Category

Show more

वायु प्रदुषणाचा अर्थ कारणे परिणाम व उपाय - Meaning, causes, effects and solutions

वायु प्रदूषण म्हणजे काय? त्याचे कारणे परिणाम व उपाय सूचवा. 

उत्तर :-

प्रस्तावना :- वातावरणात विविध वायुंचे एक निश्चित प्रमाण असते 'तसेच त्यांच्यात एक निश्चित गुणोत्तर ही असते. सजीवाच्या अस्तीवासाठी हवाहा अत्यंत महत्वाचा घटक आहे. मानव कांही दिवस पाण्याशिवाय कांही आठवडे अन्नाशिवाय जिवंत राहू शकतो पण हवे शिवाय कांही मिनीटसद्धा जिवंत राहू शकत नाही. म्हणजे मानव हवेशिवाय जगू शकत नाही. निरोगी स्वास्थ्यासाठी शुद्ध हवेची गरज असते. मानसाला दररोज किमान १६ किलो शुद्ध ऑक्सीजनची गरज असते. परंतु वाढत्या औद्योगिक विकासाबरोबर वातावरणातील वायुंचे प्रमाण असंतुलित व प्रदुषीत होत गेले मानवाच्या विविध क्रियातून पर्यावरणात विविध दुषीत पदार्थ सोडले जात आहेत त्यामुळे हवेचे प्रदूषण वेगाने वाढत आहे.  

व्याख्या :-

World Health otganisation (W.H.O.):-

 "सभोवतालच्या पर्यावरणाला व मानवाला इजा हाईल इतकी हवा अस्वच्छ होणे म्हणजे हवेचे प्रदूषण होय त्याचा मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो."

२) परकिंस हेन्री :- 

"जेव्हा वातावरणात अनावश्यक तत्वाचा प्रवेश होतो तेंव्हा त्याचे मौलीक संतुलन बिघडते. वेगवेगळ्या प्रकारचे वायू कार्बणकण, धूर, खनिजांचे कण यामुळे हवा दूषीत होण्याच्या क्रियेत हवा प्रदूषण म्हणतात." 

३) "वातावरणातील हवेत नेहमीच्या घटकापेखा सजीवावर घातक परिणाम करणारे घटक आढळतात त्यास हवा प्रदूषण असे म्हणतात. "

वायू प्रदूषणाची कारणे :-

हवेच्या प्रदूषणासाठी नैसर्गिक क्रिया व मानवनिर्मित क्रिया कार्य करत असतात.

अ) निसर्गनिर्मित कारणे :-

१) ज्वालामुखीचे उद्रेक :- 

ज्वालामुखीच्या वेळेस भूगर्भातील घन, द्रव, वायरूप पदार्थ भूपृष्ठावर येऊन पोहचतात. त्यात वातावरणाला दूषीत करणारे वायू असतात. ज्वालामुखीतून सल्फरडाय ऑक्साईड, हायड्रोजन सल्फाईड अमोनिया क्लोराईड, हायड्रोक्लोरीक अॅसीड इत्यादी वायू बाहेर पडतात यासोबत राख धूलीका, मृदाकरण हे वातावरणात फेकले जातात. हवेतील त्यांचे अस्तीत्व घातक असते म्हणून वायू दुषीत बनते.

२) धुळीची वादळे :- 

वातावरणातील एखाद्या ठिकाणी एखाद्या वेळी दाबातील अचानक बदलामुळे वादळाची निर्मिती होते तेंव्हा भूपृष्ठावरील धूळ, कचरा, वाळूकण व सुक्ष्म पदार्थ वातावरणात खूपउंच भागात पोहचतात. त्यामुळे हवा दूषीत बनते..

३) जंगलातील आगी :- 

बऱ्याचदा जंगलात आगी लागतात वाऱ्यामुळे वेगाने पसरते जंगलात शुद्ध ऑक्सीजन असतो म्हणून आग रौद्ररुप धारण करते या ज्वलनातून कार्बनडाय ऑक्साईड धूर व राख वातावरणात पसरुन दुषीत बनते.

