महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी || Top 100 important gk question and answers in Marathi
100 General Knowledge Questions and Answers
1. काही स्थायुंना उष्णता दिल्यस त्यांचे द्रवरूपात रूपांतर न होता एकदम वायुरूपात रूपांतर होते. यांस ………. असे म्हणतात.
Ans:- संप्लवन
2. निसर्गात ………… इतकी मुलद्रव्ये आढळतात.
Ans:- 92
3. ……… या शास्त्रज्ञाने कॅथोड किरण, अॅनोड किरण, प्रोटॉन व इलेक्ट्रॉन यांचा शोध लावला.
Ans:- सर जे.जे. थॉमसन
4. अणुशक्तिचे जनक ……….. यांना म्हटले जाते.
Ans:- रुदरफोर्ड
5. प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन यांची संख्या म्हणजे……..
Ans:- अणुअंक
6. अणुमधील ‘न्यूट्रॉन’ या कणांचा शोध ……… यांनी लावला.
Ans:- जॉन चॅडविक
7. ………… यांनी पहिली अणुविषयक प्रतिकृती सुचविली.
Ans:- सर जे.जे. थॉमसन
8. प्रोटॉन आणि न्युट्रॉन यांच्या एकूण संख्येला……… असे म्हणतात.
Ans:- अणु वस्तुमानांक
9. भोवरा, पंखा, पवनचक्की इत्यादींचे फिरणे ….. गतीची उदाहरणे आहेत.
Ans:- परिवलन
10. लंबकाच्या घडयाळातील लंबकाची गती किंवा शिवणयंत्रातील सुईची गती यांना…… म्हणतात.
Ans:- कंपनगती
11. अग्नीबाण (रॉकेट) ची गती न्यूटनच्या …………. नियमावर आधारित आहे.
Ans:- तिसऱ्या
12. संवेग, बल, वेग, विस्थापन, त्वरण इत्यादी भौतिक राशी …….. आहेत.
Ans:- सदिश
13. गुरूत्व त्वरणचे सर्वात जास्त मुल्य ध्रुवावर असते तर सर्वात कमी मुल्य …….. असते.
Ans:- विषुववृत्तावर
14. गुरूत्व त्वरणाचे सरासरी मुल्य ………….. मापले जाते.
Ans:- 9.8
15. गतिमान पदार्थाच्या गती ला विरोध करणाऱ्या बलास ………… म्हणतात.
Ans:- घर्षण बल
16. आपली मुळ अवस्था कायम ठेवण्याच्या वस्तुच्या प्रवृत्तीला…..असे म्हणतात.
Ans:- जडत्व
17. वस्तुमान आणि वेग यांच्या गुणाकारास ….. म्हणतात.
Ans:- संवेग
18. एक अश्वशक्ती (Hourse Power) म्हणजे …….
Ans:- 746 वॅट
19. ध्वनीचा वायू, द्रव, व स्थायू या माध्यमापैकी …… या माध्यमात सर्वाधिक वेग असतो.
Ans:- स्थायू
20. नॅचरल गॅस मध्ये मुख्यतः ……….. वायु असाते.
Ans:- मिथेन
21. शृंखला अभिक्रियेचे निंयत्रण करण्यासाठी बोरॉन स्टील किंवा ……….. कांड्यांचा वापर केला जातो.
Ans:- कॅडमिअम
22. ………… यांस ‘रसायनाचा राजा’ असे म्हटले जाते.
Ans:- सल्फ्यूरिक अॅसिड
23. …………. या वायूला ‘हसविणारा वायु’
Ans:- नायट्रस ऑक्साईड (N2O)
24. ………… किरणांचा वेग प्रकाशाच्या वेगाएवढा असतो.
Ans:- गॅमा
25. ……….. या वायुचा सडक्या अंडयासारखा वास असतो.
Ans:- हायड्रोजन सल्फाईट
26. ………… या वायुला ठसका आणणारा वास असतो.
Ans:- सल्फर डायऑक्साईड
27. पारा आणि गॅलिअम हे द्रवरूप धातू असून….. हा एकमेव द्रवरूप अधातू आहे.
Ans:- ब्रोमीन
28. अधातुंना चकाकी नसते तसेच ते विद्युत दुर्वाहक असतात. परंतु चकाकी असणारा व विद्युत वाहकही असणारा एकमेव अधातू…..
Ans:-ग्रॅफाईट
29. सोडियम – बाय – कार्बोनेट म्हणजेच खाण्याचा सोडा होय तर सोडीयम कार्बोनेट म्हणजेच ……. .. होय.
Ans:- धुण्याचा सोडा
30. बंदुकीच्या दारुत ……… या अधातूचा वापर होतो.
Ans:- सल्फर
31. गोबरगॅस सयंत्रातून ………. हा वायू मिळतो.
