंगिक अत्याचाराचे स्वरुप, परिणाम आणि उपाय स्पष्ट करता येतात.

(Problems of Women)  - Social problems in Contemporary India


Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English