४) तापमानातील विपरीतता :-

 सामान्यतः उंचीनुसार तापमानात घट होत असते परंतु काही विशिष्ट परिस्थितीत उंचीनुसार तापमानात घन होता वाढ होते यालाच तापमानाची विपरीतता असे म्हणतात. अशा स्थितीत हवा स्थिर राहते हवेचे अभिसरण प्रवाह निर्माण होत नाहीत त्यामुळे त्या भागातील धूळ धूर धुके व इतर प्रदूषके त्याच ठिकाणी जास्त वेळ राहतात व हवा दूषीत बनते.

याशिवाय निसर्गतः 

कुजण्याच्या क्रियेतून निर्माण होणारे दुषीत वायू प्राण्याच्या उच्छवासातून बाहेर पडणारा कार्बन डाय ऑक्साईड सागरी लाटामुळे हवेत पसरणारे क्षारकण यामुळे ही हवा दूषीत बनते. 

ब) मानवनिर्मित कारणे :-

१) औद्योगिकरण :-

 औद्योगिकरणापूर्वीही हवेचे प्रदूषण होते परंतु त्याला तीव्रता नव्हती औद्योगिक क्रांतीनंतर विविध प्रकारचे कारखाने गिरण्यायांच्या संख्येत प्रचंड वेगाने वाढ झाली कारखान्यातून बाहेर पडणारा धूर कार्बनचे कण, कार्बनडाय ऑक्साईड वायू, कार्बन मोनॉक्साईड हे दूषीत वायू वातावरणात सोडले जातात. सर्वच देशात औद्योगिकरण झाल्याने हवा प्रदूषण ही जागतीक समस्या बनली आहे.

२) स्वयंचलीत वाहनांचा बेसुमार वापर :-

औद्योगिक विकासाबरोबर वाहतुकीच्या साधनामध्ये प्रचंड वाढ झालेली आहे स्वयंचलित वाहनांचा दैनंदिन वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. स्वयंचलीत वाहनातील इंधनाच्या ज्वलनाने कार्बन मोनॉक्साईड वायू वातावरणात मिळतात त्यासोबत धूरकार्बनकण शिस्याचे कन, कार्बन डाय ऑक्साइड, नायड्रोजन ऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साइड ही प्रदूषके वातावरणात मिसळून हवा दुशीत बनते.

३) औष्णीक विद्युत केंद्र औष्णीक विद्युत केंद्रात मोठ्या प्रमाणात कोळशाचा वापर केला जातो औष्णीक विद्युत केंद्रात कोळसा जाळल्यानंतर केंद्रातून बाहेर मोठ्या प्रमाणात घूर, राख, काजळी, सल्फरडाय ऑक्साईड हे घटक बाहेर पडतात. कोळशात गंधकाचेही प्रमाण असते. त्यामुळे हवा दूषीत बनते.

४) रासायनिक खत कारखाने :- 

रासायनिक खत कारखान्यातून अमोनीया, हायड्रोकार्बन, विविध कणीय घटक वातावरणात सोडले जातात. कॉस्टीक फॅक्टरीतून क्लोरीन सारखा विषारी वायू बाहेर फेकला जातो त्यामुळे हवेत रासायनीक घटक मोठ्याप्रमाणात मिसळून हवा दूषीत बनते.

५) सुतीकापड गिरण्या :-

 कापड गिरणीच्या परिसरात कापसाचे सूक्ष्म धागे, धूळ यांचे आवरण पसरते धाराधातून धूर बाहेर पडतो. कापडगिरण्यात अनेक रासायनिक द्रव्ये वापरली जातात त्यांच्या उपयोगातून नेफ्तागॅस, गंधक आम्ल, नायट्रोजन ऑक्साईड, क्लोरीन, क्लोरनिडाय ऑक्साईड, धूर सरकीचा चुरा वातावरणात पसरुन हवा प्रदूषीत होते.

६) अणुस्फोट चाचण्या - 

अणुस्फोट चाचण्यातून वातावरणात किरणोत्सर्गी धूळ मोठ्या प्रमाणात पसरते त्यामुळे हवा दूषीत बनते. अनुभट्टयातून राख व दुषीत घटक वातावरणात पसरतात.

७) जंगलतोड :- 

मानव विविध कारणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतो त्यामुळे वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईड शोषला जात नाही व ऑक्सीजन वातावरणात सोडला जात नाही. वनस्पती नसल्याने हवेचे नैसर्गिक शुद्धीकरण होत नाही त्यामुळे हवा प्रदूषणात मोठी वाढ होते. 