Ans:- मिथेन
32. स्थायुरूप कार्बनडायऑक्साईडला ……….. असे म्हणतात.
Ans:- शुष्क / कोरडा बर्फ
33. सर्व साधारण परिस्थितीत ………………. हा द्रव्यस्थितीत असणारा धातू आहे.
Ans:- पारा
34. ………… चा अपवाद सोडता सर्व अणुंच्या केंद्रकामध्ये न्यूट्रॉन असतात.
Ans:- हायड्रोजन
35. ………….व्यक्त करण्यासाठी डाल्टन हे एकक वापरतात.
Ans:- अणुवस्तूमान
36. बलाचे एम.के.एस. मधील एकक……. आहे.
Ans:- न्यूटन
37. कार्याचे एम.के.एस. मधील एकक………. आहे.
Ans:- ज्युल
38. वारंवारतेचे एकक ……… हे आहे.
Ans:- हर्टझ
39. ………….. सेल्सिअसला पाण्याची घनता महत्तम असते.
Ans:- ४ अंश
40. अल्बर्ट आइनस्टाइन या ………….. देशाच्या शास्त्रज्ञाने १९०५ साली अणुयुगाचा पाया रचला.
Ans:- जर्मन
41. प्रतिजीवसृष्टी निर्माण करण्याची क्षमता ………. तंत्रामुळे शक्य झाले.
Ans:- क्लोनिंग
42. अवकाशात मानव जिंवत राहू शकतो हे ……….. यांच्या यशस्वी अवकाश यात्रेनी सिद्ध केली.
Ans:- युरी गागारिन
43. सतिश धवन अवकाश संशोधन केंद्र ……… या ठिकाणी आहे.
Ans:- श्रीहरिकोटा (आंध्र प्रदेश)
44. ……….. साली नील आर्मस्ट्रॉंग हा चंद्रावर पाऊल ठेवणारा पहिला माणूस ठरला.
Ans:- १९६९
45. प्रत्येक दिवशी चंद्रोदय आदल्या दिवसापेक्षा सुमारे …………. उशीरा होतो.
Ans:- ५० मिनिटे
46. हॅले चा धूमकेतू ……….. वर्षांनी एकदा दिसतो.
Ans:- 66
47. भारताचा पहिला उपग्रह ………. हा १९ एप्रिल १९७५ रोजी आवकाशात सोडण्यात आला.
Ans:- आर्यभटट्
48. महाराष्ट्रात ……….. येथे अणुऊर्जा प्रकल्प आहे.
Ans:- तारापूर
49. शुद्ध सोने ………….. कॅरेटचे असते.
Ans:- २४
think work Vm knowledge
50. आधुनिक आवर्तसारणी ……… ह्यावर आधारीत आहे.
Ans:- मुलद्रव्यांचे अणुअंक
51. विभवंतराचे एस. आय. एकक ……. हे आहे
Ans:- व्होल्ट
52. मानवी रक्ताचे एकूण ………. गट पडतात.
Ans:- ४
53. विद्युत उर्जा व चुंबकत्व यांच्यामधील संबंध सर्वप्रथम ……….. यांनी शोधून काढला.
Ans:- ओरस्टेड
54. ……….. पासून मिळणारी ऊर्जा प्रदुषणरहित असते.
Ans:- सौरघट
55. सर्व इंधनात ………. चे कॅलरी मुल्य सर्वात अधिक असते.
Ans:- हायड्रोजन
56. स्पॉट हे ………… ऊर्जा स्त्रोत आहे.
Ans:- भूगर्भ औष्मिक
57. द्राक्षामधील आर्द्रता शोषणासाठी ………… वापरतात.
Ans:- सौर शुष्कक
58. एल.पी.जी. मध्ये ………. हे घटक असतात.
Ans:- ब्युटेन व आयसोब्युटेन
59. ध्वनीच्या तीव्रतेचे एकक ………. हे आहे.
Ans:- डेसीबल
60. ध्वनीचे प्रसारण …………. मधून होत नाही.
Ans:- निर्वात प्रदेश
61. ध्वनी ऊर्जेचे प्रसारण ………….. तरंगामार्फत होते.
Ans:- अनु
62. थंड प्रदेशातील जलचर प्राणी व वनस्पती …………. यामुळे सुरक्षित राहतात.
Ans:- पाण्याचे असंगत आचरण
63. रडार या यंत्रात चा ………. वापर केलेला असतो.
Ans:- रेडीओ लहरी
64. …………. पदार्थाची विशिष्ट उष्माधारकता सर्वाधिक असते.
Ans:- पाणी
65. क्ष-किरण म्हणजे ………….. आहेत.
Ans:- विद्युत चुंबकीय लहरी
66. जड केंद्रकाचे हलक्या केंद्रकात रुपांतर होत असताना ऊर्जा निर्माण होते. या अभिक्रियेस ………. म्हणतात.
Ans:- केंद्रकीय विखंडीकरण
67. केंद्रकीय विखंडन किंवा संमिलनात ………. या मुळे ऊर्जा निर्माण होते.
Ans:- वस्तुमानाचे ऊर्जेत रुपांतर
68. क्ष-किरणांचा शोध ………… या शास्त्रज्ञाने लावला.
Ans:- रॉन्टजेन
69. किपचे उपकरण ………… तयार करण्यासाठी वापरतात.
Ans:- हायड्रोजन सल्फाईड
70. अग्निशामक साधनामध्ये ………….. या वायुचा वापर केलेला असतो.
Ans:- कार्बन डायऑक्साईड
71. ………… हा कॅल्शिअम कार्बोनेटचा प्रकार आहे.
Ans:- संगमरवर
72. …………… पासून प्लॅस्टर ऑफ पॅरीस बनवितात.
Ans:- जिप्सम
73. फेरस सल्फेटला …………. असे म्हणतात.
Ans:- ग्रीन व्हिट्रीऑल
74. तुरटीचा वापर ……….. साठी करतात.
Ans:- रक्त प्रवाह थांबविणे
75. अवयव ……… पासून बनतात.
Ans:- उती
76. प्रथिने ही ………. ची बहुवारिके आहेत.
Ans:- अमिनो आम्ले
77. …………….. या मुलद्रव्याशिवाय इतर सर्व मुलद्रव्यांच्या अणुकेंद्रकात न्यूट्रॉन्स असतात.
Ans:- हायड्रोजन
78. प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी …………… आम्ल वापरतात.
Ans:- हायड्रोक्लोरीक
79. प्राचीन खगोल अभ्यासकांनी ………… नक्षत्रांची कल्पना केली आहे.
Ans:- २७
80. आधुनिक जैव तंत्रज्ञान ……… च्या पातळीवर कार्य करते.
Ans:- रेणु
81. शून्य या अंकाचा शोध …………. या भारतीय शास्त्रज्ञाने लावला.
Ans:- वराहमिहीर
82. पृथ्वी, त्रिशुल, व अग्री या क्षेपणास्त्रांच्या निर्मितीचे श्रेय ………… यांच्याकडे जाते.
Ans:- डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम
83. बल्बच्या दिव्यात ……….. ची तार असते.
Ans:- टंगस्टन
84. ………….. हा सर्वात हलका वायू आहे.
Ans:- हायड्रोजन
85. पाण्याचा द्रवणांक (गोठणाक) शुन्य अंश से. असतो. तर उत्कलनांक ……… असते.
Ans:- १०० अंश से.
86. पाऱ्याचा द्रवणांक वजा एकोणचाळीस अंश सेल्सीअस असतो तर उत्कलनांक ……
Ans:- ३५७ अंश से.
87. उकळत्या पाण्याचे तापमान ……. असते.
Ans:- १०० अंश से.
88. भूकंपाची तीव्रता मोजण्यासाठी …………. हे उपकरण वापरतात.
Ans:- सिस्मोग्राफ
89. केवळ प्रथिनांच्या अभावामुळे होणाऱ्या रोगास …… म्हणतात.
Ans:- सुजवटी
90. ऊर्जा, प्रथिने तसेच इतर पोषणतत्व यांच्या सतत अभावामुळे…. हा रोग होतो.
Ans:- सुकटी
91. लोहाच्या अभावामुळे ……….. हा रोग होतो.
Ans:- पंडूरोग/रक्तक्षय (अॅनेमिया)
92. आयोडिनच्या कमतरतेमुळे ……….. हा रोग होतो.
Ans:- गलगंड (गॉयटर)
93. कोवळ्या सुर्यप्रकाशात …….. ची निर्मिती त्वचेखाली होते.
Ans:- जीवनसत्व ‘ड’
94. दुधाच्या पाश्चरायझेशन प्रक्रियेत ……… चा नाश होतो.
Ans:- जीवनसत्व ‘ब’
95. रक्त गोठण्यासाठी ……. जीवनसत्त्व आवश्यक असते.
Ans:- के
96. जीवनसत्व ………………… चे संश्लेषण आपल्या शरीरात त्वचेखाली होऊ शकते.
Ans:- ड
97. ………. ही जीवनसत्वे मेद-द्राव्य असतात.
Ans:- अ आणि ड
98. ……….. ही जीवनसत्वे जल-द्राव्य असतात.
Ans:- ब आणि क
99. मानवात गुणसुत्रांच्या ……….. जोडया असतात.
Ans:- २३
100. मुलीचा जन्म ……… या गुणसुत्रांमुळे होतो.
Ans:- एक्स-एक्स
Important GK Questions In Marathi | महत्त्वाचे सामान्य ज्ञानाचे प्रश्न
महाराष्ट्र जनरल नॉलेज मराठी
Comments
Post a Comment
Thank you to visit My blog