याशिवाय शेतीतील किटकनाशक तननाशकांचा वापर, इंधनासाठी गोवऱ्या, कचरा शेतातील टाकाऊ पदार्थाचा वापर, शीतगृहांचा वापर, सांडपाणी व कचरा यांची विल्हेवाट न लावणे, धुम्रपान इत्यादी कारणामुळे हवा दूषीत बनते नैसर्गिक कारणापेक्षा मानवनिर्मित कारणामुळे हवा जास्त दुषीत होते.

हवा प्रदुषणाचे परिणाम :-

हवा प्रदूषण ही स्थानीक समस्या नसून जागतीक स्वरुपाची समस्या आहे त्याचे मानवी जीवनावर वनस्पतीवर हवामानावर असंख्य परिणाम होत असतात.

  1. हवेच्या प्रदूषणामुळे वातावरणातील वायूंचे नैसर्गिक संतूलन बिघडते. 
  2. ओझोनचा थर पातळ होतो. कारण वातानुलीत यंत्र, फ्रीज, हेयर ड्रायर्स, सौंदर्य प्रसाधने, आगप्रतीबंधक यंत्र यामुळे वातावरणात क्लुरोफ्लुरोकार्बन व तत्सम रासायनिक वायू वातावरणात पसरतात. त्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचे व पृष्ठभागाचे तापमान वाढते. त्यामुळे हिमाच्छगील प्रदेशातील बर्फ वितळतात. सागराच्या पाण्याची पातळी वाढून किनारी भाग जलमय होतो.
  3. वातावरणातील कार्बनडाय ऑक्साईडचे प्रमाण वाढत आहे हा वायू मोठ्या प्रमाणात उष्णता शोषून घेतो. हरीत गृह परिणामामुळे उष्ण हवा वरच्या थरात वाहत जात नाही त्याचा परिणाम तापमानात वाढ होते.
  4. कारखान्यातील धूर, वाहनांचा धूर सल्फर डाय ऑक्साईड, नायट्रोजन ऑक्साईड ओझोन हे वायू एकत्र येतात. हीवाळ्यात सापेक्ष आर्द्रता वाढून सांद्रीभवन होते. तापमानाच्या विपरीततेमुळे पृष्ठभागाजवळ दीर्घ काळ धुके व धुरके निर्माण होऊन दृश्यता कमी होते. वनस्पतीवर विषारी धुक्याची काजळी चढते.
  5. कारखान्यातील प्रदुषके वाहनांचा धूर, दगडी कोळसा, यांच्यातून नायट्रोजन ऑक्साईड, सल्फरडाय ऑक्साईड हवेतील बाष्पाच्या संपर्कात येतात तेंव्हा त्याचे आम्लात रुपांतर होते. त्यातून सल्फुरीक आम्ल, नायट्रीक आम्ल, काब्रोनिक आम्ल यांची निर्मिती होऊन आम्लपर्जन्य वृष्टी होते. त्याचा शेती वनस्पती मृदा इत्यादीवर गंभीर परिणाम होतात
  6. हवा प्रदूषणामुळे झाडे, फळझाडे, भाजीपाला, फुलझाडे म्हणजे सर्व प्रकारच्या वनस्पतीचे नुकसान होते या दुषीत पदार्थामुळे वनस्पतीच्या प्रकाश संश्लेषणात अडथळे निर्माण होतात. परिणामी वनस्पतीची वाढ खुंटते पाने पिवळी पडतात सुकतात व वनस्पतीचा नाश होतो.
  7. युद्धासारख्या मानवी आपत्तीमुळे मोठ्या प्रमाणात हवेचे प्रदूषण होते युद्धात बॉम्ब क्षेपणास्त्र इत्यादी वापर केला जातो त्याचा लहानमुले गरोदर स्त्रीया, प्राणी यांच्यावर मोठा परिणाम होतो.
  8. हवाप्रदूषणाचा मानवी आरोग्यावर ही मोठ्या प्रमाणात परिणाम होतो कार्बन मोनॉक्साईडमुळे रक्तातील हिमोग्लोबीनचे प्रमाणकमी होते. रक्तातील ऑक्सीजनचे प्रमाण कमी झाल्यासपेशीची कार्यक्षमता कमी होते. हवेत सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण जास्त झाल्यास या विषारी वायुमुळे मनुष्याचा जीव गुदमरतो डोळेजळजळ करतात, घसाखवखतो. नायट्रोजन ऑक्साईडमुळे अंतर्गत रक्तस्त्राव, कर्करोग न्यूमोनीया सारखे आजार होतात.

अशा अनेक घटकावर हवाप्रदूषणाचा परिणाम होत असतो. 

हवा प्रदूषणावरील उपाय :- 

हवा प्रदूषण ही जागतिक समस्या असून त्याच्या नियंत्रणासाठी सर्व राष्ट्रानी प्रयत्न करणे आवश्यक आहे. मानवी जीवनाचे अस्तीत्त्व जर अबाधीत ठेवायचे असेल तर हवा प्रदूषणाची तीव्रता कमी करणे आवश्यक आहे. तसेच भविष्यात हवा दूषीत होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी कांही उपाययोजना करता येतील.

  1.  वनस्पतीची जास्तीत जास्त लागवड करुन परिस्थितीकीय संतुलन राखणे, हवाशुद्धीकरण करणे आवश्यक आहे. वृक्षतोडीवर निर्बंध घालून वनस्पतीचे संरक्षण आवश्यक आहे.
  2. पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनाचा वापर कमी करावा वाहने चालवताना ती मध्यम गतीने चालवावीत.
  3. कारखाने शहरापासून दूर असावती, वाऱ्याचा दिशेचाविचार केला.
  4. परंपरागत इंधनाचा वापर न करता त्या ऐवजी अपरपंरागत उर्जासाधनाचा वापर करावा. 
  5.  हवाप्रदूषण द्रष्य स्वरुपात नसते त्याचे स्वरुप तीव्रता समजण्यासाठीहवा प्रदूषणाच्यापरीक्षणाची यंत्रणा उभरुन नियमीत सर्वेक्षण करावे. ६) हवा प्रदूषणविषयक नियमांची काटेकारेपणे अंमलबजावणी करावी कायद्याचे पालन करावे. 
  6.  कारखाण्याच्या परिसरात हवा दमट ओलसर ठेवण्यासाठी कारंजे निर्माण करावेत हरीत पट्टा उभा करावा.
  7. अतीउंचीवरील विमानामुळे ओझोन थर विस्कळीत होतो म्हणून जास्त उंचीवरील विमान उड्डानास बंदी घालावी.
  8. खाजगी मोटारीच्या वापरापेक्षा सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वापराव्यात.. 
  9. शेतीत किटकनाशके जंतुनाशके तननाशके व रासायनिक खताचा वापर करु नये त्याऐजवी नैसर्गिक खतांचा वापर करावा.
  10. वस्तीतील उद्योगातील टाकाऊ पदार्थाची योग्य विल्हेवाट लावावी. 
  11. सार्वजनिक ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी धुम्रपानात बंदी करावी.
  12. याशिवाय अणुचाचण्यावर बंदी घालावी. व्यक्ती मरण पावल्यास विद्युत शवगृहाचा वापर करावा, अंगणात रस्ते, लोहमार्ग, बसस्थानक, शाळा, महाविद्यालयाच्या परिसरात वृक्ष लागवड करावी सर्वात महत्वाचे समाजात हवा प्रदूषण विषयक माहिती देऊन जाणीवजागृती निर्माण करावी त्यासाठी प्रसारमाध्यमे औपचारीक व अनौपचारीक शिक्षण, समाजसेवी संस्था यांची मदत घ्यावी.

अशाप्रकारे अनेक उपाय केल्यानंतर हवा प्रदूषण कमी करता येईल व निरोगी जीवन जगता येईल.


Meaning, causes, effects and solutions


Comments

Popular posts from this blog

Health and physical education -आरोग्य व शारीरिक शिक्षण Class 12th Project download

Environment education and water security - पर्यावरण शिक्षण व जलसुरक्षा Project 11th and 12th Class Project Download in PDF

Health and physical education class 12 solutions maharashtra board download in pdf